Sunday, 22 January 2017

आय. एन. एस. विराट.. विनीत वर्तक
“ग्र्यांड ओल्ड लेडी” अस जिच वर्णन केल जाते. तब्बल ६ दशके म्हणजे जवळपास ५७ वर्षाहून अधिक काळ समुद्राच्या अथांग पाण्यातून जिने शेकडो मैल अंतर कापल. आधी ब्रिटीश मग भारताच्या सागरी किनार्यांची सुरक्षा आपल्या खांद्यावर झेलली. जगातील सर्वात जुनी विमानवाहू युद्धनौका कार्यरत असणारी अशी ग्र्यांड ओल्ड लेडी ने आपली शेवटची पाण्यातील सफर सुरु केली आहे. मुंबई वरून कोचीन शिपयार्ड पर्यंतच अंतर कापून ओल्ड लेडी पाण्याचा कायमचा निरोप घेणार आहे.
१९५९ साली कमिशन झालेली हि ओल्ड लेडी आधी एच. एम. एस हर्मेस ह्या नावाने ब्रिटीश नेव्ही मध्ये कार्यरत होती. १९८७ साली ती भारतात दाखल झाली ती आजतागायत भारताच्या समुद्री किनार्यांच रक्षण करत होती. २०१३ मद्धे आय. एन. एस. विक्रमादित्य येई पर्यंत भारताच्या नेव्ही ची ती फ्ल्यागशीप होती. तब्बल २८७०० टनांच डिस्प्लेसमेंट असणारी हि युद्धनौका जरी आजच्या मानाने खूप कमी वाटत असली तरी तिच्यावरील २६ एअरक्राफ्ट आणि २ X ४० मिमी बोफोर्स गन आणि त्या सोबत तब्बल १२०७ लोकांचा शिपिंग क्रू त्या सोबत १४३ लोकांचा एअर क्रू शत्रूच्या मनात धडकी भरवण्यास आजही तितकाच सक्षम होता.
वाढता मेंटनन्स चा खर्च, ढासळत चाललेली ग्र्यांड ओल्ड लेडी ची तब्येत ह्यामुळे अगदी २०२० पर्यंत जगण्याची आशा असताना कठीण मनाने भारतीय नेव्ही ने तिला अखेरचा निरोप द्यायचा निर्णय घेतला. आता २७ जुलै रोजी आपली अखेरची पाण्यातील यात्रा संपवून ओल्ड लेडी अनंताच्या प्रवासाच्या वाटेने वाटचाल करेल. ह्या देशाच आपण काही देण लागतो. अर्थात ह्याची जाणीव आपल्याला आपल्या हक्कांशिवाय कधीच होत नाही. पण ज्या गौरवशाली इतिहासाची पाने वाचतो. इतिहासापासून माहित असलेली जवळपास सगळी आक्रमण पाण्यातून झाली असताना ७५१७ किमी लांबीच्या भूमीची रात्रन दिवस रक्षा करणाऱ्या हि ग्र्यांड ओल्ड लेडी म्हणजेच आय. एन. एस. विराट आपल्यामागे एक खूप मोठी पोकळी ठेवून जात आहे. ती कधीच न भरून येणारी आहे. तिला आणि तिची देखभाल करून देशाच्या सेवेत सदा समर्पित असणार्यां सर्वाना सलाम

No comments:

Post a Comment