Sunday 22 January 2017

द मेंटलीस्ट... विनीत वर्तक
द मेंटलीस्ट नावाची एक सुंदर सिरीज आहे. मेंटलीस्ट चा अर्थ होतो की अस कोणीतरी जे मनाचा वापर करू शकते किंवा हिप्नोटाइज चा वापर करून मनाला संदेश देऊ शकते. ह्याचा वापर करून अनेक गुन्ह्यांची उकल सुद्धा होऊ शकते. ह्याच आधाराला पकडून पूर्ण सिरीज त्या भोवती गोवली आहे. गुन्हे करणारा गुन्हेगार प्रत्येक वेळी सराईत गुन्हेगार असतोच अस नाही. त्यामुळे अश्या विचित्र परिस्थीत तोंड देताना शारीरिक हावभाव, मेंटल स्ट्रेन्थ सगळच कुठेतरी जर योग्य रीतीने अभ्यासली गेली तर अनेक गोष्टी आपल्याला समजू शकतात.
फेस रीडिंग, माइंड रीडिंग किंवा बॉडी एक्स्प्रेशन, हिप्नोटीझम हे न सांगता खूप काही सांगण्याच माध्यम आहे. त्याचा अभ्यास करून आपण अनेक अडकलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधू शकतो. ह्यावर बरच लेखन, पुस्तके उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या तर्हेने, वेगवेगळ्या आकलानाद्वारे आपण कोणीही हे शिकूच शकतो. अनेकदा समोर येणाऱ्या गोष्टी आपल्याला दिसतात तश्या त्या नसतात. किंबहुना त्या वेगळ्या दिसेपर्यंत आपल्याला त्याची जाणीव पण होत नाही. जेव्हा ते कळत तेव्हा आपण सगळ्या लिंक जुळवत जातो. मग आपल्याला हे आधी का नाही कळल असाच विचार मनात येत रहातो.
मेंटलीस्ट बनण शक्य आहे का? तर नक्कीच आहे. थोड्या अभ्यासाची गरज आहे. काही गोष्टी अनुभवातून आपण शिकूच शकतो. एखादा गुन्हा लपवण्यासाठी गुन्हेगार अनेक काळज्या घेतोच. तरीपण त्याची उकल आपण करू शकतो. तर मग आपल्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टींची तर नक्कीच. छोटे पण खूप एफेक्तिव असे एक्स्प्रेशन आपण वेगवेगळ्या स्थितीत असताना करतो. आपला चेहऱ्यावरील प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीला रीस्पोंस देतात. अगदी डोळ्याच्या बाहुलीपासून ते ओठांपर्यंत.
सांगताना आवाजातील चढ- उतार , संवादांची फेक, शब्दन वर जोर अश्या सहजासहजी न जाणवणार्या गोष्टीत अनेक उत्तर लपलेली असतात. चालताना, बोलताना, बघताना शरीराची एकूण ठेवण. मनात विचार आल्यावर शरीराचा प्रत्येक भाग वेगळ्या तर्हेने रीस्पोंड करतो. कधी कळत तर कधी नकळत. कधी जाणतेपणी तर कधी अजाणतेपणी. ह्या छोट्या सूक्ष्म आणी एरवी न दिसणाऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा अनेक उत्तर लपलेली असतात.
मेंटलीस्ट बनण्यासाठी जास्ती काही गरज नाही. आपल्याला येणाऱ्या अनुभवांना एकदा पुन्हा रिवाइंड करायचं. त्या अनुभवात समोरच्या व्यक्तीची रियाकशन कशी होती. ह्याच चित्र एकदा मनात उभ राहील की पुढल्या वेळी न सांगता तुमचा मेंदू ह्या छोट्या गोष्टी नकळत टीपेल आणी गोष्टी घडण्याआधी त्या व्यक्तीबाबत तुम्ही प्रतिक्रिया किंवा उत्तर समजून घेऊ शकाल. खर का खोट हे ही तुम्हाला क्षणात कळू शकेल. अश्या अनेक व्यक्तींचा अभ्यास किंवा चित्र मनात राहिली की अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी जास्ती काही करायची गरज भासणार नाही. किंबहुना गोष्टी घडायच्या आधीच तुम्ही तयार असाल. मेंटलीस्ट बनण सोप्प नक्कीच नाही. पण अश्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण पुढे येणारी अनेक संकटे, वाईट अनुभव आधीच समजू शकू. त्यातून त्याची इंटेनसिटी कमी करू शकू.

No comments:

Post a Comment