Monday 20 April 2020

१९७१ ची अधुरी प्रेम कहाणी... विनीत वर्तक ©

१९७१ ची अधुरी प्रेम कहाणी... विनीत वर्तक ©

भारताच्या क्षितिजावर एक तारका उदयाला येतं असतेआसमंतात तिच्या येण्याने काहीतरी वेगळं घडणार ह्याची चाहूल लागलेली असतेती तारका  एक सुंदर वळण घेतेत्या वळणावर तिच्या सोबत एक सुंदर तारा चमकायला लागतोअगदी थोडा काळत्या दोघांचा प्रवास भारताच्या आकाशात एक नव्या प्रेम कहाणीला लिहणार असताना तो तारा अचानक गायब होतोत्या ताऱ्याच्या अचानक गायब होण्यामुळे त्या तारकेचं तेजच मावळतेती सगळ्या आसमंतात त्याचा शोध घेतेत्या आकाशात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक ताऱ्यालाग्रहांनासूर्याला सगळ्यांना विचारते पण तो तारा हरवतो तो कायमचाआजही ती तारका भारताच्या आकाशात दूर कुठेतरी अंधुक होऊन वाट बघते आहे त्या ताऱ्याची ह्याच आशेवर की तो पुन्हा कुठेतरी येईल आणि आपली प्रेमकहाणी सफल होईलही गोष्ट नाही तर खऱ्या आयुष्यात घडलेली घटना आहेतो गायब झालेला तारा आहेफ्लाईट लेफ्टनंट विजय वसंत तांबे आणि भारताच्या क्षितिजावर त्यांचा आजही शोध घेणारी ती तारका म्हणजेच सलग तीन वेळा राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जिंकणाऱ्या दमयंती सुभेदार तांबे.

 डिसेंबर १९७१ चा दिवस होताभारतपाकीस्तान युद्ध सुरु होतंफ्लाईट लेफ्टनंट विजय वसंत तांबे आपल्या सुखोई  लढाऊ विमानातून पाकीस्तान च्या सरहद्दीत जाऊन शत्रूचा बिमोड करत होतेह्या चकमकीत त्यांच विमान पाकीस्तानात कोसळलं आणि पाकिस्तान सैनिकांनी त्यांना युद्धकैदी बनवलंही बातमी दमयंती तांबे ह्यांना काही दिवसांनी सरकार कडून कळालीअवघ्या १८ महिन्यांच्या प्रेमाला दृष्ट लागली होती पण एकच आशा होती की आज ना उद्या ते परत येतीलपण पाकीस्तान सारख्या भिकारड्या राष्ट्राकडून अशी अपेक्षा ठेवणं किती चुकीचं ह्याची जाणीव व्हायला वेळ लागला नाहीआज जवळपास ४८ वर्ष होतं आली पण पाकीस्तान भारताच्या ५४ सैनिकांबद्दल एक चकार शब्द ही काढायला तयार नाहीभारत सरकारचे प्रयत्न आणि आंतरराष्ट्रीय दबावाखाली ह्या सैनिकांच्या कुटुंबियांना पाकीस्तानात बोलावून त्यांचा अपमान करण्याचं नाटक त्यांनी २००७ मध्ये केलंपण कुत्र्याचं शेपूट कधी सरळ होतं नसते हेच खरं.

दमयंती सुभेदार तांबे ह्यांचा जन्म अलाहाबाद चामूळचे मराठी असले तरी घरी हिंदी भाषिक वातावरणात मोठ्या झाल्याबॅडमिंटन खेळाकडे त्या लहानपणापासून ओढल्या गेल्यालग्नासाठी घरच्यांनी स्थळ बघायला सुरवात केली तोवर त्या दोन वेळा राष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या होत्याभारतीय सेनेत फ्लाईट लेफ्टनंट असलेल्या मुळच्या हैद्राबाद मधल्या विजय तांबे ह्यांच्याशी त्यांच लग्न झालंलग्न झाल्यावर त्यांनी एक इच्छा होती ती म्हणजे राष्ट्रीय स्पर्धेच्या करंडकावर तांबे हे आडनाव कोरलं जावंदमयंती सुभेदार तांबे नी तिसऱ्यांदा राष्ट्रीय स्पर्धा जिंकताना त्यावर तांबे हे आडनाव कोरलंपण हा आनंद क्षणिक ठरलाअवघ्या काही महिन्यांच्या अंतराने युद्धात फ्लाईट लेफ्टनंट तांबे हे युद्धकैदी झाल्याची बातमी आलीते परत येईपर्यंत बॅडमिंटन खेळणार नाही हा प्रण त्यांनी केला आणि भारताच्या आकाशात तेजाने तळपणारी एक २३ वर्षाची तारका अचानक अस्ताला गेली.

फ्लाईट लेफ्टनंट विजय तांबे ह्यांच्या सुटकेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेअनेक पंतप्रधानसचिवरक्षा मंत्री आणि इतर सरकारी अधिकारी आले आणि गेले पण आजतागायत हा लढा सुरु आहेहे सर्व भारतीय सैनिक जिवंत आहेत ह्याच्या दाखल्या देणाऱ्या अनेक गोष्टी उजेडात आल्या होत्या१९७५ साली टी.युसूफ ह्या बांगलादेश च्या नौदल अधिकाऱ्याने विजय तांबे च्या चुलत्यांना जे की डॉक्टर होते असं सांगितलं होतं की फैसलाबादपाकीस्तान च्या जेल मध्ये त्यांनी हे आडनाव बघितलं होतंएका कैद्याने जेल च्या भिंतीवर हे नाव कोरलं होतं आणि त्याच्या जबड्यावर एक खूण होतीह्या दोन्ही गोष्टी फ्लाईट लेफ्टनंट विजय तांबे च्या बाबतीत जुळत होत्याजयंत जठार हे विजय तांबे ह्यांचे चुलते अंडर १९ च्या क्रिकेट टीम मॅनेजर म्हणून पाकिस्तान ला १९८९ मध्ये गेले होतेतिकडे त्यांची भेट जनरल टिक्का खान (त्यावेळचे पंजाब चे गव्हर्नरह्यांच्याशी झालीखूप विनंती केल्यावर त्यांना विजय तांबे ना बघण्यासाठी फैसलाबाद इथल्या जेल मध्ये जाऊ दिलं गेलंतिथे त्यांनी कारागृहात असलेल्या फ्लाईट लेफ्टनंट विजय तांबे ह्यांना ओळखलं पण त्यांना कोणत्याही पद्धतीने बोलण्याची संधी दिली नाही.

ह्याशिवाय इतर अनेक युद्धकैदी असलेल्या सैनिकांची पत्रे तसेच फोटो सुद्धा टाइम मॅगझीन ने प्रसिद्ध केले आहेतभिकारड्या पाकीस्तान ने २००७ साली १५ लोकांच्या टीम ला आपल्या जेल मध्ये युद्धकैदींची ओळख पटवण्यासाठी नेत असल्याचं जगाला भासवलंह्यात दमयंती तांबे ही  होत्याप्रत्यक्षात कोणालाच कोणत्याही युद्धबंदी असलेल्या कैद्याला भेटण्याची अनुमती दिली गेली नाहीतसेच सगळ्या जेल मधल्या त्या कैद्यांना पाकीस्तान ने आधीच दुसऱ्या ठिकाणी हलवलं होतंफक्त जगाच्या समोर आपण माणुसकी दाखवत असल्याचं नाटक करून आपल्या हरामीपणाची साक्ष दिलीपण दमयंती तांबे अजूनही थकलेल्या नाहीतआज ७२ वर्षाच्या असणाऱ्या त्यांना अजूनही वाटते की भारत सरकारने पाकीस्तान वर दबाव बनवून भारताच्या त्या पराक्रमीशूरवीर सैनिकांना पुन्हा एकदा भारतात आणण्यासाठी प्रयत्न करावे.

ह्या सगळ्या काळात दमयंती तांबेसाठी आयुष्य किती कठीण गेलं असेल ह्याची कल्पना आपण करू शकत नाहीआपलं पूर्ण करीअर,आयुष्य त्यांनी फ्लाईट लेफ्टनंट विजय तांबे ह्यांच्या सुटकेसाठी पणाला लावलं पण १९७१ साली अधुरी राहिलेली प्रेमाची गोष्ट अजूनही तशीच अर्धवट आहेफ्लाईट लेफ्टनंट विजय तांबे ह्यांनी आपल्या काश्मीर इथल्या हनिमून च्या अलबम मधील एका फोटो खाली मथळा लिहलेला आहे तो असा
   
    “Life, certainly, is unpredictable,”......

कदाचित त्यांच्या ह्या अधुऱ्या प्रेमकहाणीत एक आनंदाच वळण येवो ह्याच आशेने त्यांच्या पराक्रमाला आणि दमयंती तांबे ह्यांच्या निरंतर लढाईला एका भारतीयाचा कडक सॅल्यूट........

जय हिंद!!!...
  
फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



2 comments:

  1. काय लिहू शब्दच सुचत नाहीत. तुम्हा दोघांसमोर नतमस्तक

    ReplyDelete
  2. I salute the sacrifice of Mrs Tambe and sufferer at Pakistani Jai Mr Tambe if there is any hope than mr PM of our Nation mr Modee jee will try than it will be success and hope of Mrs Tambe will fulfeel

    ReplyDelete