Friday 24 June 2016


    फ्लोरिडा च्या निमित्ताने.... विनीत वर्तक
    फ्लोरिडा ह्या अमेरिकेतील राज्यात झालेल्या अमानुष हत्याकांडाने पुन्हा एकदा आपल्या नातेसंबंधातील एक दुर्लीक्षित मुद्दा समोर आणला आहे. आयसीस जरी ह्या हत्याकांडाची जबाबदारी घेत असली तरी त्या मागच कारण वेगळच आहे. समलेंगिक संबंध हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. ह्यावर अनेक मत प्रवाह आहेत आणि ते त्यांच्या दृष्टीने बरोबर हि आहेत. पण कोणाच्या जिव घेऊन आपले मुद्दे आणि मत पुढे जात नसतात हे सत्य आयसीस सारख्या दशहतवादी संघटनांना कधी कळणार? कळले... तरी त्याचा वापर स्वताच्या स्वार्थासाठी करून घेणे ते थांबवतील अस दिसत तरी नाही.
    समलेंगिक संबंध हा विषय किचकट आहे. काही व्यक्तीन मध्ये असणार्या ह्या भावना आता उघडपणे पुढे येत आहेत आणि त्याला समर्थन हि मिळत आहे. अर्थात चांगले वाईट ह्या वादात मला जायचे नाही. समलैंगिकता हि विरळ अशी भावना आहे त्यात काही वाईट नाही अस माझ स्वताच मत आहे. अर्थात आता त्याच जे बाजारीकरण, अंधानुकरण होत आहे त्याला मात्र माझा तीव्र आक्षेप आहे. निसर्ग नियमानुसार आपल्या भावना स्पेशली फिजिकल पूर्ण केल्यावर काहीतरी चेंज म्हणून समलैंगिकतेकडे वळण्याची जी प्रथा चालू आहे ती मुळ स्त्री पुरुष नात्याला कुठेतरी मुळासकट उचकट्वून काढते आहे.
    समलैंगिकता हि विकृती नसली तरी चेंज म्हणून ती स्वीकारणे हि विकृती आहे. जसे योनी मधून शारीरिक भावना उपभोगल्या नंतर चेंज म्हणून पार्श्वभागाचा वापर करणे जितकी विकृती तितकीच समलैंगिकता आहे. चेंज , क्रेझ आणि यो म्हणून नवीन पिढी ह्या कडे झपाट्याने वळत आहे. अर्थात लैंगिक शिक्षण आणि लैंगिकता ह्या बद्दल असलेली निष्क्रियता त्याला जास्ती कारणीभूत आहे. आज किती स्त्रिया आणि पुरुष स्वताच्या शरीराबद्दल जागरूक आहेत? आपल्या जनेनद्रीयांच्या बद्दल किती जणांना माहिती असते? असली तरी तिच्या कडे समाज, संस्कार ह्याचा पगडा इतका असतो कि ते काहीतरी घाण आहे इथवर आपली उडी जाते.
    सेक्स हा मुळात शरीरात नसून त्याच केंद्र मन असते हे हि समजायला आपल्याला वयाची चाळीशी आणि पन्नाशी गाठावी लागत असेल तर विसाव्या किंवा तत्पूर्वी निर्माण होणार्या लैंगिक भावनांचं २०-२५ वर्षात काय होत असेल ह्याचा विचार न केलेला बरा. समलैंगिकता, सेक्स आणि एकूणच लैंगिक शिक्षण मग ते कोणत्याही स्वरुपात असो पुढल्या पिढीला त्यांच्या भावना उद्दीपित होतानाच देण हि काळाची गरज आहे. कारण लपलेलं असल कि आपण शोधायचा प्रयत्न करतो आणि समोर असल कि त्याच काही आकर्षण रहात नाही हा नियम तिथेही लागू आहे.
    गे क्लब , लेस्बियन क्लब आणि एकूणच समलैंगिक व्यक्ती ह्याचा प्रसार अमेरिकेत असला तरी भारताच्या किंबहुना आपल्या प्रत्येकाच्या दरवाज्यावर ह्या गोष्टी समोर येऊन उभ्या आहेत. त्याला समाज, संस्कार आणि देवाच्या झापड्यात न बसवता अभ्यासाच्या साच्यात बसून नवीन पिढीला विचार करायला शिकवलं तर देवाच्या नावाने अनेक निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या फ्लोरिडा सारख्या अनेक घटना टाळू शकू.


No comments:

Post a Comment