Thursday 24 August 2017

प्रेमाच शेअरिंग... विनीत वर्तक

प्रेमाच आणि शेअरिंग वाचल्यावर अनेक प्रश्न उभे रहातात. प्रेम हे प्रेम असते. तुमच आमच सेम असते ह्या पाडगावकरांच्या ओळी गुणगुणत मोठे झालेले आपण प्रत्यक्षात मात्र ते सेम असते असच मानत आलो. प्रेम सेम असल तरी ते व्यक्त करण्याची पद्धत, त्याची ओढ, त्यातल्या भावना, त्यातली खोली आणि किंबहुना सगळच हे प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत वेगळ असते. एखादी व्यक्ती जर दुसऱ्या व्यक्ती सारखी असू शकत नाही किंवा त्याची, तिची जागा घेऊ शकत नाही तर प्रेम कशी ती जागा घेईल. मग प्रेमाच शेअरिंग कस होऊ शकेल?
कोणत्याही नात्यात विशेषतः नवरा- बायको किंवा प्रेयसी- प्रियकर ह्यात शेअरिंग झालेलं अनेकांना मुळीच खपत नाही. बरेचदा ते रास्त हि असेल. कारण शारीरिक भावनांचा रस्ता ह्याच रस्त्यावरून पुढे चालू होतो. आपल्याला आवडणार कोणीतरी आपल्यापासून दूर नेते आहे हे तस खपवून घेण अवघड आहेच. पण हीच शेअरिंग डिव्हाईन लेवल वर असेल तर खरच आपण अस कोणापासून ओरबाडून घेतो का? ह्याचा विचार व्हायला हवा. लग्नानंतर विशेषतः अनेक संसारात खरे तर गाडी ओढण्याची काम चालू असतात. जुळवलेली नाती कधी जुळलेली नसतात. किंवा जुळवून पण काळाच्या ओघात अनेक फाटे त्याला फुटलेले असतात. तेव्हा कोणासाठी कोणीतरी हा राडा हाकायच काम करत असतात. मग ते मुल असो, आई- वडील असो, किंवा समाज असो.
हे सगळ करत असताना कदाचित कधी तरी अशी झुळूक येते कि जिकडे आपण वेगळ्याच अनुभूती वर दुसऱ्याशी जुळतो. जिकडे भावना ह्या शारीरिक गोष्टी पलीकडे असतात. जिकडे असण हे शब्दातून पण खूप काही असत. जिकडे मागण हेच कि काहीच मागण नसते. जिकडे फक्त एक एहसास असतो. कोणीतरी आहे जे मनाला उभारी देते. समजून घेते. त्याचा आश्वासक स्पर्श कदाचित एका संबंधा पलीकडचा असतो. पण हे सगळ आपल्याला मान्य होते अस नाहीच. कुठेतरी प्रेमाच शेअरिंग होत असल्याची भावना पण आत असतेच. मग ते समोरच्या कडून असो वा स्वतःकडून.
जर दोन व्यक्ती भिन्न आणि एकमेव असतात. तर मग त्यांच्या बद्दल वाटणाऱ्या भावनांचं शेअरिंग कस होऊ शकेल? एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारी ओढ, त्याची खोली, त्याची ताकद, त्यातली अनुभूती हि कधीच सारखी असू शकत नाही. तर मग ते प्रेम सेम कस असू शकेल. जर प्रेम सेम नाही तर मग शेअरिंग कस होऊ शकेल. हे सगळ मनात ह्याचसाठी कि आपण अनेकदा नात्यांच्या बाबतीत खूप पझेसिव होतो. माझ आणि माझ्यासाठी राखीव असताना दुसर कोणाशी कस काय होऊ शकते? ह्या विचारांनी अनेकदा आपण जवळ असलेल पण गमावून बसतो.
खूप धूसर रेषा आहे ह्यात कारण प्रेमाला अनेक कांगोरे असतात. मुळातच एखाद्या विषयी हि भावना येताना त्यातला हेतू खूप महत्वाचा आहे. म्हणजे ते शारीरिक आकर्षण म्हणून आहे कि वेळ घालवायचा म्हणून आहे कि स्वतःचा इगो मोठा करण्यासाठी आहे कि खरच ते डिव्हाईन आणि प्युअर आहे. डिव्हाईन सोडून बाकी सगळ्या बाबतीत कदाचित प्रेमाच शेअरिंग झालेलं आपल्याला आवडणार नाही. कारण तिकडे काहीतरी हव असते. पण डिव्हाईन नात्यात जस आहे तस ठेवून काही नको असताना पण त्या भावना तितक्याच खोलीच्या असतात. त्यात शेअरिंग असेलल उलट जास्ती आवडते कारण ती व्यक्ती डिव्हाईन लेवल ला जोडलेली असून सुद्धा त्याच वेळी आपल्या सर्व पातळ्यांवर अनेक गोष्टी तितक्याच सहजतेने करू शकते हा विश्वास त्यात असतो.
आपल सगळ सांभाळून म्हणजे संसार, मुल, नोकरी-धंदा आणि समाज ह्या सगळ्या वेगवेगळ्या पातळ्यांवर सोबत राहून सुद्धा आपल्या डिग्निटी किंवा समोरच्या व्यक्तीच्या डिग्निटी ला कुठेही धक्का न लावता आयुष्यभर हे प्रेमाच शेअरिंग नक्कीच शक्य आहे. पण त्यातली सहजता आणि प्युअरीटी जपण हे त्या दोन व्यक्तींना हि जमायला हव. अनेकदा ह्या सगळ्या मनाच्या स्थितांतारातून जाताना अनेकदा आपण विचार करतो. प्रेम म्हणजे खरच प्रेम असते का? आणि तुमच आमच सेम असते का? प्रेमाच शेअरिंग खरच आपल्याला जमते का? तर उत्तर होय आणि नाही अस दोन्ही आहे. प्रेमातली भावना, खोली आणि त्यातली ओढ जर योग्य तर्हेने समजली तर प्रेमाच शेअरिंग आवडते ते आपल असण्यापेक्षा.

No comments:

Post a Comment