भारताचं वाढलेलं वजन... विनीत वर्तक ©
गेल्या गुरुवारी चीन चे विदेश मंत्री वांग यी हे बोलावणं नसताना भारतात दाखल झाले. त्यांनी ओ.आय.सी. मिटिंग मधे काश्मीर चा राग आवळल्या बद्दल भारताने आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. तसेच त्यांना खडे बोल ही सुनावले. यानंतर त्यांनी दिल्लीकडे न बोलावता आपला मोर्चा वळवला. भारताने त्यांना त्यांच्या लायकीची वागणूक त्यांना दिली. दिल्लीत त्यांच विमान सामान्य लोकांसाठी असलेल्या ठिकाणी उतरवण्यात आलं. त्यांना रिसिव्ह करायला ही कोणतेही मोठे अधिकारी उपस्थित नव्हते. तसेच सामान्य अरायव्हल हॉल मधून त्यांना विमानतळाबाहेर नेण्यात आलं. गोष्ट इकडे संपत नाही तर सुरु होते. दुसऱ्या दिवशी ते भारताचे परराष्ट्र मंत्री आणि सुरक्षा सल्लागार यांना भेटले. त्यांना बिजिंग, चीन ला यायचं आमंत्रण दिलं. त्याला दोघांनी केराची टोपली दाखवली. देखल्या देवा दंडवत करत साधी पत्रकार परिषद पण घेतली नाही. वांग यी यांनी पंतप्रधानांची भेट घेण्याची विनंती सुद्धा भारताने धुडकावून लावली आणि चीन च्या मंत्र्याला आल्या पावली परत पाठवलं. एकदंर काय तर "ते विनाआमंत्रण आले. तोंडावर आपटले आणि जाताना कारवाई करण्याच्या सूचना घेऊन गेले".
अमेरीकेच्या कॉमर्स सेक्रेटरी जिना रायमोंडो त्यांच्या सोबत इंडियन- अमेरीकन एडव्हायझर दालीप सिंग हे भारतात अमेरीकेची बाजू मांडण्यासाठी आणि भारताचं सहकार्य मिळवण्यासाठी दाखल झाले आहेत. अमेरीकेने आणि युरोपियन युनियन ने घातलेल्या निर्बंधांचा परीणाम रशियावर होत नसल्याने अमेरीका पूर्णपणे बॅकफुटवर गेली आहे. भारत आणि चीन जोवर रशियाच्या बाजूने आहे तोवर याचा आपल्या निर्बंधांचा काही परीणाम होणार नाही हे अमेरीका जाणून आहे. चीन सोबत अमेरीकेचा ३६ चा आकडा आहे. त्यामुळे चीन ला वळवण अशक्य आहे. भारत आत्तापर्यंत तटस्थ राहिलेला होता पण आता भारत आपलं हित साधण्यासाठी रशियासोबत सहकार्य करार करण्यात पुढे पाऊल टाकतो आहे.
रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्गेई लाव्रोव्ह भारतात दाखल होत आहेत. रशिया भारताला क्रूड ऑइल जवळपास २५%- ३०% सवलतीत भारताला देण्यासाठी तयार झालेला आहे. याच सोबत अमेरीकन डॉलर च महत्व करण्यासाठी रुबल आणि रुपयात व्यवहार करण्याची तयारी ही दर्शवली आहे. या सर्व करारांना मूर्त स्वरूप देण्यासाठी ते स्वतः भारतात दाखल होत आहेत. या भेटीत ते भारताचे परराष्ट्रमंत्री, भारताचे पंतप्रधान यांची व्यक्तिशः भेट घेणार आहेत. १ एप्रिल पासून रशियाने सर्व युरोपियन देशांना रुबल अकाउंट असणं गरजेचं असल्याचं फर्मान काढलं आहे.
ब्रिटन च्या परराष्ट्र मंत्री एलिझाबेद ट्रूस भारतात दाखल झाल्या आहेत. त्यांनी आज संध्याकाळी भारताच्या परराष्ट्र मंत्र्याची भेट घेतली आहे.
एकाचवेळी जगातील सगळे महत्वाचे मंत्री भारतात दाखल होण्यामागे काय कारण आहे? अमेरीका, चीन, रशिया, जपान, ब्रिटन, इस्राईल ( हा दौरा कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याने पुढे गेला आहे. ) या सर्व देशांचे परराष्ट्र मंत्री अचानक भारतात येऊन आपल्या देशाची लॉबिंग करत आहेत. हा बदल आहे भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणात वाढलेल्या वजनाचा. आज भारत काय भुमिका घेतो अथवा भारताने काय भुमीका घ्यावी यासाठी जगातील सगळ्याच देशांना भारतात लॉबिंग करावी लागत आहे.
भारत आपल्या राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देताना त्या देशांना आपली जागा नाकावर टिच्चून दाखवत आहे. आज चक्क अमेरीका म्हणते आहे की, 'जे देश अमेरीकेचे निर्बंध जुगारून रशियाशी व्यवहार करतील त्यांना त्याचे परीणाम भोगावे लागतील. पण त्याचवेळी अमेरीकेच्या मित्रांसाठी मात्र कोणतीही लाल रेषा नाही.' हे वाक्यच दाखवते की भारतासाठी कोणतेही निर्बंध अमेरिका लावणार नाही. रशियाकडून भारताने किती प्रमाणात क्रूड ऑइल घ्यावं यावर अमेरीका कोणतच बंधन टाकणार नाही.
भारताचे पंतप्रधान विदेश दौरे करतात म्हणून खूप टिका झाली आहे. पण या दौऱ्याची फळ आता दिसत आहेत. एकीकडे मुस्लिम राष्ट्रांच्या बैठकीला गैरहजर लावून किंवा त्याच महत्व कमी करत गल्फ देशांच शिष्टमंडळ काश्मीर मधे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. खरे तर अक्षरशः पैसा ओतत आहे. हे सगळं शक्य होण्यामागे गेल्या काही वर्षात भारताची बदललेलं चित्र आणि भारताच आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेलं वजन कारणीभूत आहे.
जय हिंद!!!
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनित वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Very nice
ReplyDeleteExcellent
ReplyDeleteखूप छान माहिती दिली आहे सर
ReplyDeleteExcellent
ReplyDeleteVery very EXCELLENT!!!
ReplyDeleteGineus
ReplyDeleteआपणच आपली स्तुती करणे म्हणजे काय याचे हे उत्कृष्ट उदाहरण.
ReplyDeleteExactly
Deleteअतिशय महत्वपूर्ण माहिती .खूप खूप थँक्स सर 🙏🙏
ReplyDeleteNice information
ReplyDeleteमस्तच...👌😀
ReplyDeleteखूप मस्त 👌👌👍👍
ReplyDelete