Friday 24 June 2016


आर एल व्ही- टी डी - पहिल पाउल - विनीत वर्तक

गेल्याच आठवड्यात इस्रो ने आपल्या रीयुझेबल लोंच वहिकल - टेकोनोलोजी डेमोंसट्रेटर (आर एल व्ही- टी डी) च यशस्वीरित्या प्रक्षेपण केल. एका बुस्टर च्या टोकाला एखाद्या एस यु व्ही गाडी च्या आकाराच्या ह्या यानाला ७० किमी उंचीवर अवकाशात सोडून पुन्हा जमिनीवर आखून दिलेल्या ठिकाणी उतरवण्यात इस्रो ला यश मिळाल. हे उड्डाण एक टेक्निकल डेमोंसट्रेशन असल तरी भविष्यातल्या मानवी उड्डाणाच पाहिलं पाउल इस्रो ने टाकल.
हे यश खूप अर्थानी महत्वाच आहे. कारण अवकाशातून एखादी वस्तू पुन्हा जमिनीवर येताना वातावरणाच्या घर्षणाचा सामना त्याला करावा लागतो. निर्माण होणार तापमान हे जवळपास ५००० - ७००० डिग्री सेल्सियस च्या आसपास असत. अश्या वेळेस आतील यंत्रणेच तापमान ५० डिग्री सेल्सियस च्या पुढे न जाऊ देता यानाला नियंत्रित करणे अतिशय जिकरीच असते. हे तापमान सहन करू शकेल अस यान तयार करण. ते नियंत्रित करणारी यंत्रणा निर्माण करण. तसेच यानाला वातावरणात एखाद्या विमाना प्रमाणे ग्लाइड करण हि खूप किचकट पण मानवी सफारी साठी महत्वाची यंत्रणा निर्माण करण्यात इस्रो ला यश मिळाल हि नक्कीच इस्रो आणि भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

एक परिपूर्ण स्पेस शटल किंवा रीयुझेबल लोंच वहिकल बनवायला अजून पुढली १५ वर्ष लागतील पण स्वबळावर अशी यंत्रणा विकसित करण्याच्या दृष्टीने इस्रो ने पाहिलं पाउल टाकल आहे. जिकडे नाही म्हंटल जात तिकडेच ते मिळवल्याचा आनंद जास्ती असतो नाही का? स्पेस शटल हि संकल्पना नासा ने २०११ सालीच बंद केली. कारण त्यात येणारा खर्च, त्यातील धोके आणि एकूणच च्यालेंजर आणि कोलंबिया स्पेस शटल ला झालेले अपघात. मग भारत पुन्हा एकदा त्या पद्धतीच स्पेस शटल का बनवत आहे? एका बीबीसी च्या पत्रकाराने पल्लव भार्गवा न हाच प्रश्न केला तेव्हा त्यांनी दिलेल उत्तर खूप काही सांगून जाते. नासा काही काळ्या दगडावरची रेष नाही. त्यांना जमल नाही म्हणून कोणी करू शकत नाही अस नाही. आमच्या वैज्ञानिक आणि अभियंताना अस वाटते कि स्पेस शटल हे भविष्य आहे. म्हणून आम्ही ते करणार.

स्पेस एक्स सारख्या कंपन्यांनी वर्टीकल ल्यांडीग यशस्वी केल असताना स्पेस शटल तरीसुद्धा त्यामानाने कमी खर्चिक आणी सेफ आहे. ते ह्यासाठी कि कोणतही यान, विमान हे हवेत स्थिर करण खूप कमी वेगात अतिशय जिकरीच आहे. वर्टीकल ल्यांडीग साठी ते खूप महत्वाच आहे. स्पेस शटल च्या बाबतीत ते विमानाप्रमाणे ग्लाइड करून धावपट्टीवर हळुवार उतरवता येऊ शकते. म्हणून येणाऱ्या काळात जर इस्रो ह्यात यशस्वी झाली तर इतक्या स्वस्तात अशी यंत्रणा असणारी एकमेव स्पेस एजन्सी असेल. ( आर एल व्ही- टी डी ची किंमत हि फ्यानटासटिक फोर चित्रपटाला बनवण्यासाठी आलेल्या खर्चाच्या फक्त १०% आहे. )

नासा आणि इस्रो ह्यांची तुलना होऊ शकत नाही. नासा ने स्पेस शटल प्रोग्राम विकसित केला तो मानवाला अंतराळात पाठण्यासाठी तर इस्रो हा कार्यक्रम विकसित करते आहे उड्डाणाचा खर्च कमी करण्यासाठी. मानवाला अंतराळात पाठवणे हा एक हेतू असला तरी मुख्य लक्ष्य हे उपग्रह उड्डाण खर्च कमी करणे आहे. इस्रो चे सगळे प्रोग्राम हे सर्वसामान्य भारतीयांच्या आयुष्यात काय बदल करू शकतो हे विजन घेऊनआहेत. (ISRO Vision and Mission Statements. Harness space technology for national development, while pursuing space science research and planetary exploration.)

अमेरिकेतअसताना अटलांटीस स्पेस शटल अतिशय जवळून बघण्याचा योग आला.त्याच्या डेल्टा विंग वरच्या टी पी एस फरश्या बघताना कल्पना चावला ची आठवण झाली. अश्य्याच विंग वरच्या फरश्या निखळल्याने पहिल्या भारतीय स्त्री अंतराळवीरांगनेला आपल्या प्राणाला मुकावे लागले होते. आज आर एल व्ही- टी डी च्या निमित्ताने पुन्हा एकदा त्याची आठवण झाली. त्याच स्पेस शटल प्रमाणे असणाऱ्या आर एल व्ही ला पुढे कलामयान ह्या नावाने संबोधल जाईल अशी चर्चा आहे. इस्रो जर स्पेस शटल प्रोग्राम यशस्वी करू शकली तर डॉक्टर अब्दुल कलाम च्या स्वप्नांचे पंख प्रत्यक्षात येतीलच पण भारतीय स्त्री ची पताका अंतराळात रोवणाऱ्या कल्पना चावला ला दिलेली खरी आदरांजली असेल. इस्रो ला पुढील खडतर वाटचालीसाठी खूप शुभेच्या. 

No comments:

Post a Comment