उंचच उंच... विनीत वर्तक
माणसाला उंचीच कायम आकर्षण राहील आहे. अगदी
पाच हजार वर्षापूर्वी पिऱ्यामिड बांधताना ते उंच असतील अस बघितल गेल. जवळपास १५०
मीटर इतके उंच ते उभारले गेले. आजही इतक्या शतकानंतर माणसाची उंचच उंच जाण्याची
शर्यत सुरु आहे. अश्या काही उंचच उंच वास्तू जवळून बघण्याचा तसेच त्या उंचीवर जाऊन
जमिनीकडे बघण्याचा योग कामाच्या निमित्ताने आला. प्रत्येक वास्तू हि मानव निर्मित
असली तरी प्रत्येकाच एक वेगळच वैशिष्ठ आहे. त्यातील दोन वास्तू माझ्या खूप जवळच्या
आहेत. थ्रिलिंग वाटेल आणि उंचीचा किंवा खोलीचा एक वेगळ्याच अनुभव देणाऱ्या वास्तू
आयुष्यात प्रत्येकांनी शक्य असेल तर एकदा तरी नक्कीच अनुभवाव्यात.
जगातील उंच बिल्डींग म्हणजे पेट्रोनास टॉवर
(कौलालंपूर- मलेशिया), एम्पायर स्टेट ( न्यू योर्क- अमेरिका ), वर्ल्ड ट्रेड सेंटर
किंवा आताचा फ्रीडम टॉवर ( न्यू योर्क- अमेरिका), बाययोके टॉवर – टू (ब्यांग्कोक -
ह्या वास्तू बघतानाचे क्षण नक्कीच अविस्मरणीय
असेच होते. पायथ्याशी उभ राहून पूर्ण मान वर करून उंचीचा अंदाज घेताना माणसाच्या कौशल्य
किती प्रचंड आहे ह्याची जाणीव होते. पण उंचीची सगळ्यात जास्ती जाणीव किंवा धाकधूक
कुठे जाणवली असेल तर ते म्हणजे बुर्ज खलिफा ( दुबई- यु ए ई ).
मला भावलेली आणि आवडलेली जगातील सर्वात
उंच मानव निर्मित वास्तू अशी बिरुदावली मिरवणारी हि बिल्डींग खरोखरीच अदभूत अशी
आहे. तब्बल ८२९.८ मीटर उंच असणारी हि बिल्डींग तिच्या वेगळ्याच आकारामुळे खूप
आवडली. बंडल ट्यूब अशी रचना असणारी हि बिल्डींग दुबईच्या कोणत्याही कोपर्यातून
उठून दिसते. १४८ मजल्यावरून म्हणजे तब्बल ५५५ मीटर वरून दुबई बघताना स्तिमित
व्हायला होते. चांगल्या वातावरणात आणि ओहोटीच्या वेळी इराण चा समुद्र किनारा हि दिसतो.
दुबईतले रस्ते, बिल्डींग्स, कारंजे वरतून बघताना खूपच रोमांचित करणार आहे.
उंचीचा जाणवलेला दुसरा रोमांच मात्र वेगळाच
आहे. उंचावर तर जाऊन आलो. पण आपल्या खाली प्रचंड खोल अशी दरी असेल तर. आपण चालताना
खाली काहीच नाही असा भास झाला तर. एक क्षण अस वाटेल कि अस कस शक्य आहे. पण अस शक्य
आहे ते ग्र्यांड केनियन स्काय वॉक येथे. घोडाच्या नालीच्या आकाराप्रमाणे असणारे हे
स्काय वॉक पूर्णतः पारदर्शक आहे. कोलोऱ्याडो नदी पासून ह्याची उंची आहे ३५० मीटर. ह्यावरून
चालत जाताना आपण हवेतून चालतो असाच भास होतो. तुटेल ह्या भीतीने लोक रेलिंग चे हात
पण धरतात. तब्बल २४० मीटर उंचावरून आपण हवेतून चालत असतो. ग्र्यांड केनियन च्या
दरीवरून चालताना चा क्षण हा मला सगळ्यात जास्ती रोमांचित करणारा वाटला. एक अनामिक
भीती नक्कीच वाटत होती. क्यामेरा नेण अलाउड नसल्याने काही ते क्षण फोटोत बंदिस्त
नाही करता आले पण मनात मात्र ते कायम कोरले गेले.
माणसाच्या अत्युच्य अश्या अभियांत्रिकीचे
दाखले देणाऱ्या ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे माणसाच्या उंचच उंच स्वप्नांना दिलेले
पंख आहेत. हवेत तरंगण्याचा आणि खूप उंचावरून खाली बघण्याचा आनंद लुटायचा असेल तर
ह्या दोन्ही उंचीनां आपण एकदा तरी आयुष्यात भेट द्यायलाच हवी.
No comments:
Post a Comment