Thursday 24 August 2017

भा. पो.... खरच का?... विनीत वर्तक

भा. पो. अस म्हणण्याचा प्रघात आहे. ज्याचा अर्थ होतो कि भावना पोहचल्या. फेसबुक आणि व्हात्स अप अश्या दोन्ही स्टेशन वरून माहितीची देवाणघेवाण सतत सुरु होते. पण ह्या सगळ्या माहितीच्या जाळ्यामध्ये असे काही अनुभव येतात कि आपल्या माणूस असण्या वरती प्रश्नचिन्ह उभ करतात. आपण नकळत मशीन होत माहितीची देवाण घेवाण करतो. अश्या ह्या स्थितीत शब्दातून, चित्रफितीतून खरच भावना पोचतात का? पोचतात तर त्यावर आपण काय प्रतिक्रिया देतो? ह्याचा विचार आपण कधीच करत नाही. संवेदना मेल्याप्रमाणे जर आपण आपल्याला मिळालेल्या माहितीची देवाणघेवाण करणार असू तर त्याची किंमत हि मोजायची तयारी असायला हवी. कधीतरी माणूस बनून ह्या सगळ्याकडे आपण बघयला हव.
काल एका घटनेने माझ मन सुन्न झाल होत. काल व्हास्त अप वर पाकिस्तान मधल्या झालेल्या स्फोटाचे विडीओ फिरत आहे. एक स्फोटा आधीचा तर एक नंतरचा. ते बघून खूप विचित्र वाटल. आपण इतके भावनाशून्य झालो आहोत का? त्या स्फोटानंतर कोळसा झालेल्या माणसांच चलचित्र बघून नक्की आपण काय दाखवत आहोत? त्या निष्पाप जिवांच अस चलचित्रीकीरण मनात कुठे तरी चीड आणणार होत. त्यांचा धर्म कोणताही असो, त्यांनी केलेल चूक हि असो पण त्याच अस उदात्तीकरण कुठेतरी खूप क्लेशदायक होत. एका ग्रुप मधून नाही तर अनेक ग्रुप मधून कोण न कोण तरी ते अजून पुढे पाठवत होत.
मला तरी भावना पोचतात मेसेज मधून, चित्रफिती मधून. भले तो माणूस भेटलेला असो वा नसो. मी एक सामान्य माणूस आहे. तर माझ्या सारख्याच तुमच्या प्रत्येका पर्यंत त्या पोहचत असतील ह्यात शंका नाही. माणूस कोणीही असो, भावना चांगली किंवा वाईट असो. फेसबुक आणि व्हास्त अप ह्या माहितीच्या स्टेशन वरून जाणाऱ्या सगळ्याच गाड्या मनाच्या गाभाऱ्या पर्यंत निदान माझ्या तरी पोह्चात. नक्कीच सगळ्यांच्या पोहचत असतील. पण ह्या पोहचणाऱ्या भावनांचं उदात्तीकरण करायचं, त्या व्यक्त कश्या, केव्हा, कोणत्या पद्धतीने करायच्या ह्याच सुकाणू मात्र आपल्या हातात असायला हव. कोणीतरी एकान केल म्हणून डोळे बंद करून जर आपण तेच पुढे पुढे ढकलत असू तर नक्कीच आपल्यातील माणसाला त्या मशीन अवस्थेतून जाग करून विचारायला हव कि भा.पो. खरच का?
रोज डीगभर येणारे शुभ सकाळ आणि संध्याकाळ चे मेसेजेस, तसेच विडीओ, जी.आय.एफ. फाईल्स आपण न चुकता इकडून तिकडे कॉपी पेस्ट करत रहातो. त्याचा उद्देश भा.पो. असतो. म्हणजे खरच आपण अस करतो का? त्या बदल्यात आपण कधी त्या व्यक्तीची चौकशी करतो का? त्याच्या प्रकृतीची चौकशी करतो का? कधी माहितीची देवाणघेवाण मग ती व्यक्तिगत स्वरूपात, पैशाच्या स्वरूपात, किंवा इतर कोणत्याही स्वरूपात ज्यात आपला स्व असेल अशी किती वेळा करतो ह्याचा आपण विचार करायला हवा. आपल्या भा. पो. करण्यासाठी कोणत्याच नाना, व. पु., पु. ल. किंवा पाडगावकरांची गरज नसते. आपले शब्द हे नेहमीच स्पेशल असतात. तेव्हा डोळे बंद आणि मनाची कवाड बंद ठेवून कॉपी पेस्ट करू नका. त्यातून ज्या भा. पो. होतात. त्याने आपली किंमत तर कमी होतेच पण आपण त्या क्रूर, हिंसा, निगेटिव विचार , क्लेश ह्याचा आपण आपोआप भाग होत जातो. आपण माणूस आहोत मशीन नाही. अपघाताच्या वेळी किंवा अश्या कोणत्याही क्षणी विडीओ बनवण्याआधी आपल्यातील माणुसकी जिवंत ठेवू यात. मग पुढल्या वेळी मेसेज पुढे पाठवताना आपण नक्कीच विचार करू कि भा. पो. खरच का?

No comments:

Post a Comment