मॉम ची दोन वर्षे .... विनीत वर्तक
२४ सप्टेंबर २०१४ हा भारताच्या इतिहासातील एक सोन्याचा दिवस होता. श्रद्धांच्या ह्या महिन्यात श्राद्ध सुरु झाली की मला न रहावून मंगळाची आठवण येते. मंगळावर गेलेले मार्स मिशन म्हणजे भारतीय जुगाड ला जगाने केलेला कुर्निसात होता. ६ महिने आयुष्य असलेले मिशन आता २ वर्ष झाले तरी न थांबता नवनवीन माहिती पृथ्वी कडे सतत पाठवत आहे. आतापर्यंत शेकडो फोटो मंगळाचे, त्याच्या उपग्रहांचे मॉम ने पृथ्वीवर पाठवले आहेत. ह्यामुळे मंगळावरील सबलीमेशन प्रोसेस जी की आत्तापर्यंत समजू शकली नव्हती ती समजण्यास मदत झालीआहे.
इस्रो च्या कालच्या स्टेटमेंट प्रमाणे ५ इन्स्ट्रुमेन्ट्स अगदी व्यवस्तीथ काम करत आहेत. सतत जी मिळेल ती माहिती संग्रहित करून पृथ्वीवर पाठवत आहेत. ह्यातून काही शोध लागो अथवा न लागो पण एका गोष्टीची जगाने नोंद घेतली ती म्हणजे भारतीय जुगाड. चायनीज मालाप्रमाणे स्वस्त असून सुद्धा त्यांच्या पेक्षा कैक अधिक पटीने उत्कृष्ठ परतावा देणारी अशी उपकरणे, इंजिनिअरिंग भारत स्वबळावर करू शकतो. हि गोष्ट आपल्या वैज्ञानिक , अभियंते ह्यांना प्रचंड असा विश्वास देणारी आहे. तसेच त्या जोडीला स्वस्त म्हणजे क्वालिटी मद्धे कोम्प्रोमाईज हा समज हि मोडीत काढला आहे.
ह्या दोन वर्षाच्या कालावधीत मॉम ब्ल्याक आउट फेज तसच व्हाईट आउट फेज ह्या दोन्ही फेज मधून गेले आहे. ज्या वेळेस पृथ्वीवरून कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकत नाही. सूर्यापासून उर्जा मिळू शकत नाही. अश्या वेळेस पूर्ण कंट्रोल हा मॉम च्या कॉम्प्युटर कडे असतो. ब्याटरी मध्ये असलेली उर्जा वापरून यानाच नियंत्रण, तसेच उपकरण बंद करून जास्तीत जास्त उर्जा वाचवून पुन्हा ह्या फेज मधून बाहेर निघताना ती पुन्हा सुरु करून पृथ्वीकडे सतत माहिती पाठवण्याची जबाबदारी मॉम स्वबळावर करत आहे. ह्यात इस्रो किंवा कोणत्याही ह्युमन कंट्रोल शिवाय हे सगळ चालू असते. इतक्या लांबून काम करायच्या कालावधी च्या ४ पट कालावधी उलटून गेल्यावर सुद्धा ह्या सर्व यंत्रणा अतिशय व्यवस्तीथ रित्या हे किचकट काम त्याच वेगाने, त्याच नियंत्रणात पूर्ण करत आहेत हि खूप मोठी उपलब्धी भारतासाठी आहे.
ह्यात वापरण्यात आलेले सेन्सर, धातू, इलेक्ट्रोनिक्स, इंजिन सर्वच एकाच वेळेस आपल्या कामगिरीत अपेक्षेपेक्षा जास्ती काम करत आहेत. एकाच वेळेस अश्या सर्व भागांवर इतकी अप्रतिम कामगिरीमुळे जगात हि पूर्ण मॉम च्या मोहिमेबद्दल रिस्पेक्ट सोबत एक कुतूहल ही आहे. कारण इतक्या सर्व गोष्टी जुळून येण्यासाठी कधीतरी त्यालाच उतरावं लागते. अर्थात सायन्स मध्ये विश्वास असणारे लोक ह्यावर विश्वास ठेवणार नाहीत पण तरीही हे सर्व करण्यामागे ज्यांचे हात ,डोक होत त्या सर्वाना माझा सलाम.
यु.ए.ई सारख्या देशाने आपल्या मोहिमेसाठी इस्रो ची निवड केली ह्यात सर्व काही येते. म्हणजे जे लोक सतत उत्कृष्ठ, वेगळ आणी आपल नाव नेहमी चिरंतर मागे राहील ह्यासाठी आग्रही असतात. ज्या साठी कित्येक करोडो पैसे मोजायची तयारी असते अश्या वेळेस अमेरिका, युरोपियन युनियन, चीन, जपान, रशिया अश्या सर्वाना मागे टाकत भारताची निवड हि आपल्या मॉम ने जगात निर्माण केलेल्या विश्वासच प्रतिक आहे.
पुढल्या वर्षाच्या सुरवातीला पुन्हा एकदा मॉम ब्ल्याक आउट फेज मधून जाईल व पुन्हा एकदा त्याच्या सर्व उपकरणांची टेस्ट होईल. यश , अपयश काही आल तरी मॉम ने आखून दिलेल्या कालावधीपेक्षा ४ पट कामगिरी आधीच नुसती भारतासाठी नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी पूर्ण केली आहे. त्यामुळे ह्यात यश आलच तर सोने पे सुहागा पेक्षा हि जास्त यश इस्रो, भारत आणी संपूर्ण मानव कल्याणासाठी ते असेल. नासा इस्रो च्या मदतीने मॉम ने दिलेल्या माहितीवर अनेक अभ्यास करत आहे. नासाच मावेन आणी रोवर त्याच्या जोडीला मॉम हे सतत मंगळाच्या परिक्रमा तसेच पृष्ठभागावर संशोधन करण्यास आपल्याला मदत करत आहेत. कोणत्याही सायन्स चा अभ्यास हा एखाद्या देशासाठी राखीव नसतो त्यामुळे मॉम च्या पुढल्या प्रवासाठी एक सामान्य भारतीय नागरिक ते एक माणूस म्हणून खूप खूप शुभेच्या.
No comments:
Post a Comment