IQ च EQ... विनीत वर्तक
स्पर्धेच्या ह्या युगात झाडून सगळे पालक आपआपल्या पाल्याच्या नंबर, ग्रेड साठी सतत चिंतामग्न असतात. आपण अनाहृतपणे आपल्या पाल्याला न संपणार्या शर्यतीत ढकलत असतो. ज्या शर्यतीच्या नंबर, ग्रेड चा खरे तर आपल्या आयुष्यात काहीच अर्थ नसतो. कोण कितवीत पहिला आला कि दुसरा हे आपल्याला आठवते का? त्या नंबर चा आपल्या आयुष्यात किती संबंध आहे? मी १५ वर्षापूर्वी ३ रा नंबर काढला ह्याचा आत्ता आपण करीत असलेल्या कामाशी तसा काहीच संबंध नसतो. अर्थात मिळवलेले मार्क आणि ग्रेड एक आत्मिक समाधान नक्कीच देतात पण जेव्हा ते स्वताहून मिळवण्याची उर्मी असेल तेव्हाच.
जवळपास ९५% अधिक वेळा पालक आपल्या स्वप्नांचे पंख मुलांच्या आयुष्याला लावून त्यातून उडण्याचा आनंद घेतात. मला नाही जमल मग माझा मुलगा, मुलगी ते स्वप्न पूर्ण करेल किंवा केल हि असली वाक्य आपण अनेक पालकांच्या तोंडून ऐकतो. ते ऐकू येण्यासाठी मोजलेली किंमत किती जबरी असते. ह्याची अनेक पालकांना जाणीव सुद्धा नसते. आपल्या मुलाने, मुलीने अनेक यशस्वी शिखर गाठावी असे कोणत्या पालकांना वाटणार नाही. पण ते करताना आपण त्याचं बालपण, अस्तित्व, तर नष्ट करत नाहीत न ह्याचा सुजाण पालकांनी विचार करायला हवा.
IQ ( intelligence quotient) म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी (An intelligence quotient (IQ) is a total score derived from one of several standardized tests designed to assess human intelligence. ) आपण आपल्या पाल्याची नेहमीच करत असतो. किंबहुना त्यावरून हुशारीचे ठाकतोळे मांडले जातात. पण इथेच खरी मेख आहे. सगळी खूप उच्च IQ ( intelligence quotient) असणारी मुल आयुष्यात यशस्वी असतात का? तर ह्याच उत्तर नाही अस आहे. बुद्धिमत्ता आयुष्य सुखी, समृद्ध आणि समाधानी असण्याविषयी कोणतेच ठोकताळे मांडू शकत नाही. तरीपण आपण ह्याविषयी प्रचंड आग्रही असतो. किंबहुना त्यावरून मुलांची गणना हुशार आणि ढ अशी होते. ह्यात एक वेगळी बाजू आहे. जी तर अनेक पालकांना माहित नाही किंवा माहित असून त्याचा आपल्या पाल्यांच्या आयुष्यात किती महत्वाचा रोल आहे ह्याबद्दल ते अनभिज्ञ आहेत.
Emotional intelligence (EI) or emotional quotient (EQ) is the capacity of individuals to recognize their own, and other people's emotions, to discriminate between different feelings and label them appropriately, and to use emotional information to guide thinking and behavior. इ क़्यु हि काळाची गरज आहे. जास्ती इ क्यू असणारे सगळेच आयुष्यात समाधानी, सुखी आणि समृद्ध असतात. कारण सुख, समाधान, आनंदी हे मेंदूत नाही तर मनाची कवाडे आहेत. जी मुल किंवा व्यक्तींमध्ये हे जास्ती असते. ते हटकून वेगळ्या आपल्याला गर्दीत दिसतात.
यशस्वी माणसांच्या मागे आणि त्यांच्या यशात अनेक लोक प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे सहभागी असतात. पण अयशस्वी व्यक्ती, मुल ह्यांच्या सोबत ते एकटेच असतात. तेव्हा त्यांचा IQ ( intelligence quotient) ठरवत नाही कि ह्याच्या पुढे त्याचं पाउल काय असेल तर Emotional quotient (EQ) ठरवतो कि ह्यातून पुढे कोणत वळण ती व्यक्ती घेईल. मग ते फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उडी असेल किंवा आत्महत्येच्या वाटेच वळण असेल.
एक पालक म्हणून मुलांना योग्य रस्ते दाखवायला हवेतच ते आपल कर्तव्य आहेत. पण कोणता रस्ता त्याने किंवा त्याने स्वीकारावा आणि त्या रस्त्यावरच कोणत वळण त्याने किंवा त्याने घ्यावं हे मात्र त्यांना ठरवायचं स्वातंत्र्य द्यावं. तसेच ते योग्य पद्धतीने निवडण्यासाठी IQ ( intelligence quotient) हवाच पण त्यातील खाचखळगे आणि एक वळण स्वतः निर्माण करण्यासाठी त्या Emotional quotient (EQ) ची जोड हवीच. IQ च EQ जर माहित असेल तर यश आणि अपयश कोणत्याहि वळणावरच असू देत त्याची सोबत करणार कोणी तरी नेहमीच आपल्या सोबत असेल.
No comments:
Post a Comment