Sunday 22 January 2017

फ्रेन्डशिप आणी बरच काही... विनीत वर्तक ( १२- सप्टेंबर- २०१६)
माणूस जसा प्रगल्भ होत गेला तशी नात्यांची व्याख्या पण बदलू लागली. लग्नासारख्या पारंपारिक समाजातील संस्कारा नंतर विरुद्ध व्यक्तीशी मिळणारी मोकळीक हळूहळू लग्नाच्या आधी मिळू लागली. स्त्री वर झालेल्या अत्याचार आणि बुरसटलेल्या विचारांची जोखड जेव्हा उतरली गेली किंवा निदान तशी प्रक्रिया सुरु झाली तेव्हा विचारांच्या प्रगल्भतेचा आपण एक माप ओलांडल अस म्हणता येईल. स्त्री- पुरुष मैत्री हि कोणत्याही वयात करण्याची, होण्याची स्वतंत्रता हे त्याचच द्योतक आहे. माणूस कधीच समाधानी होत नाही. त्यामुळे एखाद शिखर साध्य केल्यावर दुसर त्याला खुणावत असतेच.
म्हणूनच फ्रेन्डशिप आणी बरच काही हे एक नवीन परिणाम पुढे आल. लग्नसंस्था जिच्या मध्ये अनेक दोष आहेत. अजूनही ती प्रगल्भ होते आहे. पण काळाच्या ओघात ह्याला न मानणारा एक मोठा वर्ग हि झाला. फेसबुक , व्हात्स अप सारखी माध्यम मिळाल्यावर ह्या वर्गाला स्वताची मत मांडण्याच एक मोठी व्यासपीठ उपलब्ध झाली. मग अजून एका नव्या शिखरासाठी नवीन पिढी सज्ज झाली. लग्न न करताच झालेल्या मैत्रीतून सगळ मिळवता आल तर. म्हणजे अगदी सेक्स पासून ते सेट ब्याक पर्यंत. सगळीकडे निर्णय स्वातंत्र्य हे माझ राहील. एकतर मैत्री करण्याच त्यातून बरच काही मिळवण्याच आणि ते मिळवल्यावर त्यातून होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी घेण्याच.
खरे तर खूप काही हाताशी लागेल ह्याच अपेक्षेने फ्रेन्डशिप आणि बरच काही अशी नाती होतात. एकतर मैत्री असल्याने इमोशनल लेवल वर मन जुळलीच असतात. एक कम्फर्ट लेवल असते त्यामुळे समजून घेण हा भाग त्यात आपसूक असतो. बऱ्याच गोष्टी न समजता समजतात. काही समजलेल्या गोष्टींमुळे नात अधिक परिपक्व बनते. मानसिक सपोर्ट हि ह्या नात्यामधील अतिशय महत्वाची बाजू असते. कारण मन मोकळ करणे हीच तर प्रगल्भ नात्याची लक्षणे असतात. वेगळ होण्याची वेळ आली तरी गोष्टी वैचारिक देवाणघेवाणीने होतात. चिखलफेक होण्याची शक्यता कमी असते. स्वतंत्र अस्तित्व असणार अस नात कोणाला नको असते. जिकडे सगळच आपण ठरवतो.
खरीच अशी नाती काळाच्या परिमाणावर टिकून राहतात का तर उत्तर नाही असेच येते. अर्थात काही अपवाद असतील आणि आहेत. मुळातच अश्या नात्यांची ठेवण असते ती मानसिक शेअरिंग वर तेच कुठे डळमळीत व्हायला लागल कि मग वरचा डोलारा कोसळायला वेळ लागत नाही. सगळ्यात गोची कुठे होते तर ह्यामुळे झालेली मानसिक घालमेल मोकळ कोणाकडे करायची हेच अनेकवेळा माहित नसते. कारण ज्या व्यक्तीकडे आपण आपल मन मोकळ करत असतो तीच तुटलेली असते तेव्हा मन मोकळे करायचे कोणाकडे? तसेच आपल्या स्वतंत्रतेसाठी खूप मोठी किंमत आपण मोजलेली असते. आपल्या जवळच्या इतर नात्यांमध्ये एकतर कडवटपणा स्वीकारलेला असतो किंवा एकतर ती संपवलेली असतात. अश्या वेळच तुटण पूर्ण आयुष्याला वेगळीच कलाटणी देऊ शकते किंबहुना देते. सगळ्याच वेळी ती चुकीच्या रस्त्याने जाणारी असते.
मग फ्रेन्डशिप आणि बरच काही नको का? लग्न संस्था सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे का? तर नक्कीच नाही. प्रत्येक बाजूच्या अनेक जमेच्या आणि तितक्याच जोखमीच्या बाजू आहेत. ह्याचा सुवर्णमध्य आपण गाठू शकतो का तर त्याच उत्तर होय असच आहे. पारंपारिक लग्न संस्था जपताना मैत्रीच्या नात्यातून हि बरच काही मिळवता येऊ शकते. अर्थात बरच काही चे ठोकताळे प्रत्येकाने आपल्या पद्धतीने घ्यावेत कारण बरच काही हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. आपल्याला काय योग्य किंवा कोणत्या क्षणी कोणत नात योग्य हे समाजाने ठरवता कामा नये तर ते ठरवण्याच आपल स्वातंत्र्य आपण जपलं पाहिजे. त्याच वेळी येणाऱ्या जोखमीची, प्रश्नांची जबाबदारी हि आपलीच असली पाहिजे. सगळ्यामधून सगळच मिळवण हीच तर खरी तारेवरची कसरत आहे. जी व्यक्ती हे शिकली तीन फ्रेन्डशिप मधून बरच काही मिळवलं अस आपण म्हणू शकतो.

No comments:

Post a Comment