Thursday, 24 August 2017

धुमकेतू ची दिवाळी - ययाती उल्कावर्षाव... विनीत वर्तक

आज सकाळ पासून धुमकेतू च्या खगोलीय दिवाळीची सुरवात झाली. ययाती तारकासमुहात ईशान्य आकाशात अंदाजे एकावेळी ५०-१०० च्या आसपास उल्का पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून नष्ट होतील. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या मध्यंतराला होणारी हि दिवाळी म्हणजे स्विफ्ट टटल धुमकेतू ने मागे ठेवलेल्या धुळीचा भाग होय. धुमकेतू नेहमीच माणसाला आकर्षित करत आलेले आहेत. अगदी काही शेकडो वर्षांपासून धुमकेतू बघितल्याच्या नोंदी अनेक संस्कृतीत मिळतात. कुठून येतात हे धुमकेतू? त्यांची कक्षा तसेच त्यांचा पृथ्वीला काय धोका हे जाणून घेण खूपच सुंदर आहे.
धुमकेतू म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचं झाल तर सुटलेले खडक. हे धुमकेतू क्यूपर बेल्ट आणि ओर्ट क्लावूड मध्ये तयार होऊन आपल्या अथांग पसरलेल्या विश्वाच्या पसाऱ्यात हे अगदी एकला चलो रे करत विहार करत असतात. सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत येताच त्याच्याकडे आकर्षित होतात. सूर्याच्या उष्णतेमुळे गरम होऊन आपल्या पाठीमागे अनेक वायू सोडतात. ह्या वायूंमुळे जो दिसणारा भाग तयार होतो तो म्हणजे कोमा. म्हाताऱ्या स्त्रीने मोकळ्या सोडलेल्या पांढऱ्या केसांप्रमाणे वाटणारा हा कोमा पृथ्वीच्या परीघापेक्षा १५ पट लांब पसरलेला असू शकतो. खरा धुमकेतू काही मीटर ते किलोमीटर चा असला तरीपण ह्या कोमामुळे तो आकाशात चटकन उघड्या डोळ्यांनी दिसून येतो. सोलार रेडियेशन आणि सोलर विंड ह्यामुळे कोमा तयार होतो. त्याची शेपटी म्हणजेच कोमा नेहमी सूर्याच्या विरुद्ध दिशेने असते. ह्यात मूलतः पाणी आणि धूळ असते. सूर्याच्या जवळ येताना ह्या कोमा चा आकार प्रचंड वाढतो. परावर्तीत होणारा प्रकाश आणि आयोनायझेशन मुळे धुमकेतू ला त्याचा प्रकाश प्राप्त होतो.
धुमकेतू हे लंब गोलाकार कक्षेत फिरतात. ह्यांची कक्षा काही वर्षांपासून कित्येक मिलियन वर्षांपर्यंत असू शकते. उदाहरण द्यायचं झालच तर ह्याले धुमकेतू चा कालावधी ७६ वर्षांचा आहे. तर ह्याकुटेक ह्या धुमकेतू चा कालावधी ७०,००० वर्षांचा आहे. ह्याचा अर्थ इतके वर्षानंतर हे धुमकेतू विश्वाची सफर करून पुन्हा सूर्यमालेच्या कक्षेत प्रवेश करतील. आता इकडे मुख्य प्रश्न येतो तो म्हणजे ह्या सगळ्याचा पृथ्वी शी काय संबंध? सौरमालेतून जाताना समजा ह्या अश्या धूमकेतूंचा रस्ता आणि पृथ्वीचा रस्ता एकत्र झाला तर? ह्या जर तर ची उत्तरे आपण प्रत्येक सेकंदाला आजही शोधत आहोत. मानवाची विज्ञानातील प्रगती गेल्या ३००-४०० वर्षातील आहे. तर धुमकेतू ७०,००० वर्षाच्या कक्षेतून येत आहेत. त्यामुळे कोण कधी भेट देईल ह्याबद्दल आपण शाश्वत अस काहीच सांगू शकत नाही. तसेच ह्या कक्षा अवलंबून असतात त्या गुरुत्वीय आकर्षणावर. त्यामुळे त्यांच्या काक्षांबद्दल अगदी अचूक गणित मांडणे सोप्पे नसते.
एखादा ग्रह, तारा मध्ये आला तर धुमकेतूच्या ह्या कक्षा बदलू शकतात म्हणूनच आपली पृथ्वी जिवंत आहे. गुरु सारखा ग्रह आपल्या प्रचंड ताकदीच्या गुरुत्वाकर्षण बळावर असे छोटे,मोठे धुमकेतू स्वतः गिळंकृत करत आलेला आहे. एका अभ्यासाप्रमाणे जर गुरु ग्रहावर आदळणाऱ्या धुमकेतू, अशनी ह्याचं प्रमाण ८००० पट पृथ्वीपेक्षा जास्त आहे. ह्यावरून गुरु ग्रहाने अवकाशात व्ह्याक्युम क्लीनर चा भाग निभावल्याने पृथ्वीवर आपण शांत झोपू शकतो. १६-२२ जुलै १९९४ रोजी गुरु ने असाच एक शूमेकर लेव्ही-९ नावाचा धुमकेतू गिळंकृत केला होता. जर असा अपघात झाला नाही तर धुमकेतू गेल्यानंतर त्या रस्त्यात पाठीमागे राहिलेले असंख्य छोटे छोटे तुकडे, धूळ हि अवकाशात तशीच रहाते. जरी पृथ्वी त्या भागात त्याच वेळी नसली तरी तिच्या कक्षेच्या आसपास धुमकेतू चा मार्ग गेला असेल तर? किंवा पृथ्वी नंतर त्या भागात आली तर? त्या तर च उत्तर म्हणजे खगोलीय दिवाळी.
स्विफ्ट टटल हा असाच एक धुमकेतू पृथ्वीच्या कक्षेच्या जवळून सौरमालेला दर १३३ वर्षांनी भेट देतो. गेल्यावेळी १९९२ साली तो आपल्या सौरमालेतून गेला. २६ किमी च डोक असलेला हा धुमकेतू ५८ किमी/ सेकंद वेगाने विश्वात फिरत असून २१२६ साली हा धुमकेतू पृथ्वीला टक्कर मारेल असा एक शोध समोर आला होता. समजा हि टक्कर झालीच तर डायनासोर ला नष्ट करणाऱ्या अशनी च्या टक्करी पेक्षा ३०० पट अतिसंहारक असेल अस शास्त्रज्ञांना वाटते. पण अजून काही शोधानंतर अशी शक्यता नसल्याच नासा ने जाहीर केल आहे. तर ह्या स्विफ्ट टटल ने मागच्या वेळी जाताना आपल्या मागे सोडलेल्या कचऱ्याचा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश म्हणजेच ययाती उल्कावर्षाव. दरवर्षी पृथ्वी जेव्हा ह्या भागात येते त्यावेळी मागे राहिलेल्या कचऱ्यातील काही भाग पृथ्वीच्या गुरुत्वाकार्षाणामुळे पृथ्वीच्या कक्षेत ओढला जातो. वातावरणाशी होणाऱ्या घर्षणामुळे रात्रीच्या अंधारात ह्या उल्का अगदी शेकडोच्या संखेने पृथ्वीकडे झेपावतात. मग जमिनीवरून दिसते ती खगोलीय दिवाळी. दरवर्षी होणाऱ्या ह्या दिवाळीसाठी शहराबाहेर जाऊन आनंद लुटण्याची तयारी किती जण करतात हा संशोधनाचा विषय आहे. कारण आपली दिवाळी फक्त प्रदूषणापुरती आणि आवजापुरती मर्यादित असल्याने निसर्गाची दिवाळी आम्हाला लक्षात हि नसते हीच आमच्या पिढीची शोकांतिका आहे.

विकृतीला लाजवणारी लिंगाची खाज... विनीत वर्तक

दोन- तीन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेने खूप अस्वस्थ आहे. पुरुष असल्याची लाज तर सोडाच पण मला एकूणच पुरुषत्वाची चीड यायला लागली आहे. मुंबईतल्या एका प्रतिथयश शाळेत एका ४ वर्षाच्या निरागस मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने प्रश्नाचं मोठ कोडच समोर उभ केल आहे. ४ वर्ष?? ज्या वयात आपण कोण? आपण कुठे आहोत? आपल अस्तित्व ह्या सगळ्यानपलीकडे ज्याचं सुंदर विश्व असते त्या निरागस कळीला कुस्करल जाते का तर लिंगाची खाज भागवण्यासाठी???
हि कसली खाज? म्हणजे लैंगिक भावना समजू शकतो. त्यांच्यावर कंट्रोल नसण पण एकवेळ समजून घ्यायचा प्रयत्न होऊ शकतो. पण विकृती ला हि लाज वाटेल अशी हि कोणती लिंगाची खाज? म्हणजे सेक्स एकतर लिंगाच्या योनी प्रवेशापर्यंत मर्यादित ठेवणारा पुरुष आता कोणत्याही वयाच्या योनिकडे त्याच नजरेने बघू लागला आहे. हे सर्व विचार करण्यापलीकडे आहे. त्या ४ वर्षाच्या कोवळ्या फुलावर काय बेतल असेल ह्याचा विचार पण मी करू शकत नाही? तिच्या पालकांच्या भावना आणि स्थिती ह्याचा नुसता विचार केला तरी डोळ्यातून पाणी आणि अंगावर काटा येतो. एक क्षण जरी स्वतःला तिकडे ठेवल तर पूर्ण आयुष्य कोलमडल्या सारख झाल.
त्या मुलीवर आज काय अवस्था आली ह्याचा विचार मनाला शिवला तरी एका मुलीचा बाप म्हणून माझ्या पायाखालची जमीन सरकते. निष्पाप जीवांना आपल शिकार करून कोणत्या भुकेला आपण शमवतो आहोत ह्याचा विचार पण त्या नराधमांच्या मनाला स्पर्श करत नसेल का? आपण इतक मेलो आहोत का? ज्या भारतीय संस्कृतीच्या प्रगतीचे हजारो वर्षाचे दाखले देतो. ज्या स्त्रीच्या पोटातून जन्म घेतो त्या स्त्री ला अस चुरगळून टाकताना काहीच कस होत नाही. सेक्स इतका मोठा कधीपासून झाला? तो हि फक्त लिंगाच्या योनी प्रवेशापर्यंत. ह्या सगळ्यातून त्या निष्पाप जीवाला किती शारीरिक यातना तर आयुष्यभर मानसिक यातनांना सामोरे जावे लागेल ह्याचा अंदाज पण लावू शकत नाही. ज्याच्यामुळे हे आल तो मात्र दोन वेळच जेवण व्यवस्थितपणे कारागृहात गिळणार. हीच का शिक्षा? हाच का आपला कायदा? खरच आपला कायदा असा असेल तर न्यायदेवतेला डोळ्यावरची पट्टी काढायची खूप गरज आहे.
आमचा सेक्स अजूनही बालपणात अडकून पडला आहे. त्याला भरीस भर म्हणून इंटरनेट, टीव्ही हि माध्यम आहेतच. आपल्या समाजात पिढ्यान पिढ्या स्त्री ला मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवण्यात आल. लिंगाचा माज त्या काळी हि होता आणि आता हि आहेच. फक्त माध्यम आणि समाजाच्या मोकळ्या धोरणांमुळे तो आता वेगळ्या स्वरूपात बाहेर येतो आहे. ते स्वरूप खूप गंभीर आहे. ते म्हणजे स्त्री ला भोगी आणि लिंगाला देणगी समजून त्याची लालसा कोणत्याही क्षणी समोरच्याचा विचार न करता भागवण्याची वृत्ती. वय, विचार, भावना सगळ बाजूला टाकत फक्त आणि फक्त दोन पायांच्या मधला भाग जेव्हा हवाहवासा वाटतो तेव्हा त्या लिंगाच्या खाजेपुढे विकृती पण लाजते.
अश्या किती कळ्या आजही सगळीकडे कुस्करल्या जात आहेत. काही अगदी आपल्या आजूबाजूला. प्रत्येक वेळी आपण काही करू शकत नसलो तरी ह्या विकृती ची सुरवात छोट्या छोट्या गोष्टीतून होते. आधी नजर मग स्पर्श ते शेवटी बलात्कार अश्या पायऱ्या चढल्या जातात. जेव्हा ह्या घटना आपल्या आजूबाजूला घडतात तेव्हा आपण डोळेझाक न करता त्या तिकडेच ठेचायला हव्यात. कारण ह्या विकृती जर इकडेच थांबल्या नाहीत तर येणाऱ्या काळात अनेक कळ्यांना असच कुस्करत रहाणार. कायदा आपल काम करेलच पण एक सुजाण नागरिक म्हणून आपण हि अश्या घटनांचा नुसता निषेध न करता त्या घटनांचा मूक साक्षीदार न बनता अश्या लोकांना त्यांची जागा दाखवायला हवीच.
तसेच अगदी लहान पणापासून प्रलोभन, नजर, स्पर्शाची भाषा आपल्या मुलांना शिकवायला हवी. आपण पालक म्हणून प्रत्येक वेळी मुलांसोबत असू अस नाही. प्रत्येकवेळी कोणी बघेलच अस नाही. कोणत्याही क्षणी आपल्या मुलीला किंवा मुलाला ह्यातला फरक ओळखता यायला हवा. अगदी लहान का असेना कारण विकृती ने वयाची मर्यादा केव्हाच मागे सोडली आहे. विकृत लोक आता बाहेर नाही तर आपल्या आजूबाजूला आणि घरात येऊन पोहचले आहेत. ती वृत्ती सगळीकडे फोफावत आहे. वृत्ती उनमळून टाकायला त्याची सुरवात आपल्यापासून होते. म्हणूनच समाज सुधरायचा तेव्हा सुधारेल पण आपल्या मुलांना तरी आपण ह्या विकृतीला लाजवणाऱ्या लिंगाच्या खाजेपासून वाचवण खूप महत्वाच झाल आहे.

वेध भविष्याचा... विनीत वर्तक

१५ फेब्रुवारी २०१७ पूर्ण जगाच लक्ष भारताकडे लागल होत. अवघ्या ३० मिनिटात १०४ न्यानो उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात भारताने यश मिळवलं. १९६९ ते २०१७ ह्या काळातला इस्रो चा प्रवास थक्क करणारा आहे. स्पेशली गेल्या ५-१० वर्षात ज्या तऱ्हेने मोहिमा यशस्वी केल्या आहेत. त्यामुळे भविष्यातील एक समर्थ स्पेस एजन्सी म्हणून इस्रो कडे बघितल जात आहे. १०४ उपग्रहांपलीकडे मंगळ मोहीम व चंद्र मोहिमेमुळे इस्रो च जगातील स्थान पक्क होण्यास मदत झाली आहे.
उपग्रहाच निर्माण, रॉकेट निर्माण, त्यातली अभियांत्रिकी प्रणाली, तसेच त्याच प्रक्षेपण आणि त्या नंतर त्याचा संवाद आणि त्यातून मिळणारा फायदा इतपर्यंत सगळ्या पातळीवर इस्रो ने काम केलेलं आहे. उपग्रह निर्माण करणारे देश खूप आहेत. रॉकेट बनवणारे थोडेच. त्यातही ७३ मिलियन डॉलर मध्ये कल्पनेपासून प्रत्यक्ष उपग्रह मंगळाच्या कक्षेत स्थापन करण्याचा कालावधी ३ वर्षापेक्षा कमी आणि इतक्या कमी पैश्यात पहिल्याच प्रयत्नात पाठवणारा जगातील पहिला देश आणि अशी हनुमान उडी घेणारी इस्रो जगातील एकमेव स्पेस एजन्सी आहे. मंगळयान लक म्हणून यशस्वी झालेली मोहीम नव्हती हे दाखवण्यात पाठोपाठ केलेल्या १०४ उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे इस्रो च्या तंत्रज्ञांनावर आता जगातील बरेच देश भरोसा ठेवू लागले आहेत.
इस्रो वर असलेला भरोसा आता पैश्याच्या रुपात दिसायला सुरवात झाली आहे. कमर्शियल उपग्रह प्रक्षेपणातून इस्रो ने २०१५-२०१६ मध्ये ४० मिलियन अमेरिकन डॉलर ची कमाई केली आहे. हि रक्कम खूप मोठी वाटत असली तरी जगातील उपग्रह च्या बाजारातील हा फक्त ०.६% इतकाच हिस्सा आहे. ३०० बिलियन अमेरिकन डॉलर इतकी किंमत असलेल्या बाजारात इस्रो ला प्रचंड पल्ला गाठता येऊ शकतो. किंबहुना आज पर्यंत इस्रो ने आपल्या लौकिकास साजेसा बाजारातील हिस्सा कमावलेला नाही आहे हे वास्तव आहे. हे लक्षात घेऊनच इस्रो ने आपल्या मार्यांदांवर काम करायला सुरवात केली आहे. इकडे दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. एकतर इस्रो च पाहिलं ध्येय हे देशाच्या गरजा भागवण आहे. त्यात इस्रो कडे दोन गोष्टी कमी होत्या ते म्हणजे प्रक्षेपण स्थळ आणि असेम्ब्ली बिल्डींग. एकच प्रक्षेपण स्थळ असल्यामुळे एका वेळी एकाच रॉकेट वर इस्रो काम करू शकत होती. पण आता दुसर प्रक्षेपण स्थळ कार्यान्वित झाल आहे. ह्यामुळेच एका महिन्यात इस्रो दोन रॉकेट च उड्डाण काही महिन्यांपूर्वी करू शकली होती. दुसरी असेम्बली बिल्डींग च काम सुरु असून ती येत्या वर्षाखेर कार्यान्वित होण अपेक्षित आहे.
दोन असेम्बली बिल्डींग आणि दोन प्रक्षेपण स्थळ ह्यामुळे इस्रो ला एकाच वेळी वेगवेगळ्या रॉकेट वर आणि वेगवेगळ्या स्टेजेस वर काम करता येणार आहे. २०२० पर्यंत ३०० बिलियन अमेरिकन डॉलर च्या बाजारातील हिस्सा काबीज करण्यासाठी वर्षाला २० रॉकेट उड्डाण करण्याच इस्रो च लक्ष आहे. ह्यातील ५०% जरी कमर्शियल उड्डाण पकडली तरी इस्रो च्या नफ्यात कित्येक मिलियन डॉलर ची वाढ अपेक्षित आहे. मेड इन इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्ट अप इंडिया ह्या सगळ्या योजनांमध्ये आकाशातील हिस्सा ह्यापुढे खूप मोठा असणार आहे. टीम इंडस, अर्थ टू ओर्बिट, एस्त्रोम टेक्नोलॉजी, बेलाट्रीक्स एरोस्पेस, स्याटशुअर सारख्या स्टार्ट अप कंपनी ह्या मध्ये महत्वाच योगदान देत आहेत. ह्या सगळ्या कंपन्यान मध्ये तरुण रक्ताचा सहभाग प्रचंड आहे.
भविष्याचा वेध घेताना २ चंद्र मोहिमा, शुक्र मोहीम, सूर्या वरची आदित्य मोहीम, निसार मोहीम, मंगळ मिशन २, ह्या शिवाय भारताच्या गरजा भागवायला लागणारे लष्करी तसेच दूरसंचार उपग्रह व त्या सोबत कमर्शियल रॉकेट लोन्चेस ह्या सगळ्या मोहिमांनी इस्रो ची पुढील काही वर्षाची दिनदर्शिका भरलेली आहे. ह्या सगळ्यामुळे ह्या क्षेत्रात कमालीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी पलीकडे दुसर कोणत क्षेत्र भारतात क्रांती घडवणार असेल तर ते अवकाश क्षेत्र असणार आहे. येणाऱ्या काळात दूरसंचार, दळवळण त्या पलीकडे आपल्या सारख दुसर कोणी तरी विश्वाच्या ह्या पसाऱ्यात आहे का? ह्याचा शोध घ्यायला नवीन नवीन देश सुसज्ज होणार आहेत. त्या सर्व गरजा कमी पैश्यात पूर्ण करणारा देश म्हणून भारत अग्रेसर असणार ह्यात शंका नाही.

अडकलेला पतंग... विनीत वर्तक

चंद्रशेखर गोखल्यांची एक चारोळी मला खूप आवडते ती म्हणजे “अडकलेला पतंग आधी काढायला बघतात, नाही निघत म्हंटल्यावर फाडायला निघतात” ह्या चारोळीत इतका खोल अर्थ आहे कि माणसाच्या स्वभावाची एक काळी बाजू पटकन समोर येते. माझ नाही झाल ते मी दुसऱ्या कोणाच होऊ देणार नाही. हा आपला स्वभाव अडकलेल्या पतंगात दिसतो तर नात्यांमध्ये तर तो अजून प्रकर्षाने समोर यायला हवा. तसच होताना आपण सगळीकडे बघतो.
आजच्या जमान्यात तर भिंतीपलीकडली नाती खूप तयार होतात. तयार होतात तशी तुटत पण जातात. काळाच्या कसोटीवर तोलून रहाणारी काहीच असतात. पण ह्या तुटलेल्या नात्याचं त्या अडकलेल्या पतंगासारखी अवस्था असते. एकीकडे हवेतून उडण्याचे ते क्षण ताजे असताना आपण आपल काहीतरी गमावल्याच शल्य. मग जेव्हा कोणातरी दुसऱ्याची नजर तिकडे जाते तेव्हा मग दुसर कोणी त्यावर स्वामित्व सांगू नये म्हणून त्याची चिरफाड करण्याची चढाओढ दोन्ही कडून सुरु होते. अगदी विश्वासाने सांगितलेल्या गोष्टी लोकांपुढे मांडून त्यावर होणाऱ्या चिखलफेकीचा असुरी आनंद घेतला जातो.
कधी कधी मग दोन्ही बाजूने युद्ध सुरु होते. एकमेकांवर विश्वासाने शेअर केलेल्या, अनुभवलेल्या गोष्टी समाजात मांडण्याची स्पर्धा. ह्यात मधल्या लोकांना आनंद मिळत असतो. म्हणजे उघडपणे दुसऱ्याची बाजू घेणारे आपल्याला समोरचा किती चुकीचा हे सांगून तू केलस ते बर केलस असा सल्ला देण्यास हि कचरत नाहीत. पुढे अजून असच चालू राहुंदे ह्यासाठी पाठींबा हि. शब्दांनी केलेले वार हे तलवारीपेक्षा हि घातक असतात हे समजून सुद्धा आपण त्या शर्यतीत भाग घेतो. अडकलेला पतंग माझा नाही तर कोणाचा नाही हि भावना इतकी प्रबळ असते कि ह्यात आपण आपल किती नुकसान करत आहोत ह्याचा अंदाज हि आपल्याला येत नाही. जेव्हा तो फाटतो तेव्हा आपण वागलेल्या चुकीच्या वागण्याच एक खोट समाधान नक्की मिळते. पण ह्या सगळ्यात आपण स्वतःला किती खोल गर्तेत बुडवून टाकल ह्याचा अंदाज यायला वेळ लागतो.
अडकलेला पतंग तिकडेच रहातो. त्याची लक्तरे तिकडे लटकवयाची कि त्या पतंगाच्या सोनेरी आठवणी तश्याच जपून ठेवायच्या हे आपल्या हातात आहे. नात्याचं पण तसच असते. आपण घालवलेले क्षण जपायचे कि एकमेकांवर उलटून त्याचा सूड घ्यायचा हे आपण ठरवायला हव. एकांतात किंवा एकमेकांसोबत शेअर केलेल्या गोष्टी, अनुभवलेले क्षण जर सगळ्यांसमोर आणून आपण दबावतंत्र किंवा समोरच्याचा राग मनातून काढत असू तर आपल्या प्रवृत्तीचा आपणच विचार करायला हवा. कदाचित आज तुम्ही ड्रायव्हर सिट वर असाल पण उद्या रीसिविंग टोकाला असू तेव्हा निर्माण होणाऱ्या मानसिक आंदोलन, त्रास त्यातून निर्माण होणारे प्रश्न ह्या सगळ्याला आपण कसे तोंड देणार आहोत ह्याचा विचार झाला पाहिजे. 

सॉरी बोलून झालेला त्रास किंवा मला अस होईल अस वाटल नव्हत सांगून गोष्टी बदलत नसतात. अडकेला पतंग फाडता येतो पण चिकटवता येत नाही. तेव्हा फाडण्याआधी विचार करायला हवा. दोन व्यक्ती कोणत्याही लेवल वर जोडलेल्या असताना गोष्टी आपल्या मनाप्रमाणे किंवा अपेक्षेप्रमाणे नाही झाल्या तर शांतपणे वेगळ होण उत्तम. त्याचा बाजार केलात तर आपल्याही अंगावर शिंतोडे उडणार अगदी तुम्ही कितीही काळजी घेतली तरीच. चोरी करताना पण त्याचे अलिखित नियम असतात मग इकडे तर दोन जीवांचा प्रश्न असतो. काही नियम अलिखित आपण पाळायला हवेच.
समोरची व्यक्ती जर ह्या तत्वात बसणारी नसेल तर अश्या व्यक्तीपासून चार हात लांब राहिलेले बरे. व्यक्ती कर्तुत्वाने किती का मोठी असेना पण जर कॉमन सेन्स नसेल तर तेवढ्यास तेवढ राहिलेलं निदान आपला कॉमन सेन्स सांगत. आमचे एक सर नेहमी सांगायचे युज युर कॉमन सेन्स व्हीच इज नॉट सो कॉमन. तस करायला आपण शिकायला हव. कोणाच वाईट बघून आपल चांगल होत नसते न त्याच्या कर्माच फळ आपल्याला मिळणार असते. त्यामुळे कोण चूक आणि कोण बरोबर असा वाद घालताना आपल्या नात्याच्या मर्यादा प्रत्येकाने जपायला हव्याच. फेसबुक किंवा व्हात्स अप सारख्या सोशल प्लाटफोर्म वर आपल्या त्या नात्याचे वाभाडे काढून आपण खूप मोठ काहीतरी केल. ह्या आवेशात अनेक व्यक्ती वावरत असतात. पर्सनल च्याट , पर्सनल मेसेजेस, पर्सनल फोटो ते पर्सनल गोष्टी एकमेकात शेअर केलेल्या गोष्टींच्या पोस्ट करून आपण किती माती खातो ह्याचा अंदाज हि काही व्यक्तींना नसतो.
अगदी साध्या गोष्टीत पण काही नियम, एथिक्स असतात. जर ते नियम आणि एथिक्स आपल्याला पाळता येत नसतील किंवा समोरचा पाळत नसेल तर अश्या व्यक्ती सतत मानसिक त्रासातून जात असतात. कारण दुसऱ्याला त्रासात बघून होणारा कुत्सित आनंद आपल्या स्व ला सुखावत असेल पण मनातून आपण पूर्ण तुटतो. काही व्यक्तींना ह्याच काही पडलेलं नसते. ते दर काही दिवसांनी असे पर्सनल मेसेज उगाच शेअर करून आपण किती मोठे ह्यासाठी शाबाशकी हुजऱ्या लोकांकडून मिळवत असतात. म्हणून अडकलेला पतंग काढायचा कि फाडायचा हे आपण ठरवायचं. निघत नसेल तर त्याला तिकडे ठेवून शांतपणे पुढे जायचं कि दगड मारत त्याची लक्तरे वेशीवर लटकवण्यापेक्षा तो अडकलेला पतंग तिथेच छान दिसतो नाही का?

पाणी कप...विनीत वर्तक

ऑलम्पिक, क्रिकेट वर्ल्ड कप, विम्बल्डन ते फिफा विश्वकप असे अनेक कप आपण दरवर्षी बघत असतो. किंबहुना ते जेव्हा खेळले जातात त्याच्या आधीपासून अनेक अंदाज बांधले जातात. ह्या वर्षी हे कप कोणता देश जिंकणार किंवा कोणता संघ जिंकणार. काही दरवर्षी तर काही ४ वर्षाच्या नंतर आपल्या भेटीला येत असतात. पण ह्याच्या मधल्या काळात हे कप जिंकण्यासाठी प्रचंड मोर्चेबांधणी होत असते. स्पर्धा कुठे भरवायच्या इथपासून सुरु झालेला प्रवास तो जिंकेपर्यंत चालूच असतो. ते पदक आपल्या गळ्यात याव अशी अपेक्षा प्रत्येक भाग घेणाऱ्या खेळाडूची असते. असाच एक कप महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून आयोजित केला जातो. तो म्हणजे पाणी कप.
दरवर्षी कमी पावसामुळे महारष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्म्हत्येच प्रमाण वाढत होत. पाण्याच दुर्भिक्ष दरवर्षी च रडगाण होत. पाउस वाढवता येत नसताना किंवा त्याच्या लहरीपणाचा अंदाज नसताना पाण्याची साठवणूक आणि त्याच नियोजन हाच पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्याचा प्रभावी उपाय आहे हे समोर आल. राळेगणसिद्धी, हिवरे बाजार सारख्या गावांनी पाण्याची साठवणूक कशी गावाचा कायापालट करून देऊ शकते हे दाखवून दिलच होत. नाना पाटेकर ह्यांची नाम आणि अक्षय कुमार सारख्या सिनेतारकांनी केलेल्या कार्य हे जखमांवर तात्पुरता उपाय असताना कुठेतरी पावसाच्या पाण्याच योग्य नियोजन आणि साठवणूक हेच लांबच्या प्रवासात शेतकरी तसेच गावांना पाण्याच्या संकटापासून मुक्त करण्याचा योग्य मार्ग आहे हे दिसून येत होत.
पाण्याच नियोजन आणि साठवणूक कशी वाढवता येईल त्यात सामान्य गावकऱ्यांना समाविष्ट करून एकूणच जमिनीतील पाण्याचा साठा कसा वाढवता येईल ह्या साठी पाणी फौंडेशन ने आमीर खान च्या सत्यमेव जयते सोबत पुढाकार घेत गेल्या वर्षी पाणी कपाची सुरवात केली. पहिल्या वर्षी पायलट स्वरूपावर महाराष्ट्रातील ११६ गावांमध्ये हि स्पर्धा घेतली गेली. एकीच बळ काय असते ह्याचा अंदाज पहिल्याच वर्षी महाराष्ट्रात बघयला मिळाला. सर्वसामान्य माणूस जेव्हा एका विधायक कार्यासाठी एकत्र येतो तेव्हा त्याने तडीस नेलेल्या कामाची मोजदाद करायला अंक कमी पडतात. २०१६ मध्ये एकट्या आंबेजोगाई तालुक्यात ४२०३ गावकरी मिळून जवळपास १ कोटी पेक्षा जास्ती खर्चाच काम अवघ्या ४५ दिवसात संपूर्ण केल. त्यांच्या ह्या कार्याला लोकांनी आपल्या परीने मदत करून एकट्या ह्या तालुक्यात तब्बल १३ कोटीची काम पूर्ण केली गेली. ह्याचा परिणाम कि एका तालुक्याने कित्येक कोटी लिटर पाण्याच संवर्धन करणारी रचना निर्माण केली. तीन तालुक्यात घेतलेल्या ह्या स्पर्धेमुळे ह्या तीन तालुक्यात तब्बल १३६८ कोटी लिटर पाण्याचा साठा निर्माण झाला. जे पाणी आजपर्यंत वाहून जात होत. ते अडवून जमिनीचा पोत तर वाढलाच पण पाण्याच्या दुर्भिक्षा पासून ह्या तालुक्यांची सुटका होण्यासाठी वाटचाल सुरु झाली.
२०१६ च्या स्पर्धेच्या यशाने ह्या वर्षी स्पर्धेची व्याप्ती वाढवण्यात आली. ह्या वर्षी ३० तालुक्यामधील १३०० गावांनी भाग घेतला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग बघताच शासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी स्वतः अश्या स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिल. आपल्या हेलिकॉप्टर अपघातानंतर हि फक्त पाणी फौन्डेशन च्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री काही वेळात पोहचले होते ह्यावरूनच शासकीय लेवल वर ह्या स्पर्धेचा प्रभाव आपल्याला दिसून येईल. कारण ह्या स्पर्धेने सामान्य लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला. बुंद बुंद से सागर बनता हे कुठेतरी सामान्य माणसापासून ते शासकीय यंत्रणापर्यंत जाणवलं गेल. ह्या स्पर्धेने शहरातील तरुण पिढीला पुन्हा गावाकडे नेल. श्रमदाना सारख्या कार्यक्रमातून अनेक तरुण, तरुणींनी मग ते शहरातले असो वा गावातले आपल्या परीने मदत केली, लोकांनी भांडण, द्द्वेश बाजूला ठेवून एकमेकांसोबत बंधुभावाने काम केल. ज्या बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्ती आत्महत्या शेतकऱ्यांच्या झाल्या त्या जिल्ह्यात ह्या वर्षी ह्या स्पर्धेमुळे एकही आत्महत्येची घटना नोंदवण्यात आलेली नाही. शासकीय यंत्रणा अगदी मुख्यमंत्र्यान पासून ते सामान्य कर्मचाऱ्या पर्यंत जिकडे काम केल गेल तिकडे अवतरल्या. ह्यामुळे गाव आणि शासकीय यंत्रणा ह्यांच्यातील समन्वय साधला गेला.
ह्या स्पर्धेत केलेल्या कामामुळे किती पाणी नियोजन झाल आणि साठवणूक झाली ह्याचे आकडे काही महिन्यात येतीलच पण ३ तालुक्यात आपण जर १३०० कोटी लिटर पेक्षा जास्त पाण्याच संवर्धन करू शकतो. तर त्याच्या दहापट म्हणजेच ३० तालुक्यात पाणी स्पर्धेच काम झाल्यावर येणारे आकडे किती मोठे असतील ह्याचा अंदाज शेबंड मुल पण लावू शकेल. ह्या वर्षीच्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ काल पुण्यात साजरा झाला. जिंकलेल्या गावांना तब्बल ५० लाख, ३० लाख, २० लाख रुपयांची घसघशीत बक्षीस देण्यात आली. तसेच तालुका पातळीवर सर्वश्रेष्ठ ठरलेल्या गावांना १० लाखाच बक्षीस देण्यात आल. ह्यात अनेक सामाजिक संस्था, देणगीदार ह्यांनी सढळ हस्ते मदत केली. तसेच शासकीय यंत्रणेने गरजेचा असलेला सपोर्ट ह्या स्पर्धेच्या मागे लावून धरला ह्यासाठी मुख्यमंत्री तसेच शासकीय अधिकारी कौतुकास पात्र आहेत.
मला सांगायला खूप आनंद होतो कि विवेकानंद सेवा मंडळ ह्या माझ्या अश्याच एका सेवाभावी संस्थेतील सहकारी अमित दातार, अनिकेत प्रभुदेसाई, नरेंद्र गोडसे व ह्यांच्या टीम ने काम केलेल्या जयभयवाडी ह्या गावाला महाराष्ट्रातील १३३० गावांमधून १५ लाखांचा दुसरा पुरस्कार तर वाठवाडा (ता. कळंब जिल्हा:- उस्मानाबाद ) ह्या गावाला तालुका पातळीवर पहिल्या क्रमांकाच बक्षीस मिळाल आहे. अमित, अनिकेत, नरेंद्र तुमच्या आमच्या सारखेच काम करून आपली पोटाची खळगी भरणारे आहेत. पण ज्या समाजातून आपण आलो जे ज्ञान शिकलो त्या ज्ञानाचा उपयोग समाजाला कश्या रीतीने होईल असा विचार करत पाणी कपाच्या ह्या कामाला त्यांच्या टीम ने वाहून घेतल. बक्षीस आणि पैसे ह्याची अपेक्षा न करता त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती त्यांना काल मिळालीच पण त्याही पलीकडे ह्या गावातल पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दिलेलं योगदान शब्दांपलीकडे आहे. तुम्हा सर्वाना व तुमच्या टीम ला माझा सलाम. पुढल्या वर्षी हि स्पर्धा १०० तालुक्यात घेतली जाणार आहे. आपण पण ह्याचा भाग होऊ शकतो. चला तर मग भाग होऊया एका मोहिमेचा ज्यात तुमच, आमच ह्या राज्याच, ह्या देशाच हित आहे. पुढल्या वर्षी आपण पण पाणी कपाचा भाग होऊया.

लुक अप... विनीत वर्तक

मैत्री मग ती कोणाशी का असेना आपल्या सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य अंग आहे. असा एकही व्यक्ती शोधून मिळणार नाही कि ज्याने कधी मैत्री केलीच नाही. त्यामुळे पाण्यासारखी नितळ आणि गरजेची असलेली मैत्री आपल्या आयुष्याचा भाग हवीच. पण नुसती ती केली म्हणजे सर्व काही झाल का? मैत्री सुद्धा एक नात आहे आणि ते निभावाव लागते. त्याची बांधणी करावी लागते. ते जपाव लागते. सगळ्यात महत्वाच ते जगाव लागते.
व्होडाफोन चा एक सुंदर व्हिडीओ सध्या फिरतो आहे. त्याच टायटल आहे लुक अप. आभासी जगात आपल्या मैत्रीला विसरून गेलेल्यानो लुक अप. नुसत स्मायली आणि HBD अक्षरांनी शुभेछ्या देणाऱ्यानो लुक अप. क्षण न उपभोगता त्याला क्यामेरात आणि सेल्फी मध्ये बंद करणाऱ्या सर्वानीच लुक अप. लुक अप कुठे आणि कोणाला तर आपल्या मैत्रीत. कारण तुमची मैत्री पण तुमच्या प्रमाणे आभासी होत जाते आहे. अजून वेळ नाही गेलेली. लुक अप.
आभासी जगात राहून आपण पण आभासी होत आहोत. एकमेकांना मित्र म्हणवणारे खरेच आभासी झालो आहोत. आपल्या मित्र मैत्रिणीनां आणि त्यांच्या मैत्रीला पण. आज मैत्र दिवस. अनेक शुभेच्छाचे मेसेज फेसबुक आणि व्हास्त अप नुसते आदळत आहेत. मी स्वतःला एक प्रश्न विचारला कि ह्यातला मी एकतरी लिहिला आहे का? माझ्या मित्रासाठी / मैत्रिणीसाठी. तिच्या / त्याच्या विषयी मला काय वाटते? मला त्या मैत्रीतून काय मिळाल? माझ्यासाठी त्या मैत्रीच महत्व काय? मी पण घाण्याला जोडलेल्या बैलाप्रमाणे फक्त ओढायच म्हणजेच आलेल कॉपी पेस्ट करून पुढे पाठवायच का? असे अनेक प्रश्न आज डोक्यात आहेत.
आज इतके मेसेज आलेत पण एकपण पत्र नाही आल. एका मित्राने एका मित्राला किंवा मैत्रिणीला लिहलेल. मैत्रदिनाच्या शुभेछ्या काय फक्त फोरवर्ड करून देता येतात का? का नाही कोणाला अस वाटल कि आज मी सांगाव आज तुझी मैत्री माझ्यासाठी काय आहे? त्यातून मला काय मिळाल आणि तुला काय दिल. खरे तर मैत्रीत हिशोब मांडू नये मुळीच पण आपल्याला आतून वाटणाऱ्या भावनांना मांडायला कसला आला आहे हिशोब. म्हणजे एखाद्याने आपल्या कठीण क्षणात वेळ दिला असेल. पैसे, ओळख, आणि इतर कोणत्याही पद्धतीची मदत केली असेल. अगदी मदत केली नसेल तरी त्याच किंवा तीच असण हा तुमचा आधार असेल तर ते तुम्ही कधी सांगितल आहे का?
मित्र आणि मैत्रीण म्हणजे काय फक्त खांदा द्यायला असतात का? गरज लागली कि असतात का? उत्तर नाही असेल तर मग ह्या शिवाय आपल्याला त्यांची आठवण कधी येते? आलीच तर ती आल्यावर एक फोन, एक भेट, एक कॉफी, एक जेवण, एक सहल ते एक पिकनिक अस किती वेळा करतो. किंवा अस काही न करता पण नुसतच बोलण्याची तल्लफ आली हे किती वेळा सांगतो. आपण कोणत्याही टोकावर असो. समोरून आलेलं असा कोणताही क्षण आपल्याला शब्दांपलीकडे अत्युच्य समाधान देतो. बघा कधी प्रयत्न करून. मित्राला आणि मैत्रिणीला तुम्ही दिलेलं गिफ्ट लक्षात रहाणार नाही किंवा तुम्ही मैत्रदिनी कोणता मेसेज फोरवर्ड केला ते लक्षात रहाणार नाही. लक्षात राहील ते तुम्ही दिलेले क्षण. मग ते कसेही असो. तो एक फोन, ते पत्र, ती एक कॉफी, ती भेट, तीच ती पिकनिक किंवा तोच तो क्षण जो तुम्ही दोघे एकत्र अनुभवलेला असेल.
अजून वेळ गेलेली नाही. मैत्र दिवस संपला म्हणून तुमची मैत्री नाही. मोबाईल च्या स्क्रीन मध्ये डूबण्यापेक्षा त्याच मोबाईल वरून केलेला एक फोन कॉल कि मला तुझी आठवण येते किंवा आपली मैत्री माझ्या आयुष्याचा एक घटक आहे. हे एक वाक्य त्या शब्दांन पलीकडे अत्युच्य समाधान देईल. जेव्हा तुम्हाला कोण अस समोरून कॉल करेल किंवा भेटेल किंवा विचारेल तेव्हा होणारा आनंद परमोच्च असेल ह्यात शंका नाही. आज मैत्र दिनाच्या दिवशी मी तरी लुक अप करतो आहे. प्रत्येकाने ठरवायचं क्षण पकडायचे कि अनुभवायचे? आजपर्यंत क्षण पकडत आलोत एकदा अनुभवून बघा त्यासाठी जास्ती काही करायची गरज नाही जस्ट लुक अप.

नऊ यार्डाची म्यारेथॉन... विनीत वर्तक

आत्महत्येच्या घटना ऐकून आणि अनेकांनी त्यावर लिहिलेलं बघून आयुष्य इतक कठीण असत का मला वाटायला लागल होत? इतके कठीण प्रश्न असतात कि जीवन संपवण हा उपाय शिल्लक असतो फक्त समोर. यशाची धुंदी आणि स्वतःला सिद्ध करण्यात आलेल अपयश परीक्षेतल्या मार्कांवर आणि नोकरीत मिळालेल्या पगारावर अवलंबून असते का? गोठलेल्या भावना आणि हरवत चाललेली माणुसकी ह्या सर्वात आपण खरी प्रगती केली का? असाच विचार मनात घोळत होता. त्या वेळेस एका जुन्या गोष्टीने लक्ष वेधल ते म्हणजे नऊ यार्डाची म्यारेथॉन.
म्यारेथॉन ती हि नऊ यार्डाची? तर हि गोष्ट आहे आयुष्य जगायला शिकवणाऱ्या एका गरीब स्त्रीची. उच्च विद्याविभूषित म्हणून जो काही माज, सन्मान आपण बाळगतो न त्या शिक्षणाने न शिकवलेला एक धडा ह्या मातेने आपल्या सर्वांसमोर ठेवला आहे. काही लोकांनी त्यांच्या बद्दल वाचल असेल हि. पण त्यांच्या कडून शिकण्यासारख खूप काही आहे. त्या आहेत लता भगवान करे. गरीब शेतकरी असलेल्या ह्या मातेने आपल्या नऊ यार्डाच्या नउ वारी साडीत, अनवाणी म्यारेथॉन जिंकण्याचा वयाच्या ६१ वर्षी भिम पराक्रम केला आहे. ह्याच्या अर्ध्या वयात सुटलेले पोट, वाढलेले वजन, थोड चालून वय झाल म्हणणाऱ्या सो कॉल्ड आधुनिक स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या विचारसरणीला सणसणून थोबाडीत मारली आहे.
आपल्या नवऱ्याच्या आजारासाठी पैसे हवेत म्हणून जीवाच्या आकांताने धावणाऱ्या माउलीने स्पोर्ट्स शूज, ट्रयाक प्यांट घालून धावणाऱ्या अनेकांना लाजवेल ह्या चपळाईने म्यारेथॉन जिंकली आहे. एकदा नाही तर तब्बल तीन वेळा प्रौढ वयाच्या गटात धावताना वयाच्या ६७ वर्षी सुद्धा नऊ यार्डाची म्यारेथॉन जिंकली आहे. रुपये ५००० च बक्षीस ज्याने आपल्या नवऱ्याच्या औषधांचा खर्च निदान थोडा का होईना भागेल ह्या आशेने धावणाऱ्या ह्या माउली पुढे मी तरी नतमस्तक आहे.
आयुष्य म्हणजे काय तर हेच मी सांगेन. संपवण हा उपाय नाही तर जे आहे त्याला सगळ्या नियमांना तोडत स्वतःला सिद्ध करण हेच तर जीवन आहे. जाताना काही घेऊन जाणार नाही पण घेऊन जाऊ त्या ह्या आयुष्याच्या आठवणी आणि ठेवून जाऊ ते पुढल्या अनेक पिढीला आपल्या जिद्दीची कहाणी. नऊ यार्डाची म्यारेथॉन महत्वाची नाही. महत्वाची आहे ती वृत्ती. अनेक संकटात सुद्धा स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची मनीषा. पडलो तरी पुन्हा उभ राहून नेटाने सामना करण्याची प्रवृत्ती. वय, आपली जात, धर्म, आपल शिक्षण, आपल स्टेटस ह्या पलीकडे आपण आपल्या स्व ला दिलेली शक्ती.
लता करे नऊ यार्डाची म्यारेथॉन धावल्या तेव्हा जिंकण्यापलीकडे पर्याय नव्हता. नवऱ्याला औषध हवी असतील तर तो कप आपल्या हातात असायला हवा. ह्या साठी समोर एकच लक्ष्य. आयुष्य त्यांना हि संपवता आल असत. आयुष्यापुढे त्या हि हतबल होत्याच कि साध एम.आर.आय. काढायला पैसे नसणाऱ्या ह्या माउलीपेक्षा तुमची आमची स्थिती आयुष्याच्या कोणत्याही क्षणी चांगलीच आहे आणि असेल. मग एक माउली वयाच्या ६१ वर्षी आयुष्यापुढे हरायचं नाकारते मग तुम्ही आम्ही तर कोसो लांब आहोत. आयुष्यात कितीही पडला तरी पुन्हा उभ रहाता येते. नक्कीच सगळ्याच लता करे नसतील. पण त्यांची वृत्ती तर आपण नक्कीच शिकू शकतो.
गेल्या महिन्यात फेसबुक वरील एकाची आत्महत्या तसेच म्हसकर कुटुंबाच्या घरातील आत्महत्या ह्यावरून पुन्हा एकदा कुठेतरी आयुष्य आता हरते कि काय असच वाटत होत. सतत त्या बातम्या वाचून मला हळहळ वाटण्यापेक्षा चीड येत होती. एका अंड्याच्या आणि स्पम च्या मिलनातून सुरु झालेला प्रवास खरच इतक्या सोप्प्या रीतीने संपवता येतो? खरच आयुष्य इतक कठीण आहे? खरच आपण हरलो का? तेव्हा लता करे माउलींची आठवण झाली. त्यांच्या ह्या जिद्दीची आणि आयुष्याला कलाटणी दिलेल्या प्रवासाची नोंद त्या काळी बी.बी.सी. ने हि घेतली होती. कारण जगाच्या कोणत्या कोपऱ्यात नऊ यार्डाची म्यारेथॉन अजून कोणीच धावत नाही. पण आपण जगभरच्या बातम्या वाचताना आपल्या घरात मात्र डोकावून बघत नाही.
नऊ यार्डाची म्यारेथॉन माझ्यासाठी तरी नेहमीच आदर्श असेल. जेव्हा जेव्हा आळस येईल, जेव्हा जेव्हा मी पडेन, जेव्हा जेव्हा मी हरेन, जेव्हा जेव्हा आयुष्य नकोस वाटेल तेव्हा तेव्हा हि नऊ यार्डाची म्यारेथॉन मला आयुष्याची म्यारेथॉन धावायला नेहमीच उद्युक्त करेल ह्यात शंका नाही. त्या माउलीस माझा साष्टांग दंडवत.

सह्याद्रीमधला झिंगाट... विनीत वर्तक

पावसाळा सुरु झाले कि वेध लागतात ते पावसाळी पिकनिक आणि तिर्थक्षेत्रानां जाऊन झिंगाट करण्याचे. महाराष्ट्रावर सह्याद्राची कृपा असल्याने असे झिंगाट पोइंट अनेक ठिकाणी हळूहळू निर्माण झाले. ह्यातल सर्वात मोठ तिर्थक्षेत्र म्हणजेच मुंबई- पुण्याच्या मध्ये असलेला भुशी डयाम. मी तिर्थक्षेत्र मुद्दामून म्हणतो आहे कारण जसे तिकडे जाऊन आपण आपल अस्तित्व विसरून त्या शक्तीशी समरूप होतो. तसेच इकडेही समरूप होण्यासाठी लोक जमतात. फरक इतकाच कि तिकडे भक्तीभाव असतो इकडे मादिराभाव असतो. पण तल्लीनता कुठेच कमी नसते.
असे अनेक पोइंट महाराष्ट्रात निर्माण झाले आहेत. दरवर्षी दारू पिऊन होऊन अपघात होण्याचे प्रकार तर असंख्य आहेतच पण त्या पलीकडे ह्यात माज आणि ग्ल्यामर येत आहे. म्हणजे तुम्ही एकतर दारू प्यायला नाहीत तर गावठी, मागासलेले किंवा निसर्गाची मज्जा अनुभवता न आलेले अरसिक प्राणी आणि आपल्यापुरते झालात तर तुमच्यात दम नाही. म्हणजे काय कि तल्लीन होईन तर भक्तीच प्रदर्शन हवेच मग ते कितीही ओंगळवाण किंवा जीवावर बेतलेल का असेना पण करायला हव. मग तुमचा भक्तीभाव निसर्गा पर्यंत पोहोचतो आणि मग तुम्हाला त्या क्षेत्री जाण्याच समाधान लाभते. ह्या सगळ्या काळात आपण जे काही करतो ते बाकीच्यांनी समजून घ्यायचं हाच तो माज.
निसर्गाच्या त्या सुंदरतेत तल्लीन होताना थोड हलक झाल तर काय बिघडल? अर्थात काहीच बिघडत नाही जोवर ते हलक होण आपल्या सीमेमध्ये असते. पण निसर्गाच्या अदाकारीत आपण सीमा केव्हाच ओलांडून टाकतो आपल्याला कळण्याच्या आधी. दारू प्यावी का नाही हा वेगळा प्रश्न कारण त्याच व्यसन आणि माज होईपर्यंत काहीच वाईट नसते हे माझ मत. भारतीय लोक विशेष करून दारू दाखवायला पितात. म्हणजे मी १ लिटर पितो कि २ लिटर ह्यावरून माझी मजल केवढी आहे. ते ठरवतो. खरे तर भारताबाहेर दारूत पाणी मिक्स करून कोणी दारू पितच नाहीत. त्यात बर्फ टाकतात कारण त्याचा ब्लेंड अनुभवणे हे कुठेतरी असते. त्यामुळे दारू कशी प्यावी इथपासून आपली सुरवात आहे. असो हा भाग विषय सोडून आहे.
निसर्गाला अनुभवयाला आणि झिंगाट करायला दारू ची गरज हवीच कशाला? जेव्हा निसर्ग तुमच्यासमोर असा ओसंडून वहात असतो तेव्हा नशेची खरच गरज आहे का? ह्याचा विचार प्रत्येकाने करावा. आपण त्या निसर्गात असताना एका वेगळ्याच धुंदीत असतो त्यात दारूची सोबत नशेवर नशा देते आणि क्षणांचा नाश करते. तिर्थक्षेत्री दारू सेवन करून माज करणाऱ्या तरुणांना आवरायला आणि त्यांची धुंदी उतरवायला पोलीस किंवा इतर दल कुठे कुठे पुरे पडणार आहेत? आपली काळजी आणि आपल्या सोबत आलेल्या लोकांची काळजी व सन्मान ठेवणे इतक साध तत्व जर आपण धुंदीत विसरून जात असू तर आपण आपल्यात डोकावण्याची गरज आहे.
सेल्फी आणि मोबाईल शुटींग करून निसर्गाला कवेत नाही पकडता येत. त्यासाठी ते क्षण मनात भरायला लागतात हे आपल्याला शाळेत शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे. सरसकट व्यवस्थेवर दोष देऊन काहीच होणार नाही. प्रोब्लेम आणि त्याच उत्तर दोन्ही आपल्या हातात आहे. निसर्गात झिंगाट नक्की व्हा. कारण आजच्या स्ट्रेस असलेल्या जीवनात ते गरजेचे आहे. पण त्यासाठी आपल्या सीमा लक्षात असू द्या. डोंगराच्या कड्यावरून उडी मारण्याची आणि हवेतून विहारण्याची इतकीच खाज असेल तर दुबई, अमेरिका इकडे जाण्याची ताकद निर्माण करा. तिकडे २०० डॉलर्स मध्ये अति उंचावरून हवेत उडण्याची झिंग अनुभवता येते. तितकी आपली कुवत नसेल तर दारू पिऊन उगाच सह्याद्री मध्ये ते साहस करण्याची हिंमत दाखवू नका.
आपल्या घरी कोणीतरी आपली वाट बघते आहे. त्याच भान आपण नेहमीच ठेवल पाहिजे. निसर्गाचा मान आणि घराच भान आपण ठेवू तेव्हा हा रांगडा सह्याद्री आपल्याला वेगळा जाणवेल. अगदी कोकणापासून ते गुजरात पर्यंत. सह्याद्री अनुभवायला ट्रेकर व्हायलाच पाहिजे अस नाही. कारण ट्रेकर हा शब्द आपण असा काही वापरतो जणू काही डोंगरात जाऊन आल्यावर आणि एखादा ट्रेक केल्यावर कोणत्याही डोंगरावर जाण्याच स्वामित्व आपल्याला मिळालेलं असते. म्हणून ट्रेकर न होता सुद्धा आपण सह्याद्री अनुभवू शकतो. त्याच प्रमाणे झिंगाट न करता सुद्धा. दोन्ही टोकावर जाण्याची घाई नको. अतिसाहस आणि अतिझिंगाट ह्या दोन्ही वेळेस “नजर हटी दुर्घटना घटी” हे सगळ्यांनी लक्षात ठेवल पाहिजे. तूर्तास ह्या रांगड्या सह्याद्री चा आनंद आपल्या सीमेत राहून घ्या हीच विनंती.

इंटरस्टेलर मिशन उद्याच स्वप्न... विनीत वर्तक

आपण ह्या विश्वात एकटेच का? हा प्रश्न मानवाला त्याच्या उत्क्रांती पासून पडला आहे. ह्या पृथ्वी शिवाय ह्या विश्वात असा कोणता दुसरा ग्रह असेल कि ज्यावर अजून कोणी असे प्राणी असतील? किंवा पृथ्वी शिवाय आपण अन्य कोणत्या ग्रहावर वस्ती करू शकू का? अश्या प्रश्नांना आता प्रगत विज्ञानामुळे मूर्त स्वरूप मिळताना दिसत आहे. विश्वाचा आवाका इतका प्रचंड आहे कि त्यातली अंतर खरे तर माणसाच्या ह्या शोधापुढची खरी अडचण आहे. इंटरस्टेलर म्हणजेच आपल्या सौरमाले प्रमाणे विश्वात अस्तित्वात असलेल्या दुसऱ्या सौरमालेमध्ये केलेला प्रवास. आपल्याला सर्वात जवळचा असणारा तारा म्हणजेच अल्फा सेंचुरी आपल्यापासून ४.३७ प्रकाशवर्ष अंतरावर आहे. ३ लाख किलोमीटर प्रती सेकंद ह्या अफाट वेगाने प्रकाश ४.३७ वर्षात जितक अंतर कापेल तितक हे प्रचंड अंतर आहे. ह्यामुळेच इंटरस्टेलर मिशन हे उद्याच स्वप्न बनून राहील आहे.
आनंदाची बातमी हि कि ह्या स्वप्नातल्या मिशन ला सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. ह्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्था किंवा इस्रो चा सहभाग लक्षणीय आहे. रशियातील बिलोनियर युरी मिलनेर हा ब्रेकथ्रू स्टारशॉट नावाचा एक रिसर्च प्रोजेक्ट फंडिंग करतो आहे. हे प्रोजेक्ट सपोर्ट केल आहे जगातील नामवंत शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग ह्यांनी. ह्या संस्थेने न्यानो उपग्रह तयार केले आहेत. ४ ग्राम वजन, ३.५ सेंटीमीटर लांब असणाऱ्या प्रोटोटाईप न्यानो उपग्रहांचा उद्देश इंटरस्टेलर प्रवासाचा आहे. ह्या प्रोटोटाईप उपग्रहांनां स्प्राईट अस म्हंटल जाते. ह्या स्प्राईट मध्ये सेन्सर, सोलार प्यानेल, रेडीओ एक्व्युपमेंट सोबत सिंगल सर्किट बोर्ड चा कॉम्प्यूटर असतो. ह्यातल्या पहिल्या प्रोटोटाईप स्प्राईट उपग्रहांच्या सिरीज ला भारताच्या इस्रो ने आपल्या पी.एस.एल.व्ही.- सी ३८ रॉकेट मधून गेल्या २३ जून २०१७ ला अवकाशात प्रक्षेपित केल आहे.
२३ जून २०१७ च्या प्रक्षेपणात इस्रो ने २९ न्यानो उपग्रह १४ देशांसाठी प्रक्षेपित केले आहेत. त्यात दोन न्यानो उपग्रह वेंटा- १ आणि म्याक्स वालीर ह्या दोन अभ्यास उपग्रहांचा समावेश आहे. ह्या दोन उपग्रहांच्या पाठीवर हे प्रोटोटाईप स्प्राईट प्रक्षेपित केले गेले. ह्यातील ६ पेकी एका स्प्राईट उपग्रहाशी संपर्क करण्यात ग्राउंड स्टेशन ना यश आल आहे. हा जगातील सर्वात छोटा उपग्रह ठरला आहे. आपण विचार करू शकत नाही पण अवकाश तंत्रज्ञानाच्या दृष्ट्रीने हि खूप मोठी उडी आहे. ३.५ सेंटीमीटर इतका इवलासा उपग्रह निर्माण करून जमिनीवरून त्याच्याशी संपर्क साधून त्याच स्थान, इतर माहिती ह्याच दळणवळण हि इंटरस्टेलर मिशन साठी खूप मोठी झेप आहे. इस्रो च्या उड्डाणाने इंटरस्टेलर मिशन आता स्वप्न न रहाता सत्यात उतरणाच्या दृष्ट्रीने एक पाउल पुढे टाकल आहे.
पुढल्या काळात असेच अनेक स्प्राईट अवकाशात सोडून त्याला अवकाशात लेझर द्वारे वेग देण्यात येणार आहे. त्यांच्या कमी वजनामुळे लेझर च्या हाय इंटेनसिटी मुळे प्रकाशाच्या वेगाच्या १५% ते २०% वेग ह्या स्प्राईट उपग्रहांना आपण देऊ शकणार आहोत. ह्यामुळे ह्या प्रचंड वेगाने इंटरस्टेलर प्रवास सत्यात उतरणार आहे. ब्रेकथ्रू स्टारशॉट च पाहिलं टार्गेट अल्फा सेंचुरी असणार आहे. प्रकाशाच्या वेगाच्या १५% ते २०% वेगाने जाऊन सुद्धा अश्या स्प्राईट उपग्रहांना तिकडे पोचण्यास जवळपास २० वर्षाचा कालावधी लागणार आहे. तिकडे पोहचून हे न्यानो उपग्रह तिथले फोटो काढून ते पुन्हा पृथ्वीवर प्रक्षेपित करतील. प्रोक्सिमा बी ह्या ग्रहाचे फोटो तिथलं वातावरण ह्याचा अभ्यास आपल्याला त्यामुळे करता येणार आहे. तसेच असे हजारो स्प्राईट पृथ्वी च्या भोवती प्रक्षेपित करून पृथ्वी च्या चुंबकीय क्षेत्राचा तसेच वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे. येत्या दशकात हे स्वप्न सत्यात उतरेल अशी आशा आहे.
मानवाच्या पूर्ण इतिहासात आजवर फक्त नासाचे ५ उपग्रह आपल्या ग्रह्मालेच्या बाहेर प्रवास करू शकलेले आहेत. अवकाशातील अंतर हि नेहमीच संशोधक आणि अभियंते ह्यांच्यासाठी एक मोठा अडथळा राहिली आहेत. पण स्प्राईट च्या यशाने एक नवीन रस्ता आपल्याला उघडला गेला आहे. छोट वजन, त्याचा आकार, तसेच निर्मिती खर्च कमी असून त्याला लेझर मुळे प्रकाशाच्या २०% वेगात प्रवास घडवणे शक्य असल्याने इंटरस्टेलर मिशन उद्याच स्वप्न न रहाता उद्या सत्यात उतरणार आहे. ह्या सगळ्या प्रवासात भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो चा सहभाग हि भारतीयांच्या दृष्ट्रीने एक अभिमानाची गोष्ट आहे. पुढचा काळ न्यानो उपग्रहांचा आहे. इस्रो च्या पी.एस.एल.व्ही रॉकेट ला जगात न्यानो उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी पर्याय सध्यातरी नाही आहे. उद्या जर आपण हा प्रवास केला तर त्याची बीज हि इस्रो ने अवकाशात प्रक्षेपित केलेल्या प्रोटोटाईप स्प्राईट मध्ये दडलेली असणार आहेत. म्हणूनच हि घटना सर्वच भारतीयांसाठी अभिमानाची तर इस्रो च्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवणारी आहे ह्यात शंका नाही.

चंद्रावर एक से भले दो... विनीत वर्तक

ऐन तारुण्यात प्रेमाचे धुमारे फुटले कि चंद्र नेहमीच साक्षिला असतो. आपल्या पांढऱ्या शीतल प्रकाशामुळे अंधारात पण प्रकाश देणारा हा पृथ्वीचा उपग्रह अनादी काळापासून मानवाच आकर्षण राहिला आहे. चंद्रावर माणसाने पहिली स्वारी करून आता दशके उलटली असली तरी चंद्राबद्दल असलेली आस्था आजही कायम आहे. भारतीयांच्या मनात तर त्याच्याविषयी जास्तीच आस्था आहे. २००८ मध्ये भारतीय तिरंगा चंद्रावर फडकला. भारतीय चंद्रयान १ मिशन सोबत गेलेल्या नासा च्या उपकरणाने चंद्रावर पहिल्यांदा पाण्याच अस्तित्व शोधलं. ह्या घटनेला दशक उलटत असताना पुन्हा एकदा भारतीय तयार आहेत ते चंद्राच्या स्वारीसाठी, ह्या वेळेस चंद्रावर स्वारी करण्यासाठी एक से भले दो अस म्हणत भारतीयांनी कंबर कसली आहे.
हे वर्ष सरता सरता किंवा नवीन वर्षाच्या सुरवातील भारतातून दोन चंद्र मोहिमा एकाचवेळेस अवकाशात झेपावत आहेत. एक आहे ती इस्रो ची चंद्रयान-२ मोहीम. चंद्राच्या पृष्ठभागावर रोवर उतरवून त्याच्या भू भागाचा अभ्यास केला जाणार आहे. मिन्रोलोजिकल आणि एलिमेंटल अभ्यास ह्या रोवर द्वारा केला जाणार आहे. ३२५० किलोग्राम उड्डाण वजन असणाऱ्या रोवर ला घेऊन जी.एस.एल.व्ही २ आकाशात उड्डाण भरेल तेव्हा भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती आणि मिसाईल म्यान डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांच्या स्वप्नांना एक मूर्त स्वरूप आपण दिलेलं असेल. २००८ साली सुद्धा चंद्राच्या पृष्ठभागावर तिरंगा सोडण्याची योजना सुद्धा कलाम सरांची होती. आज १० वर्षांनी पुन्हा एकदा भारत त्यांच्या अग्निपंखांवर स्वार होऊन चंद्राच्या दिशेने उड्डाण भरत आहे.
दुसरीकडे भारतात पहिल्यांदा देशातील तरुण विद्यार्थी आणि प्रायवेट प्लेयर एकत्र येऊन ३० मिलियन डॉलर बक्षीस असलेल्या गुगल लुनार स्पर्धेत भाग घेत आहेत. दिल्ली आय.आय.टी. मधून पास झालेल्या राहुल नारायण ह्याच्या देखरेखेखाली टीम इंडस हि एक स्टार्ट अप कंपनी चंद्रावर रोवर पाठवत आहे. गुगल च्या ह्या स्पर्धेत टीम इंडस सह अमेरिकेची मून एक्स्प्रेस, इस्राइल ची स्पा सेल आणि एक इंटरनेशनल टीम सिनर्जी मून ने भाग घेतला आहे. गुगल च्या ह्या स्पर्धेतील नियमाप्रमाणे एक रोवर चंद्रावर पाठवून त्याने ५०० मीटर अंतर चंद्राच्या पृष्ठभागावर कापायला हव. तसेच चंद्राचे हाय डेफिनेशन फोटो पृथ्वीवर पुन्हा पाठवणे आवश्यक आहे. जगातील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत एका भारतीय टीमने अंतिम चार जणात स्थान मिळवले आहे. त्यांची हि धमक लक्षात ठेवून इन्फोसिस फाउंडर नंदन निलकेणी ह्यांनी ह्या मोहिमेसाठी पैसे गुंतवले आहेत. तसेच इस्रो चे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन तसेच इतर माननीय वैज्ञानिक ह्यांनी आपल पाठबळ दिल आहे.
इस्रो ने टीम इंडस च्या प्रयत्नांना आपल्या सगळ्यात भरवश्या रॉकेट चे पंख लावून चंद्रावरच्या स्वारीच्या रथाच स्वारस्य केल आहे. इस्रो च वर्कहॉर्स आणि पाहिल्या चंद्र मोहिमेला चंद्राच्या कक्षेत घेऊन जाणार पी.एस.एल.व्ही. रॉकेट इस्रो ने टीम इंडस ला त्यांच्या मोहिमेसाठी दिल आहे. तसा करार इस्रो ची एंट्रीक्स कोर्पोरेशन आणि टीम इंडस मध्ये झाला आहे. टीम इंडस आणि इस्रो ह्या दोघांच्या मोहिमीची उद्दिष्ठ वेगळी आहेत. त्यामुळे त्यांना वाहून नेणारे प्रक्षेपक पण. टीम इंडस कडे रोवर च तंत्रज्ञान होत पण तो रोवर चंद्रावर प्रक्षेपित करण्यासाठी लागणार रॉकेट नाही. जगातून एरियन सारख्या कंपन्या कडून प्रक्षेपित करण्यासाठी लागणारा पैसा पण नव्हता अश्या वेळेस इस्रो ने कमी पैश्यात आपल सगळ्यात भरवश्याच रॉकेट देण्याच मान्य केल. इकडे एक लक्षात घेतल पाहिजे कि पी.एस.एल.व्ही. रॉकेटसाठी बाहेरील देश रांगा लावून असताना अवघ्या एका वर्षाच्या आतमध्ये इस्रो ने पैसा न बघता एक पूर्ण रॉकेट टीम इंडस ला त्यांच्या स्पर्धेसाठी दिल. जगातली कोणतीही स्पेस एजन्सी अस करण्याआधी पैशाचा आणि व्यावहारिक दृष्ट्रीकोन समोर ठेवेल पण देशहितासाठी इस्रो ने पैसा बाजूला ठेवून तरुण मुलांच्या स्वप्नांना पंख दिले आहेत.
२०१७ च्या डिसेंबर महिन्यात टीम इंडस च रॉकेट उड्डाण भरेल तर जानेवारीत इस्रो च चंद्रयान मिशन चंद्राकडे उड्डाण भरेल. चंद्राची मोहीम काय एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासारखी नाही. आपण एका वेगळ्या ग्रहावर उड्डाण भरतो आहे. त्यामुळे एकाच वेळेस दोन मोहिमा आखताना तितकेच श्रम, मेहनत, संशोधन, अभियांत्रिकी तसेच प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा कसून अभ्यास करण्याची गरज असते. एक छोटी चूक आणि आपण किती दशके पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा अस असताना ह्यात खूप मोठी रिस्क असते. त्यामुळे एकाच वेळेस दोन चंद्र मिशनवर काम करताना इस्रो आणि तिथल्या विज्ञानिकांची किती दमछाक होत असेल ह्याचा आपण विचार पण करू शकत नाही. असे मिशन हाती घेण्यासाठी तितकाच विश्वास आणि कमिटमेंट असावी लागते. येत्या काही महिन्यात हि दोन्ही मिशन चंद्राकडे रवाना होतील. चंद्रावर एक से भले दो ची हि मोर्चेबांधणी भारताच अवकाशातल नाण खणखणीत वाजवत ठेवणार आहे. ह्या मोहिमेसाठी इस्रो आणि टीम इंडस च्या सर्व अभियंते आणि शास्त्रज्ञांना खूप खूप शुभेछ्या.

आपलीच ओळख... विनीत वर्तक

अनेक देशांविषयी जाणून घेताना त्यांच्या संस्कृती, विचार, लोक किंवा एकूणच जीवनपद्धती बद्दल आपण नेहमीच खूप उत्सुक असतो. पण हे सगळ करताना आपण आपलीच ओळख कधी करून घेतो का? ज्या देशात आपण रहातो. ज्या संस्कृतीचा आपण एक भाग आहोत त्याबद्दल आपण किती जाणतो. आपल्या संस्कृतीविषयी आपण नेहमीच चुकीच बोलत किंवा ऐकत असतो. प्रथा, रूढी, पद्धती, सण सगळ्याच विषयी आपण खूप बोलतो. पण ह्याच संस्कृतीने आपल्याला ज्ञानाचा एक खजिना आपल्याला दिलेला आहे. तो शिकायचा तर सोडाच आपल्याला त्याची माहिती पण नाही. म्हणून होळीच्या ह्या दिवशी निदान आपण त्याची ओळख करून घेऊ ह्यात.
विष्णूचा वराह अवतार आपण वाचला असेल किंवा निदान ऐकून तरी माहिती असेलच. ह्या अवतारात विष्णूंनी पूर्ण पृथ्वी आपल्या तोंडावर पाण्यातून बाहेर बाहेर काढली आहे अस चित्रित केल आहे. त्या मागची कथा बाजूला ठेवली तर एक सत्य आपण विसरून जातो. ते म्हणजे त्या चित्रात पृथ्वीचा दाखवलेला आकार. त्यात पृथ्वी गोल दाखवली आहे. ह्याचा सरळ अर्थ आहे कि तब्बल १०,००० वर्षांपेक्षा आधी भारतातील लोकांना पृथ्वी गोल होती हे माहित होत. ज्या तंत्रज्ञानात प्रगतीशील असलेल्या युरोप ने अपोलो यानाने पाठवलेल्या छायाचित्र नंतर पृथ्वी गोल आहे ह्यावर विश्वास ठेवला. त्याच वेळी अशिक्षित, गरिबीत खितपत पडलेल्या भारताला आणि त्याच्या हिंदू संस्कृतीला त्याची प्रचीती १०,००० वर्षापूर्वी आली होती. म्हणूनच पृथ्वीच्या अभ्यासाला भू-गोल म्हंटल गेल. भू-त्रिकोण किंवा चौकोन नाही. आपण पृथ्वीला जगत म्हंटल. जगत चा अर्थ होतो सतत गतिमान असणारा. ह्याचा अर्थ त्या वेळी पृथ्वी गतिमान आहे हे आपल्या पूर्वजांना माहित होत.
ह्यापेक्षा अजून एक सत्य जे ऐकून तर आपण तोंडात बोटेच घालू. अंटरस नावाचा एक तारा आकाशात मंगळाच्या प्रमाणे लाल रंगात चमकतो. आकाशातील १५-१६ नंबरचा प्रखर तेजाने लुकलुकणारा तारा असून सुद्धा त्याला आपल्या पुर्वाजनांनी जेष्ठा अस नाव दिल. अनेक वर्ष ह्या ताऱ्याला अस नाव का दिल गेल ह्याबद्दल भारतीय पिढी किंवा आपली जनरेशन खूप गोंधळात होत. जेव्हा नासा नी ह्याच मूल्यमापन केल तेव्हा एक अस सिक्रेट पुढे आल कि ज्याचा आपण स्वप्नात पण विचार करू शकत नाही. जेष्ठ चा अर्थ होतो सगळ्यात मोठा, सगळ्यात जुना. मग त्यांनी १५-१६ नंबरच्या ताऱ्याला जेष्ठ नाव का दिल? तर अंटरस नावाचा हा तारा सूर्यापेक्षा तब्बल ४०,००० पट मोठा आहे. ४०,००० पट आपण विचार तरी करू शकतो का? जेष्ठा नाव म्हणूनच ह्या ताऱ्याला दिल गेल. आतापर्यंत मानवाला माहित असणाऱ्या तार्यांमध्ये जेष्ठ हा सगळ्यात मोठ्या तर्यांपेकी एक आहे वस्तुमाना प्रमाणे. हे आमच्या पूर्वजांना ५०००-१०,००० वर्षापूर्वी माहित होत. ते हि कोणत्याही टेलिस्कोप शिवाय.
उर्सा मेजर हा एक ताऱ्यांचा समूह अनेक वर्षापासून मानवाला माहित आहे. उघड्या आकाशात आपण त्याला नेकेड डोळ्यांनी बघू शकतो. उर्सा मेजर तारका समुहातील एक तारा जो हिंदू वेदिक शास्त्रात अरुंधती-वशिष्ठा ह्या नावाने ओळखला जातो. आजही दक्षिण भारतात लग्नाच्या पहिल्या रात्री नवीन लग्न झालेल्या जोडप्याने हा तारा पहिल्या रात्री बघावा असा प्रघात आहे. अनेक वर्ष अस का? ह्याच उत्तर मिळत नव्हत. आधी चालू असलेल्या चालीरीती प्रमाणे असच उत्तर येत होत. आत्ताच्या अनेक प्रगत टेलिस्कोप नी ह्याचा शोध घेतल्यानंतर समोर आलेलं सत्य विस्मयकारक असच आहे. अरुंधती-वशिष्ठा ह्या नावाने ओळखला जाणारा हा तारा एक नसून दोन तारे आहेत. म्हणून ह्याच नाव अरुंधती-वशिष्ठा अस ठेवण्यात आल. ह्याच्या पेक्षा एक पाउल पुढे म्हणजे दोन एकमेकांभोवती फिरणारे तारे नेहमीच एक ताऱ्याभोवती दुसरे असे फिरत असताना हे दोन तारे चमत्कार आहेत. तर तो कसा कि हे दोन्ही तारे एकमेकांभोवती फिरत आहेत. व लग्नाच्या पहिल्या रात्री नवीन लग्न झालेल्या जोडप्याने का बघायचे तर कोणीही मोठा नसून संसार हा त्या दोन व्यक्तीच्या एकमेकांशी गुंफलेल्या भावनेत आहे. इतक सुंदर एकरूपतेच दर्शन भारतीय संस्कृतीत अजून कुठे नसेल. कोणत्याही टेलिस्कोप शिवाय एकतर हे दोन तारे आहेत हे ओळखण तसेच ते दोघेही एकमेकांच्या भोवती समान वेगाने फिरत आहेत हे ५००० वर्षापूर्वी ओळखणे म्हणजे भारतीय संस्कृती किती परमोच्च स्थितीला होती ह्याचा अंदाज पण आपण लावू शकत नाही.
गोव्यात वास्को दि गामा ह्याने भारतात प्रवेश केल्याच्या स्मरणार्थ प्रदेश आहे. पण भारतात येण्यासाठी वास्को द गामा ला एका भारतीयाने आपल्या जहाजाने एस्कोर्ट केल होत. केप ऑफ गुड होप ह्या आफ्रिकेच्या टोकावर आल्यावर भारतात कस जाव हे त्याला माहित नव्हत. तेव्हा कान्हा नावाच्या एका गुजराती भारतीयाने वास्को द गामा ला गोव्या पर्यंत एस्कोर्ट केल. त्यावेळी त्याच्या नौका वास्को च्या नौकेपेक्षा कित्येक पट मोठ्या होत्या. वास्को जवळ असणारी नौका हि त्या काळी युरोपातील सर्वात सुसज्ज युद्धनौका होती. तर कान्हा कडे असणाऱ्या नौका ह्या व्यापारी असून त्याच्या ५-६ पट मोठ्या होत्या. वास्को ची बोट मध्ये तर त्याच्या पुढे एक तर दोन्ही बाजूला दोन अश्या तर्हेने कान्हाने वास्को ला भारताच्या म्हणजेच गोव्या च्या समुद्र किनारी सोडले. हे भारतीय पुराणात नाही तर खुद्द वास्को दि गामा ने आपल्या पर्सनल डायरीत लिहिले आहे. हि डायरी आजही लिस्बन इकडे बघण्यासाठी उपलब्ध आहे.
इतकी प्रचंड विदव्त्तेचे, संकृतीचे, विज्ञानाचे, आणि मानव संस्कृतीचे घर असणाऱ्या भारतात माझा जन्म झाला हा तुमचा, माझा आणि एकूणच आपल्या कर्तुत्वाचा बहुमान आहे. बाहेरील संस्कृतीने हुरळून जाण्यापेक्षा आपल्या संस्कृतीत दडलेल्या आपल्या मातीला ओळखण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया हाच ह्या होळीच्या निमित्ताने केलेला प्रण. रंगांच्या धुळवडीत विसरताना ह्या रंगांच्या निर्मितीत आपल्या पूर्वजांनी खूप मेहनत घेतली आहे ह्याच विस्मरण होऊ न देण हीच प्रत्येक भारतीयाची प्रतिज्ञा असली पाहिजे. चला तर मग ओळख करून घेऊया आपल्याच अस्तित्वाची.

द सेशन्स... विनीत वर्तक

सामान्य माणसांच्या गरजांबद्दल आपण नेहमीच बोलतो. त्याच्या बद्दल आपण नेहमीच जागरूक असतो. कधीतरी त्या पूर्ण नाही झाल्या तर आपण प्रचंड विचलित होतो. त्याचा कुठेतरी राग आपण कोणावर तरी काढतो. पण आपल असणंच जर दुसऱ्यांवर ओझ असेल तेव्हा? आपल्या गरजांच काय? आपल्याला वाटणाऱ्या, येणाऱ्या भावना मग त्या शारीरिक का असोनात व्यक्त करण्याची आपली शारीरिक क्षमता नसेल तर? दोन हात, दोन पाय असताना आणि एक चालत बोलत शरीर असण किती भाग्याच असू शकते ह्याचा विचार पण आपण करत नाही. सेक्स किंवा हस्तमैथुन सारखी क्रिया ज्या सहजतेने आपण करतो. त्या करताना आपण कधीच आपल्याला मिळालेल्या देवी देणगीचा विचार करत नाहीत. त्याच देणगीवर एका वेगळ्या अंगाने प्रकाश टाकणारा चित्रपट म्हणजे द सेशन्स.
पोलिओ मुळे अर्धमेल शरीर घेऊन आयर्न लंग मध्ये आयुष्य मोजणाऱ्या मार्क ओ ब्रायन ची हि कथा आहे. पोलिओ च्या आजारामुळे हाता- पायांच्या हालचालीवर नियंत्रण काय तर आपल्या श्वासावर नियंत्रण नसलेला मार्क अतिशय खडतर आयुष्य जगत असतो. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात वाटणाऱ्या भावना आणि शारीरिक उत्तेजना तो अनुभवत असतो. पण आजारामुळे त्याच्या हालचालीवर असलेल नियंत्रण त्याला ह्या सगळ्या सुखापासून वंचित ठेवते. अश्यावेळी वर्जिन म्हणजेच शारीरिक सुख न अनुभवलेला मार्क त्या सुखासाठी काय करता येईल ह्याच्या विचारात असतो. हस्तमैथुन सुद्धा न करता येणारा मार्क अंघोळ करताना होणाऱ्या स्पर्शाने उत्तेजित होऊन जेव्हा त्याच स्लखन होते. तेव्हा त्या सगळ्या प्रकाराने तो खूप खजील होतो. आपल्याला तो अनुभव हवा आहे अस तो चर्च मध्ये फादर ला सांगतो. सेक्स सेरोगसी हा प्रकार आपल्याकडे अजूनही तसा दुर्लिक्षित आणि समाजमान्य न झालेला प्रकार आहे. सेक्स सेरोगसी म्हणजे सेक्स आणि शरीरसुखाची अनुभूती देण्यासाठी काही लोक काम करतात. ह्यात शारीरिक अपंगत्वामुळे शरीर सुखापासून वंचित असलेल्या लोकांना ह्याचा आनंद देण्याचा प्रयत्न केला जातो. सेरोगसी मुल जन्माला घालण्यासारखा हा प्रकार आहे. मार्क सेक्स सेरोगासी चा आधार घेऊन त्या पूर्णत्वाच्या सिमेला जेव्हा स्पर्श करतो का? त्या नंतर काय होते? मार्क आणि शेरील मध्ये काय नात असते आणि होते? हे सगळ बघण म्हणजे द सेशन्स.
द सेशन्स ह्या चित्रपटाने अनेक आंतराष्ट्रीय पुरस्कारात नामांकन आणि पुरस्कार मिळवले तर चित्रपटात प्रमुख भूमिका असणाऱ्या हेलन हंट ला तब्बल १८ नामांकन, पुरस्कार आणि जॉन हॉकर ला १३ नामांकन आणि पुरस्कार ह्या चित्रपटासाठी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मिळाले आहेत. द सेशन्स बघितल्यावर ह्या चित्रपटाने मनात घर केल. हातापायाची हाल-चाली वर आपला कंट्रोल नसताना सेक्स सारख्या भावना अनुभवताना जस चित्रपटात दाखवल आहे त्याने मला निशब्द केल. हेलन हंट ने ह्या चित्रपटात पूर्ण न्युड सिन्स दिले आहेत. पण तिला बघताना कुठेही अश्लिलता मनाला शिवत पण नाही इतके ते सुंदर आहेत. सेक्स काय असतो ते अनुभवायचं असेल तर द सेशन्स एकदा बघयला हवाच. स्पर्श करताना पण त्याची नजाकत, त्या भावना आणि ते शारीरिक सुख ह्याचा सुंदर मिलाफ चित्रपटात झाला आहे. शारीरिक संभोगाचे जे सिन्स आहेत त्यात हेलन हंट ने कमाल केली आहे. चेहऱ्यावर एक अंश सुद्धा कृत्रिमतेचा जाणवू न देता नैसर्गिक अस वातावरण क्यामेरा समोर तो उभ करण तीच जाणो. हेलन हंट ने जेव्हा हा चित्रपट केला तेव्हा ती ४९ वर्षाची होती. तीच ते शरीर जे ह्या वयात हि तिने अगदी मेंटेन ठेवल आहे. सडपातळ बांधा एखाद्या कॉलेज सुंदरीला लाजवेल अस सुंदर शरीर दाखवताना त्यात कुठेही अश्लीलतेचा भाव न येऊ देता सेक्स सेरोगसी सारख्या सुंदर विषयावर भाष्य करणारा चित्रपट करण म्हणजे चाबूक. जॉन हॉकर चा पोलियो झालेला अभिनय हा पण बघण्यासारखा.
अपंग, प्याराप्लाजिक, पोलिओ सारख्या शरीराच्या हालचालींवर बंधन असलेल्या लोकांचे सेक्स चे प्रश्न मांडणारा हा चित्रपट आत मुरतो. हेलन हंट च एक सुंदर वाक्य त्यात आहे. ज्यात ती मार्क ला सांगते कि मी वैश्या नाही. माझ्यात आणि वैश्यामध्ये एक फरक आहे. ती गिऱ्हाईक शोधते तर मी तुम्ही अनुभवू न शकलेल्या अनुभूतीची तुम्हाला जाणीव करून देते. हे ऐकल्यावर चित्रपट प्रचंड वेगळीच उंची गाठतो. सेक्स पलीकडे चित्रपटात बघण्यासारख आणि समजून घेण्यासारखं खूप काही आहे. लिंगाच्या योनी प्रवेशाने जरी सेक्स परिपूर्ण होत असला तरी स्पर्श, भावना, त्याची जाण आणि समोरच्या विषयी वाटणारी आत्मीयता त्यात बाजार आणि अनुभती असा फरक घडवू शकतात. दोन हात, दोन पाय, चालता बोलता येणार शरीर हि देवाने दिलेली देणगी आहे. हि देणगी आपल्याला जाणवत नाही पण द सेशन्स सारखे चित्रपट आपल्याला त्याची जाणीव करून देतात. पोर्न बघून वेगवेगळी आसन करण्यापेक्षा तितकाच वेळ स्पर्श, आणि समोरच्या माणसाच्या भावना समजून घेण्यात घालवला तर शरीरसुखाची प्रत्येक अनुभूती द सेशन्स सारखी असेल.

दोन टोकांमधला सुवर्णमध्य... विनीत वर्तक

तारेवरची कसरत नेहमीच दोन टोकांच्या मध्ये असते. कारण टोकावर राहून दुसऱ्या टोका बद्दल बोलणे किंवा बघणे सोप्पे असते. पण दोन्ही टोकांना समजून घेऊन दोन्ही टोकांचा सन्मान ठेवणे खूप कमी जणांना जमते. अस म्हणतात नात जोडण आणि तोडण खूप सोप्प असते. कठीण असते ते निभावण कारण जोडण एक टोक तर तोडण दुसर टोक त्यामध्ये जी काही कसरत असते ती मात्र ते नात निभावण्यात असते.
पुरुषी असल्याचा माज किंवा फेमिनिझम साठी असलेला अहंकार हि पण दोन टोकच. अनेकवेळा माणस ह्या दोन टोकांवर विहार करतात. काही पुरुषांना आपल्या लिंगाचा खूप माज असतो. स्त्री ला दुय्यम समजण्यापासून ते तिची अहवेलना करण्यात एक प्रतिष्ठा त्यांना मिळते. तर काही स्त्री च्या हाताखाली इतके दबलेले असतात कि घरगडी होऊन सुद्धा त्याच त्यांना काहीच वावग वाटत नाही. स्त्री सुद्धा दोन टोकांवर रमते. बऱ्याचदा पुरुषाच्या वजनाखाली दबलेली असते किंवा पुरुषार्थावर सतत संशय घेणारी असते. सगळे पुरुष सारखेच म्हणत आपल्या तालावर नाचवणाऱ्या स्त्रिया काही कमी नाहीत. पण टोकावर राहून आपण दुसऱ्या टोकाचे अंदाज कसे काय बांधू शकतो? किंवा समजून घेऊ शकतो?
सेक्स हा अजून एक असाच विषय जिकडे आपण टोकावर रमतो. एकतर काहीच माहित नसणारे किंवा घाण, विकृत, सरसकट वाईट लेबल लावणारे किंवा त्या बद्दल लाज बाळगणारे अस एक टोक तर सेक्स मध्ये सतत रमून समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे भोगी प्रवृत्ती ने बघणार दुसर टोक. सतत त्याचाच विचार. कधी समोर असणार अनुभवण्याची शिक्षण नसणारे एक टोक तर जे आपल नाही ते पण ओरबाडून त्यावर पाशवी हक्क सांगणार दुसर टोक. ह्या दोन्ही टोकांवर भावनांची आंदोलन परमोच्च असतात. पण समाधान मात्र कुठेच नसते. कारण समाधान हे दोन अपूर्णांकाच्या पुर्णत्वा मध्ये असते. ते मिळवायचे असेल तर सुवर्णमध्य गाठायला हवा. नाहीतर वर्षोनवर्ष आपण एकतर पाळणे हलवतो नाहीतर बलात्काराचे, अत्याचाराचे बळी ठरतो.
आपल्या करियर, अभ्यास, घर, कुटुंब , मित्र- मैत्रिणी सरसकट हा टोकाचा नियम लागू होतो. वर दिलेले दाखले त्यातला छोटासा अंश आहेत. एखादी विचारसरणी पकडून त्याच्या मुळाशी जाऊन आपले विचार प्रगल्भ करणे नक्कीच हवे. पण आपल्या त्या विचारात सतत रमणे म्हणजे टोकावर जाणे. प्रगल्भ प्रतिभा नेहमीच दुसऱ्या बाजूचा विचार करते. विचार केला ह्याचा अर्थ ते पटले असा होत नाही तर त्यातून आपण काय शिकू शकतो हाच तो सुवर्णमध्य. राजकारणात आपल्याला एखादा पक्ष, एखादा नेता आवडला म्हणजे त्यांनी केलेलं सगळच बरोबर किंवा त्यांनी उचललेली सगळी पाउल बरोबर अस करून टोक गाठलं कि तोंडावर आपटलोच. त्याच वेळी एखाद्या पक्ष, नेता आवडून सुद्धा त्यांच्या न पटणाऱ्या गोष्टींवर केलेली टीका हा सुवर्णमध्य.
आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा अनेकवेळा जे गैरसमज होतात त्याच मुख्य कारण टोकाची भूमिका हेच असते. मला कोणीतरी समजून घ्यावं म्हणताना आपण कोणाला तरी समजून घेण्याची तयारी दाखवतो का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. टोकावर बसून दुसऱ्या टोकाचे आकलन करण्यापेक्षा थोड अंतर त्या टोकाच्या दिशेने चाललो तर परिस्थितीची कल्पना आपण विचार करतो त्यापेक्षा स्पष्ट बघण्याची दृष्टी मिळेल. प्रत्येकवेळी उत्तर मिळतील अस नाही. कदाचित आपल टोक सोडून मीच का प्रत्येकवेळी जाव हा हि प्रश्न मनात येईलच. पण अस करताना आपण काहीच गमवत नाही आहोत तर कदाचित काहीतरी नवीन कमवू हा विश्वास त्यावेळी जागृत असेल तर सुवर्णमध्य गाठायला वेळ लागणार नाही.
आपण कुठवर चालायचं मध्यापर्यंत कि दुसऱ्या टोकापर्यंत ह्याचा निर्णय ज्याचा त्याने परिस्थिती बघून घ्यायचा कारण सुवर्णमध्य नेहमीच मध्यात मिळेल अस गणित आयुष्यात लागू होत नाही. आयुष्यात लागू होते ती त्या टोकाला समजून घेण्याची मानसिकता आणि प्रगल्भता. ती आपल्यात रुजवली तर टोकांच्या गणितात अडकून पडणार नाही. मग आपली वाटचाल नेहमीच त्या दोन टोकांमध्ये असलेल्या सुवर्णमध्या कडेच होत राहील.

२६ जुलै... विनीत वर्तक

२६ जुलै ह्या दिवसाच महत्व तस वेगळच आहे. अनेक चांगल्या वाईट गोष्टींसाठी हा दिवस माझ्या आयुष्यात नोंदला आहे. २६ जुलै चा तो मुंबईत पडलेला पाउस असो वा कारगिल ला टायगर हिल, तोलोलिंग च्या शिखारांसमोर उभ राहून साजरा केलेला विजय दिवस असो. ह्या दिवसाने माझ्या आयुष्यावर वेगळीच छाप सोडली आहे.
२००५ चा २६ जुलै कसा काय विसरू शकेन? दुपारी सुरु झालेला तो असा काही कोसळत होता कि आता बस असच म्हणावस वाटत होत. काही तासात मुंबई पाण्यात पूर्ण डुबली. त्यावेळी ह्यात असणाऱ्या कोणीच असा पाउस बघितला नव्हता. त्याकाळी मी भाभा अणुसंशोधन केंद्रात कामाला होतो. दुपारी २ वाजता घरी येण्यासाठी तिकडून निघालो. पण नॉर्थ गेट ते अणुशक्ती नगर च गेट येईपर्यंत ३ तास लागले. पुढे जायचा नाद मी सोडून दिला. अणुशक्ती नगर मध्ये रात्री मित्राच्या घरी राहायचा निर्णय माझा तो निर्णय अगदी योग्य ठरला. संध्यकाळ होता होता पाण्याचा जोर अणुशक्ती नगर च्या गेट वर दिसत होता. बस पण जाऊ शकणार नाही अश्या वेगात पाणी वहात होते. लोकांची तारांबळ बघून मी व माझ्या काही सहकाऱ्यांनी माणसांची साखळी बनवून लोकांना गेट च्या आतमध्ये घेत होतो. अर्थात काही वेळात तो नाद सोडून द्यावा लागला कारण पाण्याचा जोर खूप वाढला होता.
रात्री भुर्जी पाव खाऊन कशीबशी रात्र काढली. सकाळी ६:३० ला अणुशक्ती नगर वरून चालत निघालो. रस्त्यात काल रात्री पावसाने केलेल्या हाहाकाराचे दाखले मिळत होते. अणुशक्ती नगर ते चेंबूर मग तिकडून प्रियदर्शनी करत सायन गाठलं. पूर्ण रस्त्यात पाणीच पाणी. छाती एवढ्या पाण्यातून रस्ता काढत एकमेकांचा आधार घेत हा पूर्ण रस्ता चालत कापला. सायन वरून वांद्रे गाठलं. तोवर दुपारचे १२ वाजून गेले होते. तिकडेही ट्रेन किंवा कोणतीच सेवा चालू होण्याच कोणतच चिन्ह नव्हत. पोटात काल रात्री खाल्लेले दोन पाव. भुकेने कसतरी होत होत. पण सगळ्यांची अवस्था ती होती. हॉटेल वाल्याला विचारल तर त्याने जे उत्तर दिल ते ऐकून मी काही मिळेल ह्याचा नाद सोडून दिला. साहेब लोकांनी कोथिंबीर पण मागून खाली. आत्ता माझ्याकडे काहीच नाही. अशी अवस्था मी आयुष्यात कधीच अनुभवली नव्हती.
वांद्रे ते विलेपार्ले पूर्ण रस्ता कमरेएवढ्या पाण्यातून पार केला. थंडीने थरथरत होतो. सतत पाण्यात राहून विचित्र अवस्था झाली होती. विलेपार्ले ला रस्त्यावर एक समाजसेवी संस्था जाणाऱ्या लोकांना पार्ले जी बिस्कीट देत होती. ती तीन बिस्कीट मी कधीच विसरू शकत नाही. ते एक ग्लास पाणी जे कि मी ८ तासानंतर प्यायल त्या तीन बिस्कीटांन सोबत. तिकडून बोरीवली कडे प्रवास सुरु ठेवला. संध्याकाळी ६ च्या सुमारास घरी पोचलो. १२ तासात ४० किलोमीटर पेक्षा जास्ती अंतर पूर्ण पाण्यातून ३ बिस्कीट आणि एक ग्लास पाण्याने पूर्ण केल होत. २६-२७ जुलै २००५ हे दोन्ही दिवस कधीच विसरू शकणार नाही. आज १२ वर्ष झाली. पण सगळ्या घटना आजही समोर आहेत. आठवलं तरी आपण कस घरी आलो ह्याच मला आजही आश्चर्य वाटते.
२६ जुलै २०१५ कारगिल ला जवळपास एका आठवड्याच्या प्रवासा नंतर पोहचलो होतो. मनाली ते लडाख म्हंटल तर एक किंवा दोन दिवसांचा प्रवास पण निसर्गाच्या त्या तड्याख्यात असा काही सापडलो कि ३ दिवस रस्त्यावर काढले. एकवेळ पेंगोग लेक ला किंवा खारदुंगला ला नाही गेलो तरी चालेल पण २६ जुलै चा कारगिल कार्यक्रम मिस नव्हता करायचा. त्या दिवशी त्या शिखारांसमोर उभ राहून तिरंगा फडकताना बघताना अभिमानाने छाती फुलून आली. पण त्याच वेळी सैनिकांचे बलिदान आठवून डोळ्यातून पाणी आपसूक बाहेर आल. तिकडे येण्यासाठी निसर्गाने जो तडाखा दिला त्यानंतर पुन्हा कधी इकडे येणार नाही असच प्रत्येकाच्या मनात आल असेल. पण मग रोज हा तडाखा झेलणाऱ्या माझ्या सैनिकाच्या मनात काय असेल असाच विचार करत ते क्षण अनुभवत होतो. अनु मावशी मुळे अगदी प्रेस बॉक्स मधून फोटो काढण्याची संधी मिळाली. शहिदांच्या स्मृतीला अगदी जवळून वंदन करता आल. ज्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली हे सैनिक होते. त्या अधिकाऱ्याशी अगदी जवळून भेटण त्यांना स्याल्युट करता येण हा माझ्या आयुष्यातील एक परमोच्च क्षण होता.
काही दिवसाचं महत्व, आठवणी आणि तो दिवस आयुष्यात जपून ठेवावा असेच असतात. काही तर कधीच पुन्हा आठवू नये अश्या पण. दोन्ही टोकाच्या अनुभूतिनी ह्या दिवसाच माझ्या आयुष्यात स्थान आहे. एकीकडे पुन्हा २६ जुलै होऊ नये तर दुसरीकडे दरवर्षी त्या दिवशी मी कारगिल ला त्या आठवणी अनुभवव्या अस. आजपण तोच दिवस आहे २६ जुलै. आज पाण्यातून आपल काम करत असताना पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर आल्या. मनोमन हीच इच्छा कि २६ जुलै २०१५ परत येऊन दे पण २००५ नको

ह्याकसॉं रिज... विनीत वर्तक

भारतात किंवा बॉलीवूड मध्ये सैनिकांच्या शौर्यावर मोजकेच चित्रपट निघतात. बॉर्डर, लक्ष्य सारखे चित्रपट सोडले तर बाकी सगळा आनंदी आनंद आहे. हॉलीवूड मध्ये मात्र युद्धातील सैनिकांवर निघणारे चित्रपट अगदी विस्मृतीत गेलेल्या शूरवीरांनां प्रकाशात तर आणतातच पण त्यातून जे कथानक समोर येते ते थक्क करणार असते. कुठेही प्रेम ह्या भावनेला अतिरंजित न करता गाणी आणि नृत्या पलीकडे सैनिकाच आयुष्य जवळून बघण्याचा सुवर्ण योग ह्या चित्रपटामुळे मिळतो. ह्याकसॉं रिज हा त्याच पठडीतला चित्रपट. मेल गिब्सन निर्माता असलेला हा चित्रपट डेसमोंड डॉस ह्या एका शूरवीर अमेरिकन सैनिकाची कहाणी आपल्यासमोर मांडतो तेव्हा आपण निशब्द होतो.
डेसमोंड डॉस हे नाव भारतीयांना अपरिचित आहे. डेसमोंड डॉस हा अमेरिकेच्या सैन्यात कॉर्पोरल लेवल ला कोम्ब्याट मेडिक म्हणून दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला कार्यरत होता. मेडिक म्हणून काम करताना डेसमोंड ने ब्याटल ऑफ ऑकीनावा मध्ये भाग घेतला होता. ऑकीनावा हे जपान च्या जवळच साधारण ५५० किमी वर एक बेट असून दुसऱ्या महायुद्धात जपान वर युद्ध करण्यासाठी अमेरिकेला हवाई तळाची गरज होती. हवाई हल्यासाठी कसही करून ऑकीनावा हे बेट आपल्या कब्जात अमेरिकेला हव होत. ह्यासाठी हे युद्ध अमेरिका व मित्र राष्ट्रे ह्याच्या विरुद्ध जपान आणि ऑकीनावा इथले रहिवाशी अस लढल गेल. ८२ दिवस चाललेलं हे युद्ध दुसऱ्या महायुद्धातील सगळ्यात रक्तरंजित युद्ध होत. ह्या एका युद्धात तब्बल ३ लाख लोक मारली गेली असा अंदाज आहे. अमेरिकेने २०,१९५ सैनिकांना गमावलं तर जपान ने १,००,००० सैनिकांना गमावलं. ह्याच्या पलीकडे जवळपास ५५,००० अमेरिकन सैनिक जखमी झाले तर तिकडे त्या काळी वस्ती असलेल्या ३,००,००० लोकांपेकी किती मेले, जखमी झाले, हरवले ह्याबद्दल नक्की आकडा माहित नाही. ह्या अंकांवरून आपण अंदाज लावू शकू कि हे युद्ध किती रक्तरंजित असेल.
डेसमोंड डॉस हा एक सैनिक असूनही त्याने एकही जपान च्या सैनिकावर गोळी झाडली नाही किंवा आपल्या धारणेला बगल देत बंदूक हातात उचलली नाही. पण त्याच वेळी बायबल मधल्या तत्वाला जागत त्याने युद्धात एक- दोन नाही तर तब्बल ७५ अमेरिकेन सैनिकांचे प्राण एकट्याने वाचवले. आपल्या जिवाची पर्वा न करता डेसमोंड ने भर युद्धात जपान आणि अमेरिका असा भेदभाव न करता माणुसकीची सेवा केली. त्याच्या ह्या अतुलनीय शौर्याबद्दल अमेरिकेने मेडल ऑफ ऑनर दिला. डेसमंड डॉस हा हे मेडल मिळवणारा पहिला कंसायटेनियुस ओब्जेक्टर होता. (कंसायटेनियुस ओब्जेक्टर म्हणजे ज्या व्यक्तीने आपल्या तत्वासाठी, विचारासाठी किंवा धर्मासाठी सैनिकी सेवा करण्यासाठी नकार दिला आहे. अमेरिकेत असा कायदा आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती सैन्यात राहून पण सैनिकी सेवा करण्यास नकार देऊ शकते. )
डेसमोंड डॉस चा हा प्रवास इतक्या सुंदर पद्धतीने मेल गिब्सन ने समोर ठेवला आहे कि आपण देहभान विसरून पुन्हा इतिहासात डोकावतो. आपल्या तत्वासाठी लढण काय असते ते डेसमंड काढून शिकावं. युद्धात बंदूक न घेता हि खूप मदत करू शकतो हे डेसमंड काढून शिकावं. शूरवीर किंवा पराक्रमी फक्त युद्ध लढून नाही बनत तर आपल्या सेवेने सुद्धा पराक्रम गाजवता येतो. प्रेम हे फक्त बोलून संपवायचं नसते तर निभवायचं असते. डेसमंड च पूर्ण आयुष्य आपल्याला खूप काही सांगून जाते खूप काही शिकवून जाते. सगळी शक्ती संपली असताना सुद्धा त्या परिस्थितीत डेसमंड देवाला सांगतो. अजून एकाला मला वाचवायचं बळ दे. अजून एक करत डेसमंड ज्या पद्धतीने ७५ सैनिकांना मृत्युच्या दाढेतून परत आणतो. ते म्हणजे अतुलनीय शौर्य. आपल्या तत्वांसाठी आपल आख्ख आयुष्य पणाला लावणाऱ्या डेसमंड डॉस चा हा प्रवास बघण म्हणजे अवर्णनीय अनुभव आहे.
ह्याकसॉं रिज सारखे चित्रपट तुम्हाला नुसते आनंद नाही देत तर आयुष्य शिकवतात. युद्ध, त्याचे तोटे, त्यात होणारा रक्तरंजित संहार बघून आपण थबकतो. त्याच वेळी डेसमंड डॉस ला बघून कुठेतरी माणुसकी जिवंत आहे ह्याचा विश्वास आपल्याला मिळतो. मला पुन्हा एकदा स्तिमित करणाऱ्या डेसमंड डॉस ला माझा कडक स्याल्यूट. तर हा प्रवास इतक्या सुंदरपणे आपल्या समोर आणणाऱ्या मेल गिब्सन चे अभिनंदन. अजिबात चुकवू नये असा चित्रपट. अगदी शोधून शोधून एकदा तरी बघाच ह्याकसॉं रिज.

सेन्स एट... विनीत वर्तक

सेन्स एट नावाची सिरीज सध्या बघतो आहे. नेटफ्लिक्स ची हि सिरीज मला खूप आवडली. ह्या सिरीज चे दोन एपिसोड प्रसारित झाले आहेत. प्रत्येक एपिसोड मध्ये ११-१२ भाग असून पहिल्या भागापासून ह्या सिरीज ने उत्कंठा वाढवली आहे. आत्मा हा विषय आपल्याकडे तसा खूप चघळून झाला आहे. शरीरापलीकडे माणसाचा आत्मा हा जिवंत असतो. तो स्थळ, काळ, अंतरापलीकडे जाऊ शकतो हे आपल्याला आधीपासून माहिती आहेच. त्याच आत्म्या वर बसलेली सिरीज म्हणजे सेन्स एट.
एक आत्मा आठ शरीरात जन्म घेतो. हि आठ शरीर जगाच्या सर्व कोपऱ्यात विखुरलेली असताना. आत्म्यामुळे एकमेकांशी अंतरापलीकडे एकमेकांशी जोडली जातात. जोडताना आत्मा एक असला तरी विचारांची बैठक, त्यांची जडणघडण हि वेगळी झालेली असताना शरीर आणि आत्मा ह्यांचा ताळमेळ ते कसा करतात आणि हा आत्मा कोणाचा असतो? त्या मागचा इतिहास आणि भविष्य हे सेन्स एट मधेच बघण उत्तम. वेगवेगळे देश अगदी मुंबई पासून अमेरिकेपर्यंत, तर तिकडे आफ्रिके पासून युरोप पर्यंत अश्या सगळ्या ठिकाणी ह्या मालिकेचे शुटींग झाले आहे. म्हणूनच हि मालिका पटकन आपल्या मनाचा ठाव घेते.
सेन्स एट मध्ये एल.जी.बी.टी., न्युड असे काही सिन्स असले तरी त्यात कुठे अश्लीलता जाणवत नाही. कथानका ची मांडणी तशी झाली असल्या कारणांने. लेसबियन आणि गे अश्या संबंधाना अनेक देशात मान्यता असल्याने त्या त्या देशांच्या दृष्ट्रीने तिकडे अश्या संबंधांकडे बघण्याचा दृष्ट्रीकोन वेगळा आहे हे ओळखून हि सिरीज बघावी. मला सगळ्यात जास्ती आवडले असेल ते आत्मा ह्या गोष्टीला मध्यवर्ती ठेऊन केलेली कथानकाची मांडणी.
आत्मा हे आपल्या कडे ज्ञात गोष्ट आहे. आत्म्याला मोक्ष मिळावा म्हणून आपल्या संस्कृतीत अनेक पद्धती आहेत. पण ह्या आत्म्याला आपल्याकडे भयाची जोड दिली आहे. त्यामुळे आत्मा वगरे विषय निघाला कि आपल्याला भीती वाटते. पण जर असे आत्मे जुळले तर? किंबहुना अस होतेच न. सोलमेट ज्याला म्हणतात ते तेच असते न. आपण काय विचार करतो? किंवा आपल्या मनात काय चालू आहे? हे देहबोलीतून न सांगता सुद्धा समोरच्या पर्यंत पोहचते म्हणजे तिकडे ते आत्मे जुळत असतील किंवा काहीतरी नक्कीच कनेक्शन असेल. त्याला आपण काही नाव देऊ ऑरा, आत्मा अस काहीही. पण काही असल्याशिवाय अस जुळून येण अशक्य असते.
इंटरनेट च्या जमान्यात असा अनुभव अनेकवेळा येतो. देशाच्या, धर्माच्या भिंती पलीकडे कोणीतरी आपल्याशी अस कनेक्ट होत कि आपल्याला कधी कळत नाही अस कस शक्य आहे? ज्या माणसाला आपण ओळखत नाही, बघितलेलं नाही किंबहुना कधी तर कोणत्या देशात वास्तव्य करतो हे माहित नसते. त्याची संस्कृती, भाषा काही माहित नसताना फक्त शब्दांपलीकडे जेव्हा आपण कनेक्ट होतो ते वेगळ असते. प्रत्येकवेळी ते प्रेम असते अस नाही. जे नेमक सांगायचं आहे त्यासाठी शब्दांची गरज नसते. मग अगदी खट्टू होण असू दे किंवा आनंदात असण असू देत. ते ह्या सर्व भिंती ओलांडून जेव्हा समोरच्या पर्यंत पोचते तो अनुभव वेगळाच असतो. ह्याच्या पुढे जाऊन जेव्हा त्या व्यक्तीच असण पण आपल्याला जाणवते तेव्हा ते कनेक्शन वेगळ्या लेवल वर असते.
विज्ञानाच्या भाषेत कदाचित ह्या गोष्टी आपण कोणाला सांगू पण शकत नाही. कारण ते अनुभवणं आपण कोणाशीच शेअर करू शकत नाही. म्हणून अश्या गोष्टी एकतर काल्पनिक वाटतात किंवा त्याचा अनुभव येईपर्यंत आपण त्या स्वीकारत नाहीत. एखाद्या गोष्टीची आधीच जाणीव होते अस अनेकदा आपण अनेकांकडून ऐकल असेल. पण ते केव्हा आणि कस हे मात्र कोणीच उलगडून सांगू शकत नाही. त्याच आकलन होण्यासाठी आपल्याला अनुभव घ्यावाच लागतो. सेन्स एट बघताना पुन्हा एकदा त्या ताकदीची जाणीव आपल्याला होते. अर्थात त्यावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण अनेक अनुत्तरीत प्रश्नांना उत्तर नसतात पण म्हणून त्या गोष्टी अस्तित्वात नसतात. अस होत नसते. उद्या कदाचित विज्ञान इतक सक्षम असेल कि आत्मा,ऑरा सारख्या गोष्टींची उत्तर त्याच्याकडे असतील. तूर्तास सेन्स एट ह्या सुंदर सिरीज ला एन्जोय करतो आहे.

स्पाईक एम.आर... विनीत वर्तक

हैद्राबाद भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाच एक प्रमुख शहर अस म्हंटल्यास वावग ठरणार नाही. आता तिथे तयार होते आहे इस्राइल निर्मित जगातील सर्वोत्तम एन्टी ट्यांक गायडेड मिसाईल स्पाईक एम.आर. साठी. भारताची कल्याणी सिस्टीम आणि इस्राइल ची राफेल एड्व्हांस डिफेन्स सिस्टीम एकत्र येऊन त्यांनी कल्याणी राफेल एड्व्हांस सिस्टीम ह्या नावाने एक उपकंपनी सुरु केली आहे. एकदा भारत सरकारने परवानगी दिल्यावर हैद्राबाद येथून प्रत्येक महिन्याला २०० स्पाईक एम.आर. भारतीय सेनेच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहेत.
स्पाईक एम.आर. हे पोर्टेबल म्हणजेच वाहून नेता येणार मल्टीपर्पज इलेक्ट्रोओप्टीकल मिसाईल वेपन सिस्टीम असून ह्याच्या लोंचर च वजन १२ किलोग्राम असून पूर्ण वजन १४ किलोग्राम च्या आसपास आहे. ह्यातली गायडंस सिस्टीम हि ड्युअल ओप्टीकल सिकर असून हे मिसाईल डागा आणि विसरून जा ह्या तत्वावर आधारित आहे. हे २०० मीटर पासून ते २५०० मीटर पर्यंत ह्याची रेंज असून अगदी कोणालाही सहजपणे लक्ष्यावर डागता येईल असे हे मिसाईल आहे.
अमेरीकेच जावेलीन आणि इस्राइल च स्पाईक अशी दोन मिसाईल चे ऑप्शन भारतापुढे होते. परंतु इस्राइल ने मेक इन इंडिया च्या तत्वाला अनुसरून स्पाईक चा संपूर्ण तंत्रज्ञान भारताला दिलच पण त्याही पलीकडे भारतात हे मिसाईल बनवण्याची तयारी दाखवली. इस्राइल ने रेड कार्पेट दिल्यावर जगातील सर्वात अत्याधुनिक मिसाईल आता काही दिवसात भारतात बनेल अशी चिन्ह आहेत. भारताकडे अश्या प्रकारच मिसाईल आत्तापर्यंत नव्हत. स्पाईक एम आर हे मिसाईल भारताव्यतिरिक्त २० देशात वापरल जाते. म्हणजेच भारत ह्या पुढे हे मिसाईल मेड इन इंडिया सकट ह्या २० देशांना विकू शकणार आहे. तसेच ह्यात आपले काही शत्रू असतील तर त्यांना विकायच नाही ह्याचा निर्णय भारत सरकारला घेता यणार आहे.
स्पाईक मध्ये वेगवेगळे प्रकार असून स्पाईक एम आर हे भारतासाठी योग्य असल्याच भारतीय सेनेने सांगितल्यावर त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या. गेल्या एक वर्षापासून भारतीय सेनेने ह्या मिसाईल च्या चाचण्या दिवसा, रात्री, वाळवंटात, घेऊन त्याच्या उपयुक्ततेवर आपली मोहोर उमटवली आहे. भारत सरकारने परवानगी देतात अवघ्या काही आठवड्यात हे मिसाईल शत्रूचे रणगाडे उद्वस्थ करायला भारतीय सेनेच्या ताफ्यात येऊ शकते. स्पाईक एम आर म्हणजे मिडीयम रेंज तर एल आर म्हणजे लोंग रेंज तर एस आर म्हणजे शोर्ट रेंज तसेच इ आर असून ती एक्स्टेंडेड लोंग रेंज आहे.
जगातील सर्वोत्तम एन्टी ट्यांक मिसाईल भारतात बनणे हि मेक इन इंडिया ला दिलेली एक पोचपावती आहे. तर भारत इस्राइल ह्या दोन्ही देशातील संबंध किती घट्ट आहेत ह्याच उदाहरण आहे. इकडे एक लक्षात घेतल पाहिजे कि इस्राइल आपली शस्त्र जी कि तंत्रद्नाच्या बाबतीत जगात वरचढ आणि सर्वश्रेष्ठ आहेत पाकिस्तान सारख्या देशाला विकत तर नाही पण त्याचवेळी त्याची टेक्नोलॉजी फक्त भारता सारख्या घनिष्ठ मित्राला शेअर करते. ह्या मिसाईल च्या येण्याने पाकिस्तानी रणगाड्या समोर दिवसा ढवळा तारे चमकले तर नवल वाटणार नाही. भारत जवळपास ८००० हून अधिक स्पाईक मिसाईल खरेदी करत असून ३२१ लोंचर तर १५ ट्रेनिंग सिम्युलेटर चा त्यात समावेश आहे. हा सौदा १ बिलियन डॉलर च्या घरात असून त्यात मेक इन इंडिया मुळे खूप मोठी बचत होणार आहे.

मुन्त्रा.. माणूस नसलेला रणगाडा... विनीत वर्तक

रणगाडा म्हंटल कि डोळ्यासमोर येतो तो प्रजासत्ताक दिवस. त्या पलीकडे आपल्याला रणगाडा बघण्याच भाग्य मिळत नाही. भारतीय आर्मी ने आयोजित केलेल्या प्रदर्शनासाठी वेळ काढण्याची आपली प्रायोरिटी नसल्याने ते भाग्य फक्त २६ जानेवारीला आम्ही भारतीयांनी राखून ठेवल आहे. तो भाग बाजूला ठेवला तर रणगाडा मला नेहमीच आकर्षित करत आलेला आहे. मजबूत, दणकट आणि आपल्या धुरांड्या मधून आवाज करत त्या चेन सारख्या पट्या च्या मध्ये दिसणारी गोल चाके मला नेहमीच आकर्षित करत आली आहेत.
पुढे लांब असणार लांब नळकांड आणि त्याच्या खाली अगदी डोक दिसेल एवढच टेहाळणी करणारा जवान. अस चित्र आपण नेहमीच रणगाड्याच बघत आलेलो आहोत. पण जसा कॉम्प्युटर ने आपल्या आयुष्यात बदल घडवला. माणस वगळून जेव्हा यंत्र ती सर्व काम करू लागली. तिकडे युद्ध तरी माणसांनी का करावी? ह्याची सुरवात हळू का होईना झाली होती. भारता ने हि ह्या दृष्ट्रीने पावल टाकायला सुरवात केली. डी.आर.डी.ओ. म्हणजेच डिफेन्स रिसर्च एंड डेवलपमेंट ऑर्गनायझेशन ने माणसाशिवाय चालणारा भारतातील पहिला रणगाडा तयार केला आहे. मुन्त्रा अस त्याच नाव ठेवण्यात आल आहे.
मुन्त्रा रणगाडा भारतीय आर्मीच्या सी.व्ही.आर.डी.ई म्हणजेच Combat Vehicles Research and Development Establishment (CVRDE) ह्यांच्या मागणीवरून तयार केला गेला आहे. मुन्त्रा रणगाड्याचे तीन प्रकार आहेत. मुन्त्रा - एस ह्या प्रकारातील रणगाडा माणूस नसलेला पहिला रणगाडा असून त्याद्वारे जमिनीवर लक्ष ठेवण्याच काम केल जाते. मुन्त्रा – एम प्रकारातील रणगाडा हा जमिनीतील माईन्स शोधण्यासाठी वापरला जाऊ शकतो तर मुन्त्रा – एन प्रकारातील रणगाडा हा न्युक्लीयर रेडियेशन किंवा बायोकेमिकल युद्धात वापरला जाऊ शकतो.
मुन्त्रा रणगाड्याची चाचणी सुद्धा भारतीय आर्मी ने महाजन फिल्ड राजस्थान मध्ये घेतली असून आर्मीने राजस्थान च्या वाळवंटात धुळीच्या वादळात ५२ डिग्री सेल्सियस तापमानात ह्या रणगाड्याची चाचणी केली आहे. भारतीय आर्मी ने हा रणगाडा रिमोट लोकेशन वरून यशस्वीरित्या ऑपरेट केला आहे. ह्या रणगाड्यावर रडार सकट, इंटिग्रेटेड क्यामेरा असून लेझर रेंज फायंडर बसवलेल आहे. १५ किमी च्या परिसरातील शत्रूचा जमिनीवर झोपून रांगणारा माणूस ते शत्रूचा कोणताही रणगाडा टिपण्याची ह्याची क्षमता आहे. युद्धामध्ये प्रत्यक्ष जीवितहानी होण्याचा धोका न पत्करता ह्या रणगाड्या द्वारे आपल्या भूमीवर गस्त तसेच युद्धात निकराच्या लढाईत वचक ठेवता येणार आहे. युद्धा पलीकडे नक्षलवादी असलेल्या भागात जिकडे माईन्स चा धोका खूप असतो अश्या ठिकाणी ह्या रणगाड्यांचा उपयोग होणार आहे.
युद्ध नेहमीच संहारक असतात. माणसाचा जीव सगळ्यात महत्वाचा असतो. पुढली युद्ध हि अतिसंहारक असतील कारण माणसाने विकसित केलेल्या शस्त्रांमुळे. ह्यासाठीच कमीत कमी मनुष्याला युद्धात खेचून यंत्रानीच जो युद्ध करेल तो विजयी अथवा वरचढ असणार आहे. म्हणून मानवरहित शस्त्र आणि अस्त्र ह्याची गरज भारताला हि आहेच. भारताची हीच गरज ओळखून त्यावर संशोधन करून माणूस नसलेला रणगाडा तयार करणाऱ्या डी.आर.डी.ओ. च्या सर्वच वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ ह्याचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांनी केलेल्या देशसेवेला सलाम.

पोर्न ची वाळवी लागलेला सेक्स... विनीत वर्तक

काही हजार वर्षापासून माणसाच्या किंबहुना भारताच्या कुटुंब व्यवस्थेचा आणि वंशवृद्धीचा कणा असलेला सेक्स हळूहळू बदलतो आहे. गेल्या काही काळात तर अतिशय झपाट्याने. माणसाची चौथी मुलभूत गरज म्हणून ज्याच्याकडे आजही बघितल जात नाही. ज्याच्याविषयी बोलण पण आजही भारतीय समाजात पाप समजल जाते. ज्याचा विचार करणपण वाईटपणाच लेबल समाजात लावून घेण अस असताना पण त्याच समाजात सगळ्यात जास्ती गैरसमज ह्याच सेक्स मुळे होत असतात.
इतके वर्ष लपून छपून चुकीच्या पद्धतीने सेक्स भारतीय समाजात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात होता. अगदी मासिक पाळी पासून ते मधुचंद्राच्या रात्री पर्यंत कधीच कुटुंबामध्ये मोकळ बोलण होत नाही. ज्या कुटुंब पद्धती मध्ये सगळे निर्णय हे घर, घरातील व्यक्ती, घराच्या भोवती गुंतले असताना आपल्या चौथ्या मुलभूत गरजेविषयी ज्ञानाचा स्त्रोत म्हणून भारतीय कुटुंब व्यवस्थेत ह्या गोष्टी शिकण्यासाठी बाहेरच जग हेच माध्यम राहील. बाहेरच जग म्हणजे मित्र, मैत्रिणी, दूरचित्रवाणी आणि आता इंटरनेट. २१ व्या शतकात प्रवेश केल्यावर माहितीचा स्त्रोत अगदी कोणत्याही बंधनाशिवाय कोणत्याही वयात समोर मिळाल्यावर ह्या ४ थ्या मुलभूत गरजेविषयी माहितीचा खजिना हाती लागला.
समुद्र मंथनात जस अमृत निघाल तस विष हि निघालच. त्यामुळे इंटरनेट त्याला कसा अपवाद असेल. चागल्या गोष्टींसोबत वाईट किंवा चुकीच्या पद्धतीने गोष्टी समोर आणण्यात हि इंटरनेट कुठेच मागे नव्हत. जगात सगळीकडे पोर्न इंडस्ट्री होतीच. माहितीच्या युगात त्याच महत्व अचानक वाढल ते हातात आलेल्या मोबाईल आणि क्यामेरा मुळे. ज्या समाजाचा मुलभूत माहितीचा स्त्रोत हे बाहेरच जग होत. त्यासाठी तर हा खजिना होता. हा खजिना बघून भारतीय हुरळून गेले नसतील तर नवलच. न बघितलेल्या, न ऐकलेल्या गोष्टी हाय डेफिनेशन स्वरूपात अगदी सहज मोबाईल आणि कॉम्प्युटर मध्ये उपलब्ध होत गेल्यावर कोणाचाही पाय घसरेलच.
पोर्न ने हळूहळू का होईना आपले हातपाय इतके पसरले कि त्याची सवय लागून गेली. ते चांगल का वाईट हा वेगळा मुद्दा पण त्याने एकूण आपल्या विचारसरणीत जे बदल झाले आहेत. ते नक्कीच कुठेतरी पूर्ण व्यवस्था उध्वस्थ करणारे आहेत. सेक्स मधील सेक्स हा फक्त आणि फक्त जनेनद्रीयांशी निगडीत आहे हा जो काही समज रूढ होतो आहे त्यामुळे एकूणच सेक्स ची परिभाषा बदलली आहे. नजर, स्पर्श, भावना, आवेग ह्या शब्दांना बगल देत फक्त नर आणि मादी स्वरूपात जननेंद्रिय दाखवत पोर्न मधून समोर येणारा सेक्स आपल्या विचारांवर पकड बनवतो आहे. मादी कडे बघताना नराची नजर फक्त आणि फक्त तिचा उपभोग आणि तो हि जनेनद्रीयांशी निगडीत. पोर्न मध्ये बाकीच्या गोष्टीना थारा न देता जशी कृत्रिम पद्धतीने निर्माण केलेल्या मादीच्या सुखाची चटक आपल्या खऱ्या आयुष्यात असलेल्या मादी कडून मिळवताना तिच्या भावनांची, तिच्या अपेक्षांची पायमल्ली करताना तिला होणाऱ्या त्रासाची थोडीशी जाणीव पण नराला होत नाही आहे. पोर्न च्या वाळवीने अस काही गारुड केल आहे कि त्यात समोर फक्त मादी दिसते आणि भोगी प्रवृत्ती.
मादी कडून हि अश्याच अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. जितक मोठ जननेंद्रिय तितका तो नर आपल्याला समाधान देऊ शकतो हा खोटा समज पसरवण्यात पोर्न इंडस्ट्री कमालीची यशस्वी ठरली आहे. म्हणून बॉडी बघून भाळणाऱ्या मादिंची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे नर किंवा मादी कोणा एकाचा दोष नाही आहे. पोर्न च्या वाळवीने सेक्स ला कधीच पोखरून टाकल आहे. आता गरज आहे ती हि वाळवी कंट्रोल करण्याची. पोर्न चांगल का वाईट वेगळा मुद्दा होईल कारण सरसकट सगळच चांगल आणि सगळच वाईट काही नसते. पण प्रत्येक गोष्टितल काय घ्यायचं आणि काय सोडायचं हा निर्णय सर्वस्वी आपला असतो.
गरज आहे ती आपल्या कुटुंब व्यवस्थेतून पुढल्या पिढीला ह्या ४ थ्या मुलभूत गरजेची माहिती सांगण्याची. कुटुंबातून हि माहिती मिळाली तर बाहेरच्या माहितीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. बाहेरची माहिती आली तरी ती फिल्टर करण्याचा चष्मा किंवा त्यात बदल करून आपल्याला लागेल तेवढ घेण्याची प्रगल्भता आपण त्यांच्यात नक्कीच निर्माण करू शकू. पोर्न ची वाळवी सेक्स ला पोखरण्या आगोदर सेक्स ची प्रगल्भता जर आपण निर्माण केली तर वाळवी ला थांबवण्यापेक्षा सेक्स ची आत्मीयता त्याला स्वतःपासून दूर ठेवेल. आपल्या कडे काय आहे कि आपण रोगावर औषध शोधतो. एखाद्या वेळेस औषध लागू पण पडते. पण रोग त्यावर वर पण हळू हळू मात करतो. म्हणून रोगावर औषध शोधण्यापेक्षा रोगालाच मुळापासून उखडून टाकलेलं कधीही चांगल. वाळवी सारखा रोग कंट्रोल होत नाही. तो आपले हातपाय इकडून ना तिकडून पसरतो. आपल्या लाकडाला मजबूत करण हेच आपल लक्ष्य असायला हव. अजून वेळ गेलेली नाही. पोर्न चा भस्मासुर आपल्या मोबाईल मध्ये केव्हाच पोचला आहे. मेंदूवर हि दस्तक देतो आहे. हीच वेळ आहे प्रगल्भ बनण्याची आणि सेक्स समजून घेण्याची.

आवडता तास... विनीत वर्तक

शाळेतील माझा आवडता तास असा प्रश्न जर मला कोणी केला तर आजही तो ऑफ पिरेड किंवा ज्या तासावर बाई किंवा सर येवो अथवा न येवो त्या तासामध्ये तुम्हाला आवडेल ते करण्याची मुभा दिलेला तो तास. सगळी बंधन जुगारून मोकळेपणी आपल्याला आवडेल ते करण्याचं स्वातंत्र्य देणारा प्रत्येक असा तास माझ्या चांगलाच लक्षात आहे. त्या तासात गप्पागोष्टी तर अखंड व्हायच्या पण त्याही पलीकडे मला वाटते तो क्रियेटीविटी चा तास होता. वाचनापासून ते खेळापर्यंत सगळ काही स्वमर्जीने. फुल्लीगोळ्या पासून ते करकटा ने बेंच वर रांगोळी काढण्यापर्यंत सगळ काही त्या तासात केल असेल.
शाळा म्हणजे ज्ञानाच घर पण ते डोक्यात भरलेलं किंवा जबरदस्ती चिकटवलेल जास्ती होत. शिक्षण पद्धती मध्ये स्वतःच्या बुद्धिमत्तेला वाव तसा कमीच होता. आपली आवड, आपल्या कल्पना, आपल काहीतरी हि भावनाच मुळी तिकडे अस्तित्वात नव्हती. पुस्तकांचे धडे, गणिताचे आकडे आणि विज्ञानाची सूत्र ह्यात दिवस काय वर्ष पण पटकन भरत होती. अनेकदा प्रयोग वही मध्ये निष्कर्ष आणि अनुमान हे दोन शब्द मला बुचकळ्यात टाकायचे. कारण त्याच्यात पण भोकमपट्टी असायची. प्रयोगाचा साचा सेम असल्यावर अजून दुसर काय होणार होत. पण ह्या सगळ्या एकसुरात सप्तसूर बाहेर काढणारा एक तास म्हणजे माझा आवडता तास.
मॉनीटर होण मला कधीच आवडायचं नाही. उगाच काय नुसतीच मुलांची नाव लिहायची आणि त्यापुढे फुल्या मारायच्या. आपल्या आवडत्या तासात वर्गाच्या समोर उभ राहून फुकट फुशारकी मारत रहाण मला कधीच आवडायच नाही. आवडत्या तासात गप्पा आणि माझ्यातल्या निरीक्षण क्षमता ह्यांना वाव देण मला खूप आवडायचं. अगदी काल झालेल्या क्रिकेट म्याच वरच्या गप्पा असतो वा बाजूच्या रांगेत बसलेल्या मुलीकडे बघण असो. सगळ कस आपण ठरवलेलं. पेनांची मारामारी आणि फुल्लीगोळा हे तर हक्काचे खेळ. त्या काळात किती तरी वह्या फुल्ली गोळ्यांनी भरल्या होत्या. निदान शेवटची १० पान तरी नक्कीच. काल मुलीसोबत फोन वर फुल्ली गोळा खेळलो पण तितकी मज्जा नाही आली. मग ती आणि मी पुन्हा एकदा पेन आणि कागद घेऊन खेळायला सुरवात केली. मला न राहवून त्या वेळेस शाळेची आठवण झाली. त्या काळी इतका त्याचा अभ्यास केला होता कि समोरचा काय खेळणार हे आधीच माहित असायचं.
इथून पुढे काय? किंवा कोणत क्षेत्र निवडणार असले फालतू प्रश्न त्या काळी अश्या तासांना पडले नाहीत. कारण रविवारी म्याच कुठे खेळायची ह्याचे विचार डोक्यात सुरु. वर्गात पण क्रिकेट खेळण्याचे प्रताप करून झाले होते. पुठ्ठ्याची ब्याट आणि कागदाच्या गोळ्याचा चेंडू शेवटचा बेंच ब्याटींग वाला तर पहिला बोलिंग वाला. मधले सर्व क्याच करणारे ह्यात बर मुलीही सामील व्हायच्या. त्यामुळे हा आवडता तास कधी संपू नये असच वाटायचं. नवीन तास सुरु झाला तरी मागच्या तासात केलेल्या मज्जेचा पाढा मनात सुरु असायचा. म्हणून आवडत्या तासा नंतर जर एखादा नावडता तास असेल तर आम्ही वर्गाबाहेर हमखास जायचोच. कारण एकतर काही कळायचं नाही आणि कळल तरी लक्ष नसायचं.
पण हे आवडते तास मित्र जोडणारे होते. त्याकाळी जोडलेले मित्र आजही टिकून आहेत. भले ते २०-२५ वर्ष भेटलेले नसो पण भेटले कि निदान खांद्यावर हात टाकून चल बसुया एकदा म्हणणारे तरी आहेत. कशासाठी बसुया हा वादाचा विषय असला तरी त्या बसण्यामागच्या प्रेमाला हे आवडते तासच कारणीभूत होते. आज माझ्या मनापासून मला हि वाटते कि मुलांना निदान आठवड्यातून एक तास असा असावा खरे तर रोज एक असावा. जिकडे त्यांना वाटेल ते करू देण्यात याव. अगदी गप्पांपासून ते खेळापर्यंत. ज्याला जे आवडेल ते. कारण इंग्रजी, गणिताचे तास लक्षात नाही रहात. लक्षात रहातात ते असेच ऑफ तास. ज्याला आपण मनातून जगतो. माझ्या मुलीने पण अशीच मज्जा करावी अस मला वाटते. परवाच सई मला म्हणाली, बाबा, मला क्लास च मॉनीटर केल. मी तिला म्हंटल चांगल झाल पण मी म्हंटल मग आता तुला बोलता येणार नाही ऑफ पिरेड मध्ये. तर खट्टू झाली थोडी कदाचित माझ्या बोलण्याचा अंदाज तिला यायला वेळ लागेल. पण काळ बदलला तरी आवडत्या तासांची मज्जा कमी झालेली नाही हेच खर.

अपंगत्वाला पांगळं बनवणारा माणूस, 'मेजर जनरल इयान कार्डोझो'... विनीत वर्तक

अपंगत्वाला पांगळं बनवणारा माणूस, 'मेजर जनरल इयान कार्डोझो'... विनीत वर्तक

'मेजर जनरल इयान कार्डोझो' हे नाव ऐकलं, की पहिला प्रश्न मनात येईल, की कोणाचं नाव आहे हे? भारतीय आहेत का? कारण आपली भारतीय असण्याची व्याख्या आधी आडनावावरून सुरू होते. आपल्याकडे नको त्या लोकांना हिरो बनवण्याची घाई असते. १० शतक मारणाऱ्या खेळाडूवर शाळेत धडा येतो किंवा १०० चित्रपट करणारा हिरो मिलेनियम सुपरस्टार बनतो. पण आपल्या जिद्दीपुढे अपंगत्वाला पांगळं करणारे मेजर जनरल इयान कार्डोझो मात्र भारतीयांना कधीच दिसत नाहीत.

इयान कार्डोझो '५ गोरखा रायफल'मध्ये १९७१ सालच्या युद्धाच्या वेळी मेजर या हुद्द्यावर कार्यरत होते. युद्धात मेजर इयान कार्डोझो यांचा पाय लँडमाईनवर पडला. त्यावेळी झालेल्या स्फोटात त्यांच्या पायाला प्रचंड जखमा झाल्या. त्यांना त्या अवस्थेत जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांच्या पायाच्या जखमा इतक्या होत्या, की पाय कापण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता, तेव्हा मेजर इयान कार्डोझो यांनी तिथल्या डॉक्टरला विचारलं, 'तुमच्याकडे मॉर्फीन आहे का बेशुद्ध करण्यासाठी?'. डॉक्टर म्हणाले, 'नाही'. मग त्यांनी विचारलं, 'तुम्ही माझा पाय कापू शकाल का?' डॉक्टर म्हणाले, 'आमच्याकडे काहीच हत्यार नाही, की आम्ही ऑपरेशन करू शकू'. एका सेकंदाचा विलंब न लावता त्यांनी जवळच असलेल्या आपल्या सैनिकाला बोलावलं, आणि विचारलं, “माझी खुकरी कुठे आहे”? त्याने क्षणाचा विलंब न लावता त्यांना आणून दिली. त्या सैनिकाला मेजर इयान कार्डोझो यांनी सांगितलं, 'या खुकरीने माझा पाय काप'.

रक्ताच्या थारोळ्यात पूर्ण पाय आणि असंख्य वेदना असताना त्या सैनिकालाही खुकरीने पाय कापण्याचं धैर्य झालं नाही. त्याने तसं करण्यास नकार दिला. दुसऱ्या क्षणी मेजर इयान कार्डोझो यांनी खुकरी आपल्या हातात घेतली, स्वतःच्या हाताने आपला पाय कापल्यावर ऑर्डर केली, की 'जा, आता ह्याला दफन करा'. स्वतःचा पाय स्वतःच्या हाताने कापायला काय धैर्य लागत असेल, याचा आपण विचारही करू शकत नाही. इथवर मेजर इयान कार्डोझो थांबले नाहीत, आता कापलेल्या भागावर शस्त्रक्रियेची गरज होती. कमांडींग ऑफिसरने त्यावेळेस म्हंटलं, की “तू खूप लकी आहेस. आत्ताच आम्ही युद्धात एका पाकिस्तानी सर्जनला बंदी बनवलं आहे, तो तुझ्यावर शस्त्रक्रिया करेल", त्यावर मेजर इयान कार्डोझो यांनी सांगितलं, माझ्यावर कोणताही पाकिस्तानी डॉक्टर शस्त्रक्रिया करणार नाही. मला माझा भारत परत हवा आहे. अरे, कुठून येते ही देशभक्ती, आणि हा जाज्वल्य देशाभिमान!  आपण करंटे आहोत, आपल्यांत ह्याच्या एक शतांशही देशाचा अभिमान नाही.

मेजर इयान कार्डोझो यांना दुसरीकडे हलवण्यासाठी युद्धामुळे चॉपरही मिळत नव्हतं. तेव्हा त्यांनी दोन अटींवर आपल्या कमांडींग ऑफिसरला स्वतःवर शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली. त्यातली पहिली गोष्ट होती, ती म्हणजे, एक वेळ मेलो तरी चालेल पण माझ्या रक्तात पाकिस्तानी माणसाचं रक्त मिसळणार नाही. दुसरी म्हणजे,  पूर्ण शस्त्रक्रियेच्या वेळी कमांडींग ऑफिसर म्हणजे ते स्वतः, ती पूर्ण होईपर्यंत समोर राहतील. यामागे कारण होतं, की त्याकाळी भारतीय सैनिकांना शस्त्रक्रियेच्या वेळी त्रास देण्याचे प्रकार पाकिस्तानी डॉक्टरकडून घडले होते. या दोन अटींचा मान ठेवून मेजर मोहम्मद बशीर यांनी मेजर इयान कार्डोझोवर शत्रक्रिया केली.

त्या पायाच्या जागेवर मेजर इयान कार्डोझो यांना लाकडी पाय बसवण्यात आला. युद्ध संपलं, पण पुढे काय? मेजर आपल्या जबाबदाऱ्या पूर्वीसारख्या पूर्ण करू शकणार नाही असं म्हणत डॉक्टरांनी अपंगत्वाची जाणीव त्यांना करून दिली, पण मेजरनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने आपली शारीरिक क्षमता वाढवायला सुरूवात केली. एक लाकडाचा पाय असणाराही दोन सामान्य पाय असणाऱ्या लोकांपेक्षा वरचढ ठरू शकतो, हे सिद्ध करण्याचा मेजरनी चंग बांधला. भारतीय सेनेच्या शारीरिक चाचण्यातून जाण्यास डॉक्टरांनी त्यांना मनाई केली. पण त्यांच्या इच्छेपुढे आणि जिद्दीपुढे डॉक्टर नमले. त्या चाचणीत मेजर इयान कार्डोझो यांनी ७ ऑफिसरना मागे टाकले. हे सातही ऑफिसर सामान्य पाय आणि फिजिकली फिट असणारे होते.
एकदा त्यांनी आर्मीच्या व्हाईस चीफना विचारलं, मी अजून काय करू शकतो? त्यावर ते म्हणाले, माझ्यासोबत जम्मू आणि काश्मीर ला इथून चल. आर्मी व्हाईस चीफ ६००० फुट उंचीवर हेलिकॉप्टरने पोहोचण्याअगोदर मेजर इयान कार्डोझो हे, तो रस्ता पायी चढून गेले. हे बघून त्यांची केस त्यांनी त्या काळी भारताचे सैन्य प्रमुख टी.एन.रैना यांच्याकडे पाठवली. सैन्य प्रमुखांनी त्यांना त्यांच्यासोबत लडाखला येण्याचा आदेश दिला. लडाखला डोंगरात आणि बर्फात चालताना बघून सैन्य प्रमुखांनी त्यांना बटालियनची (एका बटालियन मध्ये १०० ते २०० सैनिक असतात) कमांड दिली. अश्या प्रकारे ते भारतीय सैन्यातील पहिले अपंग कमांडिंग ऑफिसर बनले. त्यानंतरही अनेक स्पर्धेत आणि कामात एखाद्या धडधाकट ऑफिसरला लाजवेल अशी कामगिरी त्यांनी केली. त्यांच्या या अतुलनीय जिद्दीला सलाम म्हणून त्यांना ब्रिगेडची जबाबदारी देण्यात आली (एका ब्रिगेडमध्ये ४००० इतके सैनिक असतात).

'आपला स्वतःचा पाय का कापला?', असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं, की मला लाचार व्हायचं नव्हतं. त्या तुटलेल्या पायाचं ओझं मला वाहायचं नव्हतं. पाय गेला म्हणून मी संपलो नव्हतो, माझ्यात तीच धमक बाकी होती, माझ्यात तोच सैनिक जिवंत होता, माझ्यातली विजीगीषु वृत्ती जिवंत होती, मग घाबरायचं कशाला? अपंगत्वाला त्यांनी आपल हत्यार बनवलं. मग जे मिळवलं, तो इतिहास आहे. या हिरोने तरुण पिढीला जो संदेश दिला आहे, तो त्यांच्या शब्दांत, 

 “You have only one life to live, live it to full. You have 24 hours in a day: Pack it up”. 

अपंगत्वालाही पांगळं बनवणाऱ्या  या जिगरबाज, शूरवीर, पराक्रमी सैनिकी अधिकाऱ्याला माझा साष्टांग दंडवत. देशभक्ती काय असते, ते अश्या मेजर जनरल इयान कार्डोझोचं आयुष्य बघितल्यावर कळते. तुम्ही दुसऱ्या मातीचे आहात सर. आम्ही करंटे म्हणून जन्माला आलो, आणि तसेच जाऊ. पण अपंगत्वालाही पांगळं करणारे तुमच्या शसारखे अधिकारी भारतीय सैन्यात आहेत, म्हणून आज भारत अखंड आहे. तुमच्या सारख्या अधिकाऱ्यांना माझा पुन्हा एकदा दंडवत.