Sunday 22 January 2017

आकाशातील ३३ डोळे... विनीत वर्तक
हिंदू धर्मात ३३ ह्या आकड्याला खूप महत्व आहे. हिदू धर्मात ३३ कोटी देव आहेत अस म्हंटल जाते. हे ३३ कोटी देव हिंदू धर्माची, माणसांची रक्षा करतात. आजच्या कलियुगात सुद्धा भारताच्या दृष्टीने ३३ आकड्याला खूप महत्व आहे. गेल्याच आठवड्यात मातृभूमीच्या संरक्षणासाठी केलेल्या अतिशय नियोजनबद्ध सर्जिकल स्ट्राईक मद्धे ४०-५० अतिरेक्यांना यमनासदनी पाठवण्यात आकाशातील डोळ्याचं महत्व अधोरेखित झाल आहे. भारताचे आकाशातील ते डोळे म्हणजे इस्रो ने सोडलेले ३३ भारतीय उपग्रह. एका डोळ्याने मंगळावर लक्ष ठेवताना ३३ डोळे सतत पृथ्वीभोवती फिरत २४ X ७ भारतावर नजर ठेऊन असतात. ३३ पेकी १२ उपग्रह हे कम्युनिकेशन पठडीमधले आहेत. ७ नेव्हिगेशन कामासाठी, १० पृथ्वीच ओब्झरवेशन करण्यासाठी, तर उरलेले ४ पृथ्वीच्या वातावरणावर नजर ठेवण्यासाठी कार्यरत आहेत.
इस्रो च उद्दिष्ठ युद्ध करणे नसून सुद्धा देशाच्या सामरिक महत्वासाठी तिने दिलेलं योगदान अतिशय अत्युच्च पातळीच आहे. चंद्र, मंगळ मोहिमा करून देशाच नाव उज्जल करताना त्याच वेळी इस्रो चे १७००० लोक १.२ बिलियन लोकांच आयुष्य सुरक्षित करण्यासाठी झटत असतात. सर्जिकल स्ट्राईक यशस्वी होण्यामागे सगळ्यात महत्वाच कारण पुढे येत आहे ते म्हणजे भारताकडे असलेली गरुडाची नजर. अवकाशातून ५२६ किमी वरून गरुडाच्या नजरेने पूर्ण भारताची निगराणी इस्रो करत असते. उदाहरण द्यायचं झाल तर ह्याच वर्षी २२ जून ला सोडलेल्या क्यारट्रोस्याट- २ हा उपग्रह पाकिस्तानी पंतप्रधानाच्या घराबाहेर किती गाड्या उभ्या आहेत ते मोजू शकतो. त्याच्या ०.६५ (६५० सेमी) मीटर इतक्या प्रचंड सूक्ष्म नजरेतून ९० मिनिटात ३७ किमी प्रती सेकंद ह्या वेगात पृथ्वीभोवती फिरताना पाकिस्तानचा प्रत्येक रणगाडा, प्रत्येक ट्रक, प्रत्येक फायटर एअर क्राफ्ट कुठे आहे ह्याची मोजदाद तसच स्थान कळवू शकतो. ३७ किमी/ सेकंद ह्या प्रचंड वेगात जाताना सुद्धा एकाच ठिकाणी आपली नजर रोखून १ मिनिटाचा विडीओ पण बनवू शकतो.
पाकिस्तान सोडाच पण चायना कडे पण इतका अचूक वेध घेणारे डोळे आकाशात नाहीत. चायना चे डोळे ५ मीटर पर्यंतच बघू शकतात. त्याचवेळी भारत २५ सेंटीमीटर इतकी सूक्ष्म नजर असणारे डोळे आकाशात पाठवण्याची तयारी करत आहे. स्पेस इमेजिंग टेक्नोलोजी मध्ये भारताने केलेली गुंतवणूक आता त्याचा परतावा द्यायला सुरुवात झालेली आहे. क्यारट्रोस्याट- २ च्या जोडीला क्यारट्रोस्याट- १ तसेच रिसोर्सस्याट मिळून दिवसाच्या कोणत्याही क्षणाला भारतात कुठेही आपल्या सूक्ष्म डोळ्यांद्वारे नजर ठेवत असतात. ह्यांच्या जोडीला रीस्याट – १, रीस्याट – २ हे अंधारात सुद्धा बघण्याची क्षमता ठेवून आहेत. ह्या सर्वांच्या जोडीला अजून एक नजर ठेवणारा तिसरा डोळा म्हणजे जीस्याट- ६ तब्बल २००० केजी वजन आणी ६ मीटर व्यासाची एन्टीना असणारा तिसरा डोळा सतत भारताच्या दिशेने बघत रात्रन दिवस भारताच्या सीमेवर नजर ठेवून असतो. मल्टीमिडिया केपेबल असणारा हा डोळा २१ व्या शतकातील नेटवर्क युद्धाच्या वेळी खूप मोलाची भूमिका बजावत आहे.
ह्याच पुढच वर्जन म्हणजे जीस्याट – १ ए मध्ये ह्यावून शक्तिशाली अशी प्रणाली असणार आहे. अश्या सर्जिकल स्ट्राईक च्या वेळी सैनिकांच्या हेल्मेट वर लावलेल्या क्यामेरातून पंतप्रधान तसेच अतीमहत्वाच्या व्यक्ती अगदी दिल्लीतील साउथ ब्लोक मध्ये बसून पूर्ण ऑपरेशन अगदी घडताना बघू शकतात. जसे ओसामा ला मारताना अमेरिकन प्रेसिडेंट नी बघितलं होत. अशी अद्यावत यंत्रणा असणाऱ्या मोजक्याच देशात भारताचा समावेश होतो. ह्या डोळांच्या जोडीला ७ उपग्रहांनी बनलेली नाविक हि जीपीएस यंत्रणा शत्रूचा कर्दनकाळ ठरणारी आहे. साउथ एशिया मद्धे अशी यंत्रणा असणारा भारत अमेरिका, रशिया नंतरचा तिसरा देश आहे. तसेच नाविक पूर्णतः स्वदेशी असल्यामुळे युद्धात ती अतिशय मोलाची कामगिरी बजावू शकते. डागलेल्या एखाद्या क्षेपणास्त्राला त्याच्या इच्छित स्थळी अगदी २० मीटर अचूकतेने पोचवू शकते. हि अचूकता अमेरिका किंवा रशिया च्या जीपीएस पेक्षा उत्कृष्ठ आहे. ह्यावरून नाविक शत्रूच्या गोटात प्रचंड नुकसान करू शकते. २० मीटर अचूकता हि लोकांसाठी आहे. तर ह्यातील काही नेटवर्क चा भाग सैनिकी कारणांसाठी राखून ठेवलेला आहे. अस म्हंटल जाते कि ह्याची अचूकता अजून जास्ती असू शकते. नाविक च्या जी. पी. एस. च कार्यक्षेत्र हे भारताच्या चोबाजुंच्या सीमेंपलीकडे १५०० किमी पर्यंत पसरलेलं आहे. ह्यामुळे नाविक बनवताना भारताच्या शेजारील शत्रूंचा योग्य तो विचार केला गेला आहे.
हे सगळे डोळे बनवताना जे ह्याचा वापर करणार त्यांच्या सांगण्याप्रमाणे टेलर मेड बनवण्यात आले आहेत. युद्धच नाही तर नैसर्गिक आपत्ती, अपघात, किंवा सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी काय लागेल ह्याचा विचार करून प्रत्येक उपग्रह बनवला गेला आहे. अस म्हणतात कि पंतप्रधान मोदी हे टेक्नोसेवी तर आहेतच त्याच जोडीला त्यांना स्पेस टेक्नोलोजी मध्ये खूप रस आहे. आपली नित्यानियमाची संसदेतील काम करताना त्याच जोडीला प्रत्येक रॉकेट लोंच तितक्याच उत्सुकतेने ते फोलो करतात. त्यामुळे शत्रूची वाकडी नजर पडताच इस्रो चे हे ३३ डोळे कधी, केव्हा, कुठे फिरवायचे ह्याची जाण पण त्यांना तितकीच आहे.

No comments:

Post a Comment