Sunday, 22 January 2017

चोइस इज युअर्स... विनीत वर्तक
निसर्गातील सगळेच जीव जन्माला येऊन ह्याच निसर्गात विरघळून जातात. मनुष्य असा एकमेव प्राणी ह्या भूतलावर आहे. की जो स्वताला स्वतः हव तस बदलवू शकतो. जिकडे त्याचा स्वताचा भूतकाळ सुद्धा कोणा दुसऱ्याचा वाटेल इतपत. हे तो करू शकतो कारण त्याला वरदान आहे ते “चोइस” च. कोणतही चित्र जस विविध रंगांच्या अनेक रंगछटातून आकाराला येत. बनणार घर जस प्रत्येक वीट रचून आकार घेत तसच माणसाच आयुष्य आकार घेत ते त्याने केलेल्या चोइस मधून.
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनांमध्ये आपल्याला नेहमीच चोइस असतो. अश्या खूप घटना असतात की जिकडे चोइस आपल्याला नसतो. यश किंवा अपयश, चांगल किंवा वाईट, चढ किंवा उतार काहीही आयुष्यात आल तरी प्रत्येकवेळी आपण काय चोइस करतो. ह्यावर बरच काही अवलंबून असते. एक विफल आयुष्य जगताना ते नकोस अनेक वेळा वाटते. स्वताला संपवून टाकावं असा विचार ही येतो. नको तो त्रास, नको त्या आठवणी मग त्या प्रेमाच्या असो, अपयशाच्या असो, दुःखाच्या असो वा रागाच्या असो. तुम्ही त्या वेळी काय चोइस करता ह्यावर पुढला येणारा क्षण अवलंबून असतो. विफल आयुष्याचा शेवट की नवीन आयुष्याची सुरवात. चोइस इज युअर्स.
हरलेला सुद्धा खेळलेला असतो. आपण त्याकडे कस बघायचं ही चोइस पण आपणच करायची असते. गोष्टी घडून गेल्यावर त्या कश्या करता आल्या असत्या हा अनुभव होतो. तर आपण अस का केल नाही हेच सतत स्वताला सांगून त्याबद्दल नेहमी कमी लेखण हा आपला चोइस असतो. अनुभवातून प्रगल्भ करत नवीन दिवसाला सामोर जायचं की दुःखाच्या समुद्रात, अपयशाच्या गर्तेत स्वताला बुडवून टाकायचं हा चोइस पण आपलाच असतो. काल घडून गेलेला आहे. तो परत येण शक्य नाही. हे माहित असताना त्यात झालेल्या घटनेत आपला आज घालवायचा की उद्याच्या नवीन आशेवर आत्ताची मोर्चेबांधणी करायची. चोइस इज युअर्स.
आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला आपल्याकडे चोइस आहे. नको ते नाकारण्याचा आणी हव ते स्वीकारण्याचा. आपण कोणता चोइस करतो. ह्यावर येणारा क्षण अवलंबून आहे. आपण कोणाला आवडत नाही म्हणून कोणाला दुषण देण्यापेक्षा आपल्याला लोक आवडू शकतात न. चोइस इज युअर्स. तुम्हाला शरीराच्या व्याधी आहेत. मग हे दुखत, ते दुखत किंवा कस होणार ह्या पेक्षा वर्क आउट करून स्वतला तंदुरुस्त ठेवण्याचा चोइस आहेच न. शेवटी चोइस इज युअर्स.
आयुष्यात काही गोष्टी चोइस शिवाय मिळतात. जस तुमचे आई- वडील, तुमच कुटुंब, तुमची भावंड, तुमचे नातेवाईक, तुमच घराण आणी इतर अनेक. ह्या गोष्टी सोडल्या तर आयुष्यात तुमच्याकडे नेहमीच असते चोइस. तुमच शिक्षण, तुमचा नोकरी धंदा, तुमच राहणीमान, तुमच प्रेम, तुमचा जोडीदार आणी तुमच आयुष्य. सगळच असते तुमची चोइस. दुसऱ्या गोष्टीना नाव ठेवताना आपण आपला चोइस बरोबर आहे की नाही हे हि तपासायला हवच. तुम्हाला आयुष्यात काही हव असेल तर रडत बसून काही होणार नाही. घाम गाळायची चोइस स्वीकारलीत तर अनेक हवे असलेले क्षण आपली वाट बघत बसतील. चोइस इज युअर्स.

No comments:

Post a Comment