Sunday, 22 January 2017

भविष्याची नांदी ... विनीत वर्तक
भारत अनेक क्षेत्रात धडपडत असला तरी एका क्षेत्रात मात्र त्याने खूप भरारी घेतली आहे. ते म्हणजे स्पेस इंजिनिअरिंग. इस्रो रोज नवनवीन यशाच्या पायऱ्या चढत अवकाश क्षेत्रात भारताची पताका अभिमानाने उंचावत ठेवत आहे. आज सकाळी ६ वाजता इस्रो ने स्क्र्यामजेट इंजिनाची चाचणी यशस्वी केली. अर्थात आपल्या मिडीयाला ह्या कडे बघयला वेळ नसेल कारण त्यांच्यासाठी काश्मीर मध्ये कोण काय म्हणाल आणि त्यावर केजरीवाल आणि मोदींची मत ह्याची चर्चा करायला वेळ कसा पुरणार त्यात राहुल बाबा उत्तर प्रदेशात मुक्काम करत आहेत तर बघयला नकोच.
कोणी दखल घेवो वा न घेवो. इस्रो आंतरराष्ट्रीय अवकाश तंत्रज्ञानात आपला दबदबा वाढवत चालली आहे. जगातील अगदी मोजक्या देशांकडे असलेल हे ज्ञान इस्रो ने आपल्या बळावर तयार करून त्यात स्वयंपूर्णता मिळवली आहे. २८ ऑगस्ट ह्या दिवसाने भविष्याच्या नांदीचा दिवस म्हणून इतिहासात आपले नाव कोरले आहे. खरे तर सर्वसामान्य माणूस ह्या सगळ्या तंत्रज्ञापासून कोसो दूर आहे. पण अगदी डिटेल नाही तरी नक्की स्क्र्यामजेट इंजिन काय प्रकार आहे हे आपण समजून घेतले पाहिजे.
जेट इंजिन सगळ्यांना माहित असेलच. जेट इंजिनाचा उपयोग कोणतहि रॉकेट प्रक्षेपित करण्यासाठी केला जातो. ह्यात फ्युल म्हणून द्रवरूप हायड्रोजन तर त्याला ज्वलनासाठी ओक्सिडायझर म्हणून द्रवरूप ऑक्सिजन चा वापर केला जातो. शाळेत विज्ञानाच्या तासाला किंवा घरी जळत्या मेणबत्तीवर उलटा ग्लास ठेवूल्यास ऑक्सिजन च्या कमतरतेने ती विझते. हा प्रयोग केला असेलच. त्यातील मेणबत्ती म्हणजे द्रवरूप हायड्रोजन तर हवेतील ऑक्सिजन च्या बदल्यात द्रवरूप ऑक्सिजन चा वापर जेट इंजिनात केला जातो. आता ह्या दोन्ही गोष्टी प्रचंड वेगाने जाळल्या जातात. ज्वलनातून निर्माण होणाऱ्या उर्जेचा वापर थ्रस्ट साठी केला जातो. ह्या थ्रस्ट मुळेच रॉकेट हवेत प्रक्षेपण करते.
हे वाचायला जरी इतक सोप्प वाटल तरी खरोखर अस इंजिन तयार करणे खूप जिकरीच आहे. निर्माण होणार तापमान तसेच द्रवरूप रूपातील हायड्रोजन, ऑक्सिजन ह्यांना स्टोअर आणि त्याचं योग्य ते मिश्रण करण अतिशय गुंतागुंतीच आहे. त्यामुळेच जगातील काही मोजकेच देश ह्यात स्वयंपूर्ण आहेत. आपल्याला अभिमान नक्कीच वाटावा कि भारत ह्यात अग्रेसर आहे. आता इतर उपग्रहासोबत हे फ्युल आणि द्रवरूप ऑक्सिजन हि रॉकेट ला न्यावा लागतो. त्यामुळे उपग्रहान पेक्षा ह्याच वजन अधिक होते. उदाहरण द्यायचं झाल तर स्पेस शटल मद्धे ६१६,४३२ केजी इतका लिक्विड ऑक्सिजन तर १०३,००० केजी इतका लिक्विड हायड्रोजन असतो. ह्यावर पेलोड जाऊ शकतो फक्त २५,००० केजी म्हणजे नुसत्या रॉकेट बुस्टर जे कि स्पेस शटल मद्धे दोन असतात प्रत्येकी वजन असते ५९०,००० केजी. समजा आपण ह्यातील ऑक्सिजन काढून टाकला आणि हवेतील ऑक्सिजन वापरला तर? आपण अधिक पेलोड कमी खर्चात घेऊन जाऊ शकू. ह्याच उत्तर म्हणजे स्क्र्यामजेट इंजिन.
स्क्र्यामजेट इंजिनात द्रवरूप ऑक्सिजन चा वापर केला जात नाही. त्या एवजी हवेतील ऑक्सिजन वापरून द्रवरूप हायड्रोजन च ज्वलन केल जाते. म्हणजे तितक्याच इंधनात आपण तब्बल दुप्पट पेलोड किंवा अर्ध्या पेक्षा कमी किमतीत तितकाच पेलोड अवकाशात प्रक्षेपित करू शकू. पण हे इतक सोप्प असत तर मग सगळ्यांकडेच असत. ह्याला काही मर्यादा आहेत. अपेक्षित वेळेत ज्वलन होण्यासाठी तितक्याच जोराने ऑक्सिजन ची गरज असते. हे घडून येण्यासाठी आधी यानाला सुपर सॉनिक वेगात सोलिड बुस्टर च्या माध्यमातून नेल जाते. आता यानाचा वेग इतका प्रचंड असतो कि आत येणारी हवा म्हणजेच ऑक्सिजन सुपर सॉनिक वेगाने आत येतो. हीच वेळ असते जेव्हा स्क्र्यामजेट इंजिन इग्नाईट केल जाते. पुढील टप्पा गाठला जातो. वाचायला हे खूप सोप्प वाटल तरी तशी यंत्रणा निर्माण करण ती सक्सेस्फुली इम्प्लीमेंट करण प्रचंड गुंतागुंतीच, कठीण आहे.
ह्या इंजिनामुळे आपण तितक्याच खर्चात जास्ती पेलोड अवकाशात वाहून नेऊ शकू. तसेच भारताच्या सामरिक दृष्टीनेहि खूप मोठ पाउल पुढे गेल आहे ते म्हणजे ब्राह्मोस-२ ह्या हायपर सॉनिक क्षेपणास्त्रात ह्याचा वापर होणार आहे. ध्वनीच्या तब्बल ७ – ८ पट वेगाने जाणार हे क्षेपणास्त्राची चाचणी २०१७ मध्ये अपेक्षित आहे. ब्राह्मोस १ ने अनेकांची झोप उडवली आहे. कारण त्याच्या प्रचंड वेगापुढे उत्तर द्यायला अजून कोणाकडे यंत्रणा नाही. मग त्याच्यापेक्षा तब्बल ४-५ पट अजून वेगाने जाणऱ्या क्षेपणास्त्राने काय होईल ह्याची कल्पना हि नाही करू शकत.
एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण त्याच्या खोलात जायची गरज नाही. पण राजकारण, देव, समाज, जाती – पाती, आपले हक्क आणि कर्तव्ये ह्यावर तावातावाने बोलणारे आपण विज्ञानाची कास मुलांना धरायला काय सांगणार आहोत? देसाई म्याडम नि दर्ग्यात प्रवेश केला कि नाही ह्याने तुमच्या आमच्या जीवनावर काही फरक पडणार नाही. पण इस्रो च्या एका शोधाने, एका इंजिनिअरिंग ने तुमच्या,आमच्या देशाच्या अस्मिते सोबत जीवनात खूप फरक पडतो. भारताच्या अवकाशातील ह्या भविष्याच्या नांदी चा श्रीगणेशा इस्रो ने आज केला. ह्या प्रयोगा मागे असलेल्या सगळ्या वैज्ञानिक, इंजिनिअर ह्यांचे अभिनंदन व त्यांना दंडवत.

No comments:

Post a Comment