लग्नानंतर ची मैत्री ... विनीत वर्तक
मैत्रीचा अर्थ एकच पण व त्याला लग्नाची जोड मिळाली की येणारे शब्द पण किती वेगळे वाटतात. कदाचित तसच एक पुरुष आणी एक स्त्री च्या मैत्रीत किंवा फ्रेडशिप मध्ये होत असते. अर्थ तोच पण जेव्हा विरुद्ध लिंगी प्राणी त्यात गुंतलेले असतात. तेव्हा बघण्याचा किंवा समजण्याचा पहिला अर्थ प्रेमाकडेच जातो. त्यात काही वावग ही नाही. कारण प्रेमाची सुरवात मुळातूनच मैत्रीतून होते. दोन वेगळी मन उमलताना ओळख हा तर पाया असतो. त्या पायाला दिलेलं नाव म्हणजेच मैत्री. अनेकदा मैत्री आणी प्रेम ह्यातली धूसर रेषा अजाणतेपणी ओलांडली जाते. कधी एकदम तर कधी एकाच टोकाने जेव्हा ती एका टोकाने असते तेव्हा त्यात दोन्ही टोकांना त्रास होतो. जेव्हा ती एकदम असते तेव्हा मात्र काहीतरी स्पेशल हातात गवसते. सगळ्याच वेळी ह्याचा शेवट गोड होतो असेच नाही मात्र नेहमी बळी पडते ती मैत्री.
लग्नानंतर मैत्री म्हणजे सगळ्यांची दृष्ट लागावी अशीच. एकतर स्त्री आणी पुरुष असा लिंगभेद असताना त्याला परका पुरुष किंवा परकी स्त्री अशी विशेषण लागली की अविश्वासाच जाळ विणायला वेळ नाही लागत. त्यात ते दोघे असे काही गुरफटून जातात की शेवट मैत्री तुटन्यानेच होतो. पण मग असच नेहमी होते का? तर उत्तर नाही असेच आहे. आपण टोक लगेच गाठतो. म्हणजे एकतर हे किंवा ते. दोन्ही टोकांना सांभाळण्याची कसरत खूप कमी जणांना जमते. जी गोष्ट सर्वात चांगली असते तिलाच दृष्ट लागते अस म्हणतात. मग अशी मैत्री सगळ्यात जास्ती समाधान देणारी असते. एकतर वयाने आलेली म्याच्यूरीटी त्यात असते. अपेक्षा अगदी साधारण असतात. आयुष्यात एक स्थेर्य असते मग ते पैशाने असो अनुभवातून असो किंवा सामाजिक असो. त्यामुळे विचारांची मूळ खूप रुतलेली असतात. अपेक्षा आणी प्राप्ती मधल अंतर खूप कमी असल्याने मिळणार समाधान खूप जास्ती असते.
जे आपण आपल्या बेटर हाफ कडे सांगू शकत नाही ते शेअरिंग करण्यासाठी एक हक्काच मन असते. विरुद्ध लिंगी असल्याने तटस्थ राहून मत द्यायला किंवा अडचणीच्या वेळी सावरणार कोणी असल की त्रासाचे ओझे हलके होते. अनेकदा ह्यातून एकमेकांविषयी ओढ वाटू लागते ही त्यात चुकीच अस काय असते. एखादी व्यक्ती आवडणे ह्यात गैर ते काय? अर्थात त्या भावना काही लिमिट्स च्या आत संभाळण, त्या समाजात किंवा एकांतात वावरताना त्याचा योग्य तो सन्मान ठेवला की भूकंपाने पाया डगमगण्याची शक्यता कमी होते. मैत्री हे विश्वासच नात आहे. त्याला डाग न लावण्याचा आणी ते जपण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने नेहमीच असावा. सगळ काही सोप्प मिळत नाही. खूप काही तडजोडी, विश्वास, सामंजस्य अश्या अनेक पातळीवर जेव्हा आपली वैचारिक बैठक ठाम असते. तेव्हा ते नात उजळून निघते.
अविश्वासाचा कीडा हे नात पोखरायला नेहमीच तयार असतो. पण जेव्हा पाया सागाच्या लाकडासारख भक्कम असेल तर ही वाळवी लागत नाही. एकाच व्यक्ती मधून सगळ्याच पातळीवर सगळ्याच गोष्टी मिळतील अस नसते त्यावेळेस मित्रत्वाच हे नात विश्वास, मनोबल, सपोर्ट सगळ्याच बाबतीत आयुष्याच्या ह्या खेळात सतत साथ देत. कुठे थांबायचं हे माहित असल की मग हरवायला होत नाही. टोकाकडे जायची घाई नसली की मग सावरण्याचा आनंद घेता येतो. अशी लग्नानंतर ची मैत्री खूप अवीट आणी चिरकाळ टिकणारा आनंद देते.
No comments:
Post a Comment