Friday, 24 June 2016


    कर्मसंचित... विनीत वर्तक
    ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ त्याला मिळतेच आपण असे नेहमीच म्हणतो. पण असे घडते का? तर उत्तर हो आणि नाही असे आहे. प्रत्येक वेळी त्याच योग्य म्हणजे चांगल - वाईट फळ मिळेलच अस नाही. किंवा मिळाल तरी आपल्या दृष्टीकोनातून ते तस असेलच अस नाही न. बर्याचदा आपला ८०%- ९०% वेळ ह्याच विचारात जातो नाही का?
    त्याने किंवा तिने माझ अस केल किंवा मला दुखावलं, त्रास दिला, लुबाडल, फसवल किंवा अजून काही मग त्याला किंवा तिला कर्माच फळ मिळणार कधी आणि ते जस मला हव आहे तस असेल त...ेव्हा मला शांती मिळेल किंवा विचारांची नाळ तेव्हा तुटेल असच काहीस नाही का? ते जोवर मिळत नाही तोवर आपण अस्वस्थ राहतो.
    त्याच्या किंवा तिच्या कर्माची अपेक्षा आपण नकळत करत रहातो. आपल्या उरलेल्या गोष्टींसोबत ह्या विचारांची माळ पण आपण बरोबर घेऊन जातो. वास्तविक चांगल्या कृत्याची किंवा वाईट कृत्याची फळे देणारे किंवा अपेक्षा करणारे आपण कोण? ते फळ कसे असावे, त्याची तीव्रता कशी असावी किती वेळा ते मिळाव ह्या सर्व गोष्टी आपल्या हातात नसताना आपण तरीपण हे सगळे विचार सोबत घेऊन चालत राहतो.
    होते काय कि जो करतो किंवा करते त्याला काही पडलेली नसते. पडलेली असती तर समोरून क्षमेची याचना, माफी किंवा दया ह्या गोष्टी आपसूक आल्या असत्या निदान वाईट गोष्टींच्या बाबतीत तरी. पण त्याला काही पडलेली नसते मग ह्या कर्मांच्या फळांचा विचार हवाच कशाला. न मागता क्षमा करण्याची हतोटी आपल्या ह्या विचारांच्या साखळ्या तोडून टाकते.
    तो किंवा ती अस वागली मग तिच्या वागण्याची फळे तिला, त्याला मिळतील तेव्हा मिळतील किंवा नाही मिळणार. पण आपण न मागता केलेली क्षमा निदान आपल्या सोबत त्या विचाराना तर येऊ देत नाही. अर्थात केलेल्या चुकांची शिक्षा हि जरूर असावी पण ती शिक्षा करण्याचा अधिकार आपल्याला आहे का ह्याचा हि विचार व्हायला हवा. तो जर नसेल तर मग ते पकडून ठेवण्याचा अट्टाहास हि नकोच कि.
    सगळ सरळ नसते आणि सोप्पे हि. म्हणून न मागता क्षमा करण्याची हतोटी स्वताला मानसिक सुख देते आणि दुसर्यांच्या कार्मसंचीता पासून मुक्तता तरी नक्कीच.

No comments:

Post a Comment