Thursday, 24 August 2017

अक्षय पात्र... विनीत वर्तक

ऑक्टोबर २०१७ पर्यंत भारत आपल अक्षय पात्र जगासमोर आणतो आहे. अक्षय पात्र म्हंटल कि येते अशी थाळी जिच्या मधील अन्न कधीच संपत नाही. मग भारत अस काय आणतो आहे कि ज्याला अक्षय पात्र अस संबोधल जात आहे. ह्या वर्षाच्या ऑक्टोबर पर्यंत भारत ५०० मेगावॉट उर्जा निर्मिती करणार प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रियाक्टर सुरु करत आहे. ह्या तंत्रज्ञानावरील हि जगातील फक्त दुसरी अणुभट्टी असणार आहे. ह्याला अक्षय पात्र का म्हंटल जाते आणि भारताच्या दृष्ट्रीने का महत्वाच हे समजावून घेण महत्वाच आहे.
अणु विखंडन करून उर्जेची निर्मिती होते हे सर्वश्रुत आहे. जगात असणाऱ्या सगळ्याच अणुभट्टी मध्ये युरेनियम २३५ हे इंधन म्हणून वापरल जाते. ह्याच्या अणुच विखंडन करून उर्जा मिळवली जाते. पण युरेनियम २३५ तसच त्याच्या एनरीच स्वरूपाचे साठे जगात अत्यंत कमी आहेत. भारताच्या दृष्टीने तर भारतात अतिशय नगण्य स्वरूपात हे मिळते. त्यामुळेच भारताला हे वेगवेगळ्या देशांकडून अणुभट्टी सुरु ठेवण्यासाठी आयात करावे लागते. ह्याचा दुसरे भाऊ म्हणजेच युरेनियम २३८ आणि थोरियम हे भारतात मुबलक प्रमाणत आहे. युरेनियम २३८ वेस्ट प्रोडक्ट म्हणून तर थोरियम नैसर्गिक रित्या भारतात आढळते.
युरेनियम २३८ किंवा थोरियम चा जर इंधन म्हणून वापर केला तर ह्यातून उर्जा निर्माण झाल्यावर जे निर्माण होतो तो अखंड उर्जेचा स्त्रोत म्हणजे इंधन जाळल्यावर इंधन मिळते. हे दोन्हीचा वापर केला तर तयार होते युरेनियम २३३ आणि प्लुटोनियम. म्हणजे जर आपण युरेनियम २३८ किंवा थोरियम ची अणुभट्टी सुरु केली तर आपल्या बाकीच्या अणुभट्टीनां लागणार इंधन आपण भारतात तयार तर करूच त्या शिवाय उर्जेची निर्मिती होईल ती वेगळीच. म्हणूनच ह्या अणुभट्टी ला अक्षय पात्र म्हणजेच न थांबणारी उर्जा देणारी अणुभट्टी अस संबोधले जाते.
भारतात जगातील दुसऱ्या क्रमाकांचे थोरियम चे शोधलेले साठे आहेत. जर हे थोरियम आपण वापरू शकलो तर ६०,००० वर्ष भारताची उर्जेची गरज भागवली जाईल. इतके हे प्रचंड मोठे साठे आहेत. म्हणूनच डॉक्टर होमी भाभा सारख्या शास्त्रज्ञांनी ह्या दूरदृष्टीने संशोधनाला सुरवात केली. त्याच फळ आपण आता ह्या वर्षात चाखणार आहोत. थोरियम किंवा युरेनियम २३८ जरी अक्षय उर्जा देणारे असले तरी त्याचं पात्र निर्माण करणे कठीण आहे. ह्यांच्या अणुच अस सामान्य पद्धतीने विखंडन करण कठीण आहे. म्हणून ते करण्यासाठी ह्यांना गरजेचे असतात ते फास्ट न्युट्रॉन. फास्ट न्युट्रॉन म्हणजे काय तर ह्यातील न्युट्रॉन मधील उर्जा जास्ती असते आणि त्यांची वेलोसिटी सामान्यतः वापरण्यात येणाऱ्या न्युट्रॉन पेक्षा जास्ती असते. म्हणूनच ह्याला फास्ट न्युट्रॉन अस म्हणतात. हे फास्ट न्युट्रॉन युरेनियम २३३ किंवा थोरियम वर आदळून अणु विखंडन करतात. ह्यातून निर्माण होणार इंधन हे वापरलेल्या इंधनापेक्षा जास्ती असल्याने ह्याला ब्रीडर अस म्हंटल जाते.
भारताने अस फास्ट ब्रीडर रियाक्टर १९८५ सालीच प्रायोगिक तत्वावर सुरु केल. जगातील हे तंत्रज्ञान असणारा भारत त्याकाळी ७ वा देश होता. इतके वर्ष वेगवेगळे संशोधन करून आणि अभ्यास करून एक कमर्शियल फास्ट ब्रीडर रियाक्टर बनवण्याचा निर्णय भारताने घेतला. त्यावर काम २००४ साली सुरु झाल. प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रियाक्टर कल्पकम इकडे बांधून पूर्ण होत आल असून ऑक्टोबर २०१७ मध्ये ते कार्यान्वित होईल. ५०० मेगावॉट इतकी उर्जेची निर्मिती करताना त्याच वेळी भारताच्या इतर अणुभट्टीसाठी इंधांची निर्मिती हे अक्षय पात्र सुरु करेल. वाचताना हे सोप्प वाटल तरी फास्ट न्युट्रॉन सांभाळण सोप्प नाही. ह्यासाठी १७५० टन इतक लिक्विड सोडियम ची गरज लागते. लिक्विड सोडियम साठवण सोप्प नाही. त्याचा पाण्याशी संबंध आला तर त्याचा स्फोट होतो तर हवेशी संपर्क आला तर तो जळतो. अश्या स्थितीत हवा आणि पाण्यापासून वेगळ त्याचा साठा करण खूप मोठ कठीण काम आहे. म्हणूनच अनेक देशांनी ह्या तंत्रज्ञाना पासून पाठ फिरवली. एकट्या रशियाने ह्यावर आधारित अणुभट्टी बनवली जी १९८० पासून सुरु आहे. पण नंतर रशिया आर्थिक संकटात सापडल्यावर त्यांनी पण नाद सोडून दिला. चीन सारखा देश पण ह्या तंत्रज्ञाना बाबतीत भारतापासून दशकभर मागे आहे.
भारताने मात्र आपल संशोधन सुरूच ठेवल आणि त्यामुळेच आज भारताने अश्या तर्हेच कठीण तंत्रज्ञान निर्माण केल. ह्या अणुभट्टी मध्ये सुरक्षेसाठी दोन वेगळ्या यंत्रणा असून अवघ्या एका सेकंदात अणुभट्टी ला बंद करू शकतात. तसेच निर्माण होणार तापमान राखण्यासाठी ४ वेगवेगळ्या यंत्रणा आहेत. ह्या अणुभट्टीत युरेनियम २३८ वापरल जाणार आहे. अक्षय पात्रा सारख हि अणुभट्टी भारताच्या उर्जेची गरज येणाऱ्या अनेक वर्षात तर भागवेलच पण तितक्या वर्षात दुसऱ्या अणुभट्टीन साठी इंधनाचा स्त्रोत हि बनणार आहे. ह्या संशोधनाच स्वप्न बघितलेले डॉक्टर होमी भाभा तसेच बी.ए.आर.सी आणि आय.जी.का.र चे संशोधक, अभियंते त्यांच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांमुळे आपण हे तंत्रज्ञान वापरून अक्षय पात्रा ची निर्मिती केली आहे. त्या सर्वाना माझा सलाम.

No comments:

Post a Comment