नाविक.... विनीत वर्तक
‘‘Navic’’ (Navigation with Indian Constellation)
गेल्या आठवड्यात इस्रो ने आपला शेवटचा आय आर एन एस एस ह्या मालिकेतील शेवटचा उपग्रह प्रक्षेपित केला. पंतप्रधान मोदी नी ह्याच प्रणाली च नाविक अस नामकरण केल. खरे तर हि प्रणाली आधीच चालू झाली होती पण अपेक्षित सुसूत्रता येण्यासाठी हा सातवा उपग्रह गरजेचा होता. अमेरिका, रशिया, चीन आणि युरोपियन युनियन नंतर अशी जी पी एस प्रणाली असणारा भारत हा जगातील ५ देश ठरला आहे. कारगिल युद्धात अमेरिकेने मदत देण्यास नकार दिल्यावर आपण आपले रस्ते शोधले पाहिजेत हा विचार पुढे आला. गेल्या आठवड्यात आपण तो पूर्णत्वाला नेला. मोदी नि ह्या इस्रो च्या यशानंतर ट्विट केलेल वाक्य खूप काही अधोरेखित करून जाते “आता आपण आपला मार्ग ठरवू जो कि आपण आपल्या तंत्रज्ञाने विकसित केला आहे”. भारतीय खलाशी आणि कोळी बांधव जसे समुद्राच्या क्षितिजावर नवीन मार्ग शोधून काढतात. अनेक माहित नसलेल्या रस्त्यावरून परिक्रमा करतात त्याच प्रमाणे भारत आता स्व बळावर हे करू शकतो म्हणूनच नाविक हे नाव खूप समर्पक वाटते.
१४२० कोटी रुपयांची हि मालिका जगातील सर्वात स्वस्त जी पी एस प्रणाली आहे. भारतासोबत भारताच्या आजूबाजूच्या जवळपास १५०० किमी च्या टप्प्यातील प्रत्येक गोष्टीचा मागोवा आपल्याला आता घेता येणार आहे. आख्खा आशिया खंड ते अगदी ऑस्ट्रेलिया पर्यंत ह्याची रेंज आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या देशांना हि ह्याचा फायदा घेता येणार आहे. तसेच ह्यात दोन भाग असल्याने एक भाग हा सामरिक गोष्टींसाठी राखून ठेवण्यात आला आहे. ज्याचा उपयोग युद्ध, नैसर्गिक आपत्ती, टेहळणी ह्या सर्वासाठी करता येणार आहे. १९८० पर्यंत उपग्रह पाठवण्यासाठी धडपडणाऱ्या इस्रो ची २०१६ पर्यंत स्वताच जी पी एस बनवण्याची वाटचाल भारतीयांसाठी नक्कीच अभिमानाची आहे.
१९६९ सुरु झालेल्या इस्रो ने खूप मोठा टप्पा गाठला आहे. मेक इन इंडिया, मेड इन इंडिया विथ जुगाड ह्या तीनही शब्दांना जागत इस्रो ने जगात फ्रुगल इंजिनियरिंग ची सुरवात केली आहे. इस्रो चे स्पेस प्रोग्राम जगातील सर्वात स्वस्त पण त्याच वेळेस सगळ्यात भरवश्याचे मानले जातात. मग ते मार्स मिशन असो वा नाविक. सर्वात कमी खर्चात, कमी वेळेत आपल्या भरवश्याच्या रॉकेट प्रणालीने इस्रो ने जगात आपला दबदबा केला आहे. ३५ मिशन एका पठोपाठ एक यशस्वी करणारी पी एस एल व्ही रॉकेट प्रणाली कोणत्याही आंतरराष्ट्रीय रॉकेट पेक्षा उच्च तोडीची आहे. सध्या इस्रो कडे उपग्रह पाठवण्यासाठी वेटिंग लिस्ट आहे. जवळपास जगातील सर्व देश आपले उपग्रह इस्रो तर्फे पाठवू इच्छित आहेत. म्हणूनच गेल्याच आठवड्यात अमेरिकेतील काही संस्थांनी ह्या बाबत अमेरिकन प्रशासनाकडे तक्रार केली होती. इस्रो च्या बजेट मध्ये आम्ही उपग्रह पाठवू शकत नाही. इस्रो स्वस्तात हे करत असल्याने आता अमेरिकन संशोधक, प्रयोगशाळा आणि संस्था इस्रो कडे वळत आहेत. ह्यामुळे अमेरिकन उपग्रह बनवणार्या संस्था तोट्यात जाऊ शकतात.
येत्या काळात इस्रो चे प्रोग्राम बघितले तर थक्क व्हायला होईल. आदित्य हा सूर्याचा अभ्यास करण्यासाठी प्रोग्राम आहे, चांद्रयान २ वर काम चालू आहे, जी एस एल व्ही माख ३ हा ४ टन वजन वाहून नेणारा उपग्रह अभ्यासात आहे. (व्हीनस) शुक्र ग्रहावर जाण्यासाठी प्रणाली विकसित करत आहे, निसार The Nasa-Isro Synthetic Aperture Radar (NISAR) ह्या प्रणाली वर काम सुरु आहे. तसेच री एन्ट्री करणारे स्पेस शटल व माणसाना घेऊन जाऊन शकणारी प्रणाली ह्या वर सुद्धा काम चालू आहे. त्याच्या जोडीला अनेक स्वदेशी बनावटीचे उपग्रह जे वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोगी पडतील त्याचं निर्माण तसेच प्रक्षेपण व ह्या सगळ्यावर मात म्हणून अनेक विदेशी उपग्रह जे वेटिंग लिस्ट मध्ये आहेत रॉकेट मिळण्यासाठी. हा अश्या अनेक पातळीवर काम करून आणि एक सरकारी उपक्रम असून सुद्धा भारताची पताका इस्रो ने नुसतीच तळपत नाही ठेवली आहे तर त्याचा आता दबदबा स्थापन केला आहे.
नाविक हा एक पाडाव आहे. भारतीय शास्त्रज्ञ, अभियंते ह्याचं अभिनंदन कराव तेवढ थोडच आहे. ये तो ट्रेलर हे पिक्चर अभी बाकी हे म्हणत सगळे पुन्हा एकदा आपल्या कामात गुंतले आहेत. अजून एका नवीन न शोधलेल्या रहस्याचा शोध घेत नाविक बनून.
No comments:
Post a Comment