Sunday 22 January 2017

मुंबई च हाय... विनीत वर्तक
मुंबई हाय हे नाव आपण अनेकदा ऐकतो. इकडे फक्त ओईल, ग्यास च उत्खनन होते इतपर्यंत आपली माहिती असते. मुंबई पासून जवळपास १८०-२०० किमी समुद्रात हा पट्टा आहे. उत्तरेकडे दिव- दमण ते दक्षिणेकडे अगदी गोव्या पर्यंत हा पट्टा पसरलेला आहे. समुद्राच्या पाणाच्या खाली जमिनीतील प्लेट च्या धसण्याने हे युनिक स्ट्रक्चर तयार झाले आहे. तब्बल २०० किमी खोल समुद्रात जाऊन हि पाण्याची खोली ७५ - ८० मीटर इतकीच आहे. कारण ह्या प्लेट्स ने एक पठार किंवा प्लाटू बनवला आहे. जीओलोजी च्या शब्दात एक anticline स्ट्रक्चर आहे. साध्या भाषेत एखाद्या डोंगरा प्रमाणे जमिनीतील वेगवेगळे भूस्तर फोल्ड झाले आहेत.
(In structural geology, an anticline is a type of fold that is an arch-like shape and has its oldest beds at its core. A typical anticline isconvex up in which the hinge or crest is the location where the curvature is greatest, and the limbs are the sides of the fold that dip away from the hinge.).
म्हणूनच ह्याला बॉम्बे हाय अस म्हंटल जाते. ( इतरत्र समुद्राची खोली झपाट्याने वाढते. जसे केरळ च्या समुद्रात अगदी काही किलोमीटर जरी गेलो तरी पाण्याची खोली तब्बल २००० - २५०० मीटर आहे. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर काकिनाडा पासून अवघ्या ५० किमी वर असणाऱ्या केजी डी ६ ( रिलायंस ला गवसलेला नैसर्गिक वायू चा सगळ्यात मोठा साठा इकडे आहे) ह्या भागात पाण्याची खोली आहे तब्बल २४८३ मीटर. )
गल्फ ऑफ खंबाट च सेसमिक एक्स्प्लोरेशन चालू असताना १९६५ साली मुंबईतल्या पेडर रोड येथील रश्मी बिल्डींग येथे त्या एक्स्प्लोरेशन चा अभ्यास करताना बॉम्बे हाय चा खुलासा झाला. मग १९७३ साली सागर सम्राट ह्या ज्याक अप रिग ने ओईल शोधण्यासाठी ड्रिलिंग चालू केल. पहिली वेल १९७४ साली कार्यान्वित झाली. ह्या प्रचंड मोठ्या शोधानंतर सागर सम्राट ह्या ज्याक अप ओईल रिग चा फोटो १ रुपयाच्या नोटीवर सन्मानार्थ कोरण्यात आला. आज १ रुपयाची नोट गायब असली तरी सागर सम्राट ने शोधलेल्या आणि त्या नंतर उत्खनन झालेल्या हजारो विहिरी भारताची एनर्जी ची गरज आजही भागवत आहेत.
इकडून निघणार ओईल हे सर्वात श्रेष्ठ दर्जाच समजल जाते. ह्यात तब्बल ६०% प्याराफिनिक कंटेंट असते. सौदी अरेबिया किंवा गल्फ देशात मिळणाऱ्या ओईल मद्धे फक्त २५% प्याराफिनिक कंटेंट असते ह्यावरून बॉम्बे हाय ओईल चा दर्जा त्या मानाने खूप उच्च आहे. आज शोध लागल्यानंतर सुमारे ५० वर्षांनी सुद्धा इथून तब्बल १६ मिलियन टन इतक ओईल च वार्षिक उत्पादन होते. जे भारतात तयार होणार्या ओईल च्या तुलनेत ४०% आहे.
२६ जुलै २००५ च्या तुफानी पावसाला आपण ओळखून आहोतच पण ह्या पावसाने मुंबई हाय मद्धे हि हाहाकार माजवला होता ह्याची थोड्या लोकांना कल्पना असेल. २७ जुलै २०१५ रोजी एक बोट पाणाच्या उधळलेल्या समुद्रात कंट्रोल न झाल्याने मुंबई हाय च्या बी एच एन प्लाटफोर्म ला ठोकली. त्या नंतर लागलेल्या आगीत तब्बल २२ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अख्खा प्लाटफोर्म जळून खाक झाला. ह्यावरून रोज तब्बल ११०,००० ब्यारल म्हणजे ११०,००० X १५० लिटर इतक ओईल रोज निघत होत. जे कि भारताच्या ओईल प्रोड्युसिंग पेकी १४% हिस्सा होत. हा प्ल्याट्फोर्म परत बनवायला जवळपास १२०० कोटी रुपयानपेक्षा जास्ती खर्च आला.
कोकण किनारपट्टी हि नेहमीच निसर्गाच वरदान मिळालेली राहिली आहे. अगदी दिव- दमण पासून सुरु होऊन खाली गोव्यापर्यंत जाणाऱ्या सह्याद्रीच्या रांगेने निसर्गाची मुक्त उधळण केली आहे. पण ह्याच निसर्गाने पाण्यात सुद्धा हा नैसर्गिक चमत्कार केला आहे. जो गेली ५० वर्ष आख्या भारताची तहान भागवत आहे ती म्हणजे पेट्रोल, डीझेल ची आणि आता नैसर्गिक वायू ( सी एन जी ) ची. मात्र ह्या पाण्यातल्या चमत्कारा पासून सामान्य माणूस खूपच अनभिज्ञ आहे. पुढल्या वेळी गाडीत पेट्रोल- डीझेल, सी. एन. जी भरताना हे पण आमच्या कोकणातून आल आहे हे सांगण्यास विसरू नका..

No comments:

Post a Comment