Sunday 22 January 2017

सर्जिकल स्ट्राईक २... विनीत वर्तक
काल रात्री जेव्हा काम संपवून झोपायच्या तयारीत होतो. तेव्हा मित्राने सर्जिकल स्ट्राईक झाल्याची बातमी दिली. पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक ऐकून पुन्हा युनिट मध्ये येउन जेव्हा नेटवर बघितल. तेव्हा देशात झालेल्या ह्या सर्जिकल स्ट्राईक ने मनातल्या मनात सुखावलो. सर्जिकल स्ट्राईक ची व्याख्या आर्मी च्या भाषेत वेगळी असली तरी कालच्या निर्णयाने झालेले परिणाम हे सर्जिकल स्ट्राईक प्रमाणे होते. किंबहुना त्या निर्णयाची अंबलबजावणी ते त्याचे आफ्टर शोक्स सगळच ठरवल्याप्रमाणे.
कालच्या निर्णयावर लिहाण्याआगोदर आपण थोडा मागचा विचार करू. देशातील सगळा नोकरदार वर्ग नित्यनियमाने ट्याक्स भरत असताना. देशातील एक मोठा भाग काळा पैश्याच्या रुपात कर चुकवत होता. त्याच्या जोडीला येणार नकली चलन जे की पाकिस्तान सारख्या देशातून मोठ्या प्रमाणात येत होत. ह्यामुळे काळ्या पैशाच एक मायाजाळ देशात उभ राहून त्यांनी आपली पायामुळ खूप खोलवर पसरली होती. त्याला उखडून टाकण्यासाठी अश्या एका सर्जिकल स्ट्राईक ची गरज होती. कालच्या निर्णयामुळे सगळा काळा पैसा संपेल आणी सगळे प्रश्न सुटतील अस नक्कीच नाही. सगळच काळ धन हे नोटांच्या स्वरूपात नाही. त्यामुळे त्यावर अंकुश बसला अस म्हणता येणार नाही. तरीसुद्धा काल घेतलेल्या निर्णयामुळे सगळ्या फांद्या तरी पूर्णपणे कापल्या गेल्या आहेत.
सर्जिकल स्ट्राईक करताना खूप आधी प्लान करावा लागतो. ह्यात कोल्याट्रल ड्यामेज होऊ नये ह्यासाठी अनेक शक्यता तपासून बघाव्या लागतात. वेळेच महत्व प्रचंड असते. काळधन निघण्यासाठी पहिली पायरी म्हणून देशातील जास्तीत जास्त जनतेला मुख्य प्रवाहात आणणे. क्याशमध्ये होणारी उलाढाल रेग्युलेट करता यावी ह्यासाठी जनधन योजना आणली गेली. ज्यायोगे देशातील गरीब माणूस मुख्य प्रवाहाशी जोडला गेला. नंतर काळधन स्वताहून उघड करण्यासाठी योग्य वेळ दिला गेला. ज्यायोगे कोणीही एक संधी दिली नाही अस म्हणू नये. ह्याच वेळी गेल्या २० वर्षापेक्षाहून अधिक वेळ प्रलंबित असलेल्या विधेयकाच कायद्यात रुपांतर झाल. तो म्हणजे "उत्पनाच स्त्रोत जर सांगता आला नाही. तर ते सरकार च्या मालकीच होते. किंवा सरकार त्यावर टाच आणू शकते". हा खूप मोठा कायदा गेल्याच महिन्यात संमत झाला.
आता बाकीची तयारी झाल्यावर अचूक वेळेची निवड ही तितकीच महत्वाची होती. पूर्ण दिवसभर शांतता ठेवताना देशाला सांगण्याची वेळ हि रात्री ९ च्या आसपास निवडली गेली. जेव्हा सगळे आर्थिक व्यवहार बंद असतात. खरेदी चे व्यवहार जवळपास संपलेले असतात. सगळीकडे रात्री झोपायच्या आधीची तयारी पण घरातील सगळे जागे असतात. ही वेळ खूप महत्वाची होती. ९:३० पर्यंत सर्जिकल स्ट्राईक चालू होता. त्या नंतर झालेल्या हल्याने आता काहीच करता येऊ शकत नव्हते. एकतर जो काळा पैसा होता तो कुठेतरी गुंतवून पांढरा करण्याची संधी नव्हती. कारण १-२ दिवसांची मुदत दिली असती तर अनेकांनी हाच पैसा सोन्यात, हिऱ्यात, जागेत, वस्तुत गुंतवला असता व स्ट्राईक च महत्व कमी झाल असत. रात्री ९ ला झालेल्या स्ट्राईक ने कोणताच व्यवहार करण्याची संधी दिली नाही. रात्रीच्या अंधारात ५००- १००० नोटांचं अस्तित्व संपुष्टात आल.
देशाच्या चलनात असलेल्या नोटानपेकी जवळपास ७५% जास्ती नोटा ह्या ५००-१०० च्या नोटांच्या स्वरूपात असताना इतकी मोठी करन्सी चलनातून काढून टाकण्यासाठी निर्णय घेण्याची क्षमता प्रचंड अशी हवीच. ह्या ७५% चलनात काळ्या पैश्याचा वाटा २०% ते ८०% असू शकते. म्हणजे काळ्या पैश्याचा किती मोठा वाटा हा देशाच्या प्रगतीत अडचण होता. ते आपल्याला कळून येईल. अनेक लोक ५०० आणी १००० नोटा नकोच अस म्हणत होते आणी आहेत. पण व्यावहारिक दृष्टीकोनातून रुपयाच मूल्य हे कमी असल्याने ते असण गरज बनते. अमेरीकेच उदाहरण देताना १००$ च्या नोटेची किंमत आपल्याकडे ६८०० रुपये च्या आसपास जाते. हे पण आपण ध्यानात ठेवायला हव. म्हणून व्यवहाराच्या दृष्टीने एक मोठ चलन असण गरेजेचे आहे. तेच ठेवून ५००-२००० रुपयांच्या नवीन चलन पुढील वर्षापासून येईल.
सर्जिकल स्ट्राईक ने सगळे आतंकवादी किंवा सगळा काळा पैसा संपला अस होत नाही. त्याने होत ते ड्यामेज. एक मोठ्ठा भाग त्यात ढासळला जातो. तो त्यांच्या समूळ नष्ट करणाच्या दृष्टीने एक पाहिलं पाउल असते. पंतप्रधान, आर. बी. आय गव्हर्नर आणी तत्सम अधिकारी ह्याच कौतुक कराव तेवढ थोडच आहे. काळ्या पैश्याच्या रूपाने लागलेल्या वाळवीला एक जबरदस्त इंजेक्शन दिल्याबद्दल. त्याचे परिणाम येणाऱ्या काळात दिसून येतीलच. पण सर्जिकल स्ट्राईक २ हा देशाच्या इतिहासात सोनेरी अक्षराने लिहिला जाईल ह्यात शंका नाही.

No comments:

Post a Comment