परवा पावसाच्या पहिल्या सरी बरोबर सई ला कागदाची बोट बनवून दिली. थोड्यावेळानी सई माझ्याकडे आली आणि म्हणाली, “बाबा हे बघ मी चिकटवली इकडे बोट, त्याच्या बाजूने हे अस पाणी जाते आहे आणि माझी बोट त्या पाण्यातून न अशी जाते आहे”. तिच्या त्या प्रगल्भ बुद्धीच कौतुक कराव कि लहानपण हरवलेल्याच दुख्ख मला कळेना. माझ्या लहानपणी अश्या कित्येक होड्या मित्रांसोबत चिखलाच्या पाण्यातून सोडल्या आहेत. किंबहुना त्यांच्या शर्यती केल्या आहेत. आज हे लहानपण प्रत्येक मुलाच हरवून बसल आहे. त्याला कारणीभूत आहेत आपल्या बदलेल्या प्रवृत्ती.
माझ्या लहानपणी मुल आणि मुली एकत्र इतके खेळ खेळत असू कि त्यात कुठेच वासनेचा शिरकाव झाला नव्हता. अगदी पोहण्यापासून ते लगोरी पर्यंत. आज काल आपल्या प्रवृत्ती मध्ये वासनेचा शिरकाव नकळत का होईना झालेला आहे. अगदी लहान मुलीपासून ते वयस्कर बाई पर्यंत सगळ्यांची नजर आधी उन्नत भागाकडून पार्श्वभागाकडेच जाते. निदान माझ्या पिढीपर्यंत प्रेम वगरे किंवा मुलीकडे सेक्स, प्रेम किंवा अजून कोणत्याही नजरेतून बघण्याची प्रगल्भता शाळेनंतर येत होती. म्हणून कदाचित त्या काळी १६ वर्ष धोक्याच अस म्हंटल जायचं. पण आज काल ६ वर्ष पण धोक्याच झाल आहे. ते बदललेल्या प्रवृत्ती मुळे.
चुकून झालेला एखादा स्पर्श पण वेगळा नाही वाटायचा. किंबहुना अस काही चुकून दिसल तरी आपण चुकीच काहीतरी बघितल असाच विचार मनात. आज मात्र चित्र वेगळ आहे. मी किती जणींना अस बघितल असा सांगण्याची अहमिका मित्र लोकात सुरु असते. ह्यात स्त्रिया हि मागे नाहीत. किती पुरुषांनी माझ्याकडे बघितल किंवा त्यांनी तस बघावं म्हणून उन्नत भाग दिसतील किंवा शरीराच ओंगळवाण दर्शन हे कित्येक स्त्रियांना प्रतिष्ठेच वाटते. माझ्या पिढीत मुलांसोबत मुलीला खेळायला पाठवताना मुलीच्या पालकांच्या मनात किंतु नसायचा. बाजूचा बंटी आणि समोरचा नंदू आहेत न मग कसली काळजी? असाच विचार करण्यापर्यंत विश्वास त्या काळी होता. अगदी होळी, नवरात्र, गणपती ची रात्र जागवण असल तरी आपली मुलगी सुरक्षित आहे. हा विश्वास अगदी घरापासून ते गच्ची पर्यंत असायचा.
कोणाचे आई बाबा घरी नसताना समोरच्या नंदू च्या घरी आपल्या मुलीला पाठवताना उपदेशाचे एक दोन बोल असले तरी खेळापलीकडे किंवा अभ्यासाव्यतिरिक्त काही होणार नाही ह्याची खात्री पालक देऊ शकत होते. आज असे किती पालक खात्री देऊ शकतील? मुलगा आणि मुलगी कोणीही असो पण एक पालक म्हणून तो विश्वास आज तुटला आहे. ह्याला कारणीभूत आपल्या प्रत्येक क्षेत्रात वासनेने केलेला प्रवास. अगदी लहान मुलीपासून ते वयस्कर बाई पर्यंत स्त्री बद्दल असलेल्या सन्मानाची जागा हळूहळू वासनेने घेतली आहे. म्हणून बलात्कार करताना वयाच्या सगळ्या मर्यादा केव्हाच संपून गेल्या आहेत. आपण नेहमी म्हणताना म्हणतो कि पशुवृत्ती आपल्यात निर्माण झाली आहे. पण कोणताच पशु किंवा प्राणी बलात्कार करत नाही. अजाणत्या वयात तर नक्कीच नाही.
आज एक पालक म्हणून विचार करताना माझ्या मुलीच्या बाबतीत मी इतका विश्वास दाखवू शकेन का नंदू आणि बंड्या वर? तर उत्तर नाही असच येत. रंगपंचमी मध्ये रंगांची उधळण संपून उन्नत भागाचे स्पर्श अनुभवण्याची जाणीव जेव्हा आपल्यात जागृत झाली. तेव्हाच त्या विश्वासच अस्तित्व संपून गेल. ह्या बदललेल्या पृवृत्ती मध्ये फक्त पुरुष आघाडीवर आहे अस मुळीच नाही. स्त्री च्या बाबतीत हि ते तितकच बदलेल आहे. फरक इतकाच कि पुरुष शरीरावर प्रेम करत असल्याने ते दिसून येत. स्त्री च्या बाबतीत ह्या गोष्टी ईर्ष्या, द्वेष अश्या मानसिक पातळीवर बदललेल्या आहेत.
एक नकळत छान वाटणारा स्पर्श, नकळत उमलणाऱ्या भावना, त्यांची सांगड, त्यातून निर्माण होणार प्रेम आणि मग त्यातून निर्माण होणार एक नवीन नात अनुभवलेली आमची पिढी. आता पहिल्या भेटीत झालेलं प्रेम मग तिथून रोसोर्ट किंवा हॉटेल चा प्रवास, मग शारीरिक संबंध. मग एक से मेरा क्या होगा अस म्हणत दुसरीकडे पुन्हा सुरु केलेलं वर्तुळ असल्या अनेक गोष्टीना सामोरे जाते आहे. ह्यातून निर्माण होणार मानसिक वैफल्य ह्यावर अजून एक लेख होऊ शकेल. पण तूर्तास बदलेल्या प्रवृत्ती पुन्हा कश्या बदलता म्हणजेच चांगल्या करता येतील ह्याचा विचार प्रत्येक सुजाण नागरिकाने करायला हवा.
No comments:
Post a Comment