Wednesday, 29 April 2020

चेतन चिता... विनीत वर्तक ©

चेतन चिता... विनीत वर्तक ©

चेतन चिता हे नाव ऐकून आपल्यापैकी अनेकांना क्रांतिवीर चित्रपट आठवला असेल. ( ह्या चित्रपटात खलनायकाचं नाव चतुरसिंग चिता असं होतंकारण आपल्या माहितीचे दरवाजे फक्त क्रिकेटचित्रपट किंवा रोज २४ तास दूरचित्रवाणीवर झळकणाऱ्या ब्रेकिंग न्यूज वर मर्यादित आहेतत्या ब्रेकिंग न्यूज खऱ्याच ब्रेकिंग असतात काहा वेगळ्या अभ्यासाचा विषय आहेइतिहासाच्या पानात खरं तर सोनेरी अक्षर पण कमी पडतील असं हे नावं भारतीयांना लक्षात अथवा माहिती असण्याची सुतराम शक्यता नाहीपण इतिहास लिहणाऱ्या लोकांना त्याचं काही नसते कारण त्यांच्यासाठी देश हा सर्वप्रथम असतो

"हर करम अपना करेंगे  वतन तेरे लिए,
दिल दिया है जां भी देंगे  वतन तेरे लिए."......

१४ फेब्रुवारी २०१७ चा तो दिवस होतापूर्ण देशात प्रेमाचा दिवस साजरा होतं होतापण हातात बंदूक घेऊन देशाचं संरक्षण करणाऱ्या लोकांसाठी तर प्रत्येक दिवसचं देश प्रेमाचा असतोप्रेमाच्या दिवशी सुद्धा डोळ्यात तेल घालून सी.आर.पी.एफ.(The Central Reserve Police Force) ची  ४५ वी बटालियन बंडीपूरा इकडे एक शोधमोहीम करत होतीह्या मोहिमेचं नेतृत्व करत होते कमांडिंग ऑफिसर चेतन कुमार चिताह्या भागात लपून बसलेल्या लष्कर  तोय्यबा च्या अतिरेक्याला आपण पकडले जाणार असल्याचं लक्षात आलंत्याने शोध घेणाऱ्या त्या पोलीस सुरक्षा रक्षकांवर अंधाधुंद गोळीबार सुरु केलाकाय होते आहे कळायच्या आत गोळ्यांचा वर्षाव सगळीकडे सुरु झालाह्या अंधाधुंद गोळीबारात  सुरक्षाकर्मीना आपला जीव गमवावा लागला तर  जवान जखमी झालेएका नागरीकाला ही ह्या गोळ्यांनी आपलं लक्ष केलंअश्या बिकट परीस्थीतीत लिडर लीड फ्रॉम  फ्रंट हे सार्थ करताना चेतन चिता ह्यांनी मागचा पुढचा विचार  करता त्या अतिरेक्याच्या दिशेने उडी घेतली.

चित्रपटात खलनायक समोरून गोळ्या चालवताना हिरो त्याच्याकडे धावत जाताना आपल्याकडील बंदुकीने जश्या गोळ्या मारतो असं प्रत्यक्षात घडत होतंगोळ्यांच्या वर्षावात चेतन चिता ह्यांनी तब्बल १२ राउंड अतिरेक्याच्या दिशेने फायर केलेत्याच्यावर चाल करून जात असताना त्यांच्या डोकंपोटहातडोळे अश्या सर्व भागात तब्बल  गोळ्या घुसलेल्या होत्या गोळ्या अंगावर झेलून सुद्धा त्यांची बंदूक अतिरेक्यावर गोळ्यांचा वर्षाव करत होतीत्याला शांत केल्यावर चेतन चिता जमिनीवर कोसळलेत्यांना त्वरीत श्रीनगरला हॉस्पिटल ला नेण्यात आलंत्यांच्या शरीराचा एक्स रे काढल्यावर शरीरात सगळीकडे गोळ्यांच गोळ्या दिसत होत्यात्यांच्या कवटी मध्ये पण गोळी घुसलेली होतीपण अश्या परीस्थीतीत ही तो श्वास चालू होता फक्त आणि फक्त देशासाठी.... 

श्रीनगर मधून त्यांना दिल्ली मधल्या एम्स मध्ये आणलं गेलंत्याच्या शरीरात नक्की कुठून गोळ्या काढायला सुरवात करावी असा प्रश्न डॉक्टरांपुढे होता कारण गोळ्या लागलेली सर्व ठिकाण शरीराचा महत्वाचा भाग होतीएकेक गोळी डॉक्टरांनी काढायला सुरवात केली पण त्यांना चेतन चिता जिवंत राहतील का ह्याची काहीच कल्पना नव्हतीपण चेतन चिता ह्या सगळ्याला पुरून उरलेतब्बल  महिने कोमात राहिल्यावर मृत्यूला परत पाठवत ह्या बहादूर सैनिकाने पुन्हा एकदा डोळे उघडले ते देशभक्ती साठीचतोंडातून शब्द काढण्याची ताकद आल्यावर एक डोळा गमावल्यावर सुद्धा त्यांच्या तोंडावर हास्य होतपुन्हा एकदा देश रक्षणासाठी आपल्या कामावर परतण्याची त्यांना उत्सुकता लागली आहेजेव्हा मिनिस्टर ऑफ स्टेट होम आणि भारतीय आर्मी चे चीफ ह्यांनी भेट दिली असता त्यांनी काढलेले उद्गार त्यांच्या अतूट देशप्रेमाची साक्ष देतात.

I feel I have contributed something to the nation,"

ह्या घटनेतून ते वाचले नाहीत तर अवघ्या एका वर्षात त्यांनी पुन्हा एकदा देशाच्या रक्षणासाठी आपल्या ऑफीस मध्ये रीपोर्ट केलंशरीरात  गोळ्या घुसून जिवंत राहीलेल्या चेतन चिता ह्यांच शरीर जरी अतिरेक्यांच्या गोळ्यांनी पोखरलं असलं तरी त्यांचं मनोधैर्य आणि देशभक्ती ला त्या काहीच करू शकल्या नाहीत.

"My physiotherapy is going on. And, I am fighting fit. If my force and my country want me to go to field area and do operations. There will be no hesitation."

आपल्या युनिफॉर्म ला बघून ते हसत सांगतात,

"This is my second skin."

हे कुठून येत असेलत्यांच्याविषयी वाचताना आणि आता लिहताना पण डोळ्यात पाणी येते कि आजच्या स्वार्थासाठी जगणाऱ्या गर्दीत असे ही काही लोकं  आहेतज्यांच्यासाठी स्वार्थीपणाच्या कक्षाच वेगळ्या असतात.

ऑफीस जॉब दिल्यावर त्यांनी पुन्हा एकदा फिल्ड वर जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहेसी.आर.पी.एफच्या COBRA टीम मध्ये त्यांना जायचं आहेही टीम सी.आर.पी.एफच्या सगळ्यात घातक युनिटपैकी एक आहे. (COBRA is a specialised unit of the Central Reserve Police Force of India proficient in guerrilla tactics and jungle warfare.) पुन्हा एकदा भारताच्या शांततेतऐक्यात बाधा आणणाऱ्या अतिरेकी आणि नक्षलांचा त्यांना बिमोड करायचा आहेत्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना शांततेच्या काळात देण्यात येणाऱ्या किर्ती चक्र पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

सर तुम्ही एका वेगळ्या उंचीवर आहातअंगावर गोळ्या झेलून सुद्धा पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षितेसाठी पुन्हा एकदा आपलं सर्वस्व बलिदान करण्याची तुमची वृत्ती शब्दांपलीकडची आहेआम्ही भारतीय करंटे आहोत कारण अश्या लोकांच्या कर्तृत्वाची जाणीव  आम्हाला कधी होते ना आम्ही असं काही वाचण्याचा प्रयत्न करतो तरीसुद्धा ह्या मातीसाठीदेशासाठीतिरंग्यासाठी आपलं सर्वस्व देणारे शूरवीर सैनिक आपलं काम शांतपणे करत असताततुमच्या पराक्रमाला ह्या भारतीयाचा  कडक सॅल्यूट आणि जाता जाता ह्या ओळी तुमच्यासाठी....

तेरी गलियों में चलाकर नफ़रतों की गोलियां
लूटते हैं कुछ लुटेरे दुल्हनों की डोलियां
लुट रहे है आप वो अपने घरों को लूट कर
खेलते हैं बेखबर अपने लहू से होलियां
हम जिऐंगे और मरेंगे  वतन तेरे लिए  

दिल दिया है जां भी देंगे  वतन तेरे लिए......... 

जय हिंद!!!
फोटो स्रोत :- गुगल
    
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

2 comments:

  1. These people's are out of our thinking, a big salute to this great leader.

    ReplyDelete
  2. These people's are out of our thinking, a big salute to this great leader.

    ReplyDelete