भारताच्या ७५१७ किमी लांबीच्या किनारपट्टीच रक्षण भारताच्या नौसेनेकडे आहे. भारतीय नौसेना हि Blue Water Navy आहे. भारताच्या नौदलाच्या ताफ्यात असलेल्या १ विमानवाहू नौका, ११ डीस्ट्रोयर, १४ फ्रीगेत्स, १ न्युक्लीअर पॉवर तर १३ नॉर्मल सबमरीन अशी प्रचंड मोठी शक्ती आहे. भारतीय नौदल भारताच्या किनारपट्टीच्या सुरक्षा सोबत हिंद महासागरातील एक सक्षम नौसेना म्हणून प्रसिद्ध आहे. हिंद महासागरातून होणाऱ्या व्यापारावर चीन ला वर्चस्व हव आहे. तर चीन ला तुल्यबळ ठरू शकणारी एकच नौसेना म्हणजेच भारतीय नौदल.
अश्या सक्षम असलेल्या भारतीय नौदलला इतक्या मोठ्या किनारपट्टी तसेच हिंद महासागरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि आपल्या सर्व दला मध्ये समन्वय असण्यासाठी एका वेगळ्या लिंक किंवा उपग्रहाची गरज होती. २०१३ पर्यंत भारत दुसऱ्या देशांकडून भाडे तत्वाने हि सेवा वापरत होता. पण १९९९ मधील कारगिल युद्धात अमेरिकेने नाकारलेल्या मदतीने झालेलं नुकसान किंवा मोक्याच्या क्षणी अस दुसऱ्यांवर अवलंबून रहाणे भारतीय नौदलाला परवडणारे नव्हते. नौदलाची हि गरज ओळखून इस्रो च्या वैज्ञानिक आणि अभियंत्यांनी फक्त नौदलासाठी असा उपग्रह तयार केला. जी स्याट ७ हा तो उपग्रह.
जी स्याट ७ हा उपग्रह इस्रो च्या ४ थ्या पिढीतील आहे. २६५० किलोग्राम वजन असणारा हा उपग्रह ३० ऑगस्ट २०१३ ला एरियन ह्या रॉकेट द्वारे प्रक्षेपित केला गेला. ४८५ कोटी पूर्ण मोहिमेचा खर्च होता तर त्यातील १८५ कोटी रुपये ह्या उपग्रहाची किंमत होती. ह्याच उपग्रहाला रुक्मिणी अस संबोधल जाते. रुक्मिणी उपग्रहाने प्रक्षेपित होऊन काम सुरु केल्यावर भारतीय नौदलाच्या क्षमतेत प्रचंड वाढ झाली आहे. ह्यावर युएचफ, एस, सी तसेच केयू ब्यांड असून हा पूर्णतः सैनिकी उपग्रह आहे. पृथ्वीपासून सुमारे २४९ किलोमीटर पेरोजी तर ३५,९२९ किमी एपोजी वर ३.५ डिग्री कोनामध्ये स्थिर आहे.
जी स्याट ७ उपग्रहाद्वारे भारतीय नौसेना आपल्या सबमरीन, बोटी तसेच इतर कम्युनिकेशन नियंत्रित करते. रुक्मिणी उपग्रहाच्या मदतीने ६० युद्धनौका ७५ पेक्षा जास्ती लढाऊ विमानांच नियंत्रण अगदी सहज शक्य झाल आहे. ह्या उपग्रहामुळे भारताच्या पूर्व तसेच पश्चिम किनारपट्टी वरील २००० नॉटीकल मैल म्हणजेच ३७०० किमी च्या पूर्ण क्षेत्रात नजर ठेवता येते. ह्यामुळेच गेल्या काही दिवसात डोकला किंवा हिंद महासागरात चीन ने केलेल्या घुसखोरीचे पुरावे आपल्याकडे आहेत. चीनी युद्धनौका, पाणबुड्या ह्यांच्या १३ पेक्षा जास्ती घटना भारताच्या रुक्मिणी ने पुराव्यासहित टिपल्या आहेत.
भारताच्या किनारपट्टीची सुरक्षितता तसेच हिंद महासागरातील आपली क्षमता अबाधित ठेवण्यासाठी अश्या उपग्रहांच्या मदतीने मोलाची मदत आहे. २००० व्याट ची ब्याटरी आणि ९ वर्ष आयुष्य ह्या उपग्रहाच आहे. ह्या उपग्रहाने केलेली भारताच्या नौसेनेची मदत बघून संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर ह्यांनी १४ फेब्रुवारी २०१५ रोजी ५ रुपयांच पोस्ट तिकीट काढल आहे. ज्यावर ह्या उपग्रहाचा म्हणजेच प्रोज्केट रुक्मिणी चा फोटो आहे. रुक्मिणी ने भारतीय नौसेनेला दिलेलं बळ बघून भारतीय हवाई दलाने हि अश्या उपग्रहाची मागणी इस्रो कडे केली. ह्या वर्षाच्या अखेरीस भारतीय हवाई दलासाठी असलेल्या ह्या उपग्रहाच प्रक्षेपण अपेक्षित आहे.
इस्रो इतके पैसे घालवून देशासाठी काय देते तर रुक्मिणी आणि क्यारटोस्याट सारखे उपग्रह जे दिवस रात्र भारताच्या सीमांवर लक्ष ठेवून असतात. शत्रूची एकूण एक हालचाल आपल्या तिक्ष्ण नजरेने टिपून भारतीय सैन्य दलाला सूचना देतात. ज्यामुळे भारतीय सेना, नौदल,हवाई दल कोणत्याही अनपेक्षित संकटासाठी तयार राहू शकते. गेल्या आठवड्यात अरुण जेटली ह्यांनी एक वाक्य चीन ला ऐकवलं. ते म्हणजे १९६२ चा भारत आणि २०१७ चा भारत वेगळा आहे. ते अस म्हणू शकले ते इस्रो ने भारताला अवकाशातून दिलेल्या ह्या पाठींब्यामुळे. रुक्मिणी तसेच इतर असे अनेक उपग्रह भारतीयांच्या सेवेत देणाऱ्या इस्रो च्या अभियंते आणि वैज्ञानिक पुन्हा एकदा सलाम.
No comments:
Post a Comment