Sunday 22 January 2017

मदतीच क्लोज लूप... विनीत वर्तक
आपल्या आयुष्याच्या मुलभूत, ऐच्छिक, भौतिक गरजा परिपूर्ण झाल्या कि आपल्याला मदतीचा साक्षात्कार होतो. खरे तर त्यात चुकीच अस काहीच नाही. आपल झाल कि मग आपल्याला दुसऱ्याचा विचार येतो. अर्थात तो विचार हि निर्मळ असतोच अस नाही. बऱ्याचदा आपले हितसंबंध त्यात गुंतलेले असतातच. निर्मळ सेवेसाठी खूप मोठ मन, त्याग लागतोच. ते करण सगळ्यांना जमते अस नाही. आजकालच्या जमान्यात दिखावा मोठा केला जातो कारण प्रसिद्धीची हाव, स्वताला मोठ करण कोणाला नको असते.
रस्ते बदलतात पण मी त्यातला नाही किंवा मी त्यातली नाही हे दाखण्यासाठी स्वताहून काही बुडबुडे सोडण्याची खाज अनेकांना असतेच. अनेकदा आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी खुपदा वेगळे रस्ते स्वीकारले जातात. तडजोडी केल्या जातात. मान झुकवली जाते किंवा ती झुकवण्याच नाटक केल जाते. पैसा मोठा होतो आणी मदतीच्या जोरावर अहंकार खूप जोपासला जातो.
स्वतःला सगळ्यांपेक्षा हुशार आणि श्रेष्ठ समजणाऱ्या अनेक संस्था आणि व्यक्ती आपल्याच आजूबाजूला असतात. पूर्वाश्रमीच्या कर्तुत्वावर उडणारे अनेक पतंग वारा येईल त्या दिशेने जात असतात. वाऱ्यावर वाहताना आपल स्वतःच अस्तित्व कधीच पुसून गेल आहे ह्याची जाणीव हि त्यांना होत नाही. कोणत्या एका आकांक्षेपायी अनेक गोष्टीना तुडवत वाटचाल चालू रहाते. मग गडबडलो तरी आतला अहंकार ते स्वीकारायला तयार होत नाही. मग ती पडझड अजून जास्ती वेगात सुरु रहाते.
डाव्या हाताची मदत उजव्या हाताला कळू नये अस म्हणतात पण आज काल तर डाव्या हाताला खाज सुटली आहे म्हणून उजव्या हाताने खाजवून आता मोठी लॉटरी लागणार अशी प्रसिद्धी केली जाते. मदतीने कोणाच्या आयुष्यात काय बदल झाला ह्या पेक्षा आकड्यांचा खेळ मोठा होतो. त्यात प्रसिद्धीची हाव असतेच त्यामुळे तीच कधी अहंकारात रुपांतर होते ते कळत सुद्धा नाही. म्हणूनच तर अनेक वेळा चांगल्या कामाची सुरवात होऊन मग अनेकदा शिखरावर त्यांचा अंत होतो. खरे तर शिखरावर जाणाऱ्या मदतीचा ओघ सुरु राहायला हवा. पण असे होताना दिसत नाही. अहंकार हेच बऱ्याचदा खरे कारण असते.
इंजिनिअरींग च्या क्षेत्रात क्लोज लूप ला खूप महत्व आहे. ह्याचा अर्थ होतो कि गोष्ट चालू केल्यावर ती एका नियमित स्वरूपात काम करते. ती गोष्ट अनेकवेळा त्याच स्वरूपात स्वताला रिपीट करू शकते. मग दिलेल्या कोणत्या मदतीच आपल्याला अस क्लोज लूप नाही का करता येणार? म्हणजे ती व्यक्ती गेली, बाहेर पडली तरी सुद्धा ती मदत तशीच अविरत सुरु राहील. आपल्या आजूबाजूला असे मदतीचे अनेक क्लोज लूप आहेत. उदाहरण द्यायचं झाल तर बाबा आमटे चं देता येईल. ह्यासाठी हव ते अहंकारापासून, प्रसिद्धी पासून स्वताला लांब ठेवण. कठीण नाही बघुयात आपल्याला जमते का? कदाचित मदतीच अस क्लोज लूप आपल आयुष्य बदलवणार असेल.

No comments:

Post a Comment