पी एस एल व्ही ची लांब उडी.. विनीत वर्तक
आज सकाळी 9 वाजून १२ मिनिटांनी पी. एस. एल. व्ही ह्या इस्रो च्या सगळ्यात भरवशाच्या रॉकेट ने पुन्हा एकदा उड्डाण केल. इस्रो च्या दृष्टीने पी.एस.एल. व्ही इतक भरवश्याच रॉकेट झाल आहे कि अनेक वेगवेगळ्या लेवल आणि प्रकारामद्धे सुद्धा त्याच्या यशाची खात्री इस्रो ला आहे. आजच उड्डाण मात्र स्पेशल होत ते अनेक कारणांसाठी.
इस्रो ची हि सगळ्यात लांब उडी असणार होती. तब्बल २ तास १५ मिनिटे इतका कालावधी असणार हे उड्डाण अतिशय किचकट अस होत. ते का हे समजण्यासाठी आपण थोड मागे जायला हव. खरे तर आपण जेव्हा सुरवात केली तेव्हा आधी आपल सगळ लक्ष होते ते एकाद्या विशिष्ठ उंचीवर , विशिष्ठ कोनात उपग्रहांना स्थापित करणे. अमुक एका उंचीवर, कोनात स्थापित केल्यावर उपग्रह योग्य रीतीने संदेश वहन तसेच आपल आखून दिलेलं कार्य करू शकतात. तसेच त्या जागेवर दुसरा कोणता उपग्रह किंवा आकाशातील कचरा नसणे हे हि बघावं लागते. त्यामुळे इस्रो च सगळ लक्ष होते ते अस रॉकेट तयार करणे जे उपग्रहाना विशिष्ठ उंचीवर त्यांच्या योग्य आखून दिलेल्या कोनात प्रक्षेपित करेल.
आता पी.एस.एल.व्ही. ने वेगवेगळ्या उंचीवर आपली मास्टरकी सिद्ध केल्यावर त्याच्या पी.एच.डी साठी इस्रो ने कंबर कसली. म्हणजे कि एकाच वेळेस वेगवेगळ्या उंचीवर उपग्रह प्रक्षेपित करता आले तर? आधी वेगवेगळ्या कक्षेत जाण्यासाठी प्रत्येकवेळी नवीन पी.एस.एल.व्ही रॉकेट च निर्माण होत होते. तब्बल १२० कोटी रुपये किमत असणार रॉकेट तयार करणे खर्चिक तर होतेच जरी जगातील सर्वात स्वस्त आणि मस्त अशी बिरुदावली हे रॉकेट मिरवत असेल तरी. त्यामुळे हे १२० कोटी रुपये कसे वाचवता येतील व एकाच रॉकेट मधून अनेक उपग्रह कसे प्रक्षेपित करता येतील ह्यावर काम सुरु झाल.
हे वाचायला जितक सोप्प वाटते तितक नाही. ह्या तंत्रज्ञानाला मल्टीपल बर्न टेक्नोलोजी अस म्हणतात. ४ थ्या स्टेज मधील इंजिन बंद करून पुन्हा ते काही वेळ चालू करून पुन्हा बंद करून अपेक्षित उंची, कोन गाठून उपग्रह प्रक्षेपित करणे इतक सोप्प नाही. अवकाशातील अतिशीत तापमानात आणी कमी गुरूत्वाकर्षण असलेल्या क्षेत्रात इंजिन सुरु करून पुन्हा बंद करणे खूप कठीण आहे. तसेच ह्या काळात इंजिन मधून निर्माण होणाऱ्या उष्णतेपासून उपग्रहांच रक्षण करण हि तितकच कठीण आहे. इस्रो ने ह्याचा अभ्यास करून आपल्या सी-२९ आणी सी- ३४ ह्या उड्डाणा मध्ये ह्याचा वापर करून वेगवेगळ्या कक्षेत उपग्रह स्थापन केले. ह्या छोट्या छोट्या यशातून इस्रो बरच काही शिकली.
ह्या वेळेस इस्रो ने लांब उडी घेण्यासाठी तयारी केली. ८ उपग्रहान पेकी स्क्काटस्याट १ हा उपग्रह १७ मिनिटात ७३० किमी च्या कक्षेत प्रस्थापित केला. त्यानंतर मात्र खरी परीक्षा चालू झाली. ४ थ्या स्टेज चे इंजिन बंद होऊन रॉकेट बाकीच्या ७ उपग्रहांन सोबत असताना ४ थ्या स्टेज च्या इंजिनाने २० सेकंद प्रज्वलित होऊन रॉकेट ची उंची ६८९ किमी पर्यंत खाली आणली. आता जवळपास १ तास रॉकेट ह्याच कक्षेत फिरत राहिले पुन्हा तासाने इंजीन १ मिनिटासाठी प्रज्वलित केले आणी उरलेले ७ उपग्रह त्यांच्या ठरलेल्या कक्षेत प्रक्षेपित केले. ह्यात दोन उपग्रह हे विद्यार्थांनी बनवलेले आहेत. एक तासानंतर पुन्हा एकदा इंजिन चालू करून इंजिन आणी रॉकेट ने इस्रो चा विश्वास सार्थ ठरवला. इस्रो ची हि लांब उडी यशस्वी केली.
राहिलेल्या ७ उपग्रहान मद्धे २ उपग्रह भारतातल्या शैक्षणिक संस्थांचे तर उरलेले ५ अल्जेरिया , क्यानडा आणी अमेरिकेचे होते. अश्या वेगवेगळ्या बांधणीच्या उपग्रहाना त्यांच्या अपेक्षित कोनात, उंचीवर स्थापन करताना पी.एस.एल.व्ही ने पुन्हा एकदा आपली कामगिरी उंचावत नेली आहे. इस्रो चे सगळे वैज्ञानिक, अभियंते ह्याचं खूप खूप अभिनंदन. पुढल्या वर्षी अजून एका वेगळ्या रेकोर्ड साठी पी.एस.एल.व्ही. तयार होतो आहे. ६८ उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करण्यासाठी ही तयारी सुरु झाली आहे. वेगवेगळ्या कक्षेत, वेगवेगळ्या धाटणीच्या उपग्रहाना फक्त १२० कोटी रुपयांच्या बदल्यात प्रक्षेपित आणी ते ही १००% यशासह करत पी.एस.एल.व्ही आणी इस्रो ची हि लांब उडी येत्या काळात भारताला खूप उंचीवर घेऊन जाणार आहे. त्यासाठी इस्रो ला खूप खूप शुभेछ्या.
No comments:
Post a Comment