Sunday 22 January 2017

मिस यु ... विनीत वर्तक 
काही शब्द आपल्या जिभेवर इतके रुळतात कि आपण अनेक वेळा अनवधानाने सतत बोलून जातो. कधी त्या मागचा अर्थ जाणून घ्यायचा आपला प्रयत्न हि नसतो. मिस यु असाच एक शब्द अगदी प्रत्येक संभाषणात स्पेशली जेव्हा ते संभाषण जोडीदार, मित्र, मैत्रीण किंवा अगदी जिवाभावाच्या व्यक्तींमध्ये असते तेव्हा प्रत्येक संभाषणाच्या शेवटी पटकन आपण टाकून देतोच. पण ह्याचा अर्थ कधी फील करण्याचा आपण प्रयत्न करतो का?
मिस यु किंवा आठवण येते आहे. हा जरी शाब्दिक अर्थ असला तरी त्याला भावनांची जोड मिळाली तर पूर्ण मिनिग त्याचे बदलून जाते. आपण त्या व्यक्तीची आठवण काढत असलो किंवा त्याची अनुपस्थितीची जाणीव आपल्याला होत असली तरी त्या मिस यु ला आपण कधी फील करतो का? म्हणजे बघा आपण कोणतेही कार्य करत असू त्या प्रत्येक वेळी ती व्यक्ती आपल्या सोबत असावी अस आपल्याला वाटत असेल. म्हणजे अगदी चालताना सुद्धा तिचा सहवास आपल्याला हवा हवासा वाटत असेल पण ती व्यक्ती आजूबाजूला नाही आहे. आपण बोलण्याचा प्रयत्न करून सुद्धा आपल्याला कधी काही बोलता येत नाही. अश्या वेळी जाणवते ते फक्त अस्तित्व.
आपण डोळ्यांनी जे बघतो, कानांनी जे ऐकतो ते सर्व त्या व्यक्तीशी शेअर करावस वाटते आहे. अगदी आपल्या डोळ्यांनी, कानांनी किंवा एकूणच जे क्षण आपण अनुभवतो आहे ते सगळेच त्या व्यक्तीसोबत शेअर करावेसे वाटण. त्या व्यक्तीची मत जाणून घेण. आपण एखादी खरेदी करतो आहे. एखादी गोष्ट आवडली पण ती त्या व्यक्तीला आवडेल का ते त्याच किंवा तीच ह्यावर मत काय असेल ते सगळच कुठेतरी अस्तित्त्वात दिसणार पण पकडता न येणार.
असे काही क्षण असतात कि जिकडे अगदी त्या व्यक्तीच असण खुप काही देऊन जाते. बाकी काही नको असते. अगदी दुःखाचे, सुखाचे किंवा विरहाचे क्षण असोत. पण त्या व्यक्तीच अस्तित्व पण आपण मिस करतो. शरीराने लांब असेल हि पण जेव्हा ते अस्तित्व कोणत्याही कारणांनी मिस करतो तेव्हा त्याचा त्रास किंवा तो विरह शब्दांपलीकडचा असतो. खरे तर तो कोणालाही सांगता हि येत नाही. दाखवता हि येत नाही. जवळपास प्रत्येक वेळी मुखवटा धारण करून आपल्याला ते मिस करण लपवावं लागते. ती व्यक्ती जेव्हा समोर येते न तेव्हा ते गेलेले क्षणात आपण त्या व्यक्तीला किती मिस केल हे सांगण सुद्धा कठीण असते.
दोन शब्द पण प्रचंड अशी भावनांची ताकद ह्या दोन शब्दात आहे. आपण किती सहज बोलून जातो. पुढल्या वेळी जेव्हा कोणाला हे दोन शब्द बोलू तेव्हा आपल्याला काय वाटते त्याचा एक सेकंद नक्की विचार करूयात. जेव्हा कोण आपल्याला बोलेल तेव्हा त्याच्या किंवा तिच्या परिस्तिथीचा विचार नक्की करूयात. कारण शब्दात ताकद असते पण त्याला जेव्हा भावना मिळतात तेव्हा त्यात आयुष्य बदलवण्याची ताकद येते. कदाचित पुढल्या वेळी भावनांची जोड देऊन बघू काय माहित मिस यु आपल्या आयुष्यात कोणते बदल घडवते.

No comments:

Post a Comment