Sunday, 22 January 2017

माणसाच टी. पी. एम. ... विनीत वर्तक ( १ सप्टेंबर २०१६ )
टी. पी. एम. चा पूर्ण अर्थ होतो टोटल प्रोडक्टविटी मेंटनन्स. हि प्रणाली औद्योगिक क्षेत्रात प्रॉडक्टशन वाढवण्यासाठी तसेच मालाचा दर्जा राखण्यासाठी वापरली जाते. टी. पी. एम. च लक्ष्य असते सगळ्या मशीन आणि एक़्युपमेंट व्यवस्तीथरित्या चालू ठेवून कामात कोणताही अडथळा न येता ते सुरळीत चालू ठेवणे. सेलीची नाकाजीमा ह्यांनी विकसित केलेली हि प्रणाली आज जगातील सर्वच उद्योगात वापरली जाते. ह्या प्रणालीमुळे उद्योग क्षेत्रात क्रांती झाली. कमीतकमी इनपुट मद्धे जास्तीत जास्त आऊटपुट घेण शक्य झाल. सतत चांगले बदल, ओटोनॉमस मेंटनन्स, ठरवून केलेला मेंटनन्स , ट्रेनिंग आणि शिक्षण, क्वालिटी मेंटनन्स अश्या काही प्रिन्सिपल्स वर हि प्रणाली आधारित आहे.
आपल शरीर – मन एखाद्या उद्योगा सारखच तर आहे. अनेक विविध भाग, विभाग सतत ओप्टीमम आउटपुट देतात शारीरिक आणि मानसिक लेवेल वर तेव्हाच तर माणूस नावाचा हा प्राणी अशक्य गोष्टी शक्य करतो. आपण ह्या विविध अंगांचा कधी विचार करतो का? आपण आपला टी. पी. एम. कधी करतो का? कि फक्त सतत खायचे इनपुट देऊन आउटपुट घेत असतो? कधी मेंटनन्स करतो? जेव्हा कधी बिघाड होतो तेव्हाच. हृदयविकाराचा झटका आला कि मग हृद्य दमल आहे ह्याची जाणीव. चक्कर , घाम आला कि शुगर. असे एक ना अनेक अडथळे येईस तोवर आपल्या मशीन कडे बघायला आपल्याला वेळही नसतो.
टी. पी. एम. जर उद्योगात इतकी क्रांती घडवून आणू शकतो तर आपल शरीर – मन जे जन्मापासून मरेपर्यंत सतत आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी झटत असते त्यात का नाही क्रांती घडवून आणू शकत. त्यातले जवळपास सगळेच प्रिन्सिपल्स आपल्यात पण क्रांतिकारी बदल घडवू शकतात. कमीतकमी इनपुट मद्धे जास्तीत जास्त आउटपुट आल तर ते कोणाला नको असेल.
स्वताच्या कार्य तसेच विचारांच्या शैलीत आपण नेहमीच चांगल्या बदलांसाठी कार्यरत राहील तर स्वताला दोन्ही स्तरावर समृद्ध करण्याच्या दृष्टीने आपण एक पाउल निश्चित पुढे जाऊ. अर्थात जास्ती काही करण्याची गरज नाही. समोर घडणाऱ्या गोष्टीन मधून स्वतालः अनुभवसंपन्न करायचं. आपल्या शरीराचा, मनाचा मेंटनन्स करण्यासाठी थोडा वेळ राखून ठेवायचा. शरीरासाठी व्यायाम, मनासाठी मेडीटेशन केल कि पुन्हा एकदा नव्या दमाने आपण आपल्या आउटपुट साठी सिद्ध होऊ. स्वताच्या शरीराच्या व मनाच्या जडणघडणी प्रमाणे आपण स्वताला ट्रेन करत राहायचं. त्या ट्रेनिंग मद्धे क्वालिटी आणण्यासाठी स्वताला अपग्रेड करत राहायचं.
आपण कळत नकळत हे करत असतोच पण त्यात कुठेतरी रेग्युल्यारीटी नसते. दोन दिवस केल कि परत येरे माझ्या मागल्या. पण कमीतकमी इनपुट मद्धे जास्तीत जास्त स्वताचा उत्कर्ष करायचा असेल तर टी. पी. एम. ची कास धरायला हवीच. आपल्या कामासाठी आणि कामामद्धे आपण इतक्या निष्ठेने काम करत असतो तर मग जे शरीर आणि मन जिवंत ठेवते त्या साठी नाकाजीमां च टी. पी. एम. सतत रोजच्या रोज वापरायला हवच.

No comments:

Post a Comment