Thursday 24 August 2017

जसवंत सिंग रावत वन म्यान आर्मी... विनीत वर्तक

जसवंत सिंग रावत हे नाव भारतीयांना माहित नसेल. भारतीय सरहद्दीवर चीन पुन्हा एकदा कुरघड्या करत आहे. अरेरावी आणि दादागिरी करत आहे तेव्हा भारतीय राजकरणी शिष्टाचार म्हणून चीन च्या अधिकाऱ्यांना भेटायला जातात. तेव्हा ह्या गोष्टीच कुठून समर्थन कराव समजत नाही. ज्या भारताच्या भूमीत आपल्या शौर्याने चीन च्या आख्या सैन्याला पाणी पाजणारा जसवंत सिंग रावत जन्म घेतो. ते भारतीय तोच चीन पुन्हा कुरघोडी करत असताना राजकारणी शिष्टाचार पाळतात. हे एक न उलगडलेलं कोड आहे.
जसवंत सिंग रावत हा भारतीय सैन्यात ४ बटालियन गढवाल रायफल तुकडीमध्ये एक रायफलम्यान म्हणून सरहद्दीवर तैनात होता. १९६२ च्या भारत – चीन युद्धात गढवाल सैन्यातील ह्या बहादूर सैनिकाने स्वमर्जीने भारताच्या दिशेने गोळ्या डागण्याऱ्या एका एमएमजी गनवर ताबा मिळवण्यासाठी यांनी आगेकूच सुरु केली. हि गन अतिशय जवळून भारताच्या सैन्यावर आणि तेथील लोकांवर गोळीबार करत होती. १७ नोव्हेंबर १९६२ हा तो दिवस. ह्या आक्रमणाच्या आधी ह्या गढवाल तुकडीने त्याच दिवशी चीन ची अशीच दोन आक्रमण परतावून लावली होती. पण मागे वळतील ते भारतीय सैनिक कुठले. जीवाची पर्वा न करता जसवंत सिंग आपला सहकारी गोपाल गुसेन सह चीन च्या त्या तुकडी समोर आगेकूच सुरु केली.
त्रिलोक नेगी ने कवरिंग फायर देताच ह्या दोघांनी चीन च्या त्या गनच्या दिशेने आगेकूच सुरूच ठेवली. आपल्या जीवाची तमा न बाळगता जसवंत सिंग रावत ने शत्रूवर आपल्या बंदुकीतून गोळ्यांचा मारा सुरु ठेवला. अगदी शत्रूच्या ग्रेनेड रेंज मध्ये एक बॉम्ब आणि सर्व खेळ खल्लास अस असताना अतुल्य शौर्य दाखवत जसवंत सिंग रावत ह्यांनी शत्रूवर हल्ला केला. त्यांच्या ह्या बहादुरीपुढे शत्रूने नांगी टाकली. भारताच्या सैनिकांनी त्या एमएमजी गनवर आपला कब्जा केला. हे अतुलनीय शौर्य गाजवताना जसवंत सिंग रावत धारातीर्थी पडले. त्रिलोक नेगी नी हि आपले प्राण गमावले तर गोपाल गुसेन जखमी झाले. ह्या लढाईत एकट्या जसवंत सिंग रावत ह्यांनी ३०० चीनी सैनिकांना कंठस्थान घातले.
ह्या लढाईत भारताचे दोन सैनिक म्हणजे जसवंत सिंग रावत आणि त्रिलोक नेगी ह्यांनी आपला प्राण गमावला. तर ८ जखमी झाले. त्याच वेळेस चीन ने आपल्या ३०० पेक्षा जास्ती सैनिकांना तसेच त्या एमएमजी ला हि गमावलं. अस म्हणतात कि जसवंत सिंग रावत ह्यांनी अश्या तर्हेने फायरिंग सुरु ठेवल होत कि भारताच खूप मोठ सैन्य आपल्यावर आक्रमण करून आल आहे ह्या भ्रमात चीन च सैन्य राहील. ह्या बहादूर सैनिकाने आपल्या चातुर्याने चीनी सैन्याला भारताच्या तुकडीचा अंदाज लागू दिला नाही. त्याचवेळी चीन चे एक एक सैनिक टिपत त्याने चीन सैनिकांना सळो कि पळो करून सोडल. चीन सैनिकांना जेव्हा भारताच्या तुकडीची कल्पना आली तोवर त्यांनी ३०० सैनिकांना गमावलं होत.
आपल्या अतुल्य देशभक्ती आणि बहादुरीने प्राणाची पर्वा न करता चीन ला पाणी पाजणाऱ्या ह्या सैनिकाच शीर चीनी सैनिकांनी धडावेगळ केल. ते धड ते चीन ला घेऊन गेले. युद्धसमाप्ती ची घोषणा झाल्यावर ह्या अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या सैनिकाच धड चीनी सैनिकांनी भारताला परत केल त्याच्या ब्रास बस्ट सह. कारण त्याच्या शौर्याने चीनी सैनिकांना हि भुरळ पाडली. त्याच्या अतुलनीय शौर्याची दखल घेताना ४ गढवाल रायफल ला ब्याटल ऑनर दिला गेला. १९६२ ला मिळालेला हा ऑनर भारतीय सैन्यातील कोणत्याही तुकडीला मिळालेला पहिला ब्याटल ऑनर होता. ह्यावरून जसवंत सिंग रावत ह्यांनी गाजवलेल्या शौर्याचा थोडाफार अंदाज आपण लावू शकतो. जसवंत सिंग रावत ह्यांना मरणोत्तर महावीर चक्रा ने सन्मानित करण्यात आल. त्यांच्या ह्या शौर्याच्या स्मरणार्थ आजही ते भारतीय सैन्य दलात आहेत अस समजून त्यांना प्रमोशन दिल जाते. भारतीय सेना जवळपास ६ लोक त्यांच्या सेवेसाठी आजही कार्यरत ठेवते. त्यांना सकाळी ४:३० वाजता बेड टी, ब्रेकफास्ट ९ तर रात्री ७ ला जेवण दिल जाते.
अरुणाचल प्रदेश हा आज भारताचा भाग आहे ह्याच श्रेय ह्या सैनिकाला जाते. १०,००० फुट उंचीवर आपल्या जीवाची पर्वा न करता भारतभूमीचे रक्षण करणाऱ्या ह्या सैनिकामुळे आज आपण इकडे सुखाने झोपू शकत आहोत. त्यांच्या स्मरणार्थ ज्या ठिकाणी हे युद्ध झाले त्या ठिकाणी एक स्मारक निर्माण करण्यात आल. त्याच बरोबर जी पोस्ट त्यांनी वाचवली तिला जसवंत गात अस नाव ठेवल गेल. ज्यांच्या बहादुरीची चीनी सैन्याला पण भुरळ पडली त्या जसवंत सिंग रावत ना आम्ही भारतीय ओळखत नाही. किंबहुना भारताच्या राजकरण्यांना त्याला भेट देण्यात शिष्टाचार वाटत नाही. पण भारतीय सेना आणि तिचे सैनिक हे बलिदान विसरले नाहीत. आजही त्याचे बूट रोज पॉलिश करण्यात येतात. त्यांची बेडशीट रोज बदलली जाते. त्याचं सर्व साहित्य सन्मानपूर्वक जपून ठेवण्यात आल आहे. मग ती बोटातील अंगठी असो वा चीन ची ती ताब्यात घेतलेली एमएमजी गन.
ए मेरे वतन के लोगो जेव्हा लता मंगेशकरांनी गायलं तेव्हा आपले डोळे भरून येतात पण ज्यांच्यासाठी ते गायलं त्या सैनिकाला आपण किती समजून घेतो. कुर्बानी याद करायला आम्हाला कुर्बानी काय असते तेच कधी शिकवलं गेल नाही. आम्ही आधी अडकलो धर्मात मग जातीत आणि मग कुठे कधीतरी गाण ऐकल कि आम्हाला भरून येत. जसवंत सिंग रावत मी एक भारतीय तुमचा एक मोठा कर्जदार आहे. कदाचित ते फेडण्याइतका मोठा नसेन पण ते विसरण्या इतका छोटा हि नाही. तुमच्या अतुलनीय शौर्यासाठी कडक स्यालुट. तुम्ही नेहमीच माझ्यासाठी वन म्यान आर्मी आहात. जय हिंद.

1 comment: