Sunday 22 January 2017

एक होती शरबत गुला... विनीत वर्तक
शरबत गुला हे नाव खूप जणांसाठी तस अपरिचित असेल. भारताने त्या वेळी उदार धोरण स्वीकारल नाही. त्या वेळेस न्याशनल जियोग्राफिक च्यानल भारतात दिसत नव्हते किंवा त्याचे अंक ही खूप जणांसाठी नवीन होते. अश्या १९८४ च्या काळात न्याशनल जियोग्राफिक च्या एका फोटोग्राफर ने एक चेहरा आपल्या निकॉन मध्ये बंदिस्त केला. एक तरुण मुलगी, हिरवे डोळे, डोक्यावरून घेतलेला लाल दुपट्टा आणी तिची क्यामेराच्या लेन्स ला चिरत जाणारी नजर. तो क्षण टिपणारा फोटोग्राफर होता स्टीव म्याक-करी आणी ती नजर रोखणारी मुलगी होती शरबत गुला.
जून १९८५ न्याशनल जियोग्राफिक अंकाच्या फ्रंट पेज वर शरबत गुल अवतरली आणी तिने इतिहास घडवला. तिच्या ह्या फोटोला जगप्रसिद्ध "मोनालिसा" च्या पेंटीग शी जुळवल गेल. डॉन ब्राडमन आणी सचिन तेंडूलकर ह्यांची जी तुलना होते किंवा एकात दुसऱ्याचा खेळ दिसून येतो. तीच तुलना मोनालिसा आणी शरबत गुला ची केली गेली. ह्यावरून शरबत चा तो फोटोग्राफ काय असेल ह्याची पुसटशी कल्पना आपल्याला येईल. मी पहिल्यांदा जेव्हा शरबत ला बघितल तर निदान ५ मिनिटे तरी जागेवरून नजर हटवू शकलो नाही. साधारण २००२ च्या सुमारास न्याशनल जियोग्राफिक बघताना स्टीव आणी शरबत गुल समोर आली. तो अंक, तो फोटो माझ्यासाठी आजही एक गूढ आहे.
नासीर बाघ रेफ्युजी क्याम्प पाकिस्तान मध्ये फिरताना स्टीव तिथलं जीवन. स्त्रियांवर होणारे अत्याचार आणी एकूणच वातावरण कवर करत होता. तिथे ह्या हिरव्या डोळ्यांनी त्यातील त्या बेधक नजरेने स्टीव ला स्तब्ध केल. त्याने जेव्हा ते टीपल. तेव्हा "जगातील सर्वात जास्ती ओळखला जाणारा फोटो" आणी न्याशनल जियोग्राफिक च्या अंकाच्या इतिहासातील सर्वाधिक वेधक, सुंदर असा फोटो आपण काढत आहोत. ह्याची स्टीव ला ही कल्पना नव्हती. १९८५ साली जेव्हा हा फोटो झळकला तेव्हा तो पाश्चीमात्य देशांसाठी अफगाण स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचा प्रतिक बनला. 'पहिल्या जगातील तिसऱ्या जगाची मोनालिसा" अस ह्या फोटोला संबोधल गेल. जेव्हा हा फोटो स्टीव ने काढला तेव्हा आपण कोणाचा फोटो काढला त्या मुलीच नाव विचारण्यास विसरला. "अफगाण गर्ल" ह्या नावाने कवर वर झळकल्या नंतर स्टीव ने तिला शोधण्याचा खूप प्रयत्न १९९० च्या दशकात केला. पण त्याला नेहमीच अपयश आल.
२००२ साली पुन्हा एकदा न्याशनल जियोग्राफिक च्या साह्याने स्टीव शोध मोहिमेवर निघाला. ज्या डोळ्यांनी जगाचा बघण्याचा दृष्टीकोन बदलवला. खुद्द स्टीव ला लिजेंड फोटोग्राफर च्या पंक्तीत नेऊन बसवलं. ते डोळे शोधण स्टीव साठी एक मिशन बनल होत. नासीर बाघ रेफ्युजी क्याम्प त्याने घेतलेल्या फोटो नंतर लगेच बंद झाला होता. तिकडून अश्या मुलीविषयी कोणती माहिती मिळाली नाही. आजूबाजूंच्या गावात चौकशी केल्यावर एका व्यक्तीने ह्या मुलीच्या भावाला ओळखत असल्याचे सांगितले. तसा मेसेज तिच्या गावी पाठवला. गोरे लोक एका अफगाण मुलीचा शोध घेत आहेत ही वार्ता समजल्यावर अनेक लोक पैश्याच्या आमिषाने पुढे आले.
अनेक स्त्रिया मीच ती अस म्हणत पुढे आल्याने नक्की कोण हे ठरावण जिकरीच झाल. शेवटी अनेक अडथळे पार पाडत न्याशनल जियोग्राफिक च्या टीम ने तिला लोकेट केल. ती १९९२ साली क्याम्प मधून तिच्या गावी परत आली होती. आता तिशी मद्धे असणारी तीच ओळखण्यासाठी आयरिस रेकोग्निशन पद्धती चा वापर केला गेला. आयरिस रेकोग्निशन हि पद्धत बायोमेट्रिक पद्धतीने डोळ्यातील बुबुळ व इतर भागाचा सूक्ष्म अभ्यास करून व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी वापरली जाणारी पद्धत आहे. ती मुलगी म्हणजेच शरबत गुला म्हणजेच तिसऱ्या जगातली मोनालिसा आहे ह्यावर शिक्कामोर्तब झाल. शरबत ने जानेवारी २००२ मध्ये भेट होईपर्यंत स्वताचा फोटो बघितला नव्हता. ज्या फोटोने अनेकांच्या मनात घर केल. ज्या नजरेने अफगाण स्त्रियांच्या जुलामांना वाचा फोडली. ज्या डोळ्यांनी दुसऱ्या जगाची झोप उडवली त्या डोळ्यांना तिनेच पाहिलं नव्हत. ह्यापेक्षा दुर्दैवी काय असू शकते.
शरबत गुला ची आठवण यावी ह्याला एक कारण म्हणजे गेल्या आठवड्यात तिला अटक झाली व जेल मद्धे टाकण्यात आल. अवैध पद्धतीने योग्य कागदपत्रांशिवाय पाकिस्तान मध्ये आपल्या दोन मुलांसह राहिल्यामुळे तिच्यावर ही कारवाई करण्यात आली. ज्या पाकिस्तानात जगातील सगळ्या आतंकवादीची घरे आहेत. त्या पाकिस्तानात अश्या प्रकारे कारवाई व्हावी ह्याहून मोठ दुर्दैव नसेल. ज्या डोळ्यांनी अफगाण, पाकिस्तान मधल्या दुर्गम भागाकडे सहानभूतीने बघण्यासाठी जगाच लक्ष वळवल त्या डोळ्यांना तुरुंगात पाठवलं ह्याहून खराब नशीब काय असू शकते? शरबत आली ते भेदक डोळे घेऊन. जगली ते रीफ्युजी च आयुष्य, ज्या डोळ्यांनी जगाला नजर दिली ते डोळे ती मात्र बघू शकली नाही, शेवटी ते डोळे तुरुंगाच्या मागे कैद झाले. अशी शरबत आणी तिला टिपणारा स्टीव ह्या दोघांना माझा सलाम..

No comments:

Post a Comment