रीनेवेबल एनर्जी .... विनीत वर्तक
ओईल, ग्यास यांचे संपत आलेले साठे. वाढणाऱ्या किंमती. त्याचसोबत वाढणार कार्बन एमिशन ह्यामुळे सध्या रीनेवेबल एनर्जी बद्दल सगळीकडेच ऐकायला मिळते. अनेक प्रकारे आपण एनर्जी ची गरज भागवू शकतो. ह्यात प्रामुख्याने भारता सारख्या देशाकडे पर्याय आहेत ते न्युक्लीयर एनर्जी आणि सोलार एनर्जी. गेल्या दोन- तीन वर्षातील भारताची रीनेवेबल एनर्जी कडची वाटचाल थक्क करणारी आहे. अर्थात अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.
कित्येक वर्ष आपण पृथ्वीतील इंधनाचे साठे फस्त करत आले आहोत आणि ते संपवण आत्ता सुद्धा सुरूच आहे. ओईल साठे संपत जाणार आहेत तसच त्याला काढण्याची प्रक्रिया खर्चिक होत जाणार आहे ज्या योगे त्याची किंमत. एका रिसर्च च्या आधारे जवळपास १६८८ बिलियन ब्यारल ओईल आहे जे कि आजच्या प्रोडक्शन रेट प्रमाणे ५३ वर्ष पुरू शकेल. अर्थात हे पृवन रिझर्व आहेत. नवीन शोध आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने हे आकडे बदलतील. पण एक आहे कि आपण हळूहळू शेवटाकडे वाटचाल करत आहोत. इधन जाळल्यावर होणार प्रदूषण हा एक वेगळाच विषय आहे. व ह्या सगळ्या वर एकच उपाय म्हणजे रीनेवेबल एनर्जी हा आहे.
न्युक्लीयर एनर्जी जी फिशन ( ह्यात एकाचे दोन अणु म्हणजे अणुविखंडन होते ) आणि फ्युजन ( ह्यात दोन अणु चा एक अणु म्हणजे अणुमिलन होते. ) ह्यांनी मिळवली जाते. सूर्य हा न्युक्लीयर फ्युजन च उत्तम उदाहरण आहे. तब्बल ६२० मिलियन मेट्रिक टन हायड्रोजन प्रत्येक सेकंदाला हेलियम मध्ये फ्युजन होतो. ह्या क्रियेत जी उर्जा बाहेर पडते ती अल्फा कणांच्या स्वरूपात. हे अल्फा कण सूर्याच्या अंतर्भागातून पृष्ठभागावर यायला मिलियन वर्षे लागतात. कन्वेक्शन प्रोसेस द्वारे उष्णता आणि प्रकाशात त्याच रुपांतर होते. हे झाल्यावर ८ मिनिटे २० सेकंदात हा प्रकाश उष्णता घेऊन पृथ्वीवर तुमच्या आमच्या पर्यंत पोहचतो. म्हणजे आज आपल्याला दिसणारा प्रकाशाची निर्मिती तब्बल मिलियन वर्षांपूर्वी झाली आहे. हे सगळच अचंबित करणार आहे. न्युक्लीयर फिशन हे न्युक्लीयर रीयाक्टर मध्ये वापरल जाते. जड अस युरेनियम २३५ च विखंडन करून एनर्जी निर्माण होते. ह्यात रिस्क असते ती शेवटी रहाणार न्युक्लीयर वेस्ट आणि किरणोत्सर्गाचा असलेला धोका.
सगळ्यात सोप्पा पर्याय भारतासमोर आहे तो म्हणजे सोलार एनर्जी. भारतातील अनेक भागात वर्षभर सूर्य अगदी दिमाखाने आपली एनर्जी देत असतो. इतके वर्ष ती अशीच वाया जात होती किंबहुना जाते आहे. आता कुठे त्याची जाणीव आपल्याला होते आहे. भारतात सध्या ८ गीग्या व्याट सोलार उर्जेची निर्मिती करतो आहे. १०० गीग्या व्याट उर्जेची निर्मिती करण्याच आपण २०२२ पर्यंत लक्ष ठेवल आहे. हे जर आपण पूर्ण करू शकलो तर जर्मनी आणि चीन च्या एकंदर क्यापासीटी पेक्षा ते दुप्पट असणार आहे. भारताच्या भौगोलिक स्थानामुळे आपल्याला ह्या देशांपेक्षा उर्जेचा अखंड स्त्रोत प्राप्त होतो. जगातील पाहिलं सोलार विमानतळ भारतात कोचीन येथे कार्यान्वित झाल आहे. १० हजार सोलार प्यानेल तब्बल ४८,०००- ५०,००० किलोव्याट उर्जा निर्माण करतात. ह्यामुळे ३००,००० मेट्रिक टन कोळश्याची बचत येत्या २५ वर्षात होणार आहे. ह्यात आलेला खर्च फक्त ६ वर्षापेक्षा कमी कालावधीत भरून येणार आहे. केरळ सारख्या ठिकाणी जर इतकी वीजनिर्मिती होऊ शकते. तर गुजरात, राजस्थान सारख्या सूर्य तळपणाऱ्या ठिकाणी किती उर्जा निर्मिती होऊ शकेल.
रीनेवेबल एनर्जी हिच आपल्याला वाचवू शकणार आहे. खरे तर आपल्या संपूर्ण वैश्विक उत्पत्ती ची सुरवात मुळी झाली ती सूर्यामुळे. सूर्यातून येणाऱ्या प्रकाश उर्जेला केमिकल एनर्जी मद्धे बदलली जाते. ह्याच केमिकल एनर्जी चा वापर करून जगातील प्रत्येक वनस्पती अन्न बनवते. कार्बन डायोक्साइड शोषून त्यातील कार्बन आणि ऑक्सिजन वेगळा केला जातो. पाणी , सूर्यप्रकाश ह्याचा वापर करून शुगर म्हणजेच कार्बोहायड्रेड मोल्युकुल मद्धे एनर्जी सेव केली जाते. फोटोसिन्थेसिस हि जगातील सर्वात मोठी आणि काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली रीनेवेबल एनर्जी आहे. ह्याचे बाय प्रोडक्ट आहे ऑक्सिजन. म्हणजे जर आपण हि प्रक्रिया कृत्रिमरित्या करू शकलो खूप मोठ्या प्रमाणात तर जगाची एनर्जी भूक अगदी बिलियन वर्षा पर्यंत भागवू शकू. त्या दृष्टीने प्रयत्न हि चालू आहेत. कदाचित २१ किंवा २२ शतकातील सर्वात मोठा शोध म्हणून कमर्शियल फोटोसिन्थेसिस कडे बघता येईल.
आपण आता हळूहळू स्टेज २ म्हणजे सोलार एनर्जी कडे जात आहोत. पण माझ्या मते जर स्टेज ३ वर म्हणजेच कमर्शियल फोटोसिन्थेसिस जर आपण प्रत्यक्षात करू शकलो. तर पृथ्वीला नंदनवन बनवायच्या दृष्टीने आपण पुन्हा एकदा वाटचाल करू.
No comments:
Post a Comment