Friday 24 June 2016


इमशोनल फर्स्ट एड.. विनीत वर्तक

फर्स्ट एड च शिक्षण आपण शाळेपासून घेतच येतो. शाळा, कोलेज ते अगदी व्यावसाईक आयुष्यात ते अनिर्वार्य आहेच. त्याच महत्व हि तितकच. अगदी वेळीच मिळालेली मदत एखाद्याच आयुष्य बदलू शकते. लहान मुलांना सुद्धा अगदी त्याची जाणीव असते. म्हणजे अगदी थोडस खरचटल तरी ब्यांड डेड ते बर्नोल आणि डेटोल पर्यंतची नाव शेंबड्या मुलांना पण ठाऊक असतात. ते कुठे ठेवल आहे इथवर ती माहिती अगदी तोंडपाठ असते.

पण शरीराच्या फर्स्ट एड साठी इतके जागरूक असणारे आपण मनाच्या फर्स्ट एड साठ...ी काय करतो? मुळात फिजिकल फर्स्ट एड ठाऊक आहे पण हे इमोशनल फर्स्ट एड काय प्रकार आहे ह्याचा आपण कधी विचार तरी केला आहे का? मानसिक धक्का हा शारीरिक व्याधी आणि आजारापेक्षा अधिक धोकादायक असतो शिवाय त्याचे दूरगामी परिणाम हि खूप क्लेशदायक असतात. हे विज्ञानाने सिद्ध करून सुद्धा आपण इमोशनल फर्स्ट एड बद्दल पूर्णतः अनभिज्ञ आहोत.

खरचटल्या पासून ते अगदी फ्र्याक्चर पर्यंत फर्स्ट एड काय आणि कस करायच ह्याच शिक्षण दिल जाते. पण मनाच्या हिंदोळ्यावर होणार्या अपघातासाठी काहीच नसते. इमोशनली आपण जास्ती धडपडतो राग, रुसवा, फसवल जाणे, अपमान ते कमी लेखण ह्या सगळ्याचा भडीमार रोज इकडून, तिकडून होत असतो. त्यामुळे निर्माण होणारा स्ट्रेस, निगेटीविटी , कमीपणाची भावना, आपला सेल्फ एस्टीम, इगो ह्याला कस म्यानेज करायचं ह्याबद्ल काहीच माहिती नसते. त्याला क्युअर करण्यासाठी फर्स्ट एड काय करतो आपण तर उत्तर काहीच नाही असच येईल.

शारीरिक व्याधींच्या मानाने मानसिक व्याधी सतत आपल्यावर परिणाम करत असतात. पण त्याकडे आपण बघत सुद्धा नाही. त्याचे परिणाम दिसल्यावर मग आपण मलमपट्टी करतो जी बर्याच वेळा तात्पुरती असते. वेळ निघून गेल्यावर केलेले उपाय योग्य तो परिणाम दाखवत नाहीच. इमोशनल फर्स्ट एड म्हणजे नक्की काय? ह्याच उत्तर खरे तर सोप्प आहे पण साधन आणि परिणाम खूप वेगळे आहेत.

आपल्याला असे कधी प्रसंग आले कि जिकडे तुम्हाला अपमान, त्रास, मानसिक डीस्टरबर्न्स जाणवला अश्या वेळी स्ट्रेस , नैराश्य, निगेटीव विचार ह्यांच्या खोल गर्तात न जाण्यासाठी आपण कसे स्वताला सावरू शकतो ह्याची एक यादी. जी आपल्याजवळ अगदी फर्स्ट एड बॉक्स प्रमाणे तत्काळ मिळेल. मग ते काही असेल एखाद गाण, एखाद्या जवळ मन मोकळ करणे, एखाद पुस्तक, चित्र, पिक्चर, किंवा आवडता टाईमपास किंवा अगदी काहीही जे आपल्याला ह्या नकारात्मक विचार आणि चक्रात जाण्यापासून रोखेल. कारण जर आपण हि लिंक त्याच वेळी ब्रेक केली तर आपण जास्ती चांगल्या रीतीने स्वतला सावरू शकू. प्रोफेशनली आणि पर्सनली पण. काही वेगळ करण्याची हि गरज नाही. फक्त स्वस्थ असताना आपल्याला नक्की काय, कोण, कसे सावरू शकते ते समजून घ्यायचं.

इमोशनल फर्स्ट एड आजची सगळ्यात मोठी गरज आहे. तेव्हा बनवूया एक इमोशनल फर्स्ट एड बॉक्स कदाचित तुमच्या पेटीत मी असेन आणि माझ्या पेटीत तुम्ही.अशी हि पेटी आपल्या बर्नोल, डेटोल सारखी जवळ ठेवूयात. काय माहित त्याची कधी गरज लागेल..

No comments:

Post a Comment