Monday, 25 July 2016

ह्युमन डिव्हाईन रिलेशन .. विनीत  वर्तक

माणूस हा कळपात राहणारा प्राणी आहे. जन्मल्यापासून जी नाळ जोडली जाते ती मरेपर्यंत कोणाशी न कोणाशी जोडलेली असते. आई पासून होणारी सुरवात मग बहिण – भाऊ ते मित्र- मैत्रीण अशी होत जोडीदारा पर्यंत कधी येऊन पोहचते आपल्यालाच कळत नाही. जोडीदार आयुष्यात आल्यावर मात्र तोच आपल सर्वस्व मानून कित्येक जण आयुष्य काढतात. खूप जणांच्या बाबतीत खरे हि असेलच पण सगळ्यांच्या बाबतीत मात्र ते कुठेतरी त्या सत्यापासून खूपच लांब असते.

आयुष्यात जोडीदार कसा असावा ह्याचे ठोकळे प्रत्येकाचे वेगळे असतात. खूप सारे कोन त्याला असतात. प्रत्येक कोन जुळेल अस नाही. त्यामुळे कुठेतरी फट रहातेच. बर्याचदा आपण स्वतःला किंवा जोडीदाराला बदलवून ती फट कमी करत असतोच. पण पूर्ण बसलेल्या कोनाची मज्जा त्याला येत नाही. अर्थात आयुष्य हेच तर असते. जुळलेले कोन आणी न जुळलेल्या फटी ह्याची जुळवाजुळव करण्यात ते कसे निघून जाते आपल्याला समजत हि नाही.

पण कधी सगळेच कोन जुळणारा ठोकळा मिळाला तर? विचार करूनच खूप वेगळ वाटत असेल नाही का? असा कोणीतरी किंवा अशी कोणीतरी जी आपल्याला सगळ्याच लेवल वर समजून घेईल. आपण जसे आहोत तस अगदी सेम. विचारांची बैठक, स्वभाव, एकूणच व्यक्तिमत्व अगदी आपल्यासारखच. ज्याच्याशी बोलताना समाजाने लावलेली सगळी झापड विरगळून पडतील. ते नात दिसण, रंग , रुप आणि इतर तत्सम जाणीवेपलीकडे असेल.

असा जुळणारा ठोकळा मिळतो तेव्हा ते रिलेशन डिव्हाईन असते. म्हणजे आपण विचार करू शकतो त्या पलीकडे. ती व्यक्ती जोडीदार असेलच अस हि नाही. आपल्या वयाची असेल अस हि नाही. आपल्याला प्रत्यक्ष भेटेल असही नाही. भेटली तरी ती प्रत्येक वेळी आपल्या सोबत असेल अस हि नाही. पण तरीसुद्धा तीच असणं आपल्याला पदोपदी जाणवते. तीच असण आपल्याला आधार देते. त्या व्यक्तीचा एक शब्द सुद्धा आपला मूड चेंज करू शकतो. ती व्यक्तीच्या अस्तित्वाने आपल्याला छान वाटते. ती व्यक्ती आपल्याला सगळ्या अस्तित्वाच्या पलीकडे एक डिव्हाईन ब्लिस देऊ शकते. जर ते नाते बनले तर ती रिलेशनशिप आपल्याला परमोच्च समाधान देऊ शकते. सुख आपल्याला कोणत्याही रिलेशनशिप मद्धे मिळू शकते पण आपल्याला समजून घेणार, समजून सांगणार कोणी असेल तरच समाधान मिळते.

कोणी हेच प्रेम असही म्हणेल पण प्रेमात अपेक्षा येतात सगळ्याच बाबतीत मग त्या इमोशनल असो, फिजिकल असो. प्रेमात तिसर कोणी स्वीकारता येत नाही. प्रेमात हेतू असतात. मग ते कोणत्याही पातळीवरचे असू शकतात. प्रेम हे एकांगी पण असू शकते बऱ्याचदा असतेही. प्रेम नेहमीच सुख देते अस  हि नाही. प्रेम खुपदा अव्यक्त असू शकते आणि त्याचे ठोकताळे आयुष्याच्या अनेक पातळीवर बदलत राहतात. पण डिव्हाईन रिलेशनशिप ह्या पलीकडे आहे. ती ह्या सगळ्या पलीकडे असते. तिसरी व्यक्ती असो वा चौथी त्याने आपल्याला ठोकळ्याच्या कोनात कोणताच बदल होत नाही. काळाच्या परिणामावर हि ते जूळलेले कोन तसेच राहतात. त्यात कोणतेही हेतू नसतात. फक्त त्याचं जुळण आपल्याला आत्मिक, अत्युच्य अस समाधान देते. अपेक्षा नसल्याने अपेक्षा आणि प्राप्ती ह्यातल अंतर शून्य असते. त्यामुळे गैरसमज, भांडण किंवा हेवेदावे ह्याला काही जागाच नसते.

डिव्हाईन रिलेशन समजणे तस सोप्प आहे. देव किंवा परमात्म्या सोबत तर आपल नात डिव्हाईन असतेच कि. तो कुठेच दिसत नाही. तो कधीच काही बोलत नाही. पण त्याच अस्तित्व आपल्याला जाणवत रहाते. त्याची साथ, सांगत किंवा नुसत्या विचारांची सांगत सुद्धा अत्युच्य अस समाधान देते. ज्या वेळेस तो आपल्याशी बोलतो किंवा समजून घेतो तेव्हा मिळणार समाधान दुसर्या कोणत्याच गोष्टीत येत नाही. तिकडे फक्त असते ब्लिस. एक अत्युच्य समाधानाचा क्षण पण हेच सगळ एखाद्या माणसात आपल्याला मिळाल तर ते नात ह्युमन डिव्हाईन रिलेशन असेल. एक वेगळच पण संपूर्ण असलेल. कदाचित तुमच्या आयुष्यात असेल हि, किंवा असून हि तुम्हाला जाणवलेल नसेल, किंवा अजून यायचं हि असेल. पण तस जर कोणी आपल्या हयातीत आपल्याला भेटल तर आपण स्वताला खूप भाग्यवान समजावं. कारण जिकडे ५० वर्ष बरोबर राहून संसार होतात तिकडे अस कोणीतरी एका क्षणात त्या ५० वर्षाचं समाधान देत.    



    

No comments:

Post a Comment