Sunday, 22 January 2017

वर्कहॉर्स... विनीत वर्तक
ते म्हणतात वर्कहॉर्स आणी उगाच नाही...
२३ वर्ष , ३७ फ्लाईट, १२१ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केलेले आहेत म्हणून इस्रो चा वर्कहॉर्स आहे पी एस एल व्ही म्हणजेच पोलार स्याटेलाईट लोंच वैकल. इस्रो च वर्कहॉर्स म्हणून पी एस एल व्ही प्रसिद्ध आहे ते उगाच नाही. सप्टेंबर २६, २०१६ रोजी एकाच उड्डाणात वेगवेगळ्या कक्षेत उपग्रह यशस्वी रित्या स्थापन करून पुन्हा एकदा आपल महत्व त्याने सिद्ध केल आहे. एकाच वेळेस वेगवेगळ्या कक्षेतील उपग्रह स्थापन केल्यामुळे त्याच्या उड्डाणाचा खर्च खूप कमी झाला आहे. एकेकाळी आपले उपग्रह दुसऱ्याच्या दारी नेऊन प्रक्षेपित करण्यासाठी वाट बघावी लागत होती. त्यामुळे भारतच स्थान हे कस्टमर पुरती मर्यादित होत. ह्या संकल्पना मोडीत काढत आता भारत हा अवकाश क्षेत्रातील भागीदार समजला जातो. अमेरिका (नासा), रशिया, फ्रांस, यु.ए.ई असे अनेक देश अवकाश संशोधनात भारताला भागीदार मानतात किंवा तसे करार केले आहेत.
हि खूप मोठी उपलब्धी भारताला मिळाली ती त्याच्या वर्कहॉर्स मुळे. ४४.४ मीटर उंच, १२० कोटी रुपये किमतीचा, १७५० कीलोग्र्याम वजन वाहून नेऊ शकणारा पी एस एल व्ही इस्रो चा वर्कहॉर्स आहे. तो इतका भरवश्याचा आहे की त्याच्या पाठीवरून आपले उपग्रह सोडण्यासाठी वेटिंग लिस्ट आहे. अन्त्रीक्स कोर्पोरेशन च्या मते जी इस्रो साठी कमर्शियल मार्केट बघते त्यानुसार सध्या ५ बिलियन रुपयांच्या ऑर्डर आहेत. इतक असून सुद्धा अजून ५ बिलियन रुपयांच्या ऑर्डर साठी प्रोसेस चालू आहे. इतक करून अनेक देश लाईन मध्ये उभे आहेत.
जानेवारी २०१७ मध्ये पी एस एल व्ही एका नवी भरारी घेतो आहे की जिच्या अर्ध्यापर्यंत पोचणे अजून भल्या भल्या ना जमले नाही आहे. एकाच वेळेस ८३ उपग्रह पी एस एल व्ही घेऊन जाणार आहे. ह्यातील २ भारतीय तर तब्बल ८१ उपग्रह परदेशी आहेत. १६०० किलो वजनाचे हे वेगवेगळे उपग्रह आपल्या यानात मांडणे योग्य त्या कक्षेत, कोनात प्रक्षेपित करणे सोप्प नाही. जगात पी एस एल व्ही वर असेलला विश्वास किती भक्कम आहे ह्याच हे एक उदाहरण आहे.
गेल्या काही वर्षातला वर्कहॉर्स चा सक्सेस रेट १००% पेक्षा जास्ती आहे. कमी किमतीत, वेगवेगळ्या कक्षेत, वेगवेगळ्या धाटणीचे, वेगवेगळ्या देशांचे उपग्रह योग्य आणी अतिशय अचूक कक्षेत सोडल्यामुळे कस्टमर च्या पहिल्या पसंतीस पी एस एल व्ही उतरत आहे. अर्थात ह्या सगळ्या मागे अनेक वर्षांची इस्रो च्या सगळ्या लोकांची मेहनत आहे. जानेवारी २०१७ मद्धे जेव्हा ८३ उपग्रह घेऊन हा पुन्हा झेपावेल तेव्हा आपल्या नावाच इमान राखण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. ह्यात पी एस एल व्ही किंवा इस्रो कुठेही कमी पडणार नाही ह्याची खात्री आहे. इस्रो चा वर्कहॉर्स पुन्हा एकदा जागतिक विक्रम करेल जो की भारताची पताका अवकाशात अभिमानाने फडकवत ठेवेल.

No comments:

Post a Comment