लस्ट लव की लास्टिंग लव... विनीत वर्तक
अनेकदा नात्यांची सुरवात होताना हा प्रश्न नेहमीच पिंगा आपल्या मनात घालत असतो. अनेकदा लव की लस्ट ह्यांचा नक्की उलगडा न झाल्यामुळे फसतो. अनेकदा विचित्र अनुभव येतात. बऱ्याचदा ते आयुष्य उध्वस्त किंवा बदलणारे असतात. कारण गोष्टी घडून गेल्यावर नक्की काय ह्याचा आपल्याला उलगडा होतो. ह्याचा दूरगामी परिणाम नवीन निर्माण होणाऱ्या नात्यांवर ही होतात. एकदा चटका लागल्यावर ताक सुद्धा फुंकून पिण्याच्या आपल्या नैसर्गिक सवयीमुळे अनेकदा नवीन नात फुलतच नाही. फुलण्या आधीच ते कोमेजून जाते.
नवीन नात्याची सुरवात मुळी खूप उत्साहवर्धक असते. सगळ कस हवहवस वाटते. लव च्या नावाखाली आपल्याला लस्ट कधी जाळ्यात ओढते कळेस्तोवर बरच पाणी पुलाखालून वाहून गेलेलं असते. बरेचदा आपण प्रेमाच्या भरात अनेक गोष्टी ओवर लुक करतो. म्हणजे तिला जेवण बनवता येत नाही किंवा तो खूप पझेसिव आहे, किंवा ती ओल्ड फ्याशन आहे किंवा तो खूप चिडतो. ह्या आणी अश्या अनेक गोष्टी सुरवातीला आपल्याला लक्षात येत नाही किंवा येऊन सुद्धा आपण लस्ट मध्ये इतके गुंतून जातो की ह्याचा विचार करत नाही. काळाच्या ओघात लस्ट कमी होते. ते सगळ्या नात्यात होते. नव्याची नवलाई संपली की मग खरी लक्तरे समोर दिसू लागतात. आधी न खटकणाऱ्या गोष्टी आता भांडणाचे कारण बनू लागतात. पूर्वीसारखी मज्जा येत नाही. मग सुरवात होते ती अनेक गैरसमजूतीनां. त्याची परिणीती एकतर नात तुटण्यात होते अथवा फक्त ते निभावण्यापुर्ती शिल्लक रहाते.
आपण ओळखू शकतो का? नक्की काय आहे आपल्याला एखाद्या विषयी किंवा एखाद्याला आपल्याविषयी वाटणारी भावना लव कि लस्ट? तर ह्याच उत्तर होय असच आहे. ३-४ गोष्टींवर आपण नीट विचार केला तर समोरच्याचा मनात किंवा आपल्या मनात काय आहे ह्याचा नीट उलगडा आपल्याला नक्कीच होऊ शकतो. प्रथम तर नात निर्माण होण्याचा बेस कोणता हे सगळ्यात जास्ती महत्वाच आहे. तिकडे इमोशनल बोंडीग आहे. की ते फिजिकल आहे की अजून काही हे आपल्याला क्लियर असायला हवे. समोरचा आपल्याकडून काय अपेक्षा करतो हे समजून घेण महत्वाच. आपण जेव्हा प्रेमात ( लव ) मध्ये असतो तेव्हा आपल्या शरीरात ऑक्सीटोसीन नावाचे हार्मोन्स तयार होतात जे की आपल्याला रील्याक्स करतात. ज्यामुळे आपली त्या व्यक्तीशी इमोशनल बोंडीग वाढते. आपल्याला शेअर करावेसे वाटते. आपल्याला सहवास मग तो बोलण्यातून असो वा अजून कोणत्याही माध्यमातून तो हवाहवासा वाटतो. हेच जर का लस्ट असेल तर मग शारीरिक स्पर्श आवडतो. डोक्यात सेक्स चे विचारचक्र सुरु होते. बाह्य स्वरूपावर आपण सतत विचार करतो. म्हणजे दिसण, कपडे, रंग, श्रीमंती पैश्याची, बाज, माज सगळच. लस्ट आपल्यात ह्या सगळ्या संकल्पना तयार करते. तर लव बोंडीग तयार करते. हि झाली पहिली पायरी.
जेव्हा आपण प्रेमात ( लव ) मध्ये असतो. तेव्हा त्या व्यक्तीला आपण सगळ्यांशी इंट्रो करतो स्पेशली ज्या व्यक्ती आपल्या आयुष्यात महत्वाचा रोल निभावत असतात. आपण त्यांना लपवून नाही ठेवत. आपल्या भावना त्यांनी समजून घ्याव्यात. त्यांना काय वाटते ते आपल्याला सांगाव. आपल्याला सपोर्ट द्यावा अस आपल्याला मनापासून वाटते. लस्ट मध्ये ह्या गोष्टी येत नाहीत. तिकडे लपवाछापवी चा खेळ जास्ती असतो. आपल्याला नात्याचा कोणाला सुगावा स्पेशली जवळच्या माणसाना लागू नये ह्यासाठी सतर्क असतो. प्रेमात आपण एकदम सिक्रेट गोष्टी शेअर करतो. ज्या कधी आपण कोणाशी बोलू शकत नाही अश्या. आपल्या आयुष्यातील दुःखाचे क्षण त्या व्यक्तीशी बोलतो. आनंदाचे क्षण सगळ्यात आधी त्या व्यक्तीला सांगतो. त्यावर ती व्यक्ती पण तिला किंवा त्याला वाटणार मत, सपोर्ट, देते.
जेव्हा आपण लव मध्ये असतो तेव्हा आपण बरेचदा दुहेरी उल्लेख करतो. म्हणजे मी आणी तो च्या बदली आम्ही येते आपसूक. मी त्याच्याबरोबर सिनेमाला गेले होते आणी मग जेवण केल ह्या एवजी आम्ही सिनेमाला गेलो व एकत्र जेवलो हे वाक्य बाहेर येते. अर्थात हे एक उदाहरण झाल. आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात आपण एकमेकांना वेगळ न मानता एकच आहोत हा भाग आपल्या वागण्या बोलण्यातून बाहेर आपसूक येतो. अनेकदा लव मद्धे आपण नात्यांच्या अनेक डीप लेवल वर कनेक्ट होतो. त्या लेवल वरओपन होतो. लस्ट मध्ये हि कनेक्टीव्हिटी वरच्या लेवर वर असते. उदाहरण द्यायचं झाल तर मी दिसते कशी किंवा दिसतो कसा ह्यापेक्षा घातलेल्या साडीची आठवण किंवा मनगटावर लावलेल्या घडाळ्याच्या आठवणी आपल्याला जास्ती महत्वाच्या वाटतात. नात्यांचे अनेक पदर लव मध्ये उलगडतात तर लस्ट नेहमीच उथळ असते. लस्ट असलेल्या नात्यात आपण आपल्या छंदानबद्दल, आवडी बद्दल बोलतो पण लव मध्ये आपण त्याच्या मुळाशी जातो. त्यावर मत जाणून घेतो. त्या मतांच्या अनुषंगाने स्वतात बदल ही घडवतो. लव मध्ये शेअर होणारी प्रत्येक गोष्ट डीपर असते. पर्सनल असते. तुम्हाला काय वाटते हे बाहेर आणणारी असते. लस्ट मध्ये हे सगळ नसतच.
लस्ट फन आणी शोर्ट टर्म मज्जा देणार असते तर लव लोंग टर्म कमीटमेंट असते. कोणतही नात लस्ट वर लोंग लास्टिंग होत नाही तर ते नेहमीच शोर्ट टर्म रहाते. लस्ट मध्ये लव होण अवघड असते तर लव मध्ये लस्ट आपण कधीही क्रियेट करू शकतो. त्यासाठी हव ते नात्यात थोडा सरप्राईजिंग एलिमेंट आणण. न केलेल्या गोष्टी एकत्र अनुभवण. नाविन्य आल की कितीही जुन लव कोणत्याही लस्ट पेक्षा जास्ती आनंद , समाधान, फन देऊ शकते. पुढल्या वेळी गोंधळ उडेल तेव्हा वर सांगितलेल्या गोष्टी तपासून बघा. कदाचित हे लस्ट लव की लास्टिंग लव आहे ह्याच उत्तर सापडेल.
No comments:
Post a Comment