The Man Who Knew Infinity... विनीत वर्तक
श्रीनिवास
रामानुजन म्हणजे गणिताला पडलेल अदभूत स्वप्न. अवघ्या ३२
वर्षाच्या आयुष्यात त्यांनी तब्बल ३९०० प्रमेय त्यांनी मांडलीत. त्यातील जवळपास
सगळीच प्रमेय आता गणिताच्या भाषेत बरोबर आहेत हे आता सिद्ध झाल आहे. १८८७ ते १९२० अश्या
छोट्या आयुष्यात त्यांनी जे गणितामध्ये काम केल. ते अजूनही कोणाला जमलेलं नाही.
वयाच्या अवघ्या ३१ वर्षी लंडन येथील रॉयल सोसायटी ची फेलोशिप मिळाली. असा बहुमान
मिळवणारे ते दुसरे भारतीय होते. १९१८ साली ट्रिनिटी कॉलेज केंब्रीज ची फेलोशिप
सुद्धा त्यांना मिळाली. हा बहुमान मिळवणारे ते पहिले भारतीय होते.
गणित आणि
अवकाश ह्या दोन्ही क्षेत्रात भारत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. भारतीयांच्या ह्या
बुद्धिमत्तेचे अटकेपार झेंडे जर कोणी लावले असतील तर श्रीनिवास रामानुजन ह्यांनी.
वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी गणितातील ५००० थियरम वाचून काढली होती. पुढल्याच
वर्षी म्हणजे अवघ्या १७ व्या वर्षी त्यांनी बर्नोली नंबर तसेच युरल- मास्चोरेनी
कोन्सटट त्यांनी १५ डेसिमल प्लेसेस पर्यंत आकडेमोड केला होता. ह्या वयात अश्या अदभूत
बुद्धिमत्तेने त्यांनी जगात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. त्यांनी सबमिट केलेले
पेपर तर त्या काळातील गणिती विद्वानांना हि बुचकळ्यात टाकत होते.
पण ह्या बुद्धिमत्तेला
जी. एच. हार्डी ह्या इंग्लिश गणित तज्ञाने ओळ्खल आणि त्यांना संशोधनासाठी इंग्लंड
ला बोलावलं. रामानुजन जे कार्य केल त्यांच्या विद्वत्तेला हार्डी ह्यांनी आपल्या
एका वाक्यात सगळ स्पष्ट केल आहे.
“Hardy's personal ratings of mathematicians. Suppose that we
rate mathematicians on the basis of pure talent on a scale from 0 to 100, Hardy
gave himself a score of 25, J.E. Littlewood 30, David Hilbert 80 and Ramanujan 100.'"
रामानुजन
ह्यांनी गणितातील असे शोध लावले ज्यावर प्रचंड अस संशोधन आजही चालू आहे .
“His original and
highly unconventional results, such as the Ramanujan prime and the Ramanujan theta function, have inspired a vast amount of further research.”
हार्डी आणि रामानुजन नंबर १७२९ हा हि एक
गणिती शोध रामानुजन ह्यांनी लावला. ह्याच्या मागची कथा मोठी मजेशीर आहे.
The number 1729 is known as the
Hardy–Ramanujan number after a famous visit by Hardy to see Ramanujan at a
hospital. In Hardy's words:[94]
I remember once going to see him
when he was ill at Putney. I had
ridden in taxi cab number 1729 and remarked that the number seemed to me rather
a dull one, and that I hoped it was
not an unfavorable omen. 'No', he replied, 'it is a very interesting number; it
is the smallest number expressible as the sum of two cubes in two different
ways.'
Immediately before this anecdote,
Hardy quoted Littlewood as saying, "Every positive integer was one of
[Ramanujan's] personal friends."[95]
The two different ways are
1729 = 13 + 123 = 93 + 103.
असा हा
भारतीय गणितज्ञ आपल्या मागे एक खूप मोठा वारसा ठेऊन गेला. पण आपल्याच पूर्वजांना विसरण्यात
धन्यता मानणारे आपण जेव्हा जगाने नोंद घेतली जाते. तेव्हा जागे होतो. सलमान खान,
शाहरुख खान आणि आमीर खान मध्ये डूबलेल्या त्यांचे तद्दन फालतू आणि टुकार पिक्चर
बघण्यासाठी तिकीटबारीवर गर्दी करणाऱ्या सो कोल्ड सुजाण प्रेक्षकांना ह्या उत्तुंग
व्यक्तिमत्वावर एक चांगला सिनेमा येऊन गेला हे माहित हि नसेल.
ज्यांच्या
स्मरणार्थ आपण २२ डिसेंबर हा दिवस गणिती दिवस साजरा करतो. त्या भारताच्या अदभूत
गणिती तज्ञावर हॉलीवूड ने एक सिनेमा काढला. देव पटेल चा हा चित्रपट चुकवू नये असाच
होता. पण टुकार खानांच्या गर्दीत जगाला गणित शिकवणाऱ्या गणित तज्ञाच्या आयुष्य
जवळून अनुभवण्याचा योग मात्र आपण हरवून बसलो. म्हणून कदाचित फायनाइट मद्धे
रमणाऱ्या लोकांना कस कळणार... “The Man Who Knew
Infinity”
No comments:
Post a Comment