Sunday 22 January 2017

जीवाच मोल... विनीत वर्तक
हेल्मेट घालून पेट्रोल ह्यावरून बराच गदारोळ सुरु आहे. वास्तविक हि सक्ती किंवा असला नियम करायला लागतो हेच मुळी आपल फेल्युअर आहे. बाईक किंवा दुचाकी हि मुळातच अस्थिर प्रकारातील वाहन आहे. जेव्हा अंग्युलर मुमेंटम हे क्रिटीकल पोइंट च्या पेक्षा जास्ती असते तेव्हाच फिरण्याचा मध्य हा सरळ राहू शकतो. साध्या भाषेत सांगायचं झाल तर जोवर चाक एका निश्चित गतीने फिरतात तेव्हाच ते सरळ राहू शकतात अन्यथा गुरुत्वाकर्षण बल हे त्याचा एक्सिस चेंज करून त्याला आडवं करू शकते. ह्याच फिजिक्स च्या नियमानुसार सायकल, दुचाकी वाहन हे चालत असते. ह्याचा सरळ अर्थ आहे कि चाकांची गती कमी झाली तर ती सायकल, दुचाकी हि पडण्याची भीती जास्ती असते. भारतातील, मुंबई- पुण्यातील वाहनांची कासवाची गती बघता हि स्तिथी येण्याची प्रोब्याबलिटी खूप जास्ती आहे. त्यास भरीस भर म्हणून रस्त्यांची अवस्था, खडी, पावसाचे पाणी, ड्राईविंग शिकण्यासाठी असलेली अनस्था आणि असलेला माज अपघाताला कारणीभूत होतो.
हेल्मेट हे डोक्याच रक्षण करण्याची शेवटची साखळी आहे. अश्या अपघातात मोडलेले हात, पाय पुन्हा जोडू शकतो पण मेंदूचा आघात आपण जोडू नाही शकत. हि वास्तविकता माहित असून सुद्धा चलता हे च्या नावाखाली आपण बिनदिक्कत दुचाकी चालवत असतो. हेल्मेट घालायचे तर पोलीस असलेल्या नाक्यावर. हेल्मेट घ्यायचे तर स्वस्तात स्वस्त. २०-३० हजाराच्या मोबाईल च्या स्क्रीन गार्ड साठी ४००-५०० रुपये मोजणारे आपण अनमोल असलेल्या मेंदू साठी रस्त्यावरच १०० रुपयाच हेल्मेट घेतो. आणि ते हि घालतो का तर पोलिसाने १०० रुपयाची पावती फाडू नये म्हणून? २०-३० हजाराच्या मोबाईल च मोल आपल्या मेंदूपेक्षा जास्ती आहे का? ह्याचा आपण डोळस विचार कधी करणार आहोत?
चारचाकी वाहन दुचाकी च्या मानाने सुरक्षित असते. पण तरीसुद्धा त्यात होणारे अपघात गंभीर असतात. ह्याला कारण त्याचा वेग आणि जागा. मुळातच चार चाकी वाहन हि वेगात चालतात. अपघाताच्या वेळी आपल डोक समोरच्या स्टीअरिंग व्हील किंवा ड्याशबोर्ड, समोरची सीट ह्यावर आपटून गंभीर इजा होऊ शकते. सीट बेल्ट हि त्यापासून आपल्याला वाचवण्याची एक कडी आहे. ते कसे काम करते ह्याबद्दल अनेक लोक अनभिज्ञ आहेत. सीट बेल्ट स्लो खेचताना व्यवस्तीथ रित्या बाहेर येतो. पण हेच जर का आपण जोरात खेचला तर तो लॉक होतो. जेव्हा अपघात होतो त्या वेळेस सडन इम्प्याक मुळे सीट बेल्ट लॉक होतो व आपल्या शरीराला मुमेंटम मुळे समोर आपटण्यापासून वाचवतो. सीट बेल्ट हा जीवन आणि मृत्यू हातील शेवटची कडी आहे. तसच असते एअर ब्याग्स. समोरून किंवा मागून तसेच काही गाड्यात बाजूने सुद्धा ठोकल्यास ह्या ब्याग्स डिप्लोय होतात. काही मिलीसेकंदा मध्ये हवेची पिशवी आपल शरीर आणि गाडीचा भाग ह्या मध्ये तयार होते. आपल्या शरीराला कुठेही धक्का लागण्यापासून वाचवते.
हेल्मेट, सीट बेल्ट किंवा एअर ब्याग्स ह्या जीवन – मृत्यू ह्या मधील शेवटच्या कड्या आहेत. त्या निखळण्याचा मूर्खपणा करू नका. २ वर्षापूर्वी गाडी घेताना होंडा चा डीलर मला म्हणाला साहेब कशाला १ लाख रुपये जास्ती टाकता आहेत. एअर ब्याग्स आणि ए. बी. एस सिस्टीम ची तशी हि काही गरज नाही. म्हंटल अपघात झाल्यावर ह्यामुळे जे जीव वाचतील त्यांची किंमत १ लाखापेक्षा कमी आहे का? ह्या प्रश्नावर तो निरुत्तर झाला. जिवापेक्षा अजून मोलाच काहीच नाही. ह्या सिस्टीम नेहमीच आपल काम करतील अस नक्कीच नाही. पण कोणत्याही अपघातात ह्या सिस्टीम मुळे जीव वाचण्याची शक्यता तब्बल ९०% पर्यंत वाढते. म्हणूनच मी जिकडे काम करतो तिकडे “Wearing a seat belt is condition of employment” आहे. तुम्ही भले कंपनीचे मोठे अधिकारी , सी. ई. ओ असाल पण गाडीत बसताना सीट बेल्ट लावण हे बंधनकारक आहे.
पुढल्या वेळी पेट्रोल, डीझेल भरताना गाडी पूर्ण बंद करून भरा. मोबाईल चा वापर करू नका. मोबाईल च्या लहीरीन मधील एनर्जी हि पेट्रोल ला इग्नाईट करण्यात सक्षम असते. हेल्मेट, सीट बेल्ट हे पोलिसांसाठी वापरू नका तर तुमच्या जीवासाठी वापरा. पुढल्या वेळी कार खरेदी करताना १ लाख जास्ती मोजून एअर ब्याग्स, ए. बी. एस. (Anti-Breaking System) असलेली गाडी खरेदी करा. भले ह्या गोष्टी महाग असतील पण जीवाच्या मोल हे पैश्यात मोजता येत नाही हे नेहमीच ध्यानात असू द्यात.

No comments:

Post a Comment