Sunday 22 January 2017

किती सांगायचं मला.... विनीत वर्तक
एका मैत्रिणीच्या फोन ची कॉलर ट्यून हे गाण ऐकून नेहमीच त्या ओळी मी गुणगुणत रहातो. विचारांची सुरु झालेली चेन शब्दातून सांगणे किती कठीण असते ह्याचा प्रत्यय पदोपदी प्रत्येक नात्यात, माणसात आपल्याला अनुभवायला येतो. भावना, विचार, अनुभूती ह्या माणूस प्राण्याला मिळालेल्या देणग्या आहेत. त्याहून मोठ्या देणग्या म्हणजे भाषा. ज्या शब्दातून आपण ह्या भावना, विचार अनुभूती व्यक्त करतो. शब्दांची सुंदर रचना ते सांगण्याची पद्धत किंवा शारीरिक हावभावातून आपल्याला त्या हव्या तश्या व्यक्त करता येतात.
पण हे सांगण खरच सगळ्यांना जमते का? अगदी आपल्याला आवडीच्या ते नावडीच्या गोष्टींपासून ते सगळ्यात कठीण अश्या एखाद्या विषयी वाटणाऱ्या प्रेमाच्या भावनेपर्यंत च हा सगळा प्रवास किती लोक सशक्त करू शकतात? अस म्हणतात
“There is a vitality, a life force, an energy, a quickening that is translated through you into action, and because there is only one of you in all time, this expression is unique. And if you block it, it will never exist through any other medium and will be lost.”
स्वतःला एक्स्प्रेस करण किती महत्वाच आहे ते वरील ओळीतून सिद्ध होते.
आपल्या भावना, विचार, अनुभूती अनेक प्रकारे व्यक्त करता येते. शब्दांपासून ते नजरेपर्यंत. पण सगळ्यात महत्वाच असेल तर ते सांगण. “किती सांगायचं मला”... अस आपल्याला नेहमी वाटते. पण ते योग्य शब्दात सांगता येण आणी त्या शब्दांनी अपेक्षित तो परिणाम साधता येण ह्या साठी शब्दांच्या निवडीसोबत त्यांची जागा योग्य ठिकाणी लावता आली तरच योग्य तो परिणाम साधता येतो. मनातले विचार बऱ्याचदा मनात विरून जातात. कधी परिस्तिथी, तर कधी काळ-वेळ तर कधी हिम्मत होत नसल्याने मनातल सांगायचं राहून जाते.
शब्द जरी तेच असले तरी ते सांगण्याची पद्धत खूप वेगळा परिणाम देऊन जाते. मला तू आवडतेस हे सांगताना त्यातली आर्जव जितकी सुंदर तितकच ते समोरच्याच्या मनात पोचण्याची शक्यता जास्त. नकार देताना पण त्यातील ठामपणा आपल्या विचारांची बैठक समोरच्या पर्यंत पोहचते. मार्केटिंग म्हणजे दुसर काय? कोणतही प्रोडक्ट विकताना शब्दांच्या शक्तीचा योग्य तो, योग्य तिकडे वापर म्हणजेच मार्केटिंग. अर्थात त्यातील धंद्याचा भाग बाजूला ठेवला तर आपल्या नात्यात पण आपण हे करू शकतो.
अनेकवेळा मनात असलेल सांगण अवघड होऊन बसते कारणे अनेक असोत पण आपण घाबरत असतो ते परिणामाला. मी अस बोलले तर काय होईल? तो किंवा ती कसा विचार करेल? त्यातून कोणती परिस्तिथी उद्भवेल ह्या सगळ्या शंकासुरांचा भडीमार आपल्या मनात झाला की मनातल्या मनात ते शब्द विरून जातात. खरे तर आपले मन अनेकदा खूप टोकांच्या गोष्टीचा विचार करत असते. ज्या घडण्याची शक्यता अगदीच जास्त किंवा अगदीच कमी असते. म्हणजे मनातल प्रेम सांगताना आपल्याला ती व्यक्ती सोडून जाईल किंवा आपल्याला स्वीकारेल ह्या दोन टोकांचे विचारचक्र चालू असते. प्रत्यक्षात हि दोन्ही टोक गाठली जात नाहीत हे वास्तव असते. एकतर गोष्टी बर्याच वेगळ्या घडतात किंवा टोकावर जरी गेल्या तरी त्याचा परिणाम तितका तीव्र नसतो. काही अपवाद असू शकतात पण आपण नेहमी अपवादाचा जास्ती विचार करतो नाही का?
प्रत्येकाला सांगायला जमतेच असे ही नाही. त्यावेळी वेगळी माध्यम असतात. लिखाण, नजरेतून किंवा आताच्या फेसबुक , व्हास्त अप वरून. तरीसुद्धा अनेकदा विचार, मत हे मनातल्या मनात विरून जातात. अनेकदा आपल्याला वाटून जाते की कदाचित मी सांगितल असत तर किंवा मी हे बोलायला हव होत. निसटलेला क्षण, निघालेला शब्द जसा परत येत नाही तशी सांगण्याची वेळ पण नाही. पुलाखालून बरच पाणी वाहून गेल तरी पूल आणी पाणीसुद्धा तेच राहते हे आपण विसरता कामा नये. आयुष्याच्या शेवटी किती सांगयचं होत मला हा विचार करण्याएवजी किती सांगितल तुला हा विचार जास्ती आनंद देईल नाही का??
किती सांगायचय
किती सांगायचय मला किती सांगायचय
किती सांगायचय मला किती सांगायचय
कोरड्या जगात माझ्या भोवती चार भिंती
बोचरे नकार सारे आशा क्षणात विरती
बेचैन स्वप्नांची अन पाखरे हरून जाती
मनाच्या पाऱ्याला आवरू किती
किती सांगायचय मला किती सांगायचय
किती सांगायचय मला तुला किती सांगायचय
मला …….
हवे असे अलवारसे कुणा कसे सांगायचे हे गाणे
मला ………
माझ्या जगी जा रंगुनी पाहून घे तुही हे स्वप्न दिवाने
हलके हलके सुख हे बरसे हलके हलके सुख हे बरसे
मनाच्या पाऱ्याला असे स्वप्नांचे बहाणे
मनाच्या आभाळी अशी ओले ती लहर
घेऊ दे मनाला श्वास मोकळा…
किती सांगायचय मला किती सांगायचय
किती सांगायचय मला तुला किती सांगायचय
किती सांगायचय मला किती सांगायचय
किती सांगायचय मला तुला किती सांगायचय
हसऱ्या सुखाचा पहिला वहिला मोहर हा
थकल्या जीवाला पहिल्या सरीचा दरवळ हा
क्षण हे हळवे जपावे, जपावे इवल्या ओठी हसावे
आज चिंब व्हावे पार पैल जावे
किती सांगायचय मला किती सांगायचय
किती सांगायचय मला तुला किती सांगायचय
मनाच्या पाऱ्याला असे स्वप्नांचे बहाणे
मनाच्या आभाळी अशी ओले ती लहर
मनाच्या या गावी असे दोघांचेच घर
घेऊ दे मनाला श्वास मोकळा
किती सांगायचय मला किती सांगायचय
किती सांगायचय मला तुला किती सांगायचय

No comments:

Post a Comment