बदललेली समीकरण... विनीत वर्तक
गेल्या काही वर्षात जगाच्या राजकारणाची समीकरण झपाट्याने बदलत आहेत. ह्याला काही आर्थिक कारण तर आहेतच पण एकूणच जगाच्या राजकारणात आत्तापर्यंत सुप्त असलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाची हालचाल सुरु झाली आहे. तो फुटेल का नाही? ह्याबाबत कोणीच आत्ता काही सांगू शकत नाही. पण बुद्धिबळाच्या ह्या पटलावर आत्ता पर्यंत प्याद्या प्रमाणे वावरणाऱ्या भारताने वजिराची भूमिका घ्यायला सुरवात केल्यावर हे बदलांचे वारे वाहू लागले आहेत.
अमेरिकेच्या एकूणच थिकिंग प्रोसेस च मला खूप कौतुक आहे. सगळ्यात आधी भारताच जागतिक पटलावरच महत्व त्यांनी ओळखल. लोकसभेच्या च्या निवडणुकीत सुद्धा ह्याची चुणूक आपल्याला पाहिला मिळाली. भारत आर्थिक महासत्ता बनेल कि नाही हा वेगळा भाग पण तो जागा होतो आहे. त्याला वेळीच आपण साथ दिली पाहिजे हे अमेरिकेने पुरेपूर ओळखल. ओबामाच प्रजासत्ताक दिवशी हजर राहण ते भारत आशियातील पिवोट अस सांगून भारताच्या सुरक्षा समिती मधील स्थायी सदस्य ला पाठींबा ते एन. एस. जी., एम. टी. सी. आर. सारख्या गटात भारताला प्रवेश देण्यासाठी अमेरिकेने वापरलेले आपल वजन हे अमेरिकेच्या चाणाक्ष नीतीचे पुरावे आहेत. अर्थात अमेरिकेचा फायदा ह्यात आहेच पण अमेरिका जे बघते आहे ते बघण्याचा आपण प्रयत्न पण करू शकत नाहीत. पुढील ५० वर्षात भारताचे जागतिक बुद्धिबळावर स्थान हे वजिराच होणार आहे. वजीर कोणत्या राजापुढे चाली खेळतो हे महत्वाच आहे. दोन महासत्ता आपसात भिडणार आहेत. अमेरिका, चीन आपल्या सोंगट्या घेऊन जेव्हा समोर येतील तेव्हा भारतासारखा वजीर अमेरिकेला आपल्या बाजूला असण अत्यंत आवशक्य आहे. कारण बुद्धिबळात राजा काहीच करत नसतो. डाव जिंकण्याची संधी किंवा हरण्याची सर्व धुरा वजीरावर असते हे ओळखण्यात अमेरिका निष्णात आहे.
भारताची आर्थिक स्थिती हि तर एक मेन कारण आहेच पण त्या सोबत मोदी सारख्या मुत्सुद्दी राजकारणाच्या हातात सत्तेच्या नाड्या आल्याने गेम अजूनच शह- कटशह चा झाला आहे. चीन एकीकडे आशिया खंडाची धुरा आपल्या हाती घेण्यास पूर्ण प्रयत्न करतो आहे. त्याला एकमेव शत्रू किंवा त्याच्या ताकदीचा योद्धा समोर दिसतो आहे तो म्हणजे भारत. भौगोलिक, आर्थिक, सामरिक दृष्ट्या भारताच स्थान अतिशय महत्वाच आहे. अमेरिकेच्या वर्चस्वाला हादरे द्याचे असतील तर आशिया आपल्या हातात आला पाहिजे हे चीन ला पक्क ठाऊक आहे. पण भारताला उघड मात देण म्हणजे आपली ८०% शक्ती तिकडेच खर्च होण हे चीन ला माहित आहे. चीन ला मैत्री नको आहे न शत्रुत्व. कारण दोघांमध्ये हार त्याचीच होणार आहे हे तो जाणून आहे. मग ह्या सर्व खेळात भारताने प्यादे बनून राहावे अशीच त्याची इच्छा आहे. जागतिक राजकारणात न्युट्रल असलेली आपली प्रतिमा भारताने सांभाळावी व कुरघोडीच्या ह्या खेळात भारताने उतरू नये अशी त्याची मनोमन इच्छा आहे.
ह्या सगळ्यात मोदी आणि भारताने आपलाच खेळ सुरु केला आहे. आपल्याकडे झुकलेल्या अमेरिके कडून आपला फायदा करून घेण्यात आपण कुठेही थांबत नाही आहोत. महत्वाच्या ठिकाणी अमेरिकेचा उघड पाठींबा मिळाल्याने जागतिक पटलावर भारताच्या शब्दाला वजन आल आहे. तंत्रज्ञान, स्पेस, अभियांत्रिकीच्या क्षेत्रात अमेरिका प्रचंड पुढे आहे. आपण त्यांची बरोबरी करू शकत नाही. हे वास्तव स्वीकारून जेवढ काही घेता येईल तेवढ आपण शिकत व घेत आहोत. ह्यामुळे भारताची ह्या क्षेत्रातली इमेज वाढत चालली आहे. हे करताना चीन ला हि सहजासहजी पुढे जाऊन द्यायचं नाही हे भारत - मोदी ना चांगलच माहित आहे. चीन ने पाकिस्तान च प्याद पुढे केल आणि भारताची वाटचाल इतके वर्ष रोखली होती. आता संधी मिळताच भारताने आपली दोन प्यादी पुढे करून चीन ला कोड्यात टाकल आहे. एकीकडे बलुचिस्तान च प्याद पुढे टाकताना दुसरीकडे मोदी नी म्यानमार आणि व्हियेतनाम सारख्या देशांना उघड पाठींबा जाहीर करत भारत त्यांच्या सोबत आहे अस जागतिक पटलावर जाहीर केल आहे. ह्यामुळे चीन ची प्रचंड गोची झाली आहे. साऊथ चायना सी मद्धे वर्चस्वासाठी झटत असलेल्या चीन ला ह्या देशांना आपल्या शक्ती पुढे चिरडून टाकायचे होते पण भारताच्या पाठीम्ब्यामुळे सगळाच गोंधळ झाला आहे. भारताने अत्याधुनिक अशी ब्राह्मोस क्षेपणास्त्रे व्हियेतनाम ला दिल्याने ३०० किमी च्या क्षेत्रात चीन च्या कोणत्याच बोटीला प्रवेश करणे अतिशय जिकरीच होणार आहे.
अतिशय रंजक झालेल्या ह्या खेळत अमेरिकेचे पुढचे पाउल काय असेल ते बघणे रंजक असणार आहे? तर चीन ह्या अडकलेल्या फासातून कशी सुटका करतो ते बघणे हि? तर इकडे भारत – मोदी पुढे कोणती चाल खेळतात ह्यावर प्याद्यांची भूमिका काय असेल हे सांगणे हि खूप रंजक असणार आहे. एकूण काय तर जागतिक राजकारणात बदलेली समीकरणे एक मात्र नक्की सांगतात. भारत काळ्या पांढऱ्या सोंगट्याच्या खेळात अतिशय मोलाची भूमिका बजावणार आहे. कोण जिंकतो आणि कोण हरतो ह्या पेक्षा दोन्ही राजांना झुलवत ठेवून स्वताचा उत्कर्ष करून घेणे भारताला कितपत जमते हे पाहणे खूप रंजक असणार आहे.
No comments:
Post a Comment