Sunday, 22 January 2017

चुकलेल फेमिनिझम... विनीत वर्तक
फेमिनिझम चा खरा अर्थ होतो " women's rights on the ground of the equality of the sexes." किंवा "Feminism is a range of political movements, ideologies, and social movements that share a common goal: to define, establish, and achieve political, economic, personal, and social rights for women." स्त्री चे अधिकार जे की सर्वाना समान असतील लिंगभेदाशिवाय सर्वच क्षेत्रात. असा ढोबळ मानाने अर्थ असला तरी ह्या शब्दाचा अर्थ पुरुषाची बरोबरी असा काढला जातो.
स्त्री किंवा पुरुष ही दोन्ही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत. त्यांची तुलना मुळातच चुकीची आहे. प्रत्येकात काही न काही कमी जास्त आहे. त्यामुळे जे आपल्याकडे कमी आहे. ते अट्टाहासाने मिळवण्यासाठी जी केविलवाणी धडपड केली जाते त्याला फेमिनिझम अस गोंडस नाव दिल जाते. मूळ अर्थ बाजूला ठेवून सगळ्या क्षेत्रात पुरुषांची बरोबरी केली की स्त्री च कर्तुत्व, सन्मान आणी स्त्री चे सगळे अधिकार पूर्ण झाले असच काहीस चित्र आपल्या समोर उभ केल जाते.
स्त्री मुक्ती च्या नावाखाली अनेकदा पुरुषांना उगीच टार्गेट केल जाते. अगदी नसलेल्या गोष्टी सुद्धा ओढून ताणून माथी मारल्या जातात. आपण लावलेला अर्थच इतका चुकीचा आहे की त्यामुळे होणाऱ्या घटना ही त्याच पद्धतीने केल्या जातात आणी परिणाम दाखवतात. स्त्री ने सगळ्या क्षेत्रात पुरुषाची बरोबरी केली किंवा वरचढ झाली तर फेमिनिझम जिंकल अस काही आहे का? एक्व्यालीटी चा अर्थ बरोबरी नाही होत तर समान असा होतो. समान आणी बरोबरी ह्या दोन्ही शब्दात खूप अंतर आहे. बरोबरी किंवा तुलना ही एकमेकांशी केली जाते. तर समान हे बरोबरीने चालते.
स्त्री एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. पुरुषी वर्चस्वामुळे गेल्या अनेक शतकात जवळपास सगळ्याच क्षेत्रात समानता स्त्री ला मिळाली नव्हती. आता ती संधी किंवा मी तर म्हणेन एक चांगल वळण माणसाच्या प्रदीर्घ वाटचालीत आल आहे की जिकडे स्त्री ला समान संधी मिळत आहे. पण समानतेचा अर्थ बरोबरी घेऊन त्याच्या नावाने आपली दुकाने सांभाळणारे बरेच आहेत किंबहुना खेदाने त्याही स्त्रीयाच आहेत.
पुरुषी वर्चस्व, पुरूषाने केलेला अन्याय किंवा समानतेतून दवडलेल्या संधी ह्याबद्दल मला नाही वाटत कोणत्या प्रगल्भ पुरुषाच्या मनात शंका असेल. मी इकडे प्रगल्भ म्हंटलेले आहे. त्यामुळे सरसकट सर्व त्यात येत नाहीत. १०००- २००० वर्षांचा सामाजिक पडदा उघडायला थोडा वेळ जाणार. उशिरा का होईना तो उघडतो आहे. पण ह्याचा अर्थ रंगमंच आपला झाला म्हणून त्याचा कसाही वापर केला असा होत नाही.
फेमिनिझम च्या नावाखाली कित्येक पुरुषाला स्त्री खेळण्यासाठी वापरू लागली आहे. ह्याच्या दोन्ही बाजू आहेत. मी दुसर्या बाजुविषयी लिहितो आहे की जिकडे स्त्री च्या बरोबरी करणाच्या अट्टाहासामुळे अनेक पुरुषांना, संसाराना अनेक लोकांना खूप मानसिक, शारीरिक त्रासातून जावे लागते. नक्कीच स्त्री समानता हा खूप मोठा विषय आहे. त्यात अनेक गुंतागुंती आहेत. अनेक विचार आहेत. पण फरक आहे तो वैचारिक बैठीकीचा.
समानता आणी बरोबरी ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. इक्वल राईट्स चा अर्थ होतो समान संधी. समान संधी चा अर्थ होतो की आपल्या कर्तुत्वाप्रमाणे किंवा आपल्या स्व बळावर काहीतरी करून दाखवण्याची संधी न की संधी मिळताच पुरूषाने हे केल आहे मग मी का नाही? पुरूषाने अनेक क्षेत्र पादाक्रांत केली असली तरी स्त्रियांसाठी क्षितीज कमी आहेत का? स्त्री ची फेमिनिझम ची संकल्पना पुरुषाच्या बरोबरीने पूर्ण होते का? ती संधी मिळून स्त्री तिथवर पोचू नाही शकली तर तीच अस्तित्व शून्य होते का? तिथे पोचली तरी तीच अस्तित्व सिद्ध झाल का?
स्त्री आपल्याच परीने किती समृद्ध आणी स्वतंत्र आहे. पुरुषाशी बरोबरी करून आपलाच दर्जा आपण खाली आणत आहोत अस स्त्री ला वाटत नाही का? दिसण्याच्या बाबतीत स्त्री समृद्ध आहे, विचारांच्या बाबतीत स्त्री स्वतंत्र , मातृत्वाच्या बाबतीत स्त्री स्वतंत्र मग अश्या सगळ्या बाबतीत स्वतंत्र अस्तित्व असताना बरोबरी करून आपणच आपल्या क्षितीजांची व्याप्ती कमी करत आहोत अस स्त्री ला वाटत नाही का? फेमिनिझम नक्कीच असावं त्याचा अभिमान ही असावा. त्यासाठी गरज पडली तर दोन हात करण्याची तयारी ही असावी. कारण ते मूळ आहे स्त्री असण्याच त्याच्या स्वातंत्र्यच. पण तुलना आणी बरोबरी हे त्याच उत्तर असू नये अस मला वाटते. हे चुकलेल फेमिनिझम प्रकाशापेक्षा अंधाराकडेच तिची वाटचाल करून देते आहे.

No comments:

Post a Comment