Sunday 22 January 2017

सेफ हेवन... विनीत वर्तक
सेफ हेवन नावाचा २०१३ साली आलेला चित्रपट मला खूप आवडला होता. एक स्वताच्या आयुष्यापासून पळणारी स्त्री कोणत्या तरी दूर शहरात पळून जाताना एका कुटुंबाच्या सानिध्यात येते. हळू हळू त्यांच्या कुटुंबाचा भाग होते. तिचा हा प्रवास चांगला सुरु असताना गत आयुष्यातील गोष्टी पुन्हा तिच्या आयुष्यात प्रवेश करतात आणि सुरु होतो एक जीवघेणा प्रवास. हा तिचा प्रवास, त्या कुटुंबाशी नाळ जूळतानाचे प्रसंग, त्या लहान मुलान सोबतचे क्षण, उमलणाऱ्या प्रेमाचा प्रवास बघण एक अप्रतिम अनुभव आहे. ह्या पलीकडे मला भावलेली गोष्ट म्हणजे त्या स्त्री चा प्रवास हा आधीच ठरलेला असतो. तो कसा हे चित्रपटात बघण सगळ्यात चांगल.
नियती, डेस्टिनी काही नाव ठेवू त्याला पण ती आधीच ठरलेली असते. काही गोष्टी, माणस, नाती ह्याचा आपल्याला कधी कधी अजिबात संबंध लागत नाही. कोण, कधी, कस आपल्या आयुष्याचा भाग होत हे हि कळेपर्यंत बरच पाणी पुलाखालून वाहून गेलेलं असत. आपण विचार करत रहातो कि नक्की काय आहे ह्या व्यक्तीच माझ्या आयुष्यात येण. नियतीने आधीच सगळी आकडेमोड केलेली असते. ती कळते तेव्हा आपण तिच्या पुढे स्तिमित होऊन रहातो. प्रत्येक वेळी ती चांगलीच असेल असे नाही. काही वाईट हि अनुभव येतात. पण काळ, वेळ अशी असते कि त्या ठरवलेल्या गोष्टी घडवण्यासाठी अनेक गोष्टी लाईन मध्ये येतात.
अगदी आयुष्यातले काही महत्वाचे निर्णय असू देत. नोकरी, करियर किंवा अगदी जोडीदार नियती ने जर ठरवलं असेल तर त्या गोष्टी कश्याही होतात. अर्थात आपल्या मनातील सुप्त इच्छा हि नियतीत कधी कधी बदल घडवून आणतात. पण त्याला प्रचंड अशी ओढ किंवा मनापासून असच व्हाव हि सुप्त इच्छा जोडीस लागते. म्हणून काही वेळा माणस दुर्धर आजारातून बाहेर येतात, एखाद्या बिकट प्रसंगी सुखरूप राहतात आणि कधी कधी असे निर्णय आयुष्याचा पट बदलवून टाकतात.
सेफ हेवन चा मूळ गाभा हाच आहे कि जेव्हा तुमची इच्छा परोकोटीची असते. तेव्हा नियतीला सुद्धा काही गोष्टी बदल्याव्या लागतात. अर्थात हा एक चित्रपट होता. पण खऱ्या आयुष्यात आपल्याच आजूबाजूला किंवा आपण स्वतः अश्या सेफ हेवन चा अनुभव घेत असतो. हेवन का हेल हे नियतीला कळत नाही. ते आपण ठरवायचं असते. आलेल्या प्रसंगात आपण कसे वागतो, निभावतो, आपले विचार ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या गोष्टी नियंत्रित तर करतातच पण नियतीला हि बदलवण्याची त्यात ताकद असते. सिक्रेट पुस्तकात हेच तर सिक्रेट आहे. नियती, डेस्टिनी आपल्यासमोर काय आणणार आहे ते आपण ठरवू शकत नाही. पण आपल्या हातात असते कि समोर आलेल्या परिस्थितीला सेफ हेवन का हेल बनवायचं..

No comments:

Post a Comment