भारतीय लोक कामाच्या निमित्ताने जगभर पसरलेले आहेत. त्यामुळे भारत नेहमीच आंतकवाद्याचं लक्ष ठरलेला आहे. इराक त्यातून कसा सुटेल? इसीस ने इराक वर कब्जा करण्याआधी अनेक भारतीय इराक मध्ये काम करत होते. इसीस ने २०१४ मध्ये इराक मधील मुसोल वर कब्जा मिळवल्या नंतर पंजाब मधील ४० भारतीयांना इसीस ने बंदी बनवलं. पण त्यांच्या तावडीतून एकाने आपली सुटका करून घेतली. पण ते ३९ अडकले.
ते ३९ कुठे आहेत? त्याचं काय झाल? जिवंत आहेत का मेले? ह्याबद्दल काहीच माहिती गेल्या ३ वर्षापासून नाही. गेल्या आठवड्यात इराकी सरकारने मुसोल वर इसीस चा पाडाव केल्यावर ह्या ३९ भारतीयांच काय झाल? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. ३९ कुटुंबांनी सरकारकडे विनंती केली. सुटलेल्या एकाने त्यांना मारल अस सांगितल असताना त्याच्या सांगण्यात सुसूत्रता आढळून आली नाही. त्यामुळे भारत सरकारने त्यावर विश्वास ठेवला नाही. व त्या ३९ भारतीयांसाठी शोध मोहीम हाती घेतली.
येमेन सारख्या युद्धभूमी वरून भारतीयांना सुखरूप आणणारे जनरल व्ही. के. सिंग ह्यांच्यावर हि जबाबदारी सोपावण्यात आली आहे. सैनिक हा शेवटपर्यंत सैनिक असतो हे जनरल व्ही.के.सिंग ह्यांनी आधीच दाखवून दिल आहे. येमेन सारख्या ठिकाणाहून भारतीयांसोबत अन्य देशाच्या नागरिकांची मुक्तता करताना त्यांनी दाखवलेली सैनिकी तत्परता तसेच निडरता ह्याच कौतुक पूर्ण जगाने केल. युद्धभूमीत एखाद्या मंत्र्याने तळ ठोकून स्वतः जातीने मोहिमेत लक्ष द्यावं अस निदान मी तरी पहिल्यांदा बघत होतो.
येमेन चा अनुभव लक्षात घेऊन विदेश मंत्री सुषमा स्वराज ह्यांनी पुन्हा एकदा जनरल व्ही.के. सिंग ह्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली. जनरल व्ही.के.सिंग सुद्धा एखाद्या सैनिका प्रमाणे आपल्या कमांडिंग ऑफिसर चा आदेश अंतिम शब्द मानून लगेच इराक ला रवाना झाले. हा लेख लिहेपर्यंत जनरल व्ही.के.सिंग ह्यांनी त्या ३९ ना शोधण्याच शिवधनुष्य आगोदर उचलल आहे. गेल्या ३ वर्षात त्या ३९ जणांची काही माहितीच नाही. ते काम करत होते त्या भागात आजही इराकी लष्कराला अजून जाता येत नाही आहे. कारण जमिनीत असंख्य माईन्स इसीस ने पेरल्या आहेत. त्यामुळे तिकडे जाण म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण. इसीस ने केलेला इथला अत्याचार बघून पायाखालची वाळू सरकेल इतक भयावह आहे. पण त्या हि परिस्थितीत भारताने आपल्या नागरिकांसाठी शोधकार्य सुरु ठेवले आहे.
इराकी सरकारची मदत, इराकी सैन्याची मदत घेऊन, तिथल्या लोकांशी बोलून कुठून काही सुगावा लागतो आहे का ह्याचा कसून शोध घेतला जातो आहे. इसीस असे कामगार आपले गुलाम बनवते. आधी अश्या अनेक घटना घडल्या असल्याने त्या दृष्टीने पण सिरीया मध्ये त्यांना पाठवलं असेल का? ह्या दृष्टीने हि शोध सुरु झाला आहे. ह्या सर्वांवर मोसुल सारख्या ठिकाणी जनरल व्ही.के.सिंग लीडर प्रमाणे तळ ठोकून पूर्ण शोधकार्यावर लक्ष ठेवत आहेत.
ते ३९ मिळतील का नाही हा पुढला प्रश्न पण सर्वोच्च लेवल वर आपल वजन वापरून मिळालेल्या पहिल्या संधीचा फायदा घेत भारताने आपल वजन वापरल आहे. सुषमा स्वराज, जनरल व्ही.के.सिंग ह्या सोबत इराक मधील वाणिज्य दूत ह्यांनी आपल्या परीने इराकी सरकारकडे मदत मागितली आहे. भारताच्या ह्या मागणीला इराक सरकारने योग्य प्रतिसाद देऊन त्यांच्या सर्व सैनिकी अधिकारी तसेच वेगवेगळ्या संस्थाना त्या ३९ भारतीयांसाठी हाय प्रायोरिटी लागू केली. स्वतः एक सरकारच्या मंत्रिमंडळातील प्रतिनिधी तसेच एक निवृत्त सेना अधिकारी तळ ठोकून असल्याने ह्या शोधकार्यास गती आली आहे. सुषमा स्वराज ह्यांनी त्याच वेळी एअर इंडिया ला पण प्रायोरिटी वर राहण्याचा अलर्ट दिला आहे. अगदी छोट्या वेळेत त्या ३९ जणांना भारतात सुखरूप आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
ते ३९ मिळतील अशीच आशा त्यांच्या कुटुंबासोबत भारताला आहे. पण काहीही होवो त्या ३९ भारतीयांसाठी भारताने केलेले उपाय आणि दाखवलेली तत्परता प्रशंसनीय नक्कीच आहे. विदेश मंत्री सुषमा स्वराज, इराक मध्ये ह्या शोधकार्याच प्रतिनिधित्व करणारे जनरल व्ही.के.सिंग तसेच सर्व अधिकारी कौतुकास पात्र आहेत. ते लवकर सुखरूप घरी परत येवोत हीच प्रार्थाना.
No comments:
Post a Comment