Thursday 24 August 2017

गेम चेंजर... विनीत वर्तक

५ जून चा जी.एस.एल.व्ही. मार्क ३ च प्रक्षेपण अनेक दृष्टीनी गेम चेंजर असणार आहे. भारतात बनवलेलं सगळ्यात शक्तिशाली रॉकेट म्हणून तर आहेच पण त्यातून जाणारा उपग्रह सुद्धा गेम चेंजर आहे. २०० हत्तींच्या वजनाइतक रॉकेट सोबत सुद्धा तितकाच स्पेशल उपग्रह जीस्याट – १९ आपल्या सोबत घेऊन जात आहे. ह्या उपग्रहाच वजन सुद्धा ३३१६ किलोग्राम इतक आहे. म्हणजे एक पूर्ण हत्ती अवकाशात ३६,००० किमी हून जास्ती उंचीवर हे रॉकेट घेऊन जाणार आहे.
जीस्याट-१९ हा एक कम्युनिकेशन उपग्रह आहे. पण अस असल तरी ह्याच्या प्रक्षेपणामुळे भारतात डिजिटल क्रांतीची सुरवात होणार आहे. इस्रो च्या मते रॉकेट च्या उड्डाणापेक्षा उपग्रहाच्या प्रक्षेपणाची सगळे जण आतुरतेने वाट बघत आहेत. ह्याला कारण हि तसेच आहे. सध्या भारताचे ४१ उपग्रह पृथ्वीभोवती फिरत आहेत. त्यातील १३ हे कम्युनिकेशन साठी आहेत. जीस्याट-१९ इकडे वेगळा होतो म्हणूनच हा अवकाशातील पांढरा हत्ती ठरणार नाही. ह्या उपग्रहात पहिल्यांदा इस्रो ने एका वेगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे. मल्टीपल फ्रिक्वेन्सी बीम अस ह्या तंत्रज्ञानाच नाव आहे. आत्ता पर्यंत प्रत्येक उपग्रहाकडून एकच बीम प्रक्षेपित केला जायचा. म्हणजे पूर्ण भारतातील इन्टरनेट हे एका फ्रिक्वेन्सी वरून प्रक्षेपित व्हायचं. त्यामुळे युजर हे सेम ब्यांडविड्थ शेअर करत होते. पण पहिल्यांदा इस्रो च्या ह्या उपग्रहामुळे मल्टीपल फ्रिक्वेन्सी बीम होणार आहे. एकाच वेळी ८ बीम पूर्ण भारतच क्षेत्र कवर करतील. म्हणजे ८ उपग्रह जे काम करण्यासाठी पाठवावे लागणार होते. तेच काम हा उपग्रह एकटा करू शकणार आहे.
मल्टीपल बीम फ्रिक्वेन्सी मुळे इन्टरनेट च्या वेगात कमालीचा सुधार होणार आहे. जीस्याट – १९ तर खरा नुसता ट्रेलर आहे. खरा पिक्चर इस्रो च्या भाषेत सुरु होईल जेव्हा काही महिन्यांनी ह्याचा थोरला भाऊ जीस्याट – ११ अवकाशात एरियन- ५ रॉकेट च्या सहायाने उड्डाण भरेल. ह्या उपग्रहाच वजन तब्बल ५.८ टन असून तो ४ मीटर उंचीचा आहे. इतक वजनाच्या उपग्रहाच प्रक्षेपण करण्याची भारतीय रॉकेट ची क्षमता नसल्याने तो एरियन रॉकेट मधून सोडण्यात येतो आहे. ह्या उपग्रहात ३२ मल्टीपल बीम फ्रिक्वेन्सी असणार आहे. म्हणजे जीस्याट-१९ सारखे चार जुळे भाऊ एकाच वेळी काम करणार आहेत. हे सगळ एका सिंगल प्लाटफोर्म वरून होणार आहे. हे दोन्ही उपग्रह जेव्हा पूर्ण क्षमतेने काम करतील तेव्हा आता अस्तिवात असेलल्या बीम पेक्षा ४० पट अधिक क्षमतेने इन्टरनेट मधील माहितीची देवाणघेवाण होणार आहे. भारतातील डिजिटल क्रांतीची सुरवात हे दोन्ही भाऊ ह्या वर्षाखेरीस करणार आहेत. तांब्याच्या तारेपासून सुरु झालेली माहिती क्षेत्राची उलढाल फायबर ओप्टीक्स पर्यंत झाली. पण ह्या पुढे ती स्याटेलाईट बेस इंटरनेट क्रांती असणार आहे. ह्या वन सोर्स क्रांतीमुळे सायबर सिक्युरिटी मध्ये कमालीची वाढ होणार आहे.
जीस्याट- १९ अजून काही गोष्टींसाठी गेम चेंजर असणार आहे. (GRASP) म्हणजेच जिओस्टेशनरी रेडियेशन स्पेट्रोमीटर ह्यात असणार आहे. जे की उपग्रहांवर होणाऱ्या अतिनील किरण तसेच क्ष किरणांचा अभ्यास करणार आहे. ह्यामुळे पुढे पाठवण्यात येणाऱ्या उपग्रहानमध्ये अजून चागल्या पद्धतीचे धातू किंवा आवरण देता येईल. ज्यामुळे उपग्रहांच आयुष्य वाढण्यास मदत होणार आहे. ह्या सोबत हिट पाईप, फायबर ओप्टीक जायरो, मायक्रो इलेक्ट्रिकल म्याकेनिकल सिस्टीम सारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. ज्या कि इस्रो पहिल्यांदा वापरत आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्णतः भारतीय बनावटीच्या लिथियम आयर्न ब्याट्रीज वापरत आहे. इकडे हे लक्षात घेतले पाहिजे कि ह्याच ब्याटरी चा वापर करून पुढील काळात आपल्या रस्त्यांवर धावणाऱ्या कार, बस मध्ये केला जाणार आहे.
एक चाचपडणारी स्पेस एजन्सी ते एक प्रथितयश स्पेस एजन्सी असा इस्रो चा प्रवास ह्या निमित्ताने सुरु झाला आहे. गेल्या काही दशकात मागे असणारी इस्रो झपाट्याने बिग बोइज क्लब मध्ये मेंबर होते आहे. अमेरिका, रशिया, चीन, युरोपियन एजन्सी, जपान ह्या सारख्या अवकाश क्षेत्रातील दादा लोकांना आपल्या कुशलतेने आपली दखल घ्यायला लावते आहे. इकडे एक लक्षात घेतले पाहिजे नासा आणि इस्रो ची तुलना होऊ शकत नाही. अमेरिकेने अवकाश तंत्रज्ञान हसगत केल ते वर्चस्वासाठी तर भारत हे हस्तगत करतो आहे ते भारतीयांसाठी. ह्या दोन्ही उद्देशात खूप मोठा फरक आहे. म्हणूनच रिमोट सेन्सिंग उपग्रहांच्या बाबतीत भारत दादा आहे. आपल्या प्रत्येक मोहिमेने भारतीयांसाठी काय असेल हाच विचार करत इस्रो पुढे जाते आहे. कारण कोणाला दाखवण्यासाठी भारत माणसाला अवकाशात घेऊन जाणार नाही आहे तर भारतात होणारी डिजिटल क्रांती इस्रो साठी महत्वाची आहे. ५ जून च्या ह्या गेम चेंजर मोहिमेसाठी इस्रो च्या सर्वच वैज्ञानिक आणि संशोधकांना खूप खूप शुभेछ्या.

No comments:

Post a Comment