Saturday, 4 April 2020

आपल्याच माजघरात... विनीत वर्तक ©






आपल्याच माजघरात... विनीत वर्तक ©

आपण जिकडे रहातो त्या भागाची, प्रांताची, राज्याची, देशाची माहिती आपण ठेवतोच. त्या भागात काय चांगलं, काय वाईट, काय बघण्यासारखं ते त्या भागात असलेली वैशिष्ठ ह्या बद्दल आवर्जून लक्षात ठेवतो. मग आपण विश्वाच्या पोकळीत ज्या अनंताचा भाग आहोत त्या एका छोट्या स्थानाबद्दल आपल्याला कितपत माहिती आहे. आपल्याच माजघरात अश्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. ज्या बद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. तर आपण आपल्याच माजघराची थोडी माहिती करून घेऊ.

आपली पृथ्वी, आपला सूर्य, आपली सौरमाला ज्या आकाशगंगेचा भाग आहोत ती म्हणजे 'मिल्की वे'. मिल्की वे आकाशगंगा ह्या विश्वाच्या पोकळीत आपला पत्ता आहे. पण ह्या मिल्की वे ची काही वैशिष्ठ अचंबित करणारी आहेत. आपण स्वतःला कितीही श्रेष्ठ समजलो तरी विश्वाच्या अनंत पोकळीत तर जाऊन दे पण आपल्याच आकाशगंगेत आपलं अस्तित्व किती लहान आहे ह्याची जाणीव आपल्याला होईल.

) आपल्या आकाशगंगेचा व्यास जवळपास ,००,००० ते ,२०,००० प्रकाशवर्ष इतका प्रचंड आहे. ( एक प्रकाशवर्ष म्हणजे जवळपास  लाख किलोमीटर / सेकंद ह्या वेगाने एका वर्षात प्रकाशाने कापलेले अंतर ) आज जर आपण एखाद यान  लाख किलोमीटर / सेकंद वेगाने पाठवलं तर आकाशगंगेच्या दुसऱ्या टोकावर जायला त्याला जवळपास ,२०,००० (एक लाख वीस हजार) वर्ष लागतील. हेच यान ह्या वेगाने पृथ्वीवरून चंद्रावर एका सेकंदात पोहचेल.

) आपली आकाशगंगा ही स्पायरल पद्धतीची आकाशगंगा आहे. आपली आकाशगंगा एखाद्या फुगलेल्या डिस्क सारखी आहे. मध्यभागी असलेल्या फुगीर भागाची जाडी जवळपास १००० प्रकाशवर्ष आहे. ह्याच मध्यभागातून आकाशगंगेच्या अनेक बाहू बाहेर निघतात. त्यातल्याच ओरायन नावाच्या एका बाहूवर आपली सौरमाला (सूर्या सोबत सगळे ग्रह) वसलेले आहेत. आपली सौरमाला साधारण ३०,००० प्रकाशवर्ष आपल्या आकाशगंगेच्या केंद्रापासून लांब असून सम पातळीवरून जवळपास २० प्रकाशवर्ष उंचीवर ६३ डिग्री अंशात कललेली आहे.

) आपल्या आकाशगंगेत जवळपास १०० - ४०० बिलियन तारे असावेत असा अंदाज आहे. तर जवळपास १०० बिलियन पेक्षा जास्ती ग्रह आपल्या आकाशगंगेत आहेत. मिल्की वे मधील अर्ध्यापेक्षा जास्त तारे हे आपल्या सूर्यापेक्षा वयोवृद्ध आहेत. साधारण त्यांच वय . बिलियन वर्षापेक्षा जास्ती आहे. ह्यातले बरचसे तारे हे रेड डवार्फ पद्धतीचे आहेत. आपल्या आकाशगंगेतील सगळ्यात वयोवृद्ध तारा जवळपास १३. बिलियन वर्षाचा आहे. (विश्वाची सुरवात साधारण १३. बिलियन वर्षापूर्वी झालेली आहे. म्हणजेच आपली आकाशगंगा विश्वाच्या निर्मितीच्या नंतर लगेचच निर्माण झालेली आहे. जर का सूर्याला एक धुळीचा कण मानलं तर मिल्की वे साधारण आपल्या भारताएवढी असेल. आपण अंदाज करू शकतो की आपल्याच माजघरात आपल्या सूर्याच अस्तित्व धुळीच्या कणाएवढ आहे. तिकडे आपली काय बिशाद.

) आपली सौरमाला आपल्याच आकाशगंगेच्या मध्याभोवती ,२८,००० किलोमीटर/ तास ह्या वेगाने प्रदक्षिणा घालत आहे. ह्याचा अर्थ एका तासापूर्वी आपल्या  विश्वातील स्थानापासून आपण ,२८,००० किलोमीटर लांब आलो आहोत. विश्वाच्या दृष्टीने आपण (पृथ्वी, चंद्र, सूर्य सगळेच ) इतक्या प्रचंड वेगाने मिल्की वे ला प्रदक्षिणा घालत आहोत. इतका वेग असून सुद्धा आपल्याला आपल्या आकाशगंगे भोवती एक प्रदक्षिणा घालायला साधारण २३० मिलियन वर्ष लागतात. म्हणजे आपण जिकडे आज आहोत तिकडे मागच्या वेळेस कदाचित डायनोसार पृथ्वीवर होते तेव्हा आलो होतो. . बिलियन वर्षाच्या आयुष्यात सूर्याच्या आजवर २० पेक्षा कमीवेळा मिल्की वे भोवती प्रदक्षिणा झाल्या आहेत.

) आपल्या आकाशगंगेचा जो काही फोटो आपण बघतो तो खरा नाही. आपल्या कल्पना शक्तीच्या आधारावर तो बनवलेला आहे. कारण आपण एखादं यान जरी आपण फोटो काढण्यासाठी प्रकाशाच्या वेगाने पाठवलं तर पूर्ण आकाशगंगेला आपल्या फोटो फ्रेम मध्ये घेण्यासाठी त्याला हजार वर्ष लागतील. आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी प्रचंड असं 'स्याजीटेरिस ' नावाचं कृष्णविवर आहे. जवळपास . मिलियन सूर्याचं एकत्रित वस्तुमान ह्या कृष्णविवराच आहे. पण ह्याचा व्यास जवळपास पृथ्वीच्या कक्षेएवढाच आहे. हे कृष्णविवर त्याच्या आजूबाजूला जे काही आहे ते गिळंकृत करत आहे. आपल्या मिल्की वे च्या वस्तुमानाच्या फक्त १०% वस्तुमान हे सगळ्या १००-४०० बिलियन तारे, १०० बिलियन ग्रह मिळून आहे. बाकी ९०% वस्तुमान हे डार्क मॅटर चं आहे. ( हे डार्क मॅटर म्हणजे काय ते वेगळ्या लेखात सांगेन. ). मिल्की वे मध्ये अनेक तारे वर्षाला सुपरनोव्हा, हायपरनोव्हा होऊन मरत आहेत. तर प्रत्येक वर्षाला - नवीन तारे जन्माला येतं आहेत. ही जन्म मृत्यू ची प्रक्रिया अशीच निरंतर चालू आहे.

तर असं आहे आपलं माजघर. ज्याच्यामध्ये अजून पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. आज तर फक्त ट्रेलर होता. बाकी पूर्ण चित्रपट बाकी आहे. मनुष्य प्राणी श्रेष्ठ वाटणाऱ्या अनेकांना कळून चुकलं असेल की विश्वाचं तर सोडून द्या ज्यात मिल्की वे सारख्या बिलियन आकाशगंगा आहेत. पण आपल्याच माजघरात  आपल्याला धुळी एवढ्या कणाची पण किंमत नाही.

फोटो स्रोत :- गुगल.  

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.





No comments:

Post a Comment