हे विश्व आमुचे घर... विनीत वर्तक
मनुष्य प्राणी कितीहि मोठा झाला तरी तो
ह्या विश्वाच्या मानाने किती सूक्ष्म आहे. ह्याचा विचार केला तर भोवळ येईल. ज्या पृथ्वीवर
आपण नांदतो. ती एका सोलार सिस्टीम चा भाग आहे. ह्यातील सगळ्यात मोठा ग्रह गुरु
आहे. पृथ्वी तब्बल १२० पट गुरुपेक्षा लहान आहे. आपली पूर्ण सोलार सिस्टीम ज्या
आकाशगंगेचा भाग आहे त्या मिल्की वे च्या मध्य भागापासून आपली सोलार सिस्टीम तब्बल
३०,००० प्रकाश वर्ष दूर आहे. (एक प्रकाशवर्ष म्हणजे एका वर्षात प्रकाश कापेल ते
अंतर. प्रकाशाचा वेग आहे तब्बल ३ लाख किमी प्रती सेकंद) म्हणजे आता जो प्रकाश
आपल्याला दिसतो आहे आपल्या आकाशगंगेतील तो तब्बल ३०,००० वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे
तिकडे आता काय चालू असेल ते समजायला अजून ३०,००० वर्ष जावी लागतील. आपल्या
आकाशगंगेत अश्या किती सोलार सिस्टीम असतील. ज्याच्या बद्दल आपण पूर्णतः अनभिज्ञ आहोत.
हि तर झाली आपली आकाशगंगा आता आपल्या
शेजारील सगळ्यात जवळची आकाशगंगा आहे स्पायरल अन्द्रोमेडा. ती तब्बल २.५३७ मिलियन प्रकाशवर्ष
लांब आहे. ( तेथून निघालेला प्रकाश हा २.५३७ मिलियन वर्षा पूर्वीचा आहे. ). अश्या
छोट्या आकाशगंगेचा मिळून एक ग्रुप तयार केला आहे. त्याला वर्गो सुपर क्लस्टर अस
म्हंटल जाते. त्यात मिल्की वे, अन्द्रोमेडा सारख्या हजारो आकाशगंगा आहेत. प्रत्येक
आकाशगंगेत बिलियन सूर्य आहेत आणि अगणित ग्रह. म्हणजे हजारो आकाशगंगेत किती सूर्य
असतील ह्याची मोजदाद करायला अंक कमी पडतील.
आता हे प्रचंड वर्गो सुपर क्लस्टर विश्वाचा
एक छोटा भाग पण नाही. असे १०० बिलियन सुपर क्लस्टर आहेत. सध्यातरी इतकच विश्व आपण
बघू शकलो आहोत. त्या विश्वाची व्याप्ती अजून किती मोठी आहे कि तिथवर आपण जाउच
शकलेलो नाहीत. ह्याच कारण तिकडून निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत अजून पोहचू शकलेला
नाही. १३.५ बिलियन वर्षापूर्वी विश्वाची उत्पत्ती झाली अस म्हणतात. कदाचित तिकडून
निघालेला प्रकाश पोचायला अजून काही मिलियन, बिलियन वर्ष लागतील. हे सगळ वाचून
स्तिमित व्हायला होत नाही का? आपण ह्या सर्वात किती क्षुद्र आहोत नाही का?
मानव निर्मित सगळ्यात दूरवर गेलेली गोष्ट
म्हणजे वोयेजर १ हे यान. सप्टेंबर ५ , १९७७ सोडलेलं यान आता जून २०१६ पर्यंत तब्बल
सूर्यापासून फक्त २.०२ X १० च्या १० व्या घाता इतक लांब गेल आहे. ज्याला इंटलस्टेलर
स्पेस अस म्हणतात. अवकाश अंतराच्या मानाने हे अंतर काहीच नाही. ३८ वर्ष तब्बल
१५-१६ किमी / सेकंद ह्या वेगाने प्रवास केल्यानंतर अजून सुद्धा हे यान संदेश पाठवत
आहे. २०२५ पर्यंत पाठवत राहील अस नासा च म्हणन आहे. त्या नंतर जर काही आदळल नाही
तर ह्याचा प्रवास असा सुरु राहील. ३०० वर्षानी ते ओर्ट क्लाउड मध्ये प्रवेश करेल. तब्बल
३०,००० वर्षांनी त्यातून बाहेर पडेल. ह्यानंतर सुद्धा त्याचा प्रवास सुरु राहिला
तर ४०,००० वर्षांनी ग्लीसे ४४५ ह्या तार्या जवळ पोचेल. जो आपल्या पासून १.६ प्रकाश
वर्ष दूर आहे. विश्वाचा पसारा किती प्रचंड आहे त्यात आपण एक थेंब सुद्धा नाही
आहोत.
ज्या सर्व गोष्टीचा मोठेपणा आपण बाळगतो, अभिमान
बाळगतो त्या ह्या विश्वाच्या पसार्यात किती क्षुद्र आहेत हे वाचल्यावर स्पष्ट झालच
असेल. विश्वाची उत्पत्ती हे क्यालेंडर मानल. म्हणजे ज्या दिवशी विश्व जन्माला आल
तो दिवस १ जानेवारी मानला आणि शेवट ३१ डिसेंबर ठरवला. प्रत्येक महिना १ बिलीयन
वर्ष प्रत्येक दिवस ४० मिलियन वर्ष तर मानव उत्पत्ती पासून ते आजपर्यंतचा आपला
इतिहास. ३१ डिसेंबर च्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटे आणि ५६ सेकंद. म्हणजे अवघ्या ४
सेकंदात सामावला आहे. ज्या मानव असण्याचा आपल्याला गर्व आहे. तो ह्या विश्वाचा
किती क्षुद्र भाग आहे. तेव्हा विश्वाच वैश्विक रूप खूप प्रचंड आहे. आपण तिकडे कधी
पोहचू शकत नाही. पण निदान ते समजून घेतल तरी ते हि नसे थोडके.
No comments:
Post a Comment