Thursday, 24 August 2017

नाचता येईना अंगण वाकडे... विनीत वर्तक

भारताच्या पंतप्रधानांच्या इस्राइल दौऱ्यावरून बरेच तर्क वितर्क चालू आहेत. हि भेट इतकी महत्वाची असताना भारतातील काही लोक उगीच त्याला वेगळाच रंग देण्याचा जाणून बुजून प्रयत्न करत आहेत. इस्राइल ला जाऊन किती मोठी चूक केली हे सांगण्यासाठी काहीनाही तर आता एखाद्या धर्माविषयी चुकीचा मेसेज जाईल ह्या भीतीने त्यांची बोलती सुरु झाली आहे. हे सांगण्याआधी ज्या प्यालेसस्टाइन देशाविषयी बोलत आहेत त्याचे प्रमुख मे महिन्यातच भारतात येऊन गेले आहेत. ह्याची त्यांना एकतर कल्पना नाही किंवा जाणूनबुजून ती बातमी सांगायची नाही.
भारताची आंतराष्ट्रीय भूमिका हि बदलेली आहे. इस्राइल शी जवळीक वाढवून आपण अरब किंवा मुस्लीम राष्ट्रांना चुकीचा मेसेज जाणार नाही ह्याची काळजी भारताने घेतली आहे. काही गोष्टींचा आपण क्रम थोडा विचारात घेऊ. प्रजसत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून भारताने आमंत्रित केल यु.ए.ई चे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद अल निहान. त्यानंतर पंतप्रधान नी भेट दिली इराण ला. या मे महिन्यात प्यालेसस्टाइन चे प्रेसिडेंट मोहम्मद अब्बास ह्यांनी भारतात भेट दिली. त्यावेळी भारताने प्यालेसटाइन ला पूर्ण पाठींबा दिला. त्यावेळेस मात्र कोणत्याही सहिष्णू व्यक्तीला त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही. इस्राइल ची भेट ऐतिहासिक असणार आहे व त्यातुन काही वेगळा संदेश स्पेशली अरब आणि मुस्लीम राष्ट्रांना जाऊ नये म्हणून आधीच ह्याची तयारी केली गेली होती.
व्यवहार हा व्यवहार आहे. भारत इस्राइल कडे व्यापारी दृष्टीकोनातून बघतो आणि तेच लक्ष्य ठेवून तो इस्राइल शी संबंध वाढवणार. आत्ता सांगितलेल्या वचननाम्यात सुद्धा कुठेहि संरक्षण क्षेत्राचा सामावेश जाणून बाजून केला गेला नाही. झालेल्या ७ करारात ३ अवकाश क्षेत्रातील तर बाकीचे पाणी, शेती क्षेत्रातील आहेत. म्हणजेच इस्राइल शी संबंध हे फक्त भारत आणि इस्राइल च्या हितसंबंधाना धरून असतील न कि कोणत्या राष्ट्रावर हुकुमत गाजवायला. हा संदेश जगात देण्यात भारत यशस्वी झाला. भारत इस्राइल च्या जवळ गेला ह्याचा अर्थ त्याने अरब राष्ट्रांच्या विरोधात पाउल उचलल असा अर्थ होत नाही. त्याचवेळी फक्त इस्राइल ला भेट देऊन इस्राइल ला हि भारताने खुश ठेवल आहे. एका दगडात दोन पक्षी ह्या भेटीने भारताने मारले आहेत.
इस्राइल ला काल झालेलं स्वागत, आपले सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून भारताच्या पंतप्रधानान साठी दिलेला इस्राइल च्या पंतप्रधानानी वेळ, त्याच वेळेस त्याला दिलेला पर्सनल टच हे सगळ स्पेशल आहे. एक भारतीय म्हणून ह्याचा आपल्याला आदर हवाच. काल भारतातील अनेक नेते हि ट्रीप कशी चुकीची आहे ह्याच्या मुलाखती देण्यात व्यस्त होते. कारण उथळ पाण्याला खळखळाट खूप असतो. त्यामुळेच काहीच हाताशी न लागल्यामुळे शेवटी धर्माच कारण पुढे. भारतातील किती नेत्यांकडे असा करिष्मा आहे. उद्या जर विरोधी पक्षातील सगळे नेते उभे करून पाठवले तर ह्या भेटीला जो पर्सनल टच आहे तो मिळण अशक्य आहे. अर्थात हे उघडपणे स्वीकारण सुद्धा भक्त बनल्याच सर्तीफिकेट आजकाल होते. पण जे सत्य आहे ते स्वीकारायला हवच.
आपण जसा विचार करतो तसा तिकडे बसलेल्या यु.पी.एस.सी. सारखी कठीण परीक्षा पास केलेल्या लोकांनी केला नसेल का? आपल्या पेक्षा जास्ती प्रत्येक गोष्टीच्या परिणामांची जबाबदारी अगदी त्यांनी काटेकोरपणे तपासून मग हि पावल टाकली असतील. असो पण काय आहे मागे लिहण्याच मोकळ मैदान मिळाल कि आपण काही लिहित असतो. जे काय चालू आहे त्याने भारताच नाव मोठ होते आहे. पण आपल दुकान बंद होत जाते आहे त्याची काळजी अनेक लोकांना आहे. दुकान चालू ठेवायचे असेल तर नको त्या गोष्टी पसरवण हे प्रकार सुरु होतात. इस्राइल भेटीने उलट भारताने प्यालेस्टाईन आणि अरब राष्ट्रांना एक क्लियर संदेश दिला आहे. इस्राइल भेट हि एक बिझनेस ट्रीप आहे. आणि आम्ही आमची मत आणि बिझनेस दोघांची भेळ नाही करत. त्याहून मोठ म्हणजे भारत कोणाच्या दबावाखाली कुठे जायचं आणि कुठे नाही हे ठरवत नाही. त्याला जे योग्य वाटते ते तो करतो. त्यामुळे नाचता येत नाही म्हणून अंगण वाकड म्हणत जे फिरत आहेत. त्यांना फिरू दे. तूर्तास एका नवीन पर्वा साठी आपण एक राष्ट्र म्हणून सज्ज होऊयात.

No comments:

Post a Comment