क्रायोजेनिक इंजिनाच्या यशानंतर भारतीय सेलिब्रेट करत असले तरी इस्रो ने पुढील पाऊलावर काम करण्यास आधीच सुरवात केली आहे. जास्तीत जास्त बल कमीत कमी इंधनात निर्माण करण्यासाठी क्रायोजेनिक इंजिन वापरले जाते. ह्यात द्रवरूप ऑक्सिजन आणि द्रवरूप हायड्रोजन ह्याचं मिश्रण इंधन म्हणून वापरल जाते. ह्या सगळ्यात कठीण भाग म्हणजे हि दोन्ही इंधन द्रवरूप ठेवण. म्हणून क्रायोजेनिक तंत्रज्ञान मोजक्याच देशांकडे आहे. त्यात भारत हा एक आहे.
इस्रो ने हे इंजिन बनवल्यावर पुढल्या टप्प्याकडे आगेकूच केली आहे. समजा ह्यातील एखादी क्रायोजेनिक स्टेज संपवता आली किंवा अस दुसर इंधन जे हायड्रोजन ला रिप्लेस करू शकेल. ह्यावर काम करताना रॉकेल हायड्रोजन ला रिप्लेस करू शकेल अस प्रयोगाअंती सिद्ध झाल आहे. रॉकेल वापरण्याचे अनेक फायदे इस्रो ला होणार आहेत. एकतर रॉकेल हे वजनाने अतिशय हलक आहे. त्यामुळे तितक्याच इंधनाच वजन कमी होणार. कमी झालेल्या वजनामुळे अजून जास्ती पे लोड हे रॉकेट घेऊन जाऊ शकणार आहे. सध्या मार्क ३ ची क्षमता ४ टन भूस्थिर उपग्रहासाठी आहे ती वाढून त्यावर ६ टन वजनाचा उपग्रह प्रक्षेपित करता येणार आहे.
रॉकेल अजून एका कारणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. रॉकेल ला क्रायोजेनिक करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे अनेक तांत्रिक अडचणी पासून इंजिन मुक्त होणार आहे. रॉकेल ऑक्सिडायजर रिच स्टेज कम्बशन ह्या तत्वावर जळते. ह्यात दोन कम्बशन सायकल असून त्याला क्रायोजेनिक असण्याची गरज नसणार आहे. तसेच रॉकेल च ज्वलन हे लिक्विड हायड्रोजन ज्वलनापेक्षा कमी हानी करत असल्याने निसर्गात कमी प्रदूषण होणार आहे. इकडे एक लक्षात घेतल पाहिजे कि लिक्विड हायड्रोजन ला जरी आपण पर्याय शोधला तरी ऑक्सिजन हा लिक्विड स्टेज मध्ये राहणार आहे. म्हणून ह्या इंजिनाला सेमी क्रायोजेनिक अस म्हंटल जाणार आहे.
२००८ मध्ये ह्या इंजिनावर काम करायला सुरवात झाली. जवळपास १७९८ कोटी रुपये ह्या प्रोजेक्ट साठी मान्य करण्यात आले होते. आता क्रायोजेनिक च्या यशानंतर इस्रो ने हे प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यास्तही कंबर कसली आहे. २०२१ पर्यंत हे इंजिन बनवून त्याच्या मदतीने ६ टन वजनी उपग्रहांच प्रक्षेपण करण्याचा इस्रो चा मानस आहे. इस्रो च हे इंजिन जी.एस.एल.व्ही. मार्क ३ च्या विकास इंजिनांना रिप्लेस करेल. म्हणजे ह्या पुढे ह्या रॉकेट मध्ये तीन स्टेज असतील त्या अश्या १) एस २०० सॉलिड बुस्टर स्टेज २) सेमी क्रायोजेनिक एस.सी.ई २०० सेमी क्रायोजेनिक इंजिन ३) सी ई २० क्रायोजेनिक इंजिन. ह्या बदलामुळे ह्या रॉकेट ची उपग्रह वाहन क्षमता ६ टन इतकी होणार आहे.
२०१४ मध्ये अपेक्षित असलेल हे तंत्रज्ञान क्रायोजेनिक च्या अपयशामुळे पुढे ढकलल गेल. पण मार्क ३ च्या यशाने पुन्हा एकदा संशोधकांना नवीन हुरूप दिला आहे. अमेरिका, चीन, रशिया, युरोपियन देशांकडे हे तंत्रज्ञान आधीच आहे. व भारत हळू का होईना त्या दिशेने वेगाने पाउले टाकतो आहे. ह्या इंजिनाच्या यशस्वीतेसाठी इस्रो ला खूप शुभेछ्या. क्रायोजेनिक प्रमाणेच हे इंजिन हि इस्रोच्या वाटचालीत एक मैलाचा दगड ठरेल ह्यात शंका नाही
No comments:
Post a Comment