A Promise is a Promise… विनीत वर्तक
दिल्ली च्या कार एक्स्पो मध्ये टाटा न्यानो लोंच करताना भावनिक होऊन रतन टाटा म्हणाले होते “A Promise is a Promise” खूप काही ह्या वाक्यातून आजही शिकायला मिळते. गरीबाच्या ताटातील मिठा पासून ते अती श्रीमंत महागड्या गाड्या ज्याग्वार- ल्यांड रोवर बनवणारा टाटा ग्रुप बद्दल हे वाक्य अगदी तंतोतंत खरे आहे. जमशेदजी टाटा नी लावलेल्या त्या छोट्या वृक्षाच रुपांतर आता तब्बल ६ लाख लोकांना रोजगार आणि जवळपास १०८ बिलियन अमेरिकन डॉलर च वार्षिक उत्पन्न असणाऱ्या वटवृक्षात झाल आहे.
ब्रिटीशांच्या व्याटसन हॉटेल मद्धे गोरे नसल्यामुळे प्रवेश नाकारल्यामुळे अपमानित झालेल्या जमशेदजी टाटानी मुंबईच्या प्रवेश द्वारा समोरच ताज महाल प्यालेस उभारले. आज मितीला ह्या ग्रुप ची १०८ हॉटेल भारतात तर १७ हॉटेल परदेशात आहेत. २००८ च्या अतिरेकी हल्यात नासाडी झाल्यावर रतन टाटा ह्यांनी पुन्हा एकदा ह्या हॉटेल ला गतवैभव प्राप्त करून दिल. ह्या हॉटेल च मूळ डिझाईन एका मराठी माणसाने केल होत. रावसाहेब सीताराम खांडेराव वैद्य त्यांच्या सोबत डी. एन. मिर्झा. १९०० साली वैद्य यांच्या अचानक मृत्युनंतर हे काम W. A. Chambers ला देण्यात आल. अस म्हणतात कि ज्या व्याटसन हॉटेल मद्धे प्रवेश नाकारला होता त्याच हॉटेल च्या स्थापत्यकाराला हे काम देण्यात आल तो म्हणजे हाच तो डब्लू. ए. चेम्बर्स.
भारताच्या आजच्या महासत्तेच्या दिशेने होणाऱ्या प्रवासाच मोठ श्रेय टाटान कडे जाते. भारताच किंबहुना भारतियांच नाव त्यांनी अटकेपार नेल. २००७ मध्ये टाटा स्टील जगात ५६ व्या स्थानावर होती. आपल्यापेक्षा तब्बल ४ पट असणाऱ्या कोरस ह्या यांगलो- डच कंपनी वर ८.१ मिलियन डॉलर मोजून ताबा मिळवला. त्या वेळेस कोरस जगात ९ व्या स्थानावर होती. ह्या खरेदीमुळे टाटा स्टील त्यावेळी जगातील सगळ्यात मोठी ५ वि कंपनी झाली. ज्याग्वार आणि ल्यांड रोवर जेव्हा टाटानि फोर्ड कडून खरेदी केले तेव्हा त्यांचा लौकिक फक्त श्रीमंत लोकांच्या गाड्या असा होता. एका भारतीय कंपनीने एका अमेरिकन कंपनीकडून कंपनी विकत घेणे हा गोऱ्या लोकांच्या नाकावर टिच्चून मारलेला षटकार होता. एकीकडे अश्या महागड्या गाड्या बनवताना सुद्धा टाटा सर्वसामान्य भारतीयाला विसरले नाहीत. त्याच वर्षी म्हणजे २००८ साली टाटा न्यानो लौंच केली. जगातील सर्वात स्वस्त कार अशी बिरुदावली आजही मिरवणारी कार म्हणून तिचा जगात लौकिक आहे. एकाच वर्षी सर्वात महागड्या कार आणि जगातील सर्वात स्वस्त कार हे टाटाच करू शकतात.
ब्रिटीश लोकांनी आपला चहा सगळीकडे नेला त्याच चहाच उत्पादन करणाऱ्या टेटली कंपनी वर टाटानी २००० साली ताबा मिळवला. युनिलीवर नंतर जगात सगळ्यात सर्वाधिक चहा बनवणाऱ्या मध्ये टाटा ग्लोबल बेवरेजेस दुसऱ्या नंबरवर आहे. पूर्ण भारताच्या जेवणाला चव आणणाऱ्या आयोडीन युक्त मिठाची सुरवात टाटानी केली. भारतातील मिठाची उलाढाल २२ बिलियन रुपयांची आहे. त्यातील १७% हिस्सा टाटान चा आहे. ज्या वेळेस कॉम्प्यूटर ची पायमुळ भारतात रोवली नव्हती त्यावेळेस १९६८ साली टी. सी. एस. ची स्थापना टाटानी केली. आज जगातील पहिल्या ४ आय. टी. कंपन्यानमद्धे तिची गणना होते. ३.५ लाखापेक्षा जास्त कर्मचारी आणि ८० बिलियन डॉलर इतक मार्केट क्यापिटल असणारी टी. सी. एस. भारतातील अग्रणी कंपनी आहे.
सगळ्यात मोठ योगदान आहे ते म्हणजे समाजच. जिथून आपण आलो त्याच आपण देण लागतो ह्या भावनेतून टाटा ट्रस्ट च योगदान लिहण्यापलीकडल आहे. TIFR, Tata Memorial Hospital, TISS, IIS ह्या आणि अश्या अनेक संस्था टाटानी स्थापन केल्यात आणि आजचा भारत घडवण्यात त्याचं योगदान खूप मोठ आहे. ३०,००० पेक्षा जास्ती रुग्ण प्रत्येक वर्षी टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये क्यान्सर वर उपचार घेतात. ह्यातील तब्बल ७०% रुग्णांवर फुकट उपचार केले जातात. मला वाटते ह्याहून जास्ती लिहण्याची गरज नाही.
टाटा मधील जवळपास ६६% मालकी हि वेगवेगळ्या ट्रस्ट कडे आहे. टाटान न होणाऱ्या वार्षिक ७ बिलियन अमेरिकन डॉलर चा फायदा हा ह्याच ट्रस्ट मार्फत भारताच्या कल्याणासाठी वापरला जातो. मग ते रिसर्च असो वा मेडिकल. टाटा नेहमीच गेल्या १४८ वर्ष आपल्या शब्दाला जागत आले आहेत. जेव्हा रतन टाटा नी आपल्या खांद्यावरून ह्या सर्वाची धुरा सायरस मिस्त्री ना दिली असेल तेव्हा एक वाक्य नक्कीच लक्षात ठेव अस सांगितलं असेल. A Promise is a Promise.........
No comments:
Post a Comment