काल कोची मेट्रो च उदघाटन झाल. ह्या मेट्रो च उदघाटन अनेक अर्थाने वैशिष्ठपूर्ण आहे. १३ किलोमीटर लांबी असून ५१८१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ह्याच्या पहिल्या टप्प्यात ११ स्थानक असणार आहेत तर सर्व मिळून एकूण २२ स्थानक असणार आहेत. कोची मेट्रो दिल्ली, मुंबई, कोलकत्ता अश्या शहरात असलेल्या मेट्रो सारखी असली तरी खूप वेगळी आहे.
भारतात पहिल्यांदा मल्टीमोड इन्टीग्रेटेड सिस्टीम वापरून हि मेट्रो तयार करण्यात आली आहे. म्हणजे रेल्वे, रस्ते आणि पाणी अश्या तिन्ही स्वरूपात ह्या मेट्रो च जाळ कोची शहराला जोडणार आहे. वॉटर मेट्रो च्या बद्दल सांगायचं झाल तर दोन अतिप्रगत क्याटामरीन बोटी ज्यांचा वेग ८ नॉट असणार आहे आणि ज्यातून १०० लोक एकावेळेस प्रवास करू शकतील. अत्याधुनिक दळणवळण यंत्रणा आणि सुरक्षितता ह्यांचा ताळमेळ असलेल्या ह्या बोटी कोची च्या १० बेटांना जोडून त्यावरून लोकांची येजा सुनिश्चित करतील. ७६ किमी असलेली हि वॉटर मेट्रो २०१९ पर्यंत कार्यान्वित होणार आहे.
कोची मेट्रो मध्ये पहिल्यांदा कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन टेक्नोलोजी चा वापर करण्यात आला आहे. ज्यायोगे कमीतकमी चुका करत जास्तीत जास्त फेऱ्या करता येणार आहेत. ह्यापलीकडे सगळ्या रेल्वे स्टेशनवर सोलार प्यानेल बसवले गेले आहेत. ह्यातून २.३ मेगावॉट उर्जेची निर्मिती होणार आहे. ३०% इतकी हि उर्जा ग्रीनउर्जेच्या स्वरूपात मेट्रोला मिळणार आहे. ह्यापुढे जाऊन हे प्रमाण ५०% करण्यात येणार आहे. म्हणजे लागणाऱ्या उर्जेपेकी अर्धी उर्जा निसर्गात प्रदूषण न करता तयार करण्यात येणार आहे.
कोची मेट्रो च अजून एक वैशिष्ठ म्हणजे ह्यात १००० पेक्षा जास्ती स्त्रिया नोकरीवर रुजू करण्यात आल्या आहेत. मह्त्वाची पदे तसेच मेट्रो चा कंट्रोल स्त्रियांच्या हातात असणार आहे. वूमन एम्पपॉवर च अतिशय सुंदर उदाहरण ह्या निमित्ताने समोर आल आहे. ह्या स्त्रियांशिवाय २३ ट्रान्सजेन्डर लोकांना हि नोकरीत प्राधान्य देण्यात आल आहे. सरकारी नोकरीत पहिल्यांदा भारतात ट्रान्सजेन्डर लोकांना सामावून घेतल गेल आहे. हे खूप मोठ पाउल म्हणता येणार आहे. केरळ सारख्या सुसुक्षित भागात अस पाउल हे शिक्षणाच महत्व अधोरेखित ह्यासाठी करते कि अश्या लोकांकडे सहानभूती ने न बघता त्यांना समान संधी देण्याचा पायंडा ह्या निमित्ताने घातला गेला आहे.
ह्या मेट्रो मध्ये छोट्या अंतरासाठी सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच वृद्ध व अपंग व्यक्तींच्या सोयीसाठी उपाययोजना केल्या आहेत. मेक इन इंडिया ह्या सूत्राच्या आधारे आल्सटोम ह्या कंपनीने ७०% भाग हे भारतात बनवले आहेत. प्रत्येक ६ व्या पिलर ला उभी बाग केलेली असणार आहे. ह्यातील खतासाठी शहरातील कमपोस्ट खताचा वापर केला जाणार आहे. एकाच वेळेस इतक्या साऱ्या विविध वैशिष्ठ्यांनी नटलेली कोची मेट्रो मध्ये वाय-फाय फुकट असणार आहे. ह्या मेट्रो च्या प्रकल्पात काम करणाऱ्या आणि केलेल्या सर्वच कामगार आणि अभियंते ह्याचं अभिनंदन.
No comments:
Post a Comment